Best 500 Suvichar | Good Thoughts In Marathi | सुंदर सुविचार

1
1477
Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

नमस्कार मित्रांनो,
एक सुंदर विचार आपल्यासाठी

आपला आयुष्य खूप छोटा आहे
क्षणभंगुर आहे. या छोट्याशा
मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण
हृदयांतर केले पाहिजे.
प्रेम दिले पाहिजे…
प्रेम घेतले पाहिजे.

मित्रांनो तात्विक भांडण
सगळ्यांशी होते….. पण
शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये.

खरेतर मतभेद एकमेकांशी
असू शकतात…. आणि
जरूर असावे….. पण
मनात कायम भेद ठेवू नये.

एखाद्याशी वाद घालावा पण
वादावादी न करता क्षणात
सुसंवाद साधावा.

मित्रांनो अहंकार हाच या सर्वांचा मूळ
आहे. तो विनाकारण बाळगून जगू नये.
शेवटी मृत्यू हे सुंदर शास्वत वास्तव आहे,
त्याचे स्मरण असावे पण भय मात्र नसावे.

आपण जन्माला आलोय….
ते गेलेले दिवस मोजण्यासाठी
नाही… तर उरलेल्या दिवसांचा
आनंद, उपभोग घेण्यासाठी याचे
स्मरण ठेवूया.

आपण किती आनंदात आहोत
त्यापेक्षा आपल्या मुळे किती
जण आनंदात आहेत याला
खूप महत्त्व आहे.

मित्रांनो एक हृदय घेऊन
आलो आहे, जातांना लाखो
हृदयात जागा करून जाता
आले पाहिजे. म्हणून मित्रांनो
प्रेम द्या… प्रेम घ्या….

मित्रांनो, सुगंध देणारी अगरबत्ती
संपली की, मागे फक्त राख उरते.
त्या राखीला परत कधीच सुगंध
येत नाही….!

तसेच मनुष्य देहात जो पर्यंत जीव
आहे, तो पर्यंत छान जगा. कारण
जीवन खूप सुंदर आहे… त्याला
आणखीन सुंदर बनवा.

भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी
पैसा खाता येत नाही. पैसा जास्त
आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न
खाता येत नाही.

म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक
पर्यंतच स्थान द्या. पैशाच्या राशीत
झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर
प्रामाणिक राहून कमावलेली
सोन्यासारखी माणसे हीच श्रीमंती आहे.

मित्रहो कसला पैसा….?
कसली संपत्ती….?
कसले पद….?
कसला रुबाब…?
कसला मोठेपणा….?

बारकाईने जर विचार केला
तर काहीच नाही. मृत्यु जेव्हा
येतो ना… हे जे काही आहे ते
काहीच बघत नाही….!

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

श्रीमंत असो वा गरीब….
नेता असो किंवा सामान्य
कार्यकर्ता या मृत्यू पुढे…
सगळे जग शून्य प्रमाणे आहे.

म्हणून सांगतो मित्रांनो…
आताचा काळ हा खूप वाईट
परिस्थितीचा आहे.

मृत्यू कधी कुठून आणि कसा
येईल सांगता येत नाही. म्हणून
सर्वांशी प्रेमाने वागा. रुसने,
फुगणे, दुश्मनी ठेवणे, घमंडी
पणाने वागून इतरांचा तिरस्कार
करणे या गोष्टी सोडून द्या आणि

जो काही काळ आहे तो सर्वांशी
आपुलकीने व प्रत्येक क्षणाचा
आनंद घ्या कारण क्या पता
कल हो ना हो…! कल हो ना हो…!

आयुष्याच्या चित्रपटाला
Once More नाही…
हव्या – हव्याशा
वाटणाऱ्या क्षणाला
Download करता
येत नाही…..

नको – नकोश्या वाटणाऱ्या
क्षणाला Delete ही करता
येत नाही… कारण हा
रोजचा तोच तो असणारा
Reality Show नाही….

म्हणून भरभरून पूर्णपणे जगा.
कारण Life हा चित्रपट
पुन्हा लागणार नाही….!

Suvichar | आयुष्याला उर्जा देणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार |
Good Thoughts In Marathi | Life Quotes

प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण
समोरच्याचे बोलणे मनावर घेत
नाही. पण समोरचा जर आपण शांत
बसण्याचा फायदा घेत असेल, तर
त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच
पाहिजे.

