100+ Best Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

1
1387
suvichar marathi - सुंदर सोपे लहान प्रेरणादायक हृदयस्पर्शी सुविचार - vb
मराठी प्रेरणादायक सुविचार

नमस्कार मित्रांनो,
आजच्या या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर असे
suvichar marathi | सुंदर सोपे लहान प्रेरणादायक हृदयस्पर्शी सुविचार
घेऊन आलो आहे. हे सुंदर सुविचार,
मराठी सुविचार, [ marathi suvichar ] सुविचार मराठी,
[ suvichar marathi ] प्रेरणादायक मराठी सुविचार, सोपे
सहज लक्षात राहणारे सुविचार आपल्याला खूप शिकवुन
जातील.

suvichar marathi | सुंदर सोपे लहान
प्रेरणादायक हृदयस्पर्शी सुविचार

पायाला झालेली जखम, सावध
जपून चालायला शिकवते आणि
मनाला झालेली जखम, आयुष्य
कसे जगायचे हे शिकवते….!

*****

लहानपणी वाटायचे परीक्षा
फक्त शाळेतच असतात
आज समजले आयुष्य
जगतांना खूप परीक्षा
द्याव्या लागतात….!

*****

Friendship Quotes in Marathi

वाईट दिवस अनुभवल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत
कळत नाही…!

*****

मदत करणाऱ्याला
कधीच धोका देवू नका
आणि धोका देणाऱ्याला
कधीच मदत करू नका….!

*****

मुलगा आई वाडिलांपेक्षा जास्त
कमवायला लागला की
तो पैसा पुढेही आपले आई वडील
आहेत… हे विसरलेला असतोय…..!

*****

आयुष्यात कितीही मोठे बना
पण माणुसकी सोडू नका….!

*****

प्रेरणादायक सुविचार 

मदत एक अशी गोष्ट आहे की
केली तर लोक लगेच विसरतात
आणि मदत नाही केली तर
कायम लक्षात ठेवतात…..!

*****

रात्री शांत झोप येणे
सहज गोष्ट नाही…
त्यासाठी संपूर्ण दिवसभर
प्रामाणिक असावे लागते….!

*****

suvichar marathi

लोखंडाणे सोन्याचे जरी
कितीही तुकडे केले तरी
सोन्याची किंमत कमी होत नाही…!

*****

विश्वासामुळे माणसाला बळ येते

मन सत्याने शुद्ध होते.

*****

जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो
तसे मन आयोग्य कर्माने मलिन होते.

*****

शरीराची जखम उघडी टाकल्याने
चीघळते. तर मनाची जखम उघडी
केल्याने बरी होते….!

*****

वाचनासाठी वेळ काढा
तो शहाणपणाचा निर्झर आहे.

*****

घर किती मोठे आहे याला महत्व
नसून घरात किती सुखी आहेत
हे खूप महत्वाचे आहे….!

*****

आपल्या मधील विश्वास पर्वतालाही
हलवू शकतो. परंतु आपल्या मनामधील
शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो….!

*****

गोड बोलण्याचा सोंग करणारा
माणूस, कधीच कोणाचा हितचिंतक
नसतो हे लक्षात ठेवा….!

*****

suvichar marathi

जगात तीन मुख्य आश्चर्य आहेत..
एक – आपण जन्मभर ज्या
मी बरोबर राहतो त्यांचे स्वरूप
आपल्याला कळत नाही….!

*****

दोन – जीवनाचे सारे व्यवहार
ज्या मनाच्या द्वारे करतो ते मन
आपल्या ताब्यात येत नाही….!

*****

तीन – क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही
अशी सर्वजण तक्रार करतात पण
तो प्रपंच सोडायला कोणी तैयार नाही….!
हे तीसरे आश्चर्य होय.

*****

suvichar | सुंदर सोपे लहान
प्रेरणादायक हृदयस्पर्शी सुविचार

मला कोणाची गरज नाही
हा अहंकार आणि सर्वांना
माझी गरज आहे हा भ्रम
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या
तर माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ
लागणार नाही…..!

*****

वर्तमान काळ हा
भविष्य काळ
विकत घेत असतो.

*****

जो निष्पाप असतो त्याला
सुखाची झोप लागते….!

*****

मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही
अशी तक्रार कधीच करीत नाही.

*****

जबाबदारी पडली की
ती शिकवतेच…!

*****

या जगात सर्वात सोपी आणि
निरूपयोगी गोष्ट म्हणजे
चिंता करणे.

*****

मोठेपणाच्या मार्ग
मरणाच्या मैदानातून जातो.

