Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi

0
73
Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi
Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi

Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi

नमस्कार मित्रांनो…
आज आपण एक गोष्टीसह हे शिकणार कि जीवनात कोणतीही परिस्थिती
आल्यास आपली किंमत कमी होऊ देवू नये… तर मग चला सुरु करू या…

एका हॉलमध्ये सेमिनार सुरु असतांना त्या वक्ता साहेबाने एक दोन हजाराची नोट
घेऊन हात वर केले आणि तिथे बसलेल्या लोकांना विचारले की ही दोन हजार
रुपयाची नोट कुणाला पाहिजे…

तिथे बसलेल्या जवळपास सगळ्याच लोकांनी दोन हजारच्या नोट करितां
आपले हाथ वर केले… एवढे हाथ बघून ते साहेब म्हणाले
मी ही नोट तुमच्या मधून कुणीही एकालाच देईन….

असे बोलून त्यांनी त्या नोटला आपल्या दोन्ही हातात घेवून चुरगळली आणि
पुन्हा विचारले… आता हि नोट कुणाला पाहिजे… यावेळी ही जवळपास
सगळ्यांनीच आपले हाथ वर केले…

Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi

बरे… असे म्हणत त्यांनी ती नोट खाली फेकली आणि त्या नोटला
पायाने घासले… नंतर नोट हातात घेऊन बघितले तर नोट खूप घाणरेडी
झालेली होती…

ती घाणरेडी नोट दाखवून पुन्हा त्या साहेबांनी विचारले की… आता कोण आहे…
ज्याला ही नोट हवी आहे…?
यावेळी ही जवळपास सगळ्याच लोकांनी नोट साठी आपले हाथ वर केले…

यावेळी वक्ता साहेब म्हणाले…
मित्रांनो…
आज आपण आयुष्याचा खूप महत्त्वाचा धडा शिकलात. कारण आपण पाहिले की…
या नोट सोबत मी खूप काही केले… तरीही ही नोट तुम्हाला पाहिजेच…
याचे कारण हे आहे की… या नोटची किंमत आताही दोन हजार रुपयेच आहे.

आयुष्यात खुपदा आपण पडतो… हारतो…. खुपदा आपण घेतलेले निर्णय
आपल्यालाच मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटायला
लागते की आपली काहीही किंमत नाही. पण आयुष्यात तुमच्या सोबत
कितीही वाईट घडले… घडू द्या … किंवा भविष्यात कधी घडेल…
यामुळे तुमची कधीही किंमत कमी होत नाही.
आपण खूप मौल्यवान आहात ही गोष्ट कधीही विसरू नका.

मित्रांनो…
नेहमी एक लक्षात ठेवा. जे काही भूतकाळामध्ये घडले….
त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला
वाईट करू नका. कारण तुमच्याकडे खूप मौल्यवान
गोष्ट आहे आणि ते म्हणजे तुमचे मौल्यवान आयुष्य…
हे आयुष्य भरपूर आनंदात आणि सुखात जगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here