Suvichar | Good Thoughts In Marathi | सुंदर सुविचार
Suvichar – Good Thoughts In Marathi – सुंदर सुविचार

प्रत्येक गोष्टीत
फायदा पाहणारी माणसे
नात्याला जास्त किंमत
देत नसतात.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत
बसाल, तर आयुष्यभर रडतच बसावे
लागणार. जो जसा वागतो त्याच्याशी
तसेच वागायचे….!

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

माणूस तेव्हाच एकटा पडतो
जेव्हा तो खोट्या लोकांच्या
विरोधात खरे बोलायला सुरु
करतो.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

माणसाला परके कोण…?
हे कळण्यापेक्षा आपले कोण…?
हे कळायला जास्त वेळ लागतो….!

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

कोणाला ओळखायचे असेल तर
त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा
लगेच कोण कसे आहे समजेल.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

समोरचा आपल्याला काय समजतोय
हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.
नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो
आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली
खेळून जातो.

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

जीवनात कोणताही खेळ खेळा
पण कोणाच्याही आयुष्याशी….
भविष्याशी…. आणि भावनांशी तर
कधीच खेळू नका.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

मानवी नाते जपण्यासाठी….
मी पणा सोडून कमीपणा घेतला
की, आपोआपच आपलेपणा वाटतो.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

विश्वास असेल तर न बोलताही….
सारे काही समजून घेता येते. आणि
विश्वासच नसेल, तर बोललेल्या प्रत्येक
शब्दाचा चुकीच्या अर्थ घेतला जातो.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

जे आपली बदनामी करतात त्यांना
करू द्या. कारण की बदनामी तेच
लोक करतात, जे आपली बरोबरी
करूच शकत नाही.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

कोण हसवून गेला…
कोण फसवून गेला….
हे महत्त्वाचे नाही.
अनुभवाच्या शाळेत
कोण तुम्हाला वरच्या
वर्गात बसवून गेला
हे महत्त्वाचे.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा
आधार म्हणजे… स्वतःवरचा विश्वास
जो मंद हास्य करत तुमच्या कानात
प्रेमाने सांगत असतो…. सगळे
व्यवस्थित होईल.

Suvichar - Good Thoughts In Marathi - सुंदर सुविचार

Suvichar | आयुष्याला उर्जा देणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार |
Good Thoughts In Marathi | Life Quotes

Marathi Suvichar | जीवनात जर का शांती हवी असेल तर |
Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | Quotes

नमस्कार मित्रांनो
आपल्या सर्वांना नमस्कार
आणि आपल्या सर्वांना शुभ दिवस

आयुष्य सुंदर बनविण्यासाठी
सुंदर असे सकारात्मक सुविचार
आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
करूया सुरूवात सुंदर विचारांना…
सुंदर सुविचारांना

************

आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटेसे
हसू असेल तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तर
आठवणी सुंदर

************

जगात कुणीच धुतल्या तांदळासारखे
नाही. तरी प्रत्येक जण दुसऱ्याच्या
बाबतीतली खिचडी शिजवण्यात
व्यस्त असतो.

************

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे
लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत
साथ देऊन चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधीच विसरू नका.

************

बांधून नाही जे सांगून ठेवते ना
ते खरे नाते नाही तर जगणे
मातीमोल होऊन जाते.

************

चूक नसतानाही केवळ वाद टाळावा
म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे
फार मोठे प्रतीक आहे.

************

सुख वेचत चला दुःख सहन करत चला
अश्रू पुसत चला इतरांना हसवत चला
आयुष्य काय दोन घडीचा डाव आहे
हसा आणि हसवत चला हेच आयुष्य आहे.

************

काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव
ज्यांना कळतात, त्याच नात्यांना खरा
अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ
माझी म्हणून वाहीलेले व्यर्थ ओझी असतात.

************

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

जीवनात जर का शांती हवी असेल
तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे
सोडून द्या.

************

कधी नवऱ्याने झुकावे, कधी बायकोने झुकावे
एकमेकांच्या समजूतदारीतूनच प्रत्येक घर
टिकावे. बायकोच्या कष्टांची दखल घेणारा
तो नवरा आणि नवर्‍याच्या छोट्या-छोट्या
कर्तुत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको
हे गणित छान जमले की भले भले संसार
सुखी होतात.

