Suvichar Marathi | 500+सोपे प्रेरणादायी सुंदर मराठी सुविचार
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये खूप सुंदर सुंदर मराठी सुविचार, मराठी सुविचार छोटे, लहान लहान सुविचार
पण जीवनाचे अर्थ सांगणारे मराठी प्रेरणादायी सुविचार, सुंदर विचार आणले आहेत.
जर मित्रानो, आपण Marathi suvichar, Suvichar Marathi, suvichar status Marathi,
Marathi suvichar status, sunder vichar status , चांगले विचार, positive Quotes marathi,
Motivational Quotes Marathi, असे काही शोधत आहात तर या पोस्ट मध्ये तुमचे नक्कीच
समाधान होईल.
माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी शक्ती आहे….. सुविचार. ज्या माणसांजवळ विचारांचा
भक्कम पाया नसतो…. त्या माणसांची जीवनरुपी इमारत उभीच राहू शकत नाही. कुठल्याही
कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी आयुष्य….. सुखमय जीवन…. समाधानी आयुष्य
जगू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे प्रेरणादायक मराठी सुविचार, सुविचार मराठी, Suvichar Marathi,
शांत मनाने वाचून हे विचार पूर्णतः आपल्या आचरणात आणायला पाहिजे. नक्कीच आयुष्य सुखमय
आणि यशस्वी होईल.
Suvichar Marathi | 500+सोपे प्रेरणादायी सुंदर मराठी सुविचार
Marathi Suvichar
मेघाचे बरे असते भरून आले मन की….
कुठेही बरसता येते. पण आपले तसे नसते
बरसायला ही आधी हक्काचा कोपरा
शोधत बसावे लागते.
💐💞🙏
सावली देणारे झाड कधीही
परतफेडीची अपेक्षा करत नाही.
मग ते वृक्ष असो वा आई-वडील…
💐💞🙏
सुख आहे सगळ्यांजवळ… पण
ते अनुभवायला वेळ नाही.
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही….
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायला वेळ नाही आणि
सगळ्यांची नावे मोबाईल मध्ये
सेव आहेत. पण चार शब्द
बोलायला वेळ नाही.
💐💞🙏
सुखाचे अनेक भागीदार भेटतील
दुःखाचा एक साक्षीदार भेटायला
सुद्धा नशीब लागते.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
ठरवले ते प्रत्यक्षात होतेच असे नाही
आणि जे होते ते कधी ठरवलेलेच असते
असे नाही. यालाच कदाचित जीवन
म्हणतात.
💐💞🙏
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी
तुलनेत असते. पण समाधान हे
महाकठीण कारण त्याला मनाचीच
परवानगी लागते.
💐💞🙏
फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.
माणूस कितीही मोठा झाला
तरी कौतुक त्याच्या गुणाचे…
विश्वासाचे होते.
💐💞🙏
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात….
💐💞🙏
तुम्ही कितीही हुशार असाल
पण जर तुम्हाला माणसांशी
कसे वागायचे ते माहीत नसेल
तर तुमच्या हुशारीचा काहीच
उपयोग नाही.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
मदत करणाऱ्याला
कधीच धोका देऊ नका
आणि धोका देणाऱ्याला
कधीच मदत करू नका.
💐💞🙏
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे
जीवनात कधीही अपयशी ठरत नाही.
💐💞🙏
यश हे सोपे, ते कशाच्या तरी तुलनेत असते | Sunder Vichar Status | मराठी सुविचार | Suvichar Status
योग्य वेळ कधीच स्वतः येत नसते
तिला सततच्या प्रयत्नाने आणावे लागते.
💐💞🙏
हळूहळू मिळालेल्या यशामुळे
चांगले व्यक्तिमत्त्व घडते. तर
पटकन मिळालेल्या यशामुळे
अहंकार वाढतो.
💐💞🙏
काही गोष्टी आयुष्यभर सलत राहतात
म्हणून काय जगणे सोडून द्यायचे नसते.
एकदा हरलो म्हणून काय झाले….
परत एकदा उमेदीने पेटून उठायचे असते.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
संकट हे पाण्यासारखे असते
ते तुम्हाला बुडविण्यासाठी नाही
तर त्यात कसे पोहायचे ते
शिकविण्यासाठी आलेले असते….!
💐💞🙏
खोट्या होकारापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो.
