#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

1
1279
Suvichar-जीवनावर-आधारित-मराठी-प्रेरणादायी-सुंदर-विचार-आयुष्यावर-सुविचार-vb
Suvichar-जीवनावर-आधारित-मराठी-प्रेरणादायी-सुंदर-विचार-आयुष्यावर-सुविचार-vb

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार | Good Thoughts In Marathi On Life 

जर जीवनात काही शिकायचे असेल….
तर कठीण परिस्थितीतही
शांत राहणे शिका.
💖😉😊😋🥀

जीवन हे अगदी चित्रासारखे आहे….
मनासारखे रंग भरले की…
ते फुलासारखे खुलून दिसते.
💖😉😊😋🥀

एखाद्याच्या जीवनातील चुका शोधाव्यात…
परंतु मस्करी म्हणून नाही…
तर त्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून.
💖😉😊😋🥀

जेव्हा लोकांना
आपली प्रगती सहन होत नाही…
तेव्हा ते आपली बदनामी करायला
सुरुवात करतात.
💖😉😊😋🥀

तुम्ही आज अनुभवलेल्या वेदना
तुमची उद्याची शक्ती आहे.
💖😉😊😋🥀

पतंग आणि जीवनात
एक समानता असते…
उंचीवर असे पर्यंतच
कौतुक आणि किंमत असते….!
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

जर उत्पन्न जास्त नसेल
तर खर्चावर…. आणि
जर माहिती जास्त नसेल
तर शब्दावर नियंत्रण पाहिजेच.
💖😉😊😋🥀

लोक ज्यांना अगोदर नावे ठेवतात….
नंतर त्यांनाच मुजराही करतात….!
💖😉😊😋🥀

सुखाच्या दिवसात
गळ्यात गळा घालून फिरणारी माणसे
संकटाच्या दिवसात कुठे गायब होतात
देवच जाणे.
💖😉😊😋🥀

संकटे टाळणे माणसाच्या हाती नसते…
परंतु संकटांचा सामना करणे
माणसाच्या हातात असते.
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
आणि जर समुद्र गाठायचा असेल
तर खाच – खळगे पार करावेच लागतील.
💖😉😊😋🥀

माझ्या आयुष्यातून गेलेल्या लोकांनो
चुकी तुमची होती की माझी आता हे
महत्त्वाचे राहिले नाही.
मला नाते निभावता आले नाही ना…
तर ते नाते टिकावे म्हणून
तुम्हीही काहीच प्रयत्न केले नाही.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

ज्याला इतरांची काळजी असते…
त्याची काळजी देवाला असते…!
💖😉😊😋🥀

जर जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा.
कुणासोबत ही मिळा मिसळा एक रूप व्हा…
परंतु स्वतःचे महत्त्व कमी होऊ देऊ नका.
जगाला काय आवडते ते करू नका.
तर तुम्हाला जे वाटते ते करा.
💖😉😊😋🥀

स्वतःला कधीही कुणा पेक्षा कमी समजू नका.
व कुणा पेक्षा श्रेष्ठ ही समजू नका. कारण
स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो
आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
💖😉😊😋🥀

मौनात दडलेले अर्थ आणि
शांततेत लपलेला आवाज
सगळ्यांना समजत नाही.
💖😉😊😋🥀

जेव्हा संपूर्ण जग म्हणत असते…
पराभव मान्य कर. तेव्हा
आशेची झुळूक हळूचं कानात सांगते…
पुन्हा एकदा प्रयत्न कर.
💖😉😊😋🥀

लहानशा जीवनात खूप काही पाहिजे असते.
परंतु जे पाहिजे तेच मिळत नसते.
असंख्या चांदण्यांनी भरून सुद्धा
आपले आकाश मात्र रिकामेच असते.
हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी
माणसाला मिळत नसतात…
परंतु न मिळणाऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात…!
💖😉😊😋🥀

जर वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल….
तर कोणत्या ना कोणत्या रुपात
भगवंत मदत करतोच.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

आपण एकटेपणाला नेहमीच घाबरतो…
परंतु त्या एकटेपणातच आपण खूप काही शिकतो.
आलेला राग थोड्यावेळाने चाली जातो…
परंतु तुम्ही रागात टोचून बोललेले शब्द
समोरच्याला खूप दुखतात आणि यामुळे
खूप वर्षाचे संबंध ही खराब होऊ शकतात.
राग आहे तोवर शांत बसा….
राग गेला की मग समोरच्याशी बोला.
सगळे काही बरोबर होईल.
💖😉😊😋🥀