************

जीवन हा प्रवास आहे
स्पर्धा नव्हे त्याच्या
आनंद घ्या.

************

अनुभव माणसाला चुका
करण्यापासून वाचवतो…
पण अनुभव चुका
करण्यातूनच येतो.

************

कोणत्या वयात शिकावे आणि
कोणत्या वयात कमवावे हे
वय नाही, परिस्थिती ठरवते.

************

प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाचा
गर्व असतो. पण आपल्याला
गर्व झाला आहे याचे ज्ञान नसते.

************

अखंड यशाने जीवनाची
एकच बाजू कळते. दुसरी
बाजू कळण्यासाठी
अपयशाची गरज असते.

************

जर प्रयत्न मनापासून असतील
तर नशिबाला हि झुकावे लागते.

************

वेळ हसवते…
वेळ रडवते…
ती वेळच असते
जी माणसाला
सर्व काही शिकवते.

************

आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर
फोडण्यापेक्षा, आधी आपले कुठे
चुकले हे तपासून बघा. कदाचित
आपली चूक आहे हे लक्षात येईल.

************

आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन दौलत कोण कोणाला
देत नसते….! फक्त
माणुसकी जपता रहा.

************

प्रत्येक गोष्टींची कदर करायला
शिका. कारण ना आयुष्य परत
येते. ना आयुष्यातून गेलेली माणसे
ना आयुष्यातून गेलेली वेळ…..!

************

इच्छा किती विचित्र गोष्ट आहे
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.

************

मी पणाचा गोडवा गाण्यापेक्षा
आम्ही हा शब्दप्रयोग वापरायला
शिकून घ्या. तुम्हाला एकाकीपणाचा
त्रास कधीच जाणवणार नाही

************

माणूस जेवढा आजाराने थकत नाही
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो
म्हणून हसत रहा… विचार सोडा…
आपण आहात तर जीवन आहे
हीच संकल्पना मनी बाळगा.

************

आयुष्यामध्ये सर्वांना महत्त्व द्या
पण नेहमी लक्षात ठेवा… जिथे
तुम्हाला महत्त्व नाही, तिथे आपला
किमती वेळ वाया घालवू नका.

************

वागायचे असे की कोणाला त्रास
नाही झाला पाहिजे. आणि जगायचे
असे की, कोणी नाद नाही केला पाहिजे.

************

प्रत्येक व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच
पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या
घटना त्याला वाईट वागायला प्रवृत्त करू
शकतात. म्हणून कधीतरी एखाद्याच्या
वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी, एकदा
त्या व्यक्तीची स्थिती जाणून घ्यायचा
प्रयत्न करावा.

************

प्रयत्न करून चुकलात तरी चालेल
पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नका
कारण हिम्मत नाही तर किंमत नाही
विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही.

************

मोठे व्हायला ओळख नाही….
माणसांची मने जिंकावी लागतात
जगातील कुठल्याही तराजूत
मोजता न येणारी एकमेव मोठी
वस्तू म्हणजे माणुसकी

************

जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्ने लिहितात त्यांच्या
नशिबाची पाने कधीच
कोरी नसतात.

************

मित्रांनो,
धावपळीच्या जगण्यामध्ये
एक विसावा नक्की घ्यावा.

गरम गरम चहा घेऊन
कामामध्ये उत्साह आणावा

मैत्रीच्या जीवनामध्ये
आठवणींचा गाव यावा.

हृदयात जपलेल्या प्रत्येकाला
रोज नक्की आवाज द्यावा.

************

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

सांभाळून ठेवणे ही पण
एक कला आहे. ती संपत्ती
असो वा नाते, सांभाळता
आले पाहिजे.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - नाती

ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची
व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते ना
त्यावेळी समजून घ्या की जगातील
सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली
आहे.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - नमस्कार

दुःख देऊन आनंद व्यक्त करणे
म्हणजेच जीवन
कष्ट करून फळ मिळवणे
म्हणजेच व्यवहार
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू
देणे, म्हणजेच सहानुभूती
माणुसकी शिकून माणसासारखे
वागणे म्हणजेच अनुभूती.

