sunder vichar – माणसाला ठेच लागते..
पण त्यानंतर त्याचे चालणे कायमचे सुधारते
‘आपण कसे बोलावे….?’
हे शिकवण्यासाठी कोणताही
वर्ग / क्लास नाहीत.
आपण ज्या पद्धतीने बोलतो
त्यावरून आपला ‘वर्ग / क्लास’
निश्चितच ठरतो.
“चूक ही आयुष्यचे एक पान आहे
पण नाती म्हणजे जीवनाचे पुस्तक
आहे. गरज पडली तर चुकीचे पान
फाडुन टाका पण एका पानासाठी
अख्खे पुस्तक गमावू नका..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावे
म्हणून नव्हे… तर शिखरावरुन
तुम्हाला जग पाहता यावे म्हणून…
स्वतःला घडविण्यात
आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना
दोष द्यायला वेळच
मिळणार नाही.
शर्यतीत धावतांना अर्ध्या रस्त्यात
थांबणाऱ्यांना यश मिळत नाही.
उर्जा कायम ठेवा. कामाची भूक
ठेवा. कोणतीही गोष्ट अर्ध्यावर
सोडू नका.
चिता मेलेत्या माणसांना जाळते
तर चिंता जिवंत माणसांना
जाळत राहते.
“दु:ख” सहन करणारा माणूस
एक ना एक दिवस ‘सुखी होतो..
“दु:ख” देणारा माणूस कधीच
“सुखी” होऊ शकत नाही..
“माणसाचा स्वभाव थोडा तिखटच
असावा… कारण गोड लागणारा
ऊस लोक चावून खातात.. पण
तिखट मिरची चावून खाण्याची
हिम्मत कोणी करत नाही. तुमचा
स्वभाव मिरचीसारखा तिखट असला
की…. कोणी तुमच्या नादी लागणार
नाही… कारण आजकाल दुनियेत जास्त
गोड स्वभाव असेल…. तर लोक फायदा
उठवतात म्हणुन स्वभाव थोडा तिखटच
ठेवा…. म्हणजे लोकं बरोबर हिशोबात
राहतील.
sunder vichar – माणसाला ठेच लागते..
पण त्यानंतर त्याचे चालणे कायमचे सुधारते
क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर
कळते आपल्याजवळ आपल्याशिवाय
आपले असे कोणीही नाही.
जे नाही मिळाले ते चांगले नव्हतेच.
जे आहे ते चांगले आहेच. जे पुढे
मिळणार आहे ते चांगलेच असेल
कोणाच्यातरी भावना दुखावणे
म्हणजे आपण स्वतः कर्ज
घेतल्यासारखे आहे आणि ते
आपल्याला व्याजासहित फेडावे
लागतेच.
एखाद्या व्यक्तीची सवय
लागणे… हे प्रेम होण्यापेक्षा
जास्त भयानक असते….!
दुसऱ्यांना टोपी घातली
की आपल्या कर्माचा
ओटीपी परमेश्वराकडे जातो.
काही लोक आपल्या अहंकारामुळे
किंमती नाती गमावतात तर काही
लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची
किंमत देखील गमावतात.
पतंग आणि आयुष्यात
एकच समानता असते.
उंचीवर असेपर्यंतच
कौतुक आणि किंमत असते.
तीच खरी तुमच्या जवळची
माणसे असतात… जी तुमच्या
आवाजावरून तुमच्या सुखाचा
आणि दुःखाचा अंदाज लावतात.
काही वेळा पुढाकार कोणी
घ्यायचा या एका गोष्टीमुळे
बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात.
स्वतःला घडविण्यात
आपला वेळ खर्च करा.
म्हणजे तुम्हाला इतरांना
दोष द्यायला वेळच
मिळणार नाही.
****************
नात्यांना मधुर आवाजाची
आणि सुंदर चेहऱ्याची गरज
नसते. गरज असते ती फक्त
सुंदर मनाची आणि अतुट
विश्वासाची.