*****

suvichar marathi

मोठेपणाची इच्छा असेल तर
मोठ्यांशी ईर्ष्या लहानांचा
तिरस्कार करू नका.

*****

लोक आपल्याबद्दल काय बोलतात
याच्या विचार करण्यापेक्षा
लोक आपल्या बद्दल तसे का बोलतात
याचा विचार करा.

*****

Motivational Quotes Marathi 

जो एक दिवस येतो….
तो दुसरा दिवस घेऊन जातो.

*****

जे संपले आणि त्याला इलाज नाही
त्याबद्दल दुःख ही करू नये.

*****

सद्गुणांचे बक्षीस सद्गुण असते.

*****

आधी सिद्ध व्हा….
मग आपोआपच
प्रसिद्ध व्हाल….!

*****

आयुष्य खूप सुंदर आहे
आनंदात जगा. आपला
जिव्हाळा कायम राहो.

*****

असेच नवनवीन मराठी सुविचार वाचण्यासाठी
vijaybhagat.com या संकेतस्थळाला भेट देत राहा.
धन्यवाद…!

सुंदर सोपे लहान असे प्रेरणादायक हृदयस्पर्शी सुविचार |
Good Thoughts In Marathi | Marathi Quotes

Status Suvichar In Marathi | Suvichar | मनापासून शांतपणे वाचा

Marathi Suvichar Status Image | मराठी सुविचार संग्रह

Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

वाईटाची संगत नेहमी नुकसान
कारक असते. मग ती कशीही असो…
कारण जेव्हा कोळसा पेटलेला असतो
तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला
नसतो, तेव्हा हात काळे करतो….!

*****

उद्या हा फक्त स्वप्नाळू
आणि आळशी माणसाच्या
कार्यक्रमात असतों.

*****

वेळ आली आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी
अश्रू गाळावे लागतील.

*****

आयडिया महत्त्वाची नाही
ती प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे आहे.

*****

पंख त्यांचेच मजबूत असतात
जे एकटे उडतात आणि
प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

*****

परीक्षेमध्ये तुम्हाला किती
गुण मिळतात, हे महत्त्वाचे
नाही तर तुम्ही किती गुणी
आहात हे महत्त्वाचे आहे.

*****

आनंद” आणि “प्रेम” देणाऱ्या
व्यक्ती आपल्या सहवासात असणे
ही “निसर्गाची” देणगी असते.
अश्या व्यक्ती लाभणे हे आपल्यातील
सुस्वभावाची” अनमोल परतफेड असते.
दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणे…
हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.

*****

वाहन आपल्याला केव्हाही वळवता येते
पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये.
निर्णयाचेही असेच असते.
निर्णय आपल्याला केव्हाही घेता येतो
पण वेळ आल्याशिवाय घेऊ नये.
अवेळी घेतलेले वळण अपघात घडल्याशिवाय
राहत नाही. आणि अवेळी घेतलेला निर्णय
पश्चाताप शिवाय काहीही देत नाही.

*****

परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसे
सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी
माणसे सांभाळा आयुष्यात कधीही
अपयश अनुभवायला मिळणार नाही.

*****

Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

एखादे काम करण्यास आपण स्वतः
असमर्थ आहोत हे समजल्यानंतर आपण
पूर्ण विश्वासाने त्या विधात्याला जेव्हा साद
घालतो, या भावनेलाच प्रार्थना म्हणतात आणि
प्रार्थनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद
म्हणजे परमेश्वराची कृपा….!

*****

मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या
जाळ्यापेक्षाही बारीक असतात
पण लोखंडाच्या तारे पेक्षाही
मजबूत असतात. तुटले तर
श्वासानेही तुटतील… नाहीतर
व्रजघातानेही तुटणार नाहीत.

*****

हक्क सगळे सगळ्यांच्या लक्षात
राहतात. कर्तव्याची मात्र वारंवार
आठवण करून द्यावी लागते.

*****

पदोपदी स्वतःला सिद्ध करणे
हे नात्यांमध्ये गरजेचे नसते.

*****

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे
यायलाच हवी. त्याशिवाय निस्वार्थी
माणसांची किंमत समजत नाही.

*****

विचारांच्या युद्धात शब्दांच्या मर्यादा
शस्त्राचे काम करतात.

*****

आवडते नाते सांभाळून ठेवा
जर हरवले तर गुगल पण
नाही शोधू शकणार.

*****

रात्रीला आकाशात फक्त अंधार
बघणार्‍यांना चंद्र ताऱ्यांच्या
भावना कशा कळणार.

*****

प्रगती खुंटली की प्रसिद्धी
आपला पसारा आवरते.

