ती सध्या काय करते | पहिले प्रेम विसरता विसरत नाही | Sunder Vichar
एक प्रसिद्ध म्हण आहे की…. आपले पहिले प्रेम विसरता विसरत नाही.
याच प्रकारचा एक अनुभव माझ्या मित्राला आला आहे…
कदाचित तुमच्याही जुन्या आठवणी जाग्या होतील.
नक्की वाचा….!
एक दिवस विजय च्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकाने फोन येतो…
विजय… इच्छा नसतांनाही तो फोन उचलतो….आणि विचारतो…
कोण बोलत आहे…?
समोरचा गोड आवाज विचारत होता…! विजय बोलते का…?
विजयला आवाज एकदम ओळखीचाच वाटला. मग त्याने विचारले हो,
पण आपण कोण बोलत आहात…?
मी प्रीती, आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले
प्रीती…!
हो, विजय मी प्रीतीच बोलतेय…!
विजय ने हळूच स्वयंपाक घरात डोकावले, तर बायको पोळ्या लाटण्यात मग्न
होती. मग विजय हॉलमधून गच्चीवर आला. छातीची धडधड आता वाढली होती.
श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असे वाटू लागले…
नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो…
तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या प्रीतीला आज आपली गरज
लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला.
आता काय बोलाव हे कळतच नव्हते… पण तिचा आवाज ऐकून तो परत
भानावर आला…
काय कुठे आहेस…? खूप वर्षात भेट नाही, फोन नाही….
राकेश ने नंबर दिला म्हणून फोन करत आहे….!
तिचा आवाज ऐकतच रहावे असे विजयला वाटत होते…
आता मात्र तिने अजून एक सुखद धक्काच दिला….
भेटायचय होते तुला, कधी वेळ आहे…?
त्याला क्षणभर वाटले की सरळ म्हणावे… तुझ्यासाठी कधीपण…
परंतु विजय आपल्या मनाला आवर घालत म्हणाला रविवारी.
तिने पुन्हा विचारले, भेटूयात कुठे…
तुझ्या घरी मी येऊ की तू माझ्या घरी येतोस…?
आता त्याला स्वर्ग दोन बोटेच उरला होता. अजून हुरूप आला…
एखाद्या तटस्थ ठिकाणी भेटूयात का…?
कुठे ही…. ती म्हणाली….
मग त्याने शहरातील एका चांगल्या रेस्टॉरंट चे नाव सांगितले…
भेटीचे ठिकाण आणि वेळ निश्चित झाली. आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही
मोठे वाटू लागले.
शनिवारला ऑफिस मधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन काही नवीन कपडे घेतले,
सलून मध्ये जाऊन फेशिअल मसाज केला… पांढऱ्या झालेल्या केसांना काळा रंग दिला…
अशाप्रकारे आपला सगळा सेटअप बदलला.
नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले….
तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असे सांगून बायकोलाही शांत केले.
ती पण भोळी होती. तिला चुकीचे काहीच वाटले नाही…!
आपल्या समोर जीवन जगणाऱ्या नवऱ्याला आतून होणाऱ्या गु्दगुल्या बायकोला
जाणवल्या नाहीत.
हजारो रुपये शूज, चष्मा यावर खर्च होत होता, पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.
रविवार उजाडला. सकाळपासून स्वारी एकदम खुशीत होती.
आपली गाडी स्वच्छ धुतली… चार वाजले… साहेब तैयार होऊन गाडीत बसले…
बायकोने शुभेच्छा दिल्या. मुलानंही आपले वडील कोणत्या तरी कामगिरीवर
चालले आहेत असे वाटून नमस्कार केला.
गाडी रेस्टॉरंट च्या दारात थांबली.
ती हातात गुलाबाचे फुल घेवून त्याची प्रतीक्षा करत होती.
तिच्याकडे पाहून हरखून गेला. दोघे आत जावून बसले.
महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या. बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरले.
सगळे अगदी छान पार पडले. समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून
हा तर खुलूनच गेला… नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले…
आणि यावर सही करशील का…? असे लाडाने विचारले.
विमा पॉलीसीचे कागद पाहून तो थबकला.
ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केली आहे…!
फॉर्म मी नंतर भरेन, तू फक्त सही कर.
सही झाली आणि हप्ते सुरु झाले.
दर हप्त्याला आठवणी ताज्या होत राहिल्या…
LIC जिंदाबाद
.
.
.
.
.
.
म्हणून मित्रांनो हे माहीत असणे खूप गरजेचे आहे की…
.
.
.
.
.
ती सध्या काय करते…?
ती सध्या काय करते | पहिले प्रेम विसरता विसरत नाही | Sunder Vichar