मोठे यश मिळवण्यासाठी
लहान प्रयत्नाने सुरुवात करा.
💖😉😊😋🥀

मित्राला सुद्धा तेवढेच सांगावे जेवढे तो सांभाळू शकतो….
भूतकाळ आणि वर्तमान काळ माहीत असलेला मित्र
जर उलटला तर तुमचे भविष्य बिघडवू शकतो.
💖😉😊😋🥀

जीवनात खूप लोक येतात आणि जातात….
परंतु जे आपले असतात ते नेहमी
आपल्या सोबतच राहतात.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

आपल्या जीवनात प्रगती व यश मिळवण्यासाठी
दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
एक म्हणजे आपली कोणी स्तुती केली तरी
भारावून जाऊ नका… आणि दुसरी म्हणजे
आपली जर कोणी निंदा केली तर
आत्मविश्वास गमावू नका.
💖😉😊😋🥀

आयुष्य मनसोक्त जगून घ्या…
बाकी नशिबावर सोडा.
रात्री फुलांना ही माहित नसते की….
उद्या आपल्याला मंदिरात जायचे आहे
की स्मशानात…!
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

नात्यांच्या बाजारात
नेहमी तीच माणसे एकटी पडून जातात…
जी मनाने पूर्णतः स्वच्छ असतात.
💖😉😊😋🥀

रक्ताचा एक थेंबही न सांडवता
रक्तबंबाळ करतात ते शब्द असतात…!
💖😉😊😋🥀

झाले गेले विसरून जावे. जे झाले तो भूतकाळ होता ते विसरून आजच्या दिवस
नव्याने सुरू करा.

वर्तमानात येऊन भविष्याचा वेध घ्या तुमची पावले नवीन दिशेने वाळवा…
तुम्हाला वाट निश्‍चितपणे सापडेल.

मानवी जन्म हा चालत राहण्यासाठी आहे. पडणे… धडपडणे…. हा तर निसर्ग नियमच आहे.
ज्याने आपल्याला जन्म दिला तो आपल्याला पडू देणार नाही. आपल्या जीवनाच्या पतंगाची
दोरी त्याच्या हातात आहे. ही दोरी कधी तो ओढतो तर कधी हल्की करतो…. आपल्या
आयुष्याचा सूत्रधार असलेला तो या लपाछपी च्या खेळात सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो.
सतत सावरत असतो…. म्हणून चालत राहा अगदी एकटे असाल तरी सुद्धा निर्भयपणे चालत
राहा… आपल्याला मिळालेले हे आयुष्य खूप सुंदर आहे… हे अधिक सुंदर करता आले पाहिजे.

जीवनाच्या या पाऊलवाटेवर कधी हिरवळ… तर कधी वाळवंट….. कधी खाच-खळगे तर कधी
खोल दरी असणार…. परंतु त्यावेळी हिरवळीतून चालतांना आपल्याला जो आनंद आला
तोच आनंद वाळवंटातून चालतांना अनुभवता आला पाहिजे.
फक्त फुलावरूनच नाही तर काटेरी कुंपणातूनही जाण्याची मानसिकता असावी लागते.
कारण जीवनात येणारी प्रत्येक अडचण आपले वाईटच करून जाते असे नाही तर कधीकधी
ती आपल्याला काहीतरी देऊन जाते. आयुष्य कसे जगायचे हे शिकवून जाते.
आयुष्याचा अर्धा पेला भरलेला आहे म्हणून समाधान मानावे की अर्धा रिकामा आहे म्हणून
दुःखी…. कष्टी…. व्हावे…? कष्टाची जाणीव होऊ नये म्हणून जीवन गाणे गातच रहावे…..
झाले गेले विसरून जावे आणि पुढे पुढे चालावे.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

मोठमोठे अंकांची
आकडेमोड करणारा माणूस
नात्यांच्या गणितामध्ये
अपयशी ठरतो.
💖😉😊😋🥀

शांत डोक्याने
कुठल्याही प्रश्नावर विचार केला तर…
न गोंधळताच उत्तर मिळू शकतो.
गोंधळलेल्या अवस्थेत
बरोबर येणारा उत्तर सुद्धा गोंधळतो…!
💖😉😊😋🥀

संवाद संपला की नाते थांबते….
म्हणून बोलून बघा…
कदाचित तुम्हाला
हरवलेले उत्तर सापडतील.
💖😉😊😋🥀

लाचारी आणि खोटे बोलून
मित्रता करण्यापेक्षा…
खरे बोलून शत्रुत्व स्वीकारा
म्हणजे विश्वास घात तरी होणार नाही.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

अशा माणसाबरोबर राहा…
जी वेगळ्या ध्येया बद्दल बोलतात.
अशा माणसांबरोबर नाही….
जे इतर माणसाबद्दल बोलतात…!
💖😉😊😋🥀

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही. उलट आपले
सामर्थ्य वाढते.
💖😉😊😋🥀

