suvichar marathi | रोज पाच मिनिटे काढून हे विचार नक्की ऐका

0
745
suvichar marathi | आयुष्याकडे positively बघण्याच्या दृष्टिकोन देणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार
suvichar marathi | आयुष्याकडे positively बघण्याच्या दृष्टिकोन देणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार

suvichar marathi | आयुष्याकडे positively बघण्याच्या
दृष्टिकोन देणारे प्रेरणादायी सुंदर सुविचार

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये जीवनाकडे Positively
बघण्याचा दृष्टीकोन देणारे प्रेरणादायी सुंदर विचार आहेत.
marathi motivation by vijay bhagat तसेच हृदयस्पर्शी
सुंदर सुविचार, motivational quotes Marathi, Marathi suvichar,
सर्वात बेस्ट अनमोल सुविचार, most motivational happy good thoughts,
असे सुंदर विचार आहेत. मित्रांनो best Marathi motivational quotes,
inspirational Suvichar रोज पाच मिनिटे काढून हे विचार नक्की ऐका.

मित्रांनो, आयुष्यातला प्रत्येक दिवस
शेवटचा दिवस म्हणून जगा.
motivational quotes in marathi.
प्रेरणादायी मराठी सुविचार | सुंदर विचार

जीवन आनंदमय आणि यशस्वी होण्यासाठी
जीवनामध्ये प्रेरणा असणे खूप गरजेचे असते.
म्हणूनच या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी
marathi motivational vichar ( marathi suvichar )
घेऊन आलो आहे.

सुंदर सुविचार, सकारात्मक मराठी सुविचार,
motivational thoughts in marathi
असा suvichar संग्रह ऐकण्यासाठी
youtube.com/@VijayBhagat
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

suvichar marathi

कोणी कसेही वागू दे
तुम्ही आहात तसेच रहा.
अगदी वास्तविक…!
कारण जेव्हा तुम्ही खरे असता
तेव्हा ते दिसते… तुमच्या वागण्या
आणि बोलण्यामधून. आणि जेव्हा
तुम्ही दुसऱ्या सारखे वागायला जातात
तेव्हा मग ते तुम्हाला नाही जमत आणि
सगळे चुकीचे होत जाते.

लोक तुम्हाला सल्ले देतील… मार्गदर्शन करतील…
प्रेरणा देतील… पण ते फक्त तेवढ्यापुरतेच.
तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असू दे
ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत
दुसरे येतील आणि माझ्या जीवनातील अडचणींना
सोडवतील असा अजिबात विचार करू नका.
कारण तसे काही होणार नाही. प्रत्येकाला आपल्या
जीवनाच्या अडचणी सोडवाव्या लागतात हे
तुम्हाला जरी पटत नसले तरी हेच खरे आहे.

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

सगळे ठीक होईल जे काही चालू आहे तुमच्या
जीवनात. ते कधीतरी संपणार आहे ज्याचा
ताण तुम्हाला रोज रात्री झोपू देत नाही.
ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास
ठेवा आणि धैर्य ठेवा. जे व्हायचे असते ते होतेच.
आपल्या हातामध्ये आहेत तेवढे प्रयत्न आपण
करायचे बाकी जास्त विचार नाही करायचा.

जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा
आपले विचार पण नकारात्मक व्हायला लागतात
आणि मग आपण अजून अडचणीत जातो.
म्हणून जेव्हा कधी कुठल्या अडचणीत असाल ना
तेव्हा कोणाचेही ऐकत बसू नका. लोक सकारात्मक
कमी आणि नकारात्मक विचार जास्त बोलतात म्हणून
फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींवर मात करा.

कोणी नसते कोणाचे असे तेव्हा वाटते
जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कोणी
मदत करत नाही. पण तुम्ही तरी का अपेक्षा
ठेवता मदतीची. आपल्याकडून जेवढे होईल
तेवढे करायचे बाकी आपण कोणाला जबरदस्ती
तर नाही करू शकत. तुम्हाला पण आता
समजायला पाहिजे की सगळेच लोक आपल्यासारखे
नसतात आणि जे काही करायचे आहे ते स्वतःलाच
करायचे असते आणि एवढी मेहनत घ्या की तशी
वेळच येणार नाही परत.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

जीवनामध्ये सगळे संपले असे कधीच
होत नाही. ती वेळ तशी असते म्हणून
आपल्याला तसे वाटत असते. असे जर
सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच
नसते. तिथेच सगळे सोडून हार मानली
असती. जेवढे मोठे स्वप्न तेवढा कठीण
प्रवास असतो हे कायम लक्षात ठेवा.

suvichar marathi | जीवनाकडे सकारात्मकतेने
पाहण्याचा दृष्टिकोन देणारे सुंदर विचार | good thoughts

वाईट वेळात ह्या गोष्टी लक्षात ठेवा.

लोकं हे बोलतात लोक ते बोलतात लोक बोलतच
राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगले करा किंवा
वाईट करा. मग तुम्ही ते ऐकून काहीच करणार नाही
आहात का आयुष्यात…! सोडा त्या लोकांचे ऐकणे
ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार…
आहेत हे कायम लक्षात ठेवा.

