Sunder Vichar Marathi | दृष्टांत आणि सिद्धांत | Good Thoughts Marathi

0
245
Sunder Vichar Marathi | दृष्टांत आणि सिद्धांत | Good Thoughts Marathi
Sunder Vichar Marathi | दृष्टांत आणि सिद्धांत | Good Thoughts Marathi

Sunder Vichar Marathi | दृष्टांत आणि सिद्धांत
Good Thoughts Marathi

एका गृहस्थाकडे एक छान सुंदर गोल – गोल एक दगड होता. त्या दगडाचा
उपयोग ते आपल्या घरात अनेक प्रकारे करीत असत. जसे दार समोर येत आहे
तर दारासमोर लावायचा. लहान मूलांना खेळण्याच्या कामातही यायचा.
दारावर कुत्रा आला तर त्याला फेकून मारायचा. अशा अनेक कामात
तो दगड यायचा. म्हणून ते गृहस्थ नेहमी त्याला
आपल्या नजरेसमोरच ठेवायचे.

ते गृहस्थ वेळेवर जशी गरज यायची तसा त्याचा उपयोग करीत असत.
आणि हा दगड अशा नेहमी उपयोगी पडत असल्याने तो घासून
चमकायला लागला होता.

गृहस्थांच्या घरी एक दिवस काही पाहुणे आले. त्या पाहुण्यामधून एका व्यक्तीचे
सहजच लक्ष त्या दगडावर गेले. त्याने तो गोल चमकदार दगड पहिले आणि
त्याचे डोळे चकाकले…

Sunder Vichar Marathi, मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट

त्याने तो दगड हातात घेऊन निरीक्षण केल्यास त्याला जाणवले की हा खूप महाग
रत्न आहे. हा पाहुणा रत्नपारखी होता आणि याला रत्नाचीही थोडी फार माहिती होती.

तो पाहुणा सरळ त्या गृहस्थाला म्हणाला…. काय हो… हा इतका मौलिक रत्न तुम्ही
घराच्या दाराला अडसर म्हणून उभा केलात…?

गृहस्थाला काही समजेनासे झाले… ते उलट त्या पाहुण्याला प्रश्न करायला लागले…
ते रत्नपारखी म्हणाले… अहो माझा विश्वास करा हा साधा सुधा दगड नसून
अलौकिक रत्न आहे . आज याची किंमत जवळपास १५ कोटी च्या घरात तरी
नक्कीच असेल…!

झाले… त्या दगडाचे आयुष्यच बदलले. पटकन त्या गृहस्थाने तो दगड
पाहुण्यांच्या हातून ओढला आणि सरळ तिजोरीत नेऊन ठेवला.

आता कालपर्यंत लहान लहान निकृष्ट कामासाठी वापरत येणारा हा दगड
आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहू लागला…!

Sunder Vichar Marathi, मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट

दृष्टांत संपला आत्ता सिद्धांत

मानव देह हा सुद्धा त्याच दगडा सारखा आहे. तुम्ही आम्ही त्याला उगीच
खितपत ठेवला आहे . नको त्या कामाला लावला आहे.

मग एक दिवस सद्गुरुंसारखा रत्नपारखी भेटला आणी मग त्याने या
मानव देहाची किंमत दाखवली आणी नंतरच त्याला तिजोरी प्राप्त झाली.

म्हणून म्हणतो… परमार्थाला आपण तो पर्यंत लागत नाही… जो पर्यंत या
जन्माची किंमत कळत नाही… आणि तो पर्यंत ती कळत नाही तो पर्यंत
परमार्थाचा अधिकारी नाही होऊ शकत.

Sunder Vichar Marathi, मी भिकारी नाही व्यापारी आहे, छान गोष्ट

ती जाणून घ्या आपण कशाला मनुष्य जन्माला आलो आहे आणि काय
करतोय… याचे चिंतन करा…

शेवटी काय… रत्न बनून तिजोरीत राहायचे की खितपत जन्मोंजन्मी
दरवाजाला पडत राहायचे… इतरांच्या हातातले खेळणे बनायचे हे ज्याचे
त्याने ठरवावे…!

धन्यवाद
जय श्री कृष्ण हरी

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here