sunder vichar in marathi
या ३८ गोष्टी करून नेहमी आनंदी राहा.
1) अति विचार करणे
पूर्णतः थांबवा.
2) पुरेशी शांत झोप घ्या.
यामुळे दिवसभर तुम्हाला
फ्रेश वाटेल.
3) दररोज व्यायाम करा
दररोज व्यायाम करणे
म्हणजे आर्थिक बचत करणे
आहे. आपल्याला होणाऱ्या
विविध आजारांना थांबवणे
आहे.
4) ज्या गोष्टी तुम्हाला पटत
नाहीत त्यांना स्पष्ट नाही
म्हणायला शिका. त्यावर
नंतर विचार करत बसून
मनात कुढू नका.
5) दिवसातील काही
वेळ स्वतःसाठीही ठेवा.
6) लहान मुलांमध्ये मिसळा
आणि काही काळ त्याच्या
सारखेच होऊन वावरा.
7) जास्तीत जास्त शुद्ध
हवा शरीरात जाईल…
याची काळजी घ्या.
दीर्घ श्वसन करा
8) स्वत:च्या चांगल्या
पेहरावातील हसऱ्या
चेहऱ्याचा फोटो नजरेला
सतत पडेल असा ठेवा.
9) रिकामे राहू नका
काहीतरी नवीन
शिकण्याचा प्रयत्न करा.
10) दुसरा कोणी आपले
लाड करेल याची वाट
पाहू नका स्वतःच
स्वतः चे लाड करा.
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
11) इतरांशी स्वतःची
तुलना करणे पूर्णपणे
थांबवा
12) वर्तमानात जगा…
भूतकाळाची आठवण
करू नका. तसेच
पश्चाताप ही करत बसू
नका.आणि भविष्यकाळाचा
विचार करणे थांबवा.
13) एखादी बाग…. देऊळ
नैसर्गिक वातावरणाच्या
ठिकाणी प्रसन्नता अनुभवत
दहा पंधरा मिनिटे घालवा
14) नकारत्मक शब्दांचा
वापर पुर्णपणे टाळुन…
उत्साहपूर्ण चांगल्या
शब्दाचा वापर रोजच्या
संभाषणात करा.
15) नेहमी सकारात्मक
(पॉझिटिव्ह) विचार करा.
निगेटिव्ह विचारांच्या
माणसांपासून दूर राहा.
sunder vichar in marathi
या ३८ गोष्टी करून नेहमी आनंदी राहा.
16) रिकामे मन सैतानाचे
घर असते. त्याकरिता
स्वतःला कोणत्यातरी
आवडत्या छंदामध्ये
गुंतवा. सतत काहीतरी
करत रहा. सतत व्यस्त
राहा.
17) रोजचे काम करतांना
आवडीचे संगीत
बॅकग्राउंडला चालु असु द्या.
आवडते गाणे पुन्हा पुन्हा
ऐका आणि गुणगुणत रहा.
18) चिडचिडेपणा… डोक्याला
आठ्या पाडणारा स्वभाव
उखडून टाका. मनाला सतत
शांत व प्रसन्न राहण्याची
सुचना करा.
19) दुसऱ्यांचे यश पाहून
तुम्ही घाबरुन जाऊ नका
20) तुमच्या कार्यात सहाय्य…
मदत न करणाऱ्यांकडे
दुर्लक्ष करा.
21) महत्त्वाच्या नसलेल्या
गोष्टींवर वेळ वाया घालू
नका.
22) नाहक दुसऱ्यांच्या
जबाबदाऱ्या स्वतःच्या
अंगावर घेऊ नका.
स्वतःच काम वाढवू नका.
23) आज दिवसभर काहीतरी
चांगले घडणार आहे… ही
सूचना सकाळी उठल्या
उठल्या पाच ते दहा वेळा
मनाशी म्हणा.
255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार
24) समोरच्या माणसातील
चांगल्या गोष्टी दाखवून
त्याला प्रोत्साहित करा.
स्वत:बद्दल कमी बोला.
समोरच्या बद्दल अधिक
बोला.
25) चांगल्या विचारांचे
एखादे छोटेसे पुस्तक
स्वत:जवळ बाळगा आणि
त्यातील एखादा विचार घेऊन
त्यावर मनन – चिंतन करा.
26) चालण्याची गती थोडी
वाढवा व ताठ मनाने स्मित
व्यक्त करत आवडत्या
पेहरावात समाजात वावरा
27) विनोदी सिरीयल पाहतांना
खळखळुन हसा व शरीराची
हालचाल होऊ द्या.
28) दुसरे आपल्याबद्दल
काय विचार करतात
हा विचार करणे थांबवा.
29) दुसऱ्यांची तुलना
करणे थांबवा
30) भविष्याचा अतिविचार
करणे थांबवा.
31) आपल्या आवडत्या
व्यक्तींचा विचार करा.
32) तणावापासून दूर रहा.
sunder vichar in marathi
या ३८ गोष्टी करून नेहमी आनंदी राहा.
33) दररोज २० ते २५
मिनीटे उन्हात फिरा.
यामुळे शरीराला विटामिन
डी मिळते. काही वेळेला
विटामिनच्या कमतरते
मुळे ही तणाव वाढतो.
34) घरामध्ये कुत्रा किंवा
मांजर पाळल्यामुळे
आपला आनंद निश्चतीतच
वाढतो. कारण की, आपण
आपले काम संपूण घरी
आलो तर त्यांच्यासोबत वेळ
घातल्यामुळे संपूर्ण तणाव
नाहीसा होतो.
35) समोरच्याला माफ
करायला शिका. आणि
माफी मागायलाही शिका.
यामुळे आपल्याला त्रास होत
नाही. क्षमा करणे आणि क्षमा
मागणे यावर विश्वास ठेवा.
36) तुमच्या इच्छेनुसार
तुमच्या आवडीचे काम
करा. किंवा मनापासून
काम करा.
३७) ध्येय निश्चित करा
आणि त्यांच्या दिशेने
कार्य करा.
३८) मनात येणाऱ्या
प्रत्येक गोष्टींकडे
लक्ष देऊ नका.