💐💞🙏
Sunder Vichar Status | काही गोष्टी आयुष्यभर सलत राहतात | मराठी प्रेरणादायक सुविचार
“मी” पणाची पट्टी
मनावर बांधली गेली की
जवळची नाती जवळ असतांना
चष्मा घालूनही डोळ्यांना
दिसत नाहीत.
💐💞🙏
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना
नक्की सांगा. कारण…. त्याने मन
हलके तर होईलच आणि लढण्याची
ताकद पण येईल….!
💐💞🙏
लिहिलेली प्रत्येक गोष्ट
वाचणाऱ्याला समजू शकत नाही.
कारण लिहिणारी व्यक्ती भावना लिहिते…
आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्द वाचते.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
दुःख गिळून आनंद व्यक्त करणे
म्हणजे जीवन.. कष्ट करून
फळ मिळवणे म्हणजे व्यवहार..
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे
म्हणजे सहानुभूती….
माणुसकी शिकवून माणसासारखे
वागणे म्हणजे अनुभूती…
💐💞🙏
शांतता आणि हास्य ही दोन
सामर्थ्यवान साधने आहेत.
हसणे हे बऱ्याच समस्यांचे
निराकरण करण्याचा मार्ग आहे.
आणि शांतता बऱ्याच समस्या
टाळण्याचा मार्ग आहे.
💐💞🙏
Suvichar status | दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन | मराठी प्रेरणादायक सुविचार
पायाला झालेली जखम
जपून चालायला शिकवते
आणि मनाला झालेली जखम
आयुष्य जगायला शिकवते.
💐💞🙏
सुखी घराचे रहस्य
ऑफिसातले व्यवस्थापन
ऑफिसात ठेवायचे.
घरात आणली की
घरातले घरपण हळूहळू
संपून जाते.
💐💞🙏
हजारो लोक येऊन कान भरून जातील
पण विश्वास कोणावर ठेवायचा
हा निर्णय मात्र आपला असतो.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
गरज संपली की जवळचे ही
खेळ खेळतात. म्हणून खेळ खेळतील
एवढेही कुणाला जवळ करू नका.
💐💞🙏
माणसाची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली. तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
💐💞🙏
शुभ सकाळ | हजारो लोक येऊन कान भरून जातील | suvichar status | मराठी प्रेरणादायक सुविचार | सुंदर विचार
नेहमी तुटण्याच्या अर्थ संपणे
असा होत नाही. कधी कधी
तुटल्याने आयुष्याची नवीन
सुरूवातही होते…..
💐💞🙏
छंद हे
इतरांना दाखवण्यासाठी नव्हे
तर स्वतःला सुखावण्यासाठी
जपायची असतात.
💐💞🙏
आपल्याकडे काय आहे किंवा
आपण कोण आहोत.. यावर
सुख कधीच अवलंबून नसते…
आपल्या मनात कोणते विचार
चालू आहेत यावर सुख अवलंबून
असते.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
आपले आयुष्य इतके छान…
सुंदर आणि आनंदी बनवा…
निराश झालेल्या व्यक्तीला
तुम्हाला पाहून जगण्याची
नवी उमेद मिळाली पाहिजे.
💐💞🙏
जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका
आणि जो जीव लावतो त्याची साथ कधी
सोडू नका.
💐💞🙏
Suvichar status | आपले आयुष्य छान सुंदर आणि आनंदी बनवा | Sunder Vichar Status | Good Thought Marathi
अडथळे तर क्षणिक असतात
पण त्या क्षणात खचून न जाता
धीराने त्यांना समोर जाणे
हेच तर आयुष्य आहे.
💐💞🙏
संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की
आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.
आणि रुबाब हा विकत घेता येत नाही
आणि दाखवता पण येत नाही.
तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो…!
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar | Status Suvichar
कधी समोरच्या व्यक्तीचे बोलणे
इतके मनाला लागते की…
काही क्षणासाठी मन एकदम शांत
होऊन जाते.
आणि मनात एकच विचार येतो की
खरंच आपण एवढे वाईट आहोत का…!
💐💞🙏
आयुष्यात कोणा सोबत कितीही
चांगले वागा. आपण नेहमी…..
कुठेतरी कमी पडतो. कारण
लोकांना फक्त आपल्या चुका
दिसतात. आपण लावलेला
जीव नाही…..
💐💞🙏
डोळ्यांना सर्वकाही दिसते
पण डोळ्यात जर काही गेले तर
त्याच डोळ्यांना काही दिसत नाही.
याचप्रकारे माणसाला दुसऱ्याची चूक
दिसते. पण स्वतःची चूक दिसत नाही.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
आपल्या चुका आपण मान्य केल्या की
आपले मन आणि विचार दोन्ही पण
स्वच्छ होतात.
फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे.
💐💞🙏
Marathi Suvichar Status | संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की | Sunder Vichar Marathi | चांगले विचार
चाळिशीनंतर स्त्री अचानक सुंदर दिसायला लागते | Sunder Vichar | Good Thought Marathi
चाळिशीनंतर ची स्त्री अचानक सुंदर दिसायला लागते.
कारण अनुभवांची शिदोरी तिच्या गाठीला असते.
ती स्वतःच स्वतःला जपायला शिकते.
बाहेरच्या जगात फिरताना ती मुळीच घाबरत नसते.
खूप सार्याज गोष्टींचे सखोल ज्ञान तिला प्राप्त झालेले असते
म्हणूनच कोणत्याही संकटांना ती मोठ्या धाडसाने तोंड देते
घर संसार सांभाळता सांभाळता थोडे स्वतःकडे ही लक्ष देते
म्हणूनच तर ती चारचौघीत उठून दिसते.
चाळीशीच्या उंबरठ्यावर बरीच कर्तव्य तिने पार पडलेली असतात
कोणाशी कसे बोलायचे कसे वागायचे हे तिला चांगले समजते
आतापर्यंत झालेल्या चुकांतून ती बरेच काही शिकलेली असते
या सर्व अनुभवामुळेच तर ती आपल्या मनाला खुश ठेवायला शिकते
म्हणूनच चाळीशी नंतरची स्त्री खूप सुंदर दिसते.
💐💞🙏
Marathi Suvichar Status | सुंदर विचार
उगाच कुणाला दुखवू नये
गंमत म्हणून……
बरेच काही गमवावे लागते
किंमत म्हणून…
💐💞🙏
जीवनात नाती ढिगभर मिळतील
पण ओढ लावणार मात्र
एखादेच असते.
💐💞🙏
नशिबाचे आणि मनाचे
कधीच जुळत नाही.
कारण मनात जे असते
ते नशिबात नसते.
💐💞🙏
कुणावरही द्वेष करू नका
द्वेषाने आपलेच नुकसान होणार.
त्यापेक्षा प्रेम करा
त्याने सर्व काही चांगलेच होणार
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
प्रत्येकाच्या आयुष्यात रोज
काही ना काही समस्या या
येणारच असतात. पण
खरा विजेता तोच असतो
जो या समस्यावर मात करतो.
💐💞🙏
समाधान हे गरीबांना श्रीमंत बनवते
तर समाधान हे मोठ्या श्रीमंत माणसाला
गरीब बनवते.
💐💞🙏
यश साजरा करणे चांगले आहे
परंतु अपयशातून शिकणे
महत्त्वाचे आहे.
💐💞🙏
नाती जपताना दिखावा नाही तर
त्यात आपुलकीचा ओलावा असावा
लागतो.
💐💞🙏
वेळ गेल्यावर
वेळ देऊन उपयोग नसतो….!
💐💞🙏
नाते कधीच स्वतः तुटत नसतात.
तर गैरसमज आणि गर्व त्यांना
तोडून टाकतात.
💐💞🙏
काही लोक सारखे झिजून
सुखाचा डोंगर उभा करून
थकून जातात. तेव्हा
त्यांच्या काही अपेक्षा नसतात
फक्त त्यांना आपल्या माणसाचा
काठी सारखा आधार हवा असतो.
💐💞🙏
मनाला आवडतील असे सुंदर मराठी सुविचार | Marathi Suvichar | Sunder Vichar
Motivational Marathi Suvichar | सुंदर विचार | बोधकथा
सर्व तरुणांनासाठी एक बोधकथा
मग क्षेत्र कोणतेही असो.
कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो.
तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो.
परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही. कावळ्याशी लढा देत नाही किंवा
कावळ्यावर आपला वेळ वाया घालवत नाही.
गरूड फक्त आपले पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरुवात करतो.
खरेतर गरुडाची उडान जितकी जास्त होते तितकेच कावळ्याला श्वास घेणे कठीण होत जाते.
आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप खाली कोसळतो.
आपला वेळ कावळ्या बरोबर वाया घालवणे थांबवा फक्त स्वतः उंच उंच जात राहा.
सतत सतत काम करत राहा. कमकुवत निंदा करणारे असेच संपून जातील…..
कार्य करत रहा.
कार्यमग्नता… जीवन – मृत्यू हीच विश्रांती….!
