Sunder Vichar Status Marathi | Suvichar | नाती सुविचार

3
991
Sunder Vichar Status Marathi - Suvichar - नाती सुविचार
Sunder Vichar Status Marathi - Suvichar - नाती सुविचार

Sunder Vichar Status Marathi
Suvichar | नाती सुविचार

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी काही सुंदर असे सुविचार स्टेट्स आणले आहेत.
या सुविचार स्टेट्स द्वारे हे सांगायचे आहे की आपल्या आयुष्यात नाती महत्वाची
आहेत. नाती जपा आणि त्यांना सांभाळा.

जर आपण नाती सुविचार, मराठी सुविचार, सुंदर विचार, sunder vichar status,
good thoughts in marathi, quotes on relationship,
status suvichar, changle vichar, chhan vichar,
marathi motivation , अश्या प्रकारचे सुविचार बघत आहात तर
नक्कीच इथे तुमचे समाधान होणार. तसेच सर्व सुविचारांचे विडीओ ही दिलेले आहेत
तर आनंद घ्या सुंदर सुविचारांचा.

Sunder Vichar Status Marathi - Suvichar - नाती सुविचार
Sunder Vichar Status Marathi – Suvichar – नाती सुविचार

जर नाते सांभाळायचे असेल
तर चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी आणि
जर नाते टिकवायचे असेल
तर नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी

जर कधी आठवण आली तर
डोळे झाकू नका…. जर काही गोष्टी
नाही आवडल्या तर सांगायला उशीर
करु नका.
कधी जिथे भेटाल तिथे एक
स्माईल देउन बोलायला विसरु नका.
कधी चुक झाल्यास माफ करा. परंतु
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.

जन्म हा एक थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळी सारखे असते.
परंतू मैत्री ही वर्तुळा सारखी असते….
ज्याला कधीच शेवट नसतो.

नाती फुलपाखरा सारखी असतात
जर घट्ट धरुन ठेवलीत तर
ती गुदमरुन जातात.
सैल सोडलीत तर उडून जातात.
परंतु जर हळुवार जपली तर
जीवनभर साथ देतात.

Sunder Vichar Status | नाती सुविचार
मराठी प्रेरणादायक सुविचार

या जगामध्ये कोणताही माणूस
सर्वगुण संपन्न राहत नाही.
म्हणून काही कमतरतांना
दुर्लक्ष करून नाते टिकवून ठेवावे.

कोणी तुमच्यासाठी काय केले
हे कधीही विसरू नका…. आणि
तुम्ही कुणासाठी किती केले
ते कधीही दाखवू नका….!

आपल्या जीवनात येणारी
प्रत्येक व्यक्ती कायमस्वरूपी
आपल्यासोबत नसते.
काही जण जीवनातील
धडे शिकवण्यासाठी येतात.

ते आरोप खूप त्रास देतात…
जे चुकी नसतांना पण
आपल्यावर लावले जातात.

डोळ्यातील अश्रू…..
ज्याला कळतात…
त्याला हृदयातील
भावना सांगायची
गरज भासत नसते…!

आपल्यामुळे
दुसऱ्याला त्रास होईल
असे कधीही वागू नका.

marathi suvichar
Suvichar Status | Good Thoughts

पुरुषापेक्षा स्त्री
नेहमीच फार कणखर असते.
कितीतरी असह्य जीवघेणे प्रसंग
पेलण्याची ताकद तिच्यात असते.
दडपण आले म्हणून ती व्यसनाधीन
होत नाही. सगळे दुःख पचवून चेहरा
कायम हसरा ठेवण्याचे सामर्थ्य
तिच्यात असते.

Sunder Vichar Status

पुरुषापेक्षा स्त्री नेहमीच फार कणखर असते
सुंदर विचार स्टेटस

भूतकाळात झालेल्या चुकांमुळे कुणाला वर्तमानात टोचून बोलू नका.
चुका आपल्याकडून ही झालेल्या असतात. कोणी सारखे सारखे त्याची
जाणीव करून दिली की माहित आहे ना काय होते. आपले मन पुन्हा
त्या चुकांना आठवते आणि दुखी होते.

निदान हे क्षण ज्यांनी एकदा भोगले आहेत त्याची जाणीव त्यांना
पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका. चुका होतात तेव्हाच तर माणूस सुधारत
जात असतो.
आपणच आपल्या माणसांच्या चुका सुधारायच्या असतात.
ना की त्याला तू सारखे चुकत आहेस हे दाखवायचे असते.

