Super Marathi Motivational Story | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा

1
140
Super Marathi Motivational Story | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा
Sunder Katha - श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा

Super Marathi Motivational Story |
Sunder Katha | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा |
तुमच्या भाग्यात जे लिहिले आहे ते कुठूनही तुमच्या पर्यंत पोहोचणारच

एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते.
तेथून जातांना त्यांना एक गरीब माणूस भीक मागतांना दिसतो.

अर्जुनाने त्याला आपल्या जवळची सोन्याच्या मोहरांनी
भरलेली थैली दिली आणि परत भीक मागू नकोस असे
सांगितले. थैलीभर मोहरांमुळे त्याचे आयुष्य नक्कीच
सावरणार होते.

तो आनंदाने घरी निघाला. मात्र एका चोराने ते पाहिले
आणि त्याचा पाठलाग करत मोहरांची थैली लंपास केली.

गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला.
पोटापाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला.
अर्जुनाने विचारले काल तर तुला मोठी भिक्षा दिली परत तु
आज भीक मागू लागलास…? त्याने आपबिती सांगितली.

अर्जुनाला वाईट वाटले. त्याने जवळचा बहुमूल्य
मोती त्याला दिला. तो मोती घेऊन आनंदाने घरी
आला. पण घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे तो मोती
ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला.

एका मडक्यात त्याने तो मोती ठेवला आणि तो
निवांत झोपला. बायको घरी आली तिने नवऱ्याला
अनेक दिवसानंतर शांत झोपताना पाहिले.

आवाज न करता ती गाडगी मडकी घेऊन
नदीवर पाणी भरण्यासाठी गेली. परत येऊन पाहते
तर नवरा शोधा शोध करत होता. तिच्या हातात मडके
पाहून तो म्हणाला….. “हे तू काय केलेस मी यात बहुमूल्य
मोती ठेवला होता”.

Super Marathi Motivational Story |
श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा

आपले नशीबच खराब जाऊ दे. असे म्हणून तो
माणूस परत नेहमीच्या ठिकाणी भीक मागायला
जात होता. अर्जुनाने त्याला पाहिले आणि त्याला राग
आला. तो कृष्णाला म्हणाला आता तूच काय ते बघ.

कृष्णाने त्याला दोन सिक्के दिले तो काहीही न बोलता
ते घेऊन निघाला. वाटेत त्याला एक कोळी दिसला.
त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली.

तिची तरफड पाहून त्याला दया आली. त्याने कोळ्याला
दोन शिक्के देले आणि मासोळी विकत घेऊन
एका कटोरीत घालून घरी घेऊन आला.

पाहतो तर काय मासोळी पाण्यात टाकताच तिने
घिळालेला मोती बाहेर टाकला. तो मोती पाहून
गरीब माणूस दिसला दिसला म्हणून ओरडू लागला.

झोपडी बाहेरून जाणाऱ्या भुरट्या चोरांना वाटले….
सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणी आपल्याला
पाहिले. कोणी आपल्याला शिक्षा देण्यापूर्वी इथून निसटून
गेलेले चांगले. असे म्हणत त्याने सोन्याच्या मोहरांची
थैली गरिबाला सुपूर्त केली. तो तिथून पळून गेला.

गरिबाला आश्चर्याचा धक्का बसला, “मोहरांची थैली पण
मिळाली आणि मोती पण मिळाला”.

दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन
श्रीकृष्णाचे आभार मानले.

तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने कृष्णाला
विचारले आधी मी त्याला मोहरा दिल्या… मोती दिला
त्याला लाभल्या नाहीत. मात्र तू दिलेले दोन शिक्के
कसे काय लाभले….? कृष्णाने सांगितले… आधी
मिळालेल्या लाभाचा विचार तो स्वतःपुरता करत होता.
दोन शिक्के मिळाले तर त्याने स्वतःचा विचार सोडून
दुसऱ्याचा विचार केला.

Marathi Story – VijayBhagat.com

जो दुसऱ्यासाठी झटतो त्याचा उत्कर्ष होतो.
चांगल्या कामाची पेरणी केली तर…. मोबदलाही
चांगलाच मिळतो. म्हणून चांगले कर्म करत राहा.

हीच बाब लक्षात ठेवून आपण ही सत्कर्माची
कास न सोडता आपले काम करत राहावे….
असे श्रीकृष्ण सांगतात..

Sunder Katha | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा |
भाग्यात असलेले कुठूनही तुमच्या पर्यंत पोहोचणारच
#marathi

 

मराठी बोधकथा – Marathi Moral Story 

1 COMMENT

  1. I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here