************

कदर नसलेल्या लोकांना
आदर द्यायच्या नसतो.

************

जेवढ्या वाईट दिवसांचा सामना
कराल, त्यापेक्षा दुप्पट चांगले
दिवस अनुभवायला मिळतील.

************

मन वळु नये, अशी श्रद्धा हवी….
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी…
सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी…
आणि कधी विसरू नये, अशी नाती हवी…

************

एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते, असे म्हणतात.
पण कधी कधी सर्व काही सुरळीत
होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ
द्यावा लागतो.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb- वेळ

मनातल्या भावना, शंका-कुशंका
मनातच गोठून राहिल्या की
नात्यांमध्ये दरी निर्माण होते.

************

वर्तमानातूनच सुख वेचण्याचा
प्रयत्न करा. कारण भविष्य फार
धूर्त आहे ते फक्त आश्वासन देते
खात्री नाही.

************

जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून
इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता
तेव्हा ते जळवणे राहते बाजूला.
खरे तर तुम्ही त्यांच्या मनातून
उतरण्याच्या प्रयत्न करत असता.

************

जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही
विविध रंगांनी नटलेली ही दुनिया
बघत नाही, तोपर्यंत हे जग
आपल्याला खूप छोटे वाटते आणि
आपले विचार पण तितकेच छोटे
राहतात. यामुळे छोट्या छोट्या
गोष्टी सुद्धा आपल्यात तणाव
निर्माण करत असतात.

************

लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही
फक्त त्याचा स्वतःचा गंजच त्याला
संपवू शकतो. अगदी तसेच माणसालाही
कोणीही संपवू शकत नाही, फक्त त्याचे
मनच त्याला संपवू शकते.

************

फक्त तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू
शकता. दुसरे कोणीही हे काम
करू शकत नाही.

************

आपल्या अडचणींवर मात करण्याचे
सामर्थ्य फक्त आपल्यातच असते
इतरांकडे केवळ सल्लेच असतात.

************

सृष्टी कितीही बदलली तरी
माणूस पूर्णतः सुखी होत नाही.
पण दृष्टी बदलली तर नक्कीच
सुखी होतो.
नियम सोपा असतो तो अमलात आणणे
कठीण असते. सुसंस्कृत माणसाची
संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन
आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल
घडवू शकतात.

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

कोणाचा स्वभाव तुम्ही बदलू
शकत नाही. कांदा प्रेमाने
जरी कापला तरी तो डोळ्यात
पाणी आणतोच.

************

पहिल्या बाकावर बसून यश पूर्तीची
स्वप्ने पाहता येतात. पण आयुष्याला
सामोर कसे जावे हे शेवटचा बाकच
शिकवतो.

************

लोक तुमच्या भावनांचा कधीच
विचार करत नाहीत. ते फक्त
करतात असे दाखवतात. हे
जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल
तेवढ्या लवकर तुमची प्रगती होईल.

************

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतःला ओळखणे

************

तुम्ही वर्ष बदलतांना पाहत आहात
मी वर्षभरात माणसांना बदलतांना
पाहिले आहे.

************

आवश्‍यकतेपेक्षा जास्त मिळते
त्याला म्हणतात नशीब सर्व
काही असूनही रडवते त्याला
म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी
सापडूनही आनंद देते त्याला
म्हणतात आयुष्य.

************

ऐपत नाही पत असली
तरच जग कौतुक करते.

***********

ज्या व्यक्ती जवळ ताकद नसतानांही
तो मनातून हार मानत नसेल तर
त्याला जगातील कोणतीच ताकत
हरवू शकत नाही.

************

विषवृक्ष लावावे लागत नाही
ते आपोआपच वाढतात
संशयाचे ही तसेच आहे.

************

दुःखाची झड आणि वेदनेची कळ
त्याच लोकांना जास्त कळते जे
प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य
जगत आलेले असतात.

************

स्वीकारावा लागला तर काही
काळ अंधारपणाही स्वीकारावा.
आणि पुढे अशा वेळीच आपले डोळे
उघडावे की ज्यावेळी त्या डोळ्यात
जग जाळण्याची शक्ती आलेली असेल.

************

माणूस आपली कींव करण्यात
भारी रमतो. खोटी कींव करून
घेण्याची सवय जडली की ती
व्यसनापेक्षाहि भयंकर बनते.