सुसंवाद हा फक्त एक शब्द
आहे. पण जर कोणाशी केला
तर मनातील अनेक वाईट
विचारांचा मळ काढून टाकतो.
****************
टीका करणारी व्यक्ती
एखाद्या सज्जन माणसाला
बदनाम करू शकते
पण स्वतःला मात्र
सज्जन बनवू शकत नाही.
****************
यशस्वी माणूस होण्यापेक्षा
उपयोगी पडणारा माणूस
होण्याचा प्रयत्न करा
तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
****************
काय चूक होऊ शकते….?
याची भीती बाळगणे थांबवा.
आणि जे होईल त्याबद्दल
सकारात्मक राहण्यास
सुरुवात करा.
****************
जास्त विचार केल्याने
तुमची ते काम करण्याची
क्षमता नष्ट होते.
****************
काय आहे ते स्वीकारा.
काय होते ते विसरा.
काय होईल यावर
विश्वास ठेवा.
****************
मित्र प्रेम हा असा खेळ आहे
जीव लावून खेळला तर
दोघेपण जिंकतात. पण एकाने
माघार घेतली तर दोघे पण हरतात.
कुणीतरी फुलाला विचारले….
झाडावरून तोडले तेव्हा तुला
वेदना झाल्या नाहीत का रे.
फुलाने उत्तर दिले… तोडणारा
इतका आनंदात होता की मी
माझ्या वेदनाच विसरून गेलो.
****************
माणसाजवळ पत हवी….
ऐपत हवी आणि जगाला
ठोकर मारण्याची जिगर हवी.
मग जग तुमचे कौतुक करते.
****************
चेहरे ओळखता येत नाहीत.
स्वभावही ओळखता येत नाही.
कारण…. दिसते तसे नसते.
प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच
असते. मात्र माणसाची कृती
सगळे दाखवून जाते.
****************
“आयुष्यात काही
शिकायचे असेल तर
कठीण परिस्थितीत हि
शांत राहणे शिका.
चेहरा कितीही सुंदर असेना
जर जीभ कडू असली तर
लोक तोंड फिरवून घेतात.
असामान्य माणसाची तीन लक्षणे
असतात. तो चुकीचे काम करत
नसल्याने त्याला कोणतीही चिंता
नसते. त्याच्याकडे ठाम विचार
असल्याने त्याच्या मनात गोंधळ
नसतो आणि तो प्रामाणिक
असल्याने त्याला कशाचीही
परवा… भीती नसते.
****************
माणसाला ठेच लागते
पण त्यानंतर त्याचे चालणे
कायमचे सुधारते…..!
माणसाला त्याने केलेला संघर्ष
अवश्य थकवतो.
पण त्याला बाहेरून सुंदर
आणि आतून मजबूत बनवतो.
****************
मन स्वच्छ ठेवा.
कारण स्वच्छ मनाची
स्तुती परमेश्वर करतो.
****************
आयुष्यात आज आलेल्या
परिस्थितीशी जो संघर्ष
करेल…. त्यालाच उद्याचे
सुख उपभोगायला मिळेल.
****************
आपल्या मुलाला वाईट सवयी
लागल्या असतील तर त्याच्या
लग्नापेक्षा उपचाराबद्दल विचार
करा. कारण दुसऱ्यांच्या मुली
अशा मुलांना सुधारण्याच्या
मशीन नाहीत.
****************
सत्य हे पहाणाऱ्याच्या किंवा
ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार
कधीच करत नाही. ते नेहमी
जसे असते तसेच पुढे येत असते
उगवत्या सूर्यासारखे…..!
****************
हक्काचा मुक्काम मिळवण्यासाठी
वाटा ओळखीच्या असो किंवा
अनोळखी….. प्रवास आपल्यासाठी
अनिवार्य असतो.
मूर्खाला अक्कल देणे हे नास्तिकाला
प्रसाद देण्यासारखेच असते. ना तो
‘प्रसाद’ फळाला येतो. ना ती ‘अक्कल.’
रानावनात एकाकी पडलेले फूल जसे
कोणीही कौतुक करण्याची वाट न
पाहता फुलत असते… तसेच तुम्हीही
कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता…
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा.
कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील.
****************
“आनंद त्यांना नाही मिळत
जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात…
आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या
आनंदासाठी स्वतःच्या…. आयुष्याचे
अर्थ बदलतात….”
****************
“बरे चाललेय आयुष्यात”
हे आपण कोणालाही सांगू शकतो…
पण खरे काय चाललेय आपल्या
आयुष्यात हे सांगायला
“जवळचाच माणूस” लागतो…!
नाती फुलपाखरासमान असतात.
हळुवार जपली तर साथ देतात
व सैल सोडली तर उडून जातात.
****************
ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान
आणि सहनशीलता असते. त्या
व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर
मात करण्याची क्षमता असते.
****************
कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त
दोनच वेळी कळते. जेव्हा ती
मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती
आपल्या पासून हरवते तेव्हा. त्या
दरम्यानच्या काळात आपल्याला
त्या माणसाची किंमत किंवा त्या
वस्तूची किंमत कळतच नाही.
****************
आयुष्यात सर्व काही मिळते.
पण आपण जे शोधतो ते मात्र
मिळत नाही. आयुष्य संपत जाते
शोध कार्य थांबत नाही. आणि
अंतिम क्षणी लक्षात येते की….
जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच
जवळ होते. ते म्हणजे समाधान.
****************
उगाच कडवटपणा येत नाही
स्वभावात….! कुठेतरी गोड
स्वभावाचा तोटा सहन केलेला
असतो.
sunder vichar – माणसाला ठेच लागते..
पण त्यानंतर त्याचे चालणे कायमचे सुधारते
स्वतःची व्हॅल्यू [Value] कशी वाढवावी….?
वेळोवेळी नवीन गोष्टी
शिकण्यास प्रयत्नशील
राहा. याचा तुम्हाला
भविष्यात खूप फायदा
होईल.
नेहमी इतरांशी बोलतांना
मोजकेच आणि
व्यवस्थितरित्या बोला.
इतरांच्या चांगल्या
कामाचे
कौतुक करा.
स्वतःला महत्त्व द्या.
कधीही स्वतःला
कमजोर मानू नका.
नेहमी इतरांसाठी उपस्थित
राहू नका. अर्थात स्वतःला
Busy ठेवा….!
जीवनात लोकांपेक्षा
काहीतरी वेगळे
करण्याचा प्रयत्न करा..
नेहमी अशा लोकांसोबत राहा
किंवा मैत्री करा… ज्यांना नाते
टिकवण्यासाठी समोरच्या
व्यक्तीला Impress करावे
लागत नाही. जे फक्त तुमचा
चेहरा बघत नाहीत…. तर…
मनही बघतात.
आपल्या आयुष्यातील
सर्व निगेटिव्ह, आणि
विषारी लोकांपासून दूर
राहा.
तुमच्या आयुष्यात कायम
सोबत राहण्यासाठी….
कोणाच्याही समोर हात
जोडू नका. जी खरंच
चांगली माणसे असतील
त्यांना तुमची किंमत
नक्की कळेल…
कायम इतरांचा विचार
करणे थांबवा. आणि
स्वतःच्या आनंदासाठी
जगायला शिका.
आपले दुःख लोकांना
सांगत बसू नका.
तुमच्या Personal गोष्टी
तुमचे Secrets इतरांशी
शेअर करू नका.
आपल्या भावना,
Emotions Control
ठेवा…..!
स्वतःची व्हॅल्यू [Value] कशी वाढवावी..? |
Good thoughts in marathi | Sunder Vichar
motivational quotes in marathi |
डोके जर शांत ठेवायचे असेल
तर ह्या गोष्टींवर कंट्रोल ठेवा | Suvichar
समोरच्याचे चांगले व्हावे म्हणून
तुम्ही त्याला काहीतरी सांगितले
आणि तरीही तो दुखावला जात
असेल… आणि त्याला वाईट
वाटत असेल तर…. अशा
लोकांना काही सांगू नका.
***************
ज्यांनी तुमचा विश्वासघात केला.
