suvichar marathi, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी सुविचार

0
238
suvichar marathi - मनाला शांती देणारे स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी सुंदर सुविचार
suvichar marathi - मनाला शांती देणारे स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी सुंदर सुविचार

मनाला शांती देणारे स्वामी विवेकानंद
यांचे प्रेरणादायी सुंदर सुविचार |
Suvichar Marathi

नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांना शुभ दिवस

मित्रांनो आजही मी तुमच्यासाठी
सुंदर सुविचार, सुंदर विचार
घेऊन आलो आहे.

पण अशा एका व्यक्तिमत्त्वाचे घेऊन
आलो आहे, की ज्याने आध्यात्मिक,
धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या
प्रबळ दृष्टी द्वारे सर्व मानवी जगताला
जीवन जगण्याची पद्धत शिकवली.

ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महापुरुष
होते. ध्येय साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य
करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे
ते सांगत होते. ते व्यक्तिमत्व म्हणजे
स्वामी विवेकानंद.

एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचे असलेले
स्वामी विवेकानंदांचे विचार खूपच
प्रभावी आहेत.

आपल्या प्रवासासाठी आपल्या जगण्यासाठी
ते नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात. त्यांचे
विचार नेहमीच आपल्या जगण्याला दिशा
दाखवत असतात.

तेच सुंदर सुविचार मी आज तुमच्यासाठी
घेऊन आलो आहे. नक्कीच त्याच्याही
तुम्ही आस्वाद घ्या. तुम्हाला आवडतील
करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुविचारांना

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच
कोणतीही गोष्ट शक्य होईल.
कार्याला लागण्याची अत्यंत उचित
अशी वेळ हीच असते.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो
जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने
त्याची मदत मागतो त्याला
ती निश्चितपणे मिळत असते.

ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा
कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती
प्राप्त करा. खडतर परिश्रम करा म्हणजे
तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकता.

आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे
असते. ज्याप्रमाणे लाडके मुले नेहमी असंतुष्ट
असतात. त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त
असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा आणि
त्याला सतत लगाम घाला.

चांगल्या पुस्तकाविना
घर म्हणजे….
दुसरे स्मशानच होय.

पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित
माणसाकडे आदराने पाहू नका.
जगातील सर्व मन आणि प्रचंड कामे
गरिबांनीच केली आहेत. चांगल्या
कामाची सुरुवात गरिबाकडूनच होते.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी
जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक
उपयुक्त आहे.

suvichar marathi

दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही
आपल्याला जबरदस्तीने काही
करण्यास भाग पाडेल अशी
कोणतीही गोष्ट या जगात नाही.

suvichar marathi | मनाला शांती देणारे
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी
सुंदर सुविचार

धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या
विकासाचे फळ आहे. यास्तव
धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक
नसून मानवी अंत:करण आहे.

जर तुम्ही मला पसंत करत असाल
तर मी तुमच्या हृदयात आहे.
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल
तर मी तुमच्या मनात आहे.

भयातून दुःख निर्माण होते.
भयापोटी मृत्यू येतो आणि
भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला
काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात
आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो

कोणतेही कार्य अडथळ्या वाचून
पार पडत नाही शेवटपर्यंत जे
प्रयत्न करीत राहतात त्यांना यश
प्राप्त होते.

प्रेरणादायी सुंदर सुविचार

कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही
कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू
शकत असाल तर नक्की करा. जर ते
शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना
आशीर्वाद द्या…….! आणि त्यांना त्यांच्या
मार्गाने जाऊ द्या…….!

स्वतःला घडवण्यात आपला वेळ
खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरांना
दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

मन समुद्रातल्या भवऱ्यासारखे असते
ते माणसाला दूर नेऊन बुडवते.
एक वेळ समुद्राला बांध घालणे सोपे
असेल. पर्वत उपटणे सोपे असेल. पण
मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे.

सतत चांगला विचार करत रहा
वाईट विचारांना दूर ठेवण्याचा
हाच एक मार्ग आहे.

तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही घडता
तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल
तर दुर्बलच बनाल आणि सामर्थ्यवान
समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.

स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका
तुम्ही स्वतः स्वतःचे भाग्यविधाते आहात.

suvichar marathi

काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल, त्यात जीव ओता
त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा.

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह
अपार साहस आणि धीर पाहिजे तरच
आपल्याकडून महान कार्य होतील

suvichar marathi | मनाला शांती देणारे
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी
सुंदर सुविचार

आपल्या विचाराने आपल्याला बनवले आहे
म्हणून आपल्याला काय वाटते त्याबद्दल
काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत
विचार जगतात ते दूर प्रवास करतात

समजदार व्यक्तीसोबत काही
मिनिटे केलेली चर्चा ही हजारो
पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.

स्वतःचा विकास करा
ध्यानात ठेवा गती आणि
वाढ हीच जिवंतपणाची
लक्षणे आहेत.

अगदी सरळ मार्गी असणे
हेही एक प्रकारचे पापच आहे
हे पाप कालांतराने मनुष्याच्या
दुर्बलतेचे कारण बनते.

आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या
सर्व शक्ती आहेत. तरी लोक
डोळ्यावर हात ठेवतात आणि मग
आयुष्यात किती गडद अंधार आहे
याबद्दल ओरड करतात.

आस्तिकापेक्षाही एक वेळ नास्तिक परवडेल
कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र
असा तर्क तरी असतो. पण अस्तिकाला आपण
आस्तिक आहोत याचे एकही समाधानकारक
उत्तर देता येत नाही.

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा
परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याच्या
त्याग करू नये.

संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन
तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी
ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक
तुमच्यामध्ये असली पाहिजे.

द्वेष आणि कपटवृत्तीचा त्याग करा
आणि संघटित होऊन इतरांची
सेवा करायला शिका.

विचार करा…
काळजी करू नका.
नवीन कल्पनांना जन्म द्या.

शून्यातून विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते तोच
खरा कर्तुत्ववान असतो.

suvichar marathi | मनाला शांती देणारे
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी
सुंदर सुविचार

स्वतःच्या हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे
बोलायचे असेल ते बोलू द्या. एक दिवस
हीच लोक तुमचे गुणगान करतील.

एखादा विचार घ्या आणि त्यालाच आयुष्य
समजा. त्याविषयीच विचार करा त्याचे
स्वप्न पहा. त्याला मस्तिष्क, मास पेशी, नशा
आणि शरीराच्या प्रत्येक अवयवात बुडवून
जाऊ द्या. इतर सर्व विचार वेगळे ठेवा….
हाच यशस्वी होण्याच्या मार्ग आहे.

मित्रांनो आजचे विचार सुंदर सुविचार
तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही लाईक
आणि कमेंट च्या माध्यमातून मला
नक्की कळवा.

मित्रांनो हा युट्युब चॅनेल आपण
सबस्क्राईब केला नसेल तर कृपया
मला सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चैनल
आपण नक्की सबस्क्राईब करावा.

भेटूया असाच सुंदर सुविचारांसोबत

धन्यवाद…..!

मनाला शांती देणारे स्वामी विवेकानंद
यांचे प्रेरणादायी सुंदर सुविचार |
Suvichar Marathi | quotes

Also Read 

Swami Vivekananda Marathi Suvichar

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here