************

दिलेले वचन जर पूर्ण करता येत नसेल
तर वचन कुणाला देत जाऊ नका.
तुमचे तर फक्त वचन तुटते समोरच्याचे
मन आणि विश्वास दोन्ही तुटून जातो.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - वचन

मनुष्य कितीही गोरा असला तरी
त्याची सावली मात्र काळीच असते.
मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे
पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे.

************

तुमच्या सुखासाठी कोणाकडे
हात जोडू नका. तुमचा वेळ
फुकट वाया जाईल.

************

छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन तेच
लोक घेतात, जे प्रामाणिक असतात.
बेईमान लोकांना तर काहीच फरक
पडत नाही कारण ते बेशरम असतात.

************

अनेक अपयशाची कारणीभूत बाब
म्हणजे माणसाचा स्वभाव. माणूस
जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो
यशाच्या किती जवळ होता याची
त्याला अजिबात कल्पना नसते.

************

ज्यांचे स्टेटस, स्टोरी, पोस्ट लोक बघत
नाहीत, त्यांनी समजून जावे त्यांची
लायकी – इज्जत इतरांच्या नजरेत
30 सेकंदाची पण नाही.

************

वाईट दिवस आल्यावर कधी खचून
जाऊ नका. आणि चांगले दिवस
आल्यावर कधी घमंड पण करू नका.
कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच
आलेले असतात.

************

यश मिळवणे हे सोपे आहे कारण
ते कशाच्या तरी तुलनेत असते.
पण समाधान मिळवणे हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

************

एकवेळ अपमान सहन करा
पण लाचार बनून राहू नका.
कारण ती गुलामगिरीची
पहिली पाठराखण आहे.

************

संगतीचा परिणाम वाईट होतो
असे म्हणतात. पण यावर
विश्वासच बसत नाही. तसे
असते तर काट्यांना सुवास
आणि मुलांना टोचणे आले
नसते काय…?

************

अवघड याचा अर्थ अशक्य असा
होत नाही. याचा सरळ अर्थ असा
होतो की तुम्हाला कष्ट जास्त
करावे लागतील.

************

सुंदरता असण्यात असावी
फक्त दिसण्यात नाही.
सुंदरता विचारात असावी
फक्त दिखाव्यात नाही.

************

नाती जपतांना दिखावा नाही
तर त्यात आपुलकीचा ओलावा
असावा लागतो.

************

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात, त्यांचे निकाल
लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा….

************

माणसाने माणसात असतांना
मोबाईल खिशात ठेवून माणसात
रहावे. तिथे मोबाईल हातात ठेवून
माणसे खिशात ठेवल्यागत वागू नये.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - मोबाइल

आयुष्यात आपण किती खरे आणि
किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना
माहिती असते. परमात्मा आणि
आपला अंतरात्मा.

************

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसे
महत्त्वाची असतात. कारण चांगल्या
माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - चांगली वेळ

कधी कधी काही गोष्टी कळायला
खूप उशीर होतो आणि त्या वेळेस
त्या कडूनही काही उपयोग नसतो.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - उशीर-उपयोग

शांत आयुष्य जगण्यासाठी
मनातले असंख्य आवाज
आपल्याला थांबवता यायला हवेत.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - शांत - आयुष्य

संयमाचे प्रशिक्षण घेतले की
बरीच युद्ध शांतपणे जिंकता
येतात.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - संयम

सुंदर माणूस चांगल्या विचारांचा
असतो, असे काही नाही. पण
चांगल्या विचारांचा माणूस मात्र
नेहमीच सुंदर असतो.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb-सुंदर विचार

हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत
वाढते ना, तशी चांगल्या कर्मामुळे
मनुष्याची किंमत वाढत असते.
म्हणून आपण नेहमी चांगले कर्म
करीत रहा.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - किंमत

जीभे सारखा खतरनाक अवयव
नाही. माणसे भांडतात… युद्ध होतात…
नातेवाईक दुरावतात…. नको ते
खाल्ले जाते…. नको ते पिले जाते….
आणि हे सगळे एका जिभेमुळे होते.