एक सुंदर मराठी बोधकथा | Motivational Moral Story In Marathi
मित्रांनो नक्की बघा १०१% आवडेलच || सुंदर विचार मराठी || Good Thoughts In Marathi On Life | Suvichar
suvichar
एक खुप मोठा श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे चार – पांच बंगले असतात….
महागड्या गाड्या असतात…. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नसते.
दर दिवशी तो भरपूर पैसे कमवत असतो…
एका रात्रीला त्याला दररोज च्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि
तो झोपी गेला.
सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले तर त्याच्या समोर यमराज उभे होते.
तो माणुस एकदम दचकला. तसेच यमराज म्हणाले… आता चला….
तुमची जाण्याची वेळ आली आहे.
त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की….
मी तुम्हाला वीस करोड रुपये देतो. मला आजचा दिवस द्या.
त्यावर यमराज म्हणाले की…. तुम्ही उगाच आपला ही आणि माझा ही वेळ
वाया घालवत आहात. तुम्हाला या क्षणीच माझ्याबरोबर चालावे लागेल.
त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला पन्नास करोड रुपये देतो…
मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचे आहे.
त्यावर पुन्हा यमराज म्हणाले की… खरोखरच तुम्ही वेळ वाया घालवत
आहात. तुम्हाला यावेळीच माझ्याबरोबर चालावे लागेल.
परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो.
मला फक्त पाच मिनिट द्या. त्यावर पुन्हा यमराज म्हणाले.
तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी, तुम्हाला आता या क्षणाला
माझ्याबरोबर यावेच लागेल.
तो श्रीमंत माणुस आता खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच
संकेड द्या. मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचे आहे.
यावर यमराज म्हणाले….
ठीक आहे…. लवकर लिहा जे लिहायचे आहे ते….
त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेले ते पत्र.
प्रिय मित्रहो…..
माझ्याकडे आज भरपूर पैसा आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमी
नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला
एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत.
मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस…
प्रत्येक तास…. प्रत्येक मिनिट…. मी पैसा कामविण्यात घालवला.
आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला साधा एक मिनिट सुद्धा मला
देऊ शकला नाही.
म्हणुन सांगतोय मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा. कुणी आपल्याला
वेडा म्हटले तरी चालेल परंतु जीवनाला अगदी बालपणासारखे
एन्जॉय करून जगा.
शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी
साथ सोडली. जगा… मनसोक्त जगा.
मित्रांनो… माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे काही
आपल्याकडे आहे त्यातच भरभरून आयुष्य जगा. पैसा तर जीवनात
नक्कीच कमवा परंतु तो इतकाही साठवून ठेऊ नका की जीवनाची
खरी मजा ही आपण कधीच नाही घेऊ शकत…..!
घरातून बाहेर पडतांना आपल्या देव घरातील देवाला नमस्कार करूनच
बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या. कारण तो भगवंत
तुम्ही घरी यायची वाट पहात असतो.
आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता….
तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून ‘ हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला ‘
असे म्हणां.
कारण तुमच्या हातामध्ये भले ही लाखांचे घड्याळ असेल…
परंतू त्यावर दाखवणारी वेऴ ही फक्त त्या भगवंताच्याच
हातात आहे…!
जय श्री कृष्ण
Suvichar status | Sunder Vichar Marathi | जगाला काय आवडते ते करू नका | सुंदर सुविचार संग्रह
जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा
कुणाशीही मिळा…. मिसळा…. एकरूप व्हा….
परंतु स्वतःचे महत्त्व कमी होऊ देऊ नका.
💐💞🙏
जगाला काय आवडते ते करू नका….
तुम्हाला जे वाटते ते करा.
फक्त आपल्यामुळे कुणाचे मन दुखायला नको
याची जाण ठेवा. मग बघा जीवनाची खरी मजा.
💐💞🙏
कर्तुत्वान माणसाला जीवनात वेळोवेळी झालेले डंक
हे नवे पंख देऊन जातात. काटा रुतल्या शिवाय
वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
शब्द कधी मन मोकळे करतात….
तर कधी तोंड बंद करतात.
💐💞🙏
वेळ कधी कसी येईल सांगता येत नाही….
श्री रामाला रात्री राज्य मिळणार होते….
सकाळी उठल्यावर वनवास मिळाला…!
💐💞🙏
पुन्हा जिंकण्याची तयारी
तिथूनच करायची…
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
💐💞🙏
झाडाला पाणी आणि नात्याला सुसंवाद पाहिजेच
तरच ती टिकतात. नाहीतर ती तुटतात….
