Sunder Vichar Marathi | एका वारकऱ्याची श्रीमंती | जय हरी विट्ठल

1
458
Sunder Vichar Marathi | एका वारकऱ्याची श्रीमंती | जय हरी विट्ठल
Sunder Vichar Marathi | एका वारकऱ्याची श्रीमंती | जय हरी विट्ठल

Sunder Vichar Marathi |
एका वारकऱ्याची श्रीमंती |
जय हरी विट्ठल

कंपनीत नोकरी करीत असतांना कंपनीच्या कामनेच
महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जात असे…!

असाच एकदा सोलापूर कडून कोल्हापूर कडे येत होतो. आषाढी एकादशी
संपून ६-७ दिवस झालेले होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गानी घरी
परतत होती. त्या दिवशी सकाळी लवकरच सोलापूरहून निघालो होतो.

९.३० ते १.०० ची वेळ झाली आणि खूप जोरात भूक लागली होती…
रस्त्यावरी एका चहा – नाश्ताच्या दुकानात थांबलो.

नुकतीच कोवळी उन निघाली होती… कारण जवळपास सात आठ
दिवसापासून ढगाळ वातावरण होते आणि सुर्यानारायानाचे दर्शन झालेले
नव्हते….

Sunder Vichar Marathi |
एका वारकऱ्याची श्रीमंती |
जय हरी विट्ठल

दुकानदाराला नाश्ता मध्ये काय गरम आहे अशी विचारणा करून शेवटी
कांदे पोहे, मिसळ आणि चहा द्यायला सांगितले.
दुकानदार म्हणाला… आपण आरामात बसा… मी पंधरा ते वीस मिनिटांत
सगळे आणून देतो.

मी दुकानाच्या समोर कोवळ्या ऊनेची मज्जा घेत उभा होतो…
त्याच वेळी मला दहा बारा वारकरी जातांना दिसले… त्यातलेच
एक पंचावन्न – साठवर्षाचे वारकरी जोडपे मी उभा असलेल्या
दुकानाकडे आले…!

त्यांच्या अंगावर एकही धड कपडे नव्हते…! बाईच्या खाकेत कपड्याने
बांधलेली एक गाठोडी होती आणि डोक्यावर तुळस होते.

माणसाच्या डोक्यावरही कपड्याने बांधलेले एक मोठे गाठोडे होते
आणि खाकेत एक मोठासा थैला होता.

150+ Best Motivational Quotes In Marathi | सुंदर विचार मराठी

दोघेही खूप दमलेले दिसत होते… दुकाण्याच्या बाजूला आपला सगळा
सामान खाली ठेवून पटकन तेही खाली जमिनीवर बसले.

मी हे सगळे बघत होतो… मी थोडा त्यांच्या जवळ गेलो आणि नमस्कार
करून विचारले…. काका, वारी वरूनच परत होत आहात काय…?
दोघेही हो म्हणाले…. नंतर मी विचारले… काका नाश्ता करणार…
ते काकू कडे बघत खूप हळूच हो म्हणाले…

मी आपला सहजच म्हणालो… काका पोटभर खा…
माझ्या मनात थोडा अभिमान आला की, मी ही एक प्रकारे
लहान का होईना पुण्य करीत आहे…!

नंतर त्यांना विचारले रस्त्यात चालता चालता काय करता…
काका म्हणाले… पाडुरंगाचे नाव घेतो तर कधी अभंग….
म्हणजे रस्ता कसा पार झाला कळतंच नाही…!

मी काकांना आपली विनंती केली की… एखादा अभंग ऐकवाल का…?
काकांनी एका क्षणाचा हि उशीर न लावता अभंगाला सुरुवात केली
आणि काकूंनी टाळावर साथ दिली. तो वेळ कसा गेला काहीच
समजले नाही.

त्या काका – काकूंना विनंती करून आपल्या सोबत बसवून पोटभर
नाश्ता केला. पुन्हा त्यांना विचारले, अजून किती दिवस लागणार घरी
पोहचायला…? तर ते म्हणाले अजून पांच – सहा दिवसाचा प्रवास
करावा लागणार…!

एका वारकऱ्याची श्रीमंती | जय हरी विट्ठल |
Sunder Vichar Marathi

नंतर निघायची वेळ आली. मी निरोप घेण्यासाठी नमस्कार केला…
त्यांनी माझे आभार मानले… आणि आम्ही दोघेही निघालो…
तोच माझ्या मनात आले की, अजून यांना घरी पोहचायला
पांच – सहा दिवस बाकी आहेत… काहीतरी आपण
मदत करूया…

काका काकूंना आवाज देवून थांबवून आणि त्यांच्या जवळ जाऊन
शंभर रुपयाची नोट देत म्हणालो, काका हे पैसे ठेवा.
अजून तुमचा पांच सहा दिवसाचा
प्रवास आहे… रस्त्यात काही नाश्ता वैगेरे कराल….

काकांनी एकदम प्रेमाने नकार दिला… मला थोडे आश्चर्य वाटले…
मी म्हणालो… काका तुम्ही पैसे का घेत नाहीत…
त्यावर ते बोलले…

बाळा… वारीला जाण्यासाठी घरून निघतांना खिशात एक पैसा ही
ठेवला नाही… पूर्ण वारी तो पांडुरंगच आमच्या जिवांची काळजी घेत
राहतो… त्यापुढे बाळा… तुझी ही 100 रूपयांची नोट आमच्या काय
कामाची.

घरून निघालो तेव्हाही मी खिशात एकही पैसा घेतला नाही आणि
यावेळी पण माझ्या खिशात एक ही पैसा नाही…. पांडुरंग आमची
पूर्ण काळजी घेतो…!

मी एकदम सुन्न झालो… काय प्रतिक्रिया द्यावे तेही कळत नव्हते….
अगदी एका क्षणातच मला माझी लायकी कळली…!
मन भरून आले आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले…
तसाच मी त्या माउलीच्या पायावर डोके ठेवले.

आज अंदाजे पंधरा वर्षानंतर ही घटना आठवली आणि ती घटना
डोळ्यासमोर जशी च्या तशीच फिरायला लागली…

आज माझ्याकडे सगळे आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍या पैकी
सुखांत पार पडेल एवढी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती
नक्कीच नाही.

पण मग त्या वारकरी काकांना अंगावर धड कपडे नाहीत,
धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात
एक पैसा ही नाही. असे असून सुद्धा एक आणीबाणी साठी म्हणून
मी पुढे केलेले 100 रुपये सुद्धा हा भला माणूस नाकारतो आणि
प्रंचंड आत्मविश्वासानी सांगतो माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी
तो पांडुरंगच करेल.

त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावे असे नाहीं वाटले, कारण
त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी…! त्यामुळे त्याला ना उद्याची
भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहीली आणि नजर स्वतः कडे वळली.
त्यानी शाश्वत श्रद्धेची आणि भक्तीची पुंजी जमवली आणि
मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.

हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा
आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे…
हीच कळकळीची तुझ्या चरणी प्रार्थना…

जय हरी विट्ठल…!

Marathi Motivational Speech | चिंता, दुःख, टेन्सन विसरून जाल

pandurang katha – खूपच सुंदर कथा आहे | एक दिवसाचा पांडुरंग

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here