************

आपल्या सोबत दुसऱ्यांचे ही चांगले
व्हावे. अशी मानसिकता ज्यांची
असते, त्यांना आयुष्यात काहीही
कमी पडत नाही.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - मानसिकता

सांगावे त्यालाच…. जो कुणाला
सांगणार नाही. मागावे त्यालाच
जो देईल स्वखुषीने. आवडून घ्यावे
तेच जे मिळाले आहे नशिबाने. आणि
नाते जोडावे त्यांच्याशीच जे
नीभावतील निस्वार्थपणे.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb-विजय भगत

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

नाते निभावणे हे कुलपाकडून
शिकावे. ते गंजून जाईल,
तुटून जाईल, पण चावी नाही
बदलणार.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - नाते

जर तुम्ही बरोबर आहात…
तर काहीच सिद्ध करण्याच्या
प्रयत्न करू नका. फक्त शांत
रहा. वेळ स्वतःच साक्ष देईल की
तुम्ही बरोबर आहात.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - बरोबर

माणसाने राजहंसा सारखे असावे
आपल्याला जे पटेल तेच घ्यावे….
नाही ते सोडून द्यावे.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - राजहंस

अहंकार हा सर्व नात्यांना
सुरुंग लावणारी वात आहे.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - अहंकार

ज्या स्त्रीला घरातील आर्थिक
परिस्थितीची चांगल्या प्रकारे
जाण असते. तिच्या संसाराला
कधीच काही कमी पडत नाही.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - परिस्थिति

वेळ विश्वास आणि आदर
हे तीन असे पक्षी आहे, जे
एकदा एका ठिकाणाहून
उडाले की ते परत त्या
ठिकाणी बसत नाहीत.

************

समस्या नाही असा मनुष्य
नाही. आणि उपाय नाही
अशी समस्या नाही.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - समस्या - उपाय

वेळेला महत्व द्या.
पण जिथे तुम्हाला
महत्त्व नाही, तिथे
वेळ देऊ नका.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - वेळ

व्हाट्सअप असो की जीवन
लोक फक्त स्टेटस पाहतात
आणि आपल्या स्टेटस नुसार
आपल्याशी कसे वागायचे…
ते ठरवतात.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - स्टेटस

यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे
जग बदलतात आणि असफल लोक
जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb -यशस्वी -

चांगल्या लोकांमधील सर्वश्रेष्ठ गुण
हा असतो की त्यांना लक्षात नाही
ठेवावे लागत. ते लक्षात राहतात.

************

कोणीच कोणा वाचून
मरत नाही इथे, कारण
वेळ जगायला शिकवते.

************

निरागसता इतकी
असावी की, चेहऱ्याला
सौंदर्याची गरजच नसावी.

************

चांगले संस्कार कुठल्याही
मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात मिळता

************

विचारपूर्वक घेतलेला योग्य
निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता
सिद्ध करतो.

************

लोकांना तुमच्या असल्याने फरक
पडतो. अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळूहळू सवय करून घेतात.

************

Suvichar | Good Thoughts In Marathi |
सुंदर सुविचार

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - सवय

माणसाला आयुष्यात सगळे
काही मिळते. फक्त मिळवण्याची
वेळ तेवढी चुकलेली असते.

************

प्रयत्न करत राहा यशस्वी झालात
तर घरचे खुश होतील आणि नाही
झालात तर गावचे खुश होतील.

suvichar - good thoughts in marathi - सुंदर सुविचार - vb - यशस्वी

दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा
आहे जिथे तुमची क्षमता आणि
आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते.

************

यशाचा मुख्य आधार
सकारात्मक विचार
आणि सतत प्रयत्न करणे.

************

जगात सात अब्ज पेक्षा जास्त लोक
आहेत. त्यातील मूठभर माणसांची
तुमच्या विषयीची मते वाईट असल्याने
तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का…?

************

आपण किती जणांना ओळखतो
यापेक्षा ज्यांना ओळखतो त्यांना
का ओळखतो याचा विचार केला
तर आयुष्य आणखी सुखकर
होईल एवढे मात्र नक्की.

************

मित्रांनो आजचे सुविचार सुंदर विचार
तुम्हाला कसे वाटले लाईक आणि
कमेंट च्या माध्यमातून नक्की
कळवा.

धन्यवाद

एखाद्या व्यक्तीला समजून
घेण्यासाठी, त्याच्या समोर
नाही… तर त्याच्या जागी
उभे राहावे लागते.