ज्यांनी तुम्हाला फसवले आहे. अशा
लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ
नका. पण त्यांना तुमच्या डोक्यातही
रागाच्या रुपाने ठेवू नका. त्यांना
तुमच्या जीवनातून आणि मनातून
काढून टाका.
***************
तुमच्यासोबत दुसरा वाईट का वागला
याचा विचार करून स्वतःला त्रास
करून घेऊ नका. फक्त त्यांच्या पासुन
दूर राहा.
***************
वाईट काळ सुरू असतांना आणि
वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक
विचारांवर कंट्रोल ठेवा. म्हणजे वाईट
परिस्थितीवर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता.
***************
माझ्या आयुष्यात मी कितीही
कमावले. कितीही मिळवले
कितीही प्राप्त केले. तरी सुद्धा
हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने
होत आहे. याची जाणीव सतत
ठेवा. आणि मुखामध्ये त्याचे
गोड नाव नेहमीच असू द्या.
***************
दु:ख गिळून
आनंद व्यक्त
करणे……
म्हणजे जीवन.
***************
चांगले सुरू असतांना आणि चांगल्या
परिस्थितीत गर्व करण्यावर कंट्रोल
ठेवा. दुसऱ्याला यश मिळाले तर
त्याच्यासोबत स्वतःची तुलना करून
माझे का चांगले झाले नाही असा भाव
ठेवून दुसऱ्यावर जळण्यावर कंट्रोल ठेवा.
***************
एकमेकांची मजा करतांना
शब्दावर कंट्रोल ठेवा.
***************
सर्वांमध्ये असतांना बोलण्यावर
कंट्रोल ठेवा. म्हणजे पश्चातापाची
वेळ येणार नाही.
***************
जिथे तुम्हाला आदर मिळत नाही
जे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत
आणि तुच्छ लेखतात तिथे जाऊच
नका.
***************
जे पचत नाही…
ज्याचा त्रास होतो…
असे काही खाऊच नका.
***************
संकटात असतांना तुम्ही त्या
संकटावर मात करू शकता
ते धैर्य तुमच्याकडे आहे…
ती शक्ती तुमच्याकडे आहे
याची जाणीव ठेवा.
***************
आपल्या लोकांचे वागणे पटले नाही
तर त्यांना ते सांगताना मी कोणते शब्द
वापरते त्याने ते दूर तर जाणार नाही ना
यासाठीचा संयम व जाणीव ठेवा.
रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका
आणि भावनेच्या भरात कोणाला वचन
देऊ नका.
***************
तुमचा आजार फक्त गोळ्या आणि
औषध दूर करू शकत नाही. तर
त्यासाठी तुमची जीवनशैली, आहार
विचार या तीन गोष्टी महत्त्वाच्या
आहेत. हे सुद्धा समजून घ्या.
***************
कष्ट करून फळ मिळवणे
म्हणजे व्यवहार. स्वतः जगून
दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे
सहानुभूती. आणि माणूसकी
शिकून माणसासारखे वागणे
म्हणजे अनुभूती.
motivational quotes in marathi | डोके जर शांत ठेवायचे असेल तर ह्या गोष्टींवर कंट्रोल ठेवा | Suvichar
मुलगी का असावी खुप छान गोष्ट आहे |
Good Thoughts In Marathi | sunder vichar |
छान गोष्ट मराठी by Vijay Bhagat
एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला
तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा
घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले.
तोच एक व्यक्ती तिथे आला. आणि तिरडी
धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू
लागला की मेलेल्या माणसाकडून मला माझे
10 लाख रुपये घेणे आहे.
जो पर्यंत माझे पैसे मला परत मिळत नाही
तो पर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही….
जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु
लागले. तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू
लागली की आमच्या वडिलांनी कधी
आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही.
त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.
तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले
जबाबदारी घेत नाही तर आम्ही पण देऊ
शकत नाही. आता सगळे उभे राहिले. आणि
याने तर प्रेतयात्रा अडवलेली… जेव्हा खूप
वेळ झाली तो पर्यंत ही गोष्ट घरातील
महिलांपर्यंत गेली.
ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या
मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने
आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती
वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या
आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे
पैसे
तुमच्याकडे ठेवा.. पण माझ्या वडिलांची
प्रेतयात्रा थांबवू नका… . मी सर्व कर्ज फेडून
टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच
पाठवून
देईन …..
आता तो माणूस उभा राहिला व सर्व
उपस्थित लोकांना बोलू लागला…..
की खरे पाहता गोष्ट अशी आहे की
मेलेल्या माणसाकडून 10 लाख घेणे
नाही…. तर उलट मला त्याला देणे
आहे. परंतु मी याच्या वारसदारांना
ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ
खेळला…
आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा
वारस फक्त त्याची मुलगी असून इतर
कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून
गेली. आता मुले व भाऊ मान खाली घालून
फक्त हताशपणे उभे होते…..!
आशय……
मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत
कारण मुली आपल्या आईवडिलांनाच
आपली संपत्ती समजतात. म्हणुनच
मुलगी झाली तर खुश व्हायला हवे
ना की दुःखी…….
🙏अशी प्रार्थना करा….
की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी
जी वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल…!
मुलगी का असावी खुप छान गोष्ट आहे |
Good Thoughts In Marathi | sunder vichar |
छान गोष्ट मराठी by Vijay Bhagat
हि १३ कामे नेहमीच लपवून करा | सुंदर विचार |
Good Thoughts In Marathi | चांगले विचार
1.) चारचौघात तुमचा जर कोणी
अपमान करत असेल तर
त्याचा तीव्र प्रतिकार करा.
लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या
अपमानाचे रडगाणे गात
बसाल तर उठ सूट कोणीही
तुमचा अपमान करेल.
2.) जर तुम्ही एखादे औषध घेत
असाल तर ते गोपनीय ठेवा.
अन्यथा लोक तुमचा आजार
आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला
सुरुवात करतील.
3.) विनाकारण तुम्हाला कोणी
तुमचे वय विचारले असेल
तर कधीच खरे वय सांगू नका.
या माहितीचा गैरफायदा घेण्याची
शक्यता अधिक असते.
sunder suvichar
4.) मनात अशा अनेक गोष्टी असतात
ज्या जग जाहीर केल्याने आपल्या
जीवनात संकटे येतात. बुद्धिमान
व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते
जे त्यांच्या हिताचे असतात.
5.) तुम्ही एखाद्या गुरूकडून दीक्षा
घेतली तर गुरूंनी दिलेला गुरु मंत्र
कोणाला ही सांगू नका. त्यामुळे
त्या मंत्राचा तुम्हाला अधिक
लाभ मिळेल.
6.) झालेले नुकसान
कोणाला सांगू नका.
7.) घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या
व्यक्तीशी शेअर करू नका. जर
तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल… तर
नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल.
8.) आनंदाचे क्षण नेहमी
शांततेत साजरे करा.
9.) कुणाशीही प्रेम त्याला
न सांगता करावे .
10.) लोकांना नेहमी जाणून घ्यायचे
असते की तुम्ही किती कमावता…
तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य
तेवढी गोपनीय ठेवा.
ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
11.) आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत
जीवन जगा. बाकीचे तर….
फक्त वेळ वाया घालवतील.
12.) केलेले दान हे नेहमी
गुप्त ठेवावे… तरच
त्याचा पूर्ण लाभ
आपल्याला मिळतो
असे म्हणतात की….
गुप्त केलेले दान
देवतांना प्रसन्न करते.
13.) जे काही खरेदी करायचे
असेल ते गाजावाजा
न करता खरेदी करा.
मित्रांनो अश्याच सुंदर सुंदर
विचारांसाठी vijaybhagat.com
या संकेत स्थळाला भेट देत राहा.
विचारांना लाईक, शेयर करायला
विसरू नका.
हि १३ कामे नेहमीच लपवून करा | सुंदर विचार |
Good Thoughts In Marathi | चांगले विचार