*****

आनंदी राहण्याचे रहस्य
जी व्यक्ति आपल्याकडे दुर्लक्ष करते
तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका.
ज्याला आपली किंमत नाही
त्याला किंमत देणे बंद करा. आणि
जी व्यक्ति आपल्याला महत्व देत नाही
त्याला महत्व देणे पूर्ण बंद करा.
या गोष्टींचे पूर्ण पालन केले तर
निश्चितच तुम्ही ही आनंदी राहाल.

*****

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात सावली, म्हातारपणात शरीर
आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात
पैसा कधीच साथ देत नाहीत.
साथ देतात ती फक्त आपण जोडलेली
जवळची माणसेच. म्हणून ती माणसे जपा.

*****

मन मोकळे जगणे आणि
मनासारखे जगणे. यातील
अंतर कळले की आयुष्य
आनंदी तर होतेच पण
वाढते सुद्धा

*****

जितके मोठे मन तितके सोपे जीवन
वादाने अधोगती, संवादाने प्रगती
जग काय म्हणेल हा विचार
तर अजिबात करू नका. कारण लोक
खूप विचित्र आहेत. अपयशी लोकांची
थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर
जळतात. आपण सुद्धा लोक आहोत हे
लक्षात ठेवून एकमेकांना सन्मान द्या.

*****

ज्या माणसात मनाविरुद्ध होणाऱ्या
गोष्टी स्वीकारण्याची आणि पचवण्याची
ताकद असते त्याचे सामर्थ्य हे आयुष्यातील
कोणत्याही प्रसंगाला जिंकण्याचेच असते.

*****

एखाद्या अनोळखी माणसाला ओळखीचे
व्हायला आपल्याला एक क्षण हृदयाला
स्पर्शनारा लागतो. पण एखाद्या
ओळखीच्या माणसाला अनोळखी
व्हायला आयुष्य लागते.

*****

हक्क गाजवण्या अगोदार
त्या नात्याची कर्तव्य पार
पाडायला शिकले पाहिजे
तेव्हा त्या हक्काला किंमत
राहते.

*****

जर तुमची मिळकत तुमच्या
कुटुंबाच्या गरजा भागवण्या
इतकी असेल तर, स्वतःला
श्रीमंत समजा. कारण….
श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत
कोणालाही करता आली नाही.

*****

आपल्याशी जग कसे ही का वागेना…
आपण सगळ्यांशी छानच वागायचे.
इतके छान की विश्वासघात करणाराही
तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी.

*****

ज्यांना आपली काळजी असते
अशी माणसे आपल्याशी कितीही
भांडण झाले तरी आपल्याशी
बोलण्यासाठी कारणे शोधतात.
कारण त्यांना मान-अपमानापेक्षा
नात्यांची किंमत जास्त असते.

*****

सुंदर विचार इतके देखणे
या जगात दुसरे काहीही नसते….

*****

शांत राहिले की गैरसमज होतात
आणि बोलले की वाद होतात.

*****

Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

ध्येय साध्य करतांना आलेली
निष्फळता म्हणजे अपयश नव्हे
तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश.

*****

वाया गेलेला वेळ, वाया गेलेल्या
पैशांपेक्षा ही वाईट असतो.

*****

आपल्याला एक नवीन स्वप्न बघायला
किंवा अगदी नवीन ध्येय समोर ठेवायला
वयाची मर्यादा कधीच नसते.

*****

दहावी बारावी मध्ये तुम्हाला किती गुण
मिळतात हे महत्वाचे नसते. तर तुम्ही
आयुष्य कसे जगता, तुम्ही जगाकडे
कसे बघतात… हे महत्त्वाचे असते.

*****

पुस्तकातल्या पानात डोक्याचे खाद्य असते
झाडांच्या पानात माणसे जगवण्याचे बळ
असते. दोन्ही पाने महत्त्वाची असतात.

*****

माणसे कितीही मोठी झाली तरी
त्यांची सावली कुणाला उपयोगी
येत नाही. पण झाडे मोठी झाली
तर कित्येक पिढ्यांना त्याची
सावली उपयोगी असते.

*****

जिथे कानाखाली
मारता येत नाही
तिथे लोक टोमणे
मारुन निघून जातात.

*****

जेथे संवाद तुटतो आणि जिव्हाळा संपतो
तेथे गैरसमजाची जळमटे आणि बुरशी
वाढायला लागते. म्हणून परस्परातील
संवाद आणि नात्यातील जिव्हाळा कायम ठेवा.

*****

दुसऱ्यांची मदत करण्यासाठी
कोणाकडेही वेळ नसतो. परंतु
दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय
आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो.