************

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की
माणसाला आनंद घेता ही येतो
आणि देता ही येतो.

************

कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता
समोरच्याला सांगणे हे ज्याला जमले
त्याला आयुष्य जगायचे जमले. कारण
समोरच्यावर चिडणे खूप सोपे आहे पण
त्याचे मन न दुखावता त्याला ती गोष्ट
सांगणे तेवढेच अवघड…..!

************

कोणीही पाहत नसतांना
आपले काम इमानदारीने
करणे म्हणजे प्रामाणिकपणा

************

पैशांची गरज भासली तर ते व्याजाने ही
मिळतात. पण माणसाची साथ व्याजाने
मिळण्याची सुविधा अजून तरी सुरु
झालेली नाही. म्हणून नाती जपा.

************

आनंदात काय परके सुद्धा
सामील होतात. पण न बोलावता
दुःखात सामील होतात तेच
खरे आपले असतात.

************

जीवन एक वाहणारी नदी आहे
म्हणून प्रत्येक परिस्थितीत पुढे
जात राहा. जेथे प्रयत्नांची उंची
मोठी असेल तेथे नशिबाला हि
झुकावे लागेल.

************

प्रयत्नांच्या जोरावर मनुष्य प्रत्येक
गोष्ट प्राप्त करू शकतो. अपेक्षांचे
ओझे कमी केले तर जीवनात
आपण नेहमी समाधानी राहू शकतो.

************

देशात राजा, समाजात गुरु
कुटुंबात पिता आणि घरात स्त्री
कधी सामान्य नसतात. कारण
निर्मिती आणि प्रलय यांच्याच
हातात असते.

************

जीवनात पैसे कधीही कमावता
येते. परंतु निघून गेलेली वेळ
आणि निघून गेलेली व्यक्ती
पुन्हा मिळवता येत नाही.

************

शिक्षणातून व कुटुंबातून घेतलेले
ज्ञान, मनुष्य कदाचित विसरेल ही
परंतु जीवनातील अनुभवातून
घेतलेले धडे तो कधी विसरत नाही…

************

आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते
ते काम नक्की करा. कारण भीती
तुम्हाला संकटावर मात करायला
शिकवते.

************

तुम्ही कितीही हुशार असाल, पण
जर तुम्हाला माणसांशी कसे वागायचे
ते माहीत नसेल, तर तुमच्या हुशारीचा
काहीच उपयोग नाही.

************

काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा
नाही देणार. कारण त्यांना भीती
लागलेली असते हा माझ्यापेक्षा
मोठा होऊ शकतो.

************

चालतांना ठेच लागली तर नेहमी
दगडाला दोष द्यायचा नसतो.
कधी कधी आपणच आपला पाय
चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.

************

ज्यांना स्वतःच्या चुकीची जाणिव
कधीच होत नाही त्यांना
कोणीच बदलू शकत नाही.

************

जर आपला हेतूच प्रामाणिक आणि
शुद्ध असेल तर आपल्यावर टीका
करणाऱ्यांच्या टीकेला काहीच
महत्त्व राहत नाही….

************

सुखी राहा…. हसत राहा….. आनंदी राहा……

Motivational quotes in marathi | Marathi Suvichar
मनाला शांत करणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार

आयुष्यात चूक केल्याशिवाय
अनुभव मिळत नाही. आणि
अनुभव घेतल्याशिवाय
चूक कळत नाही…..!

************

जे आपलेच खरे करतात
अश्या व्यक्तींना कधीच
समजवायला जाऊ नका
नुकसान तुमचेच आहे.

************

अशक्य असे काहीच नसते.
मनात आले तर चाळणीतून
पाणी सुद्धा नेऊ शकतो.
फक्त त्या पाण्याचा बर्फ
होईपर्यंत संयम असायला हवा.

************

कधी कधी शांत राहिलेलेच
चांगले असते.
कधी मैत्रीसाठी….
कधी नात्यासाठी….
तर कधी स्वतःसाठी….

************

खरे तर ना आयुष्यात माणसे जपायची
असतात. आणि पैसे वापरायचे असतात
परंतु आजकाल लोक पैसे जपतात…
आणि माणसे वापरतात.