जगण्यातील बेफिकीरपणाच
आयुष्यातील चिंता
कमी करत असतो.
💖😉😊😋🥀

तव्यावरची भाकरी
जो पर्यंत उलटसुलट करुन
भाजत नाही….
तो पर्यंत ती फुलत नाही.
तसेच जीवनाचे आहे.
सुख-दुःखाचे चटके
जो पर्यंत बसत नाहीत
तो पर्यंत ते जीवन खुलत नाही.
💖😉😊😋🥀

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

नात्यात राजकारणी असला तर
हरकत नाही. पण नात्यात
राजकारण नको.
💖😉😊😋🥀

काही शब्द असे असतात की…..
ते नेहमी ऐकत राहावे असेच वाटते.
काही नाती एवढी गोड असतात की….
ती कधीच संपवू नये असे वाटते. आणि….
काही माणसे एवढी आपली असतात
की ती नेहमी आपलीच असावीत
असेच वाटते.
💖😉😊😋🥀

आयुष्यात असा एक हक्काचा मित्र पाहिजे….

असा मित्र पाहिजे…
जो कधी कधी तिढ्यात…..
कधी कधी कोड्यात…..
तर कधी गोडीत बोलणारा असावा…!

असा मित्र पाहिजे…
कधी सुखाला वाटणारा…
कधी दु:खाला वाटणारा…
कधी समजून घेणारा…
तर कधी समजावून सांगणारा…!

असा मित्र पाहिजे…
कधी आपलासा करणारा…
कधी आपले अश्रु पुसणारा…..
तर कधी कधी हक्काने रागावणारा…..!

असा मित्र पाहिजे…
नेहमी मनातला समजणारा…..
सदैव ह्रदयात राहणारा….
तर कधी गालातल्या गालात हसणारा…!
असा मित्र पाहिजे…
योग्य ती वाट दाखवणारा….
तर कधी कौतुकाने पाहणारा….
संकटात हात देणारा…!

असा मित्र पाहिजे…
ओठावर हास्य आणणारा….
कधी डोळे वटारणारा….
चुकले तर कान धरणारा…
असा मित्र पाहिजे…
जीवाला जीव देणारा..
कधी भाव खाणारा…
तर कधी भाव देणारा…!

असा मित्र पाहिजे…
कधी तिखट बोलणारा…
कधी तिखट वागणारा..
कधी गोडी लावणारा…!

असा मित्र पाहिजे…
मंजुळ पाव्यासारखा…
दुधाच्या खव्यासारखा…
आणि जीवनभर साथ देणारा….
असा मित्र पाहिजे…
अगदी तुमच्यासारखा…!
💖😉😊😋🥀

माझ्या सर्व मित्र मैत्रिणी साठी

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार

Good Thoughts In Marathi On life

कोणाला भीती असते
परमेश्वर बघत आहे…
तर कोणाला आशा असते
परमेश्वर बघत आहे…
💞💙💛💗

एक कोटी रुपयाच्या हिरा
अंधारात हरवला
त्याला शोधण्यासाठी
पाच रुपयाची मेणबत्ती
उपयोगी आली.
एखाद्या गोष्टीचे महत्त्व
त्याच्या किमतीवर नसते
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या
उपयोगावर असते.
💞💙💛💗

प्रत्येक फूल देवघरात
वाहिले जात नाही. तसेच
प्रत्येक नाते ही मनात
जपली जात नाही.
मोजकीच फुले असतात
देवाच्या चरणी शोभणारी
तशी मोजकीच माणसे असतात
क्षणोक्षणी आठवणारी.
Suvichar status | एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते | Sunder Vichar Marathi | Quotes 
नाती तयार होतात हेच खूप आहे.
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे.
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल
असे नाही… एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.
💞💙💛💗काळ जात राहतो….
परंतु काळजात राहते
तीच आयुष्यातली खरी नाती.
💞💙💛💗कोणासाठीही वेळ नाही
इतके व्यस्त होऊ नये आणि
कुणीही गृहीत धरावे इतके
स्वस्त होऊ नये.
💞💙💛💗

बोलून मूर्ख होण्यापेक्षा
निशब्द होऊन सगळे
पाहण्यात समजदारी आहे.
💞💙💛💗

एक काळ असा होता कोणाला जरी
तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात
तरीही माणसांचे डोळे पाणावत होते.
आता स्मशानात सुद्धा डोळे
ओले होत नाहीत.
💞💙💛💗

Suvichar status | कधीकधी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा भेटलेली माणसे खूप काही शिकवून जातात
Good Thought

