Sunder Vichar Marathi
मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट
रेल्वेच्या डब्यात भिक्षा मागणारा एक भिकारी असतो. दररोज सारखा आज ही
तो डब्यात भिक्षा मागत असतो तेव्हा त्याचे लक्ष एका महागडे कपडे घातलेल्या
व्यक्ती वर जाते.
त्याला बघताच या भिकाऱ्याला वाटले की नक्की हा खूप श्रीमंत व्यक्ती आहे.
याच्या कडून नक्की आपल्याला काहीतरी वेगळीच आणि महागडी भिक्षा
मिळणारच.
भिकारी त्याच्या जवळ जाऊन भिक्षा मागू लागला. भिकाऱ्याने त्या श्रीमंत व्यक्तीला
भिक्षा मागितली तेव्हा भिकाऱ्याकडे बघून तो मालक म्हणाला…
” तू तर नेहेमीच दुसऱ्यांना काहीना काही मागतच फिरतोस, परंतु कधी कुणाला तरी
कांही देतोस का…? त्यावर तो भिकारी म्हणाला, ” मालक, मी एक भिकारी आहे.
मी नेहेमीच लोकांना भिक्षाच मागत फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय
लायकी असणार…?
Sunder Vichar Marathi
मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट
मालक उत्तरला :- अरे… जर तू कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला
भिक्षा मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः एक व्यापारी आहे आणि
माझा व्यवसाय देवान – घेवाण चा आहे. जर का भिक्षेच्या बदल्यात तुझ्या जवळ
मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भिक्षा देईन.
इतक्यात स्टेशन आले आणि ते मालक स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी
मालकाच्या बोलण्यावर विचार करू लागला. मालकाने दिलेले उत्तर त्याच्या मनात
फिरू लागले. त्याच्या मनात आले की मालक म्हणाले ते बरोबर असावे.
मी कुणाला भिक्षेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भिक्षा
मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार…?
पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिक्षाच
मागत राहायची…?
खूप वेळ मनातल्या मनात विचार करून भिकाऱ्याने ठरवले की यानंतर जो कुणी व्यक्ती
आपल्याला भिक्षा देईल त्याला मी कांही ना कांही नक्की देईनच. पण द्यायचे तरी काय…?
जो स्वतःच एक भिकारी आहे…! तो व्यक्ती दुसऱ्यांना काय देऊ शकेल…?
दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात फिरत होता पण त्याला याचे उत्तर सापडत
नव्हते.
विचारांच्या गुंगीत तो दुसऱ्या दिवशी स्टेशन जवळ बसला होता. तेव्हा त्याचे लक्ष
स्टेशन जवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या
मनात विचार आला की भिक्षा देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुले
द्यायला काय हरकत आहे…? आपला हा विचार त्याला खूपच आवडला आणि त्याने
लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
Sunder Vichar Marathi, मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट
तो गाडीच्या डब्यात शिरला आणि नेहेमी प्रमाणे भिक्षा मागू लागला. जो कुणी त्याला
भिक्षा देत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे.
ती सुगंधी… ताजी फुले बघून लोक आनंदी होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना
भिक्षेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली.
आपण फक्त भिक्षा मागतो ही भावना दूर झाली.
कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भिक्षा मिळू लागली आहे.
तो रोजच्या रोज स्टेशन जवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्या
जवळ फुले असतील… तो पर्यंत लोकं भिक्षा देत असत. आणि फुले संपली की लोकं
सुद्धा भीक्षा देत नसत.
आता हे दररोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भिक्षा मागत असतांना त्याला
तोच महागडे कपडे घातलेला मालक पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्या जवळ गेला आणि
म्हणाला, ” मालक… आज बघा माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुले आहेत.
जर आज तुम्ही मला भिक्षा दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन.
” मालकाने त्याला भिक्षे मध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले
ठेवून घेतली. “
भिकाऱ्यातील हा बदल बघून मालक आनंदी झाले होते. ते म्हणाले… ” व्वा…! खूपच छान…!
आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास.” एव्हढे बोलून तो मालक गाडीतून स्टेशनवर
उतरून चालता झाला.
पण त्या मालकाचे बोललेले एक वाक्य… “ आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास. ”
त्याच्या मनात घर करून गेले. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि
मनातल्या मनात तो आंनदी होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच
चमक दिसू लागली.
आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच
आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो
स्वतःशीच मोठ्याने उद्गारला….” नाही…!
मी भिकारी नाही व्यापारी आहे…! व्यापारी…!
मी सुद्धा त्या मालका सारखा एक छान व्यापारी होऊ शकतो.
मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो.”
आजूबाजूचे लोकं आश्चर्यजनक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले.
त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि
सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या
माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले….
” ओळखलेत मला…?
आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला… ” नाही, मला कांही आठवत नाही.
आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत.”
पहिला : ” नाही, नाही…! मालक. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत.”
दुसरा : ” असे…? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना
कधी भेटलो होतो…?”
पहिला माणूस हसून उत्तरला, ” ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच गाडीत
झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले
आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतेय…? ” आणि
या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि
माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.
पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही
मिळवायचे असेल तर आपल्याजवळचे कांहीतरी द्यावे लागतेच. हा देण्या-घेण्याचा
नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे.
मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता.
दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचे मला जाणवून दिले. आणि मग मात्र
मला असे पूर्णपणे वाटू लागले की मी भिकारी नाही…. व्यापारी आहे. हा आत्मविश्वास
तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरोखर एक चांगला व्यापारी झालो आहे…!
तथागत भगवान गौतम बुध्दांनी ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून
देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.
अत्त दीप भव…!
शेवटी सगले कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी
समजत होता तोपर्यंत तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला
तेव्हा तो खरोखरच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत
हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखे राहिलेच काय…?
धन्यवाद….
Best 500 Suvichar | Good Thoughts In Marathi | सुंदर सुविचार