************

जेव्हा कुणी तुम्हाला बघून पण
दुर्लक्ष करेल. समजून घ्या…
त्याचे पुर्ण लक्ष तुमच्यावरच आहे.

************

आयुष्यात काही प्रसंग असे येतील कि
आपण काही चुकीचे करत नसतो. किंवा
आपण चुकीचे नसलो तरी आपण चुकीचे
ठरवले जातो.

************

आयुष्यात कडू बोलणारे
लोक असले तरी चालेल.
पण गोड बोलून धोका देणारे
लोक नकोत.

************

प्रत्येकावर विश्वास ठेवत बसू नका
कारण साखरेचा आणि मिठाचा रंग
हा एकच असतो.

************

जर तुम्ही बरोबर आहात तर
काहीच सिद्ध करण्याच्या प्रयत्न
करू नका. फक्त शांत रहा.
वेळ स्वतः साक्ष देईल.

************

निस्वार्थी मन हाच
सर्वात मोठा आदर्श आहे.

************

मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा
लहान झरा होऊन गोड राहा.
जिथे वाघ पण मान खाली घालूनच
पाणी पितो.

************

चांगले करायला जमत नसेल तर
दुसऱ्याचे वाईट करू नका. कारण
वेळ प्रत्येकाची येते, फक्त कारणे
वेगळी असतात.

Marathi Suvichar | मनाला प्रेरणा देणारे
आणि आयुष्याला नवीन दिशा देतील
असे मराठी प्रेरणादायी सुविचार

जे क्षण समोर दिसतील त्याचा आनंद
घ्यायला शिका. वेळ बदलल्यावर ते
पुन्हा दिसणार नाही, कष्टमय सर्वांचेच
आयुष्य आहे, कधीतरी स्वतःसाठी वेळ
काढा. धावपळ तर तुमची आयुष्यभर
राहणार आहे…

***********

स्वतःसाठी जगा. कारण
लोकांसाठी कितीही केले
तरी त्यांना कमीच पडणार.

***********

आयुष्य सगळ्यांसाठी सारखे
नसते. तुमच्याजवळ जे आहे
त्यात सुखी राहायला शिका.

***********

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर
खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा
प्रत्येक क्षण आपलाच आहे.

***********

स्वतःसाठी जगा. कारण
लोकांसाठी तुम्ही कितीही
काही केले तरी ते
असमाधानीच राहणार….

***********

मित्रांनो बाकीच्यांसाठी
जगता जगता तुम्ही स्वतःला
विसरून गेला आहात. कधी वेळ
भेटला तर स्वतःसाठी पण जगा.
नाही तर या गडबडीत स्वतःला
हरवून बसाल..

***********

कधीतरी शांतही रहावे.
मनाने एकटी माणसे
शांततेत बोलकी होतात.
ओझी दोन मनांची मग
सहज हलकी होतात.

***********

भूतकाळाचा
कैदी बनण्यापेक्षा
तुमच्या भविष्याचा
निर्माता बना.

***********

स्वतःला हवे ते ऐकण्यासाठी
किंवा पाहण्यासाठी दुसऱ्याला
चुकीचे ठरवू नका. कधीतरी
स्वतःचा अँगल बदलून पहा,
तुम्हाला हवे ते ऐकता आणि
पाहता येईल.

***********

कधी कधी शांत राहिलेले चांगले
असते. कधी प्रेमासाठी, कधी
मैत्रीसाठी, कधी नात्यासाठी
तर कधी स्वतःसाठी….!

***********

खूप भारी वाटते जेव्हा कोणीतरी
बोलते, स्वतःसाठी नाही तर
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे.

***********

थोडासा वेळ काढून स्वतःसाठी
जगा. कोणी नाही सांगणार
थकला आहात आराम करा…

***********

श्रीमंतीचे स्वप्न हे प्रत्येकाला पडत असते.
पण ते चुकीच्या मार्गाने पूर्ण करायच्या
भानगडीत कधीच पडायचे नसते. कारण
त्यामध्ये अस्तित्वाला तडा जाण्याची
शक्यता असते…..

***********

जीवनाचे काही क्षण स्वतःसाठी
जगा कारण की इथे Once More
नसतो.

Marathi Suvichar | स्वतःसाठी जगा | I
nspirational quotes in marathi |
मराठी प्रेरणादायक सुविचार

Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here