कधीकधी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा
भेटलेली माणसे खूप काही
शिकवून जातात.
💞💙💛💗आयुष्य जगतांना जगाचा
अधिक विचार करू नका.
कारण जग ज्याच्याकडे काही नाही
त्याला हसते आणि ज्याच्याकडे
सर्वकाही आहे त्याच्यावर जळते…
💞💙💛💗छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात. परंतु…
मिळालेल्या अनुभवांचे लेखक
आपण स्वतः असतो.
💞💙💛💗

विजयाचा झेंडा फडकवायचा असेल तर
वेळोवेळी यशाचे फटाके फोडावे लागतात.
चैतन्य आणि उत्साह सतत ठेवायचा असेल
तर आनंदाच्या फराळ वाटावा लागतो.
💞💙💛💗

जीवनात झालेला त्रास
विसरून जा. परंतु….
त्यातून मिळालेला धडा
जीवनभर लक्षात ठेवा.
💞💙💛💗

Happy Thoughts
सतत आनंदी राहण्यासाठी टिप्स
सुंदर विचार मराठी
Suvichar marathi | Good Thoughts

जीवन जगात असतांना सामाजिक…. पारिवारिक… जवाबदारी
पार पाडत असतांना सगळ्या धकाधकीत प्रत्येक माणूस आनंदाला
शोधात असतो. सगळ्यांना आनंदी राहायचे असते.

आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग येत असतात. माणूस दुखी झाल्यावर
बाह्यरूपाने आनंदाला शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.
जसे कुणासोबत बोलणे…. गाणे ऐकणे… इत्यादी… पण हे सगळे मार्ग
थोडा वेळ आपल्या तो दुख विसरायला मदत करीत असतान…
परंतु नेहमी सांगितले जाते की नेहमी आनंदी राहण्यासाठी
आनंदाला स्वतःमध्येच शोधावा लागतो.

मी काही टिप्स देत आहे. मला विश्वास आहे की…..
हे टिप्स स्वतःला आनंदी ठेवण्यात नक्कीच मदत करतील…..

१] सकाळी उठल्यावर आपल्या मनाशी पाच ते दहा वेळा म्हणा की…..
आज दिवसभर काहीतरी माझ्यासोबत काहीतरी चांगलेच घडणार आहे.
😊😍😎

२] आवडीचा संगीत ऐका. संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे.
आपल्या आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या.
😊😍😎

३] आपल्या आवडीचे गाणे परत परत ऐकत राहा…. गुणगुणत राहा…
😊😍😎

४] समोरच्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा.
स्वत:बद्दल खूपच कमी बोला.
😊😍😎

५] आयुष्यात विनोदाला महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा
आणण्यास तो खूपच मदतगार ठरतो.
😊😍😎

६] आठवड्यात एक दोनदा आवडीचे फुल आणा आणि त्याला कार्यालय अथवा घरात
योग्य ठिकाणी ठेवा.
😊😍😎

७] छोटे से एखादे चांगल्या विचारांचे पुस्तक स्वत:जवळ ठेवा आणि एखादा विचार घेऊन
त्यावर मनन – चिंतन करा.
😊😍😎

८] चिडचिडेपणा…. डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव बदलून टाका.
😊😍😎

९] लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही वेळ त्यांच्या सारखेच होऊन वावरा.
😊😍😎

१०] जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या.
दीर्घ श्वसन करा.
😊😍😎

११] स्वतःचा चांगल्या कपड्यातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो असा ठेवा कि
सतत त्यावर आपली दृष्टी जाईल.
😊😍😎

१२] एखाद्या मंदिरात…. बागेत…. अथवा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता
अनुभवत दहा – पंधरा मिनिटे घालवा.
😊😍😎

१३] नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर
रोजच्या संभाषणात करा.
😊😍😎

१४] पाच वर्षांचे बाळ एक दिवसात साधारणत: पाचशे वेळा हसत असते.
तर मोठा माणूस साधारणतः इकडून तिकडून पंधरा वेळा.
यामुळे तणाव वाढत जातो. याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची
संधी निर्माण करा.
😊😍😎

१५] शरीरातील त्र्यानशी टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात.
याकरिता भोवतालाचे वातावरण प्रसन्नपूर्वक आणि प्रकाशयुक्त ठेवा.
😊😍😎

१६] स्वतःला नेहमी कामात किंवा आपल्या एखाद्या छंदात गुंतवावे. म्हणतात ना….
रिकामे मन शैतानाचे घर असते. सतत काहीतरी करत राहा.
😊😍😎

१७] कायम मनाला शांत आणि प्रसन्न राहण्याची सूचना करा.
😊😍😎

१८] भुतकाळातील घटना आठवून मन खिन्न करू नका. भुतकाळ घडून गेला.
भविष्यकाळ ठाऊक नाही याची चिंता करू नका.
वर्तमानातिल प्रत्येक क्षण न क्षण आनंदात जगा.
😊😍😎

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here