एक मुळापासून तर एक मनापासून.
💐💞🙏
मराठी सुविचार | Marathi Suvichar
ध्येय उंच असले की……
झेप देखील उंचच घ्यावी लागते….
💐💞🙏
वाघाची शिकार करायला
काळीज पण वाघाचे लागते.
कारण लपून वार लांडगे करतात
वाघ नाही.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
लांडग्यांनी टोळी जरी बनवली
तरी जंगलात राज्य करू शकत नाही…!
💐💞🙏
मन प्रसन्न असो वा नसो पण
चेहरा नेहमी हसरा असावा.
कारण जग चेहरा पाहते….
मन नाही.
💐💞🙏
एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके
चांगले नक्कीच व्हा…. पण पुन्हा
त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके
मूर्ख होऊ नका.
💐💞🙏
खूप दूरवर पाहण्याच्या नादात
चांगल्या गोष्टी अगदी
जवळून निघून जातात…..
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे
तेच प्रेमाने सांभाळा… मग त्या
वस्तू असोत किंवा आपली माणसे…
काळजी घ्या….
💐💞🙏
लाख डाव खेळले जातील
तुम्हाला पाडण्यासाठी….
पण त्यांना धाडसाने सामोरी जा
कारण त्यांच्यात काही नमुने
आपलेच असतात.
💐💞🙏
चुका तर सगळ्यांकडून होतच असतात
पण त्यांना धरून ठेवायचे नसते.
कारण त्या धरून ठेवले की नाती
आणि माणसे नकळत सुटत जातात.
त्यामुळे झालेल्या चुका विसरत चला.
असलेली नाती जपत चला…..!
💐💞🙏
सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.
जे आपल्या हिंमतीच्या जोरावर जीवन जगतात
त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची
गरज नसते.
💐💞🙏
जीवनात कधीही
कोणताही निर्णय घ्यायचा असेल…
तर हृदयापासून घ्या. कारण
हृदय भलेही लेफ्टला असतो
पण त्याचे निर्णय राईट असतात….!
💐💞🙏
जोपर्यंत तुम्ही थोडे तिरके होत नाही….!
तोपर्यंत काही लोक सरळ होत नाही…
💐💞🙏
सुखाला अंत नाही….
म्हणूनच माणूस शांत नाही.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
कुणाचे सुख बघून
ते आपल्या वाट्याला का नाही…
म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा….
कोणाचे दुःख बघून ते निदान
आपल्या वाट्याला तरी नाही…
हे बघून समाधानी राहणे
म्हणजेच सुखी जीवन.
💐💞🙏
आपल्याशी बोलल्याने
जर कोणाला आनंद होत असेल
तर आपली इच्छा नसली तरी….
त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलत जा.
💐💞🙏
Suvichar status | Sunder Vichar Marathi | जगाला काय आवडते ते करू नका | सुंदर सुविचार संग्रह
अत्यंत महत्वाचे जीवनसार
चिकूचे बी फळात राहून ही फळ पक्व झाले की
त्यातून अलगद बाहेर पडते. अगदी स्वच्छपणे.
आंब्याची कोळी मात्र आंब्याच्या रसात इतकी
गुरफटून जाते…. फळ पिकले तरी रसातून वेगळी
होत नाही. परिणाम…. तिलाही लोक पूर्णपणे पिऊन
चोकल्या शिवाय फेकत नाही. म्हणून चिकूच्या बी सारखे
वागावे…. सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत
बाहेर पडावे. कोई सारखे मायारूपी रसात गुरफटून राहाल तर
लोक मात्र पिळुन चोखुन फेकल्या शिवाय राहणार नाहीत.
तर तसे होण्याच्या आधीच सावधपणे बाहेर पडावे.
💐💞🙏
भगवत गीता संदेश
प्रत्येका मध्ये आपली शक्ती आणि
आपली कमजोरी असते.
मासे कधी जंगलात धावू शकत नाही.
आणि सिंह कधी पाण्यात राजा
बनू शकत नाही….! त्यामुळे प्रत्येकाला
महत्त्व दिले पाहिजे.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
शाळा सर्व काही शिकवते…
लघुकोन, काटकोन, त्रिकोण, चौकोन,
परंतु आपले कोण…
हे मात्र परिस्थितीचं शिकवते.