*****

एवढ्या लवकर जगातली कोणतीच
गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर
माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.

*****

माणूस हा आपल्या विचारांनी
तयार झालेला प्राणी आहे. तो
जसा विचार करतो तसाच बनतो.

*****

खरी माणसे सोबत नसली
तरी चालतील पण खोट्या
व्यक्तीची साथ नसावी.

*****

पत्ता माहीत नसताना सुद्धा
जवाबदारी नावाचे पत्र
प्रत्येकाच्या आयुष्यात येते.

*****

तुमच्या रिप्लायचा स्पीडच सांगतो
तुम्ही त्या व्यक्तीला टाइम देत
आहात, की टाईमपास करत आहात.

*****

धोक्याची एक “खासियत” असते
धोका देणारा कोणीतरी आपला
“खास” असतो.

*****

Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

आजचा क्षण भराचा आनंद जर
उद्या खूप दुःख देणारा असेल तर
त्याला आजच विष समजून
त्या पासून दूर व्हायला पाहिजे.

*****

प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची
पायधूळ नसते. सर्वात जास्त सुगंध
देणारी परीजातकाची फुले सर्वात
जास्त पायदळी तुडवली जातात.
पण तरीही ती ओंजळींना आणि
पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही
समानच सुगंध देतात. कदाचित
फुले आपल्याला शिकवून जातात
पुढच्याला वागायचे तसे वागू दे…
तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या
सुगंधावर ठाम रहा.

*****

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला
तेच पोहोचू शकतात ज्यांचे
निर्धार ठाम असतात. ज्यांना
कुठले तरी ध्येय गाठायचे असते.

*****

प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा
दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक
दिवशी जीवनाची सुरुवात करा.

*****

यश मिळवण्यासाठी जी मेहनत
करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट
मेहनत ते टिकवण्यासाठी लागतो.

*****

कष्ट ही एक अशी किल्ली
आहे की, जे नशीबात नसलेल्या
गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते.

*****

कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत
नसते. त्यासाठी वर्तमानात प्रचंड
मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.

*****

परीक्षा नेहमी एकांतात असते. मात्र…
तिचे परिणाम सर्वांसमोर दिसतात.
म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर
त्याच्या परिणामांचा विचार नक्की करावा.

*****

Suvichar Marathi | सुंदर सोपे प्रेरणादायक सुविचार

कधीकधी केराचा डबा ही आपल्या मनापेक्षा
बरा वाटतो. दिवसातून एकदा का होईना….
निदान तो रिकामा तरी होतो.
आपण मात्र मनात किती दुःखद आठवणी
साठवतो. काय मिळवतो यातून आपण…?
स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो…. घडून
गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो
त्या घडल्या त्यांच्यामुळे त्यांच्या पुढे तिरस्कार
करतो. केराच्या डब्या सारखेच आता रोज मनही
साफ करायचे. विसरून जुने दुःख सारे नव्या
आनंदाने ते भरायचे… सुखी जीवनाचे तंत्र आता
आपण सर्वांनीच शिकायचे स्वतः आनंदी राहायचे
आणि दुसऱ्यांना नाही दुखवायचे…
नशीब नेहमी शुरांची साथ देते.

*****

आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवितो
पण आनंदात केलेले कार्य तुमची
ओळख वाढविते.

*****

तत्वांचे पालन करणारे
वाकत तर नाहीच….
पण मोडत ही नाही.

*****

जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी
आपले शरीर आहे. जे चांगले
असेल तर आपण जगातील
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी
करू शकतो. म्हणून
स्वतःची काळजी घ्या.

*****

आपण आनंदी राहायचे की
दुःखी हे समोरच्या व्यक्तीवर
कधीही अवलंबून नसावे.

*****

शिक्षण म्हणजे
नुसती पदवी मिळवणे नव्हे
तर बुद्धीला सत्याकडे नेणे…
भावनेला माणुसकी कडे नेणे…
शरीराला श्रमाकडे नेणे….
म्हणजे शिक्षण.

*****

हल्ली संवाद सुरुवातीलाच
संपतात आणि शेवटी उरते
ती फक्त एक शांतता..

*****

ज्या गोष्टीला विरोध केला जातो
तीच गोष्ट करायची इच्छा अधिक
होते….. फक्त उत्सुकतेपोटी.

*****

Marathi Suvichar | Good Thoughts In Marathi | 
Sunder Vichar | प्रेरणादायी मराठी सुविचार |
नाते सुविचार

#suvichar, #sinder_vichar, #marathi_quotes,

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here