सुविचार | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi
Sunder Vichar Status

जे काही सहजच मिळते
ते कधीही शेवटपर्यंत टिकत नाही.
आणि जे शेवटपर्यंत टिकत असते
ते कधीच सहज मिळत नाही.

माणूस केवळ आपले जीवन
भ्रमात जगत असतो.
हा माझा… तो माझा…
सर्व माझ्या जवळचे आहेत….
परंतु खरे तर तुमची फक्त वेळ आहे….
जर तुमची वेळ चांगली असेल….
तर दूरचे पण जवळ येतात.
नाहीतर जवळचे देखील दूर
निघून जातात…!

जर जीवनात आनंदी राहायचे असेल
तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त
महत्त्व देऊ नका. कारण….
तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढविता
परंतु ती व्यक्ती तुमची किंमत शून्य
करून ठेवते….!

कधीच जीवनात निराश होऊ नका.
जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच
थोड्या अंतरावर सुख सुध्दा
वाट पाहत थांबलेले असते.

जर भिंतीत भेग पडली….
तर भिंत पडते.
जर नात्यात भेग पडली
तर भिंत उभी राहते.

हृदय हे जगातील सर्वात मोठे
सुंदर मंदिर आहे.
हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या हृदयावर
विश्वास ठेवावा. कारण….
असे हृदय फारच कमी
लोकांजवळ असते….!

संकटात जो अनुभव आणि
जी शिकवण मिळते.
ते जगातील कोणत्याच शाळेत
मिळत नाही.

marathi suvichar | sunder vichar status

ठेव कुणासाठी | Sunder Vichar | जीवन सार

या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपले आपल्याजवळ
आहे…. ती आपली तात्पुरती ठेव आहे.

पुत्र ही सुनेची ठेव आहे. कन्या ही जावयाची ठेव आहे. आयुष्य हे मृत्यूची ठेव आहे.
आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे.

एक दिवस प्रत्येकाला दिसेल की… तुमच्या मुलगा सुनेचा होईल…! मुलीला जावई
घेऊन जाईल….! जीवन मृत्यूला शरण जाईल….! आणि शरीर स्मशानातल्या राखेत
मिसळेल….!

जीवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो. कारण काळ जो शिकवितो…
ते कोणीच शिकवीत नाही. तेव्हा ठेव ही ठेवूनच सांभाळा तिच्यावर
मालकी हक्क दाखवू नका.
आपण कितीही हुशार असलात तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे
हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचा हिसकावून
खाणाऱ्याचा पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.

suvichar-marathi-sunder-vichar-marathi-quotes-vb-good-thoughts-vijay-bhagat-photo-suvichar
सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi on Life

सुविचार मराठी – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi on Life

जर आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला
हातात पकडले तर ते पाणी पिण्यायोग्य असते…!

जर तोच थेंब गटारीच्या नालीत पडला…
तर तो साधा हाथ लावायच्या कामाचाही राहत नाही…!  

जर तोच थेंब गरम तव्यावर पडला तर
बाष्पीभवन होऊन… त्या थेंबाचे पूर्ण अस्तित्वच संपून जाते…!
तो पूर्णतः नष्ट होतो…!

जर तो थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो…

आणि जर का तो थेंब शिंपल्यात पडला तर स्वतःच मोती बनून जातो…!

मित्रांनो…
थेंब तर तोच आहे परंतु तो कुणाच्या सहवासात येणार…
यावरच त्याचे अस्तित्व अवलंबून असते…! तसेच
त्याची प्रतिष्ठा आणि पत अवलंबून असते…!
 
अशा प्रकारे संकटावर तुटून पडा की
जर जिंकलो तरीही इतिहास आणि
जर हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे…!


आयुष्य जगत असतांना जास्त विचार करू नका..
कारण ज्याच्याकडे काहीही नाही त्याच्यावर
हे जग हसते… आणि
ज्याच्या जवळ सर्व काही आहे…
त्याच्यावर हे जग जळते…!

जरी आपली प्रत्येक कृती आपल्याला
आनंदी करू शकत नसली… तरीही
आपण कधीही कुठल्याच कृती शिवाय
आनंदी होऊच शकत नाही…! 

 

 

 

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here