💐💞🙏
जिंकणाऱ्या व्यक्तीचे अनुभव आणि
हरलेल्या व्यक्तीच्या सल्ला व
स्वतःची बुद्धी ह्या तीन गोष्टीत
जिंकण्याच्या विश्वास नक्कीच
निर्माण होतो.
💐💞🙏
इतरांचे भले व्हावे…
अशी मनात तळमळ असावी….
पण ज्याचे भले झाले….
त्याच्याविषयी मळमळ नसावी.
💐💞🙏
जीवनभर साथ देणारी माणसे जोडा…
नाहीतर तासभर साथ देणारी माणसे
तर… बस मध्ये पण भेटतात.
💐💞🙏
चांगल्या माणसाची परीक्षा
कधी घेऊ नये….
ते पाऱ्यासारखे असतात.
जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता
तेव्हा ते तुटले जात नाहीत पण
शांतपणे निसटून तुमच्या आयुष्यातून
निघून जातात….!
💐💞🙏
Suvichar Status Marathi
नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो…
थेंबभर मिळाला तरी जीवनभर पुरतो.
आपुलकीचे नाते दुधात मिसळलेल्या
साखरेसारखे असते. कितीही प्रयत्न केले
तरी वेगळे होणे शक्य नसते.
💐💞🙏
कोणतेही नाते जितके विश्वासावर टिकून असते
तितकेच ते समोरच्याला आहे तसे स्वीकारणे
यावर ही अवलंबून असते.
खूप लोक असेही असतात… ज्यांना वाटते
समोरच्याने त्यांना हवे तसे बदलावे आणि
समोरचा बदलतो ही… पण मग याला
खरे प्रेम म्हणावे का…..?
समोरच्यावर वर्चस्व न गाजवता….
आहे तसा त्या व्यक्तीला स्वीकारून
स्वतःचे होणारे बदल स्वीकारणे
यामध्ये खरे प्रेम असते.
💐💞🙏
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्या बरोबर आहे. नाहीतर
डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यांमध्ये
जागा नाही मिळत.
💐💞🙏
समुद्राने झरण्याला हिणवून विचारले
झरा बनून किती दिवस राहणार.
तुला समुद्र नाही का बनायचे….?
त्यावर झाऱ्याने शांततेत उत्तर दिले
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले
कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पितो.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
शिक्षणातून आणि कुटुंबातून घेतलेले ज्ञान
माणूस कदाचित विसरेल परंतु आयुष्यातील
अनुभवातून घेतलेले धडे माणूस कधीही
विसरू शकत नाही.
💐💞🙏
आयुष्याचे पुस्तक कितीही जुने झाले
तरी आठवणींची पाने तशीच राहतात….
💐💞🙏
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.
पण आयुष्याच्या आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
💐💞🙏
जग सर्वांसाठी सारखेच असले तरी
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे
नकाशे वेगवेगळे असतात.
💐💞🙏
Suvichar Status Marathi
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य….
💐💞🙏
आयुष्यभर कोणी जगण्याचे कारण विचारत नाही…
पण मृत्यू झाल्याच्या दिवशी सगळे जण विचारतात
“कसा काय मेला…?”
💐💞🙏
Suvichar status | शिक्षणातून आणि कुटुंबातून घेतलेले ज्ञान माणूस कदाचित विसरेल | Suvichar Marathi
कधी अडचणी एकट्याने येत नाहीत…
उपाय सुध्दा सोबतच घेऊन येतात…!
फक्त संयम ठेवून
उपाय शोधण्याची आवश्यकता असते…!
विचार करायला लावणारा सुंदर विचार –
Good Thoughts In Marathi On Life
Suvichar Marathi
एक सत्य युधिष्ठिराने सांगितले होते…!
सगळ्यांनाच मरायचे आहे…
पण कुणालाही मरावेसे वाटत नाही…!
आजची तर फार गंभीर परिस्थिती आहे…
अन्न सगळ्यांनाच पाहिजे आहे…
पण शेती कुणालाही करावीशी वाटत नाही…!
सर्वानांच पाण्याची गरज आहे…
परंतु कुणालाही पाणी वाचवावे
असे वाटत नाही…!
सगळ्यानांच सावली पाहिजे आहे…
परंतु झाडे लावून त्यांना जगवू असे
कुणालाही वाटत नाही…!
घरात सून सगळ्यानांच पाहिजे आहे…
परंतु आपल्याला मुलगी व्हावी…
असे कुणालाही वाटत नाही…!
विचार करावे असे प्रश्न आहेत…
परंतु कुणालाही विचार करावे
असे वाटत नाही…!
[…] […]