येईल अशी वेळ जेव्हा आपण तुटू पूर्णपणे
काहीच सूचनार नाही काय करायचे ते
सगळे संपल्यासारखे वाटेल… तेव्हा फक्त
एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते
आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. की मी हे
करू शकतो. मग ते जगातील कितीही मोठे
संकट असू दे… तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर याल…

जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल
तर असे समजू नका की लगेच होईल सगळे.
वेळ लागेल…. सुरुवात कठीणच असते
मेहनत करा दोन ते तीन महिने त्याच्यावर
त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील
एक दिवसात काही होत नाही. धीर सोडू नका…
तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पण थोडे धैर्य ठेवा.

कुणी दुखावले कुणी रडवले कोणी दुर्लक्ष केले
कोणाच्या बोलण्याचे वाईट वाटले तर ते फक्त
आजच्या दिवसा पुरताच ठेवा त्यामुळे तुमच्या
उद्याचा चांगला दिवस काल जे झाले
त्यामुळे खराब करू नका.

सुरुवातीला सगळे चांगलेच वाटते. मग ते प्रेम
असो… नौकरी असो… बिजनेस असो…. जेव्हा
आपण जास्त वेळ त्यात घालवतो त्यानंतर खरी
परीक्षा असते. कारण जेव्हा भार… अडचणी
येतात ना तेव्हा तुम्ही ते कसे हँडल करता…
यावरून तुमची क्षमता कळते एक माणूस म्हणून

एकवीस ते तीस च्या वयामध्ये तुमच्या आयुष्यात
खूप अडचणी… तणाव…. प्रश्न.. असतील तर ते
सामान्य आहे. कारण तीच वेळ असते संघर्ष
करण्याची. त्यामधून पण आपण शिकतो आणि
परिपक्व होतो आणि तुम्ही एकटे नाही आहात
इथे तर प्रत्येकाच्या आयुष्यात हेच चालू आहे.

क्षेत्र कोणतेही असो जीवनात कष्टाला
पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक
असेल…. तर यशालाही पर्याय नाही….!

suvichar marathi

फरक पडतो… जेव्हा तुमच्यासोबत गरजेला
कोणी नसते. फरक पडतो जेव्हा आयुष्यामध्ये
तुम्ही एकटे पडता. फरक पडतो…. जेव्हा तुम्ही
सगळ्या अडचणींना एकटे सामोरे जाता. पण
यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही
या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा
तुम्हाला हरवणारे कोणी नसेल. तुमच्या एवढे
बळकट इथे कोणी नसेल हे नेहमी लक्षात ठेवा.

जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची
गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि
विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला
सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात.
विरोधक आपल्याला कायम सतर्क आणि
सावधान बनवतात आणि हे दोघे मिळून आपल्या
प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करत
असतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला
कष्ट करावे लागत नाही. समाज फुकटामध्ये यांना
तुम्हाला देऊन टाकतो. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही
चिडू नका. त्यांचे स्वागत करा कारण…..
त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

बदलावे लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी
काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच तेच करून
काही होणार नाही, विचार बदलावे लागतील. जोखीम
घ्यावी लागेल. जे नाही जमणार ते जमवावे लागेल.
मार्ग बदलावा लागेल. माणसांपासून थोडे वेगळे राहावे
लागेल. तेव्हाच तुम्ही जे हवे ते मिळवू शकाल.

कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो
ती संपल्यावर शेवट निव्वळ राखच उरलेली
असते. त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही.
अगदी तसेच माणसाच्या शरीरात जोपर्यंत जीव
आहे तोपर्यंतच मस्त जगा. कारण जीवन खूप
सुंदर आहे. त्याला अधिक सुंदर बनवा.

suvichar marathi | सतत सकारात्मक विचार कसे
करायचे | वाईट वेळात ह्या गोष्टी लक्षात ठेवा | suvichar

कुणी दुर्लक्ष केले तर वाईट वाटून घेऊ नका
कारण लोकं त्यांनाच दुर्लक्ष करतात जे त्यांच्या
इथपर्यंत पोहोचू शकत नाही. उलट त्याने
आपल्याला समजते की माणसे कशी असतात
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आता ते तुम्ही
ठरवा नकारात्मकतेणे घ्यायचे की सकारात्मकपणे

कॅरियर निवडणे कठीण असते….
जोडीदार निवडणे कठीण असते
वाईट काळात खंबीर राहणे कठीण
असते. निर्णय घेणे कठीण असते
जोखीम घेणे कठीण असते आणि हे
कधीच संपणार नाही आहे. तुम्हाला
कुठून सुरुवात करायची आहे हे ठरवा
कारण गोष्टी अजून कठीण होत जाणार
आहेत प्राधान्य कुणाला द्यायचे ठरवा.

कधीतरी एक निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे
आयुष्य बदलून टाकेल. एकदा खूप रडून घ्यावे
लागेल आणि तो विषय तिथेच संपवावा लागेल.
लोक नाकारतील तेव्हा ते स्वीकारुन पुढे जावे
लागेल. कधीतरी आयुष्यात एक असे
वळण घ्यावे लागेल ज्याची तुम्हाला भीती वाटत
असेल. विचार बदलावे लागतील जेव्हा सगळ्या
गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतील आता हे
कधीतरी कधी चालू करायचे हे तुम्ही ठरवा.

suvichar marathi

जेव्हा सगळे असून सुद्धा खूप एकटे एकटे
वाटते जेव्हा कोणाशीच बोलायची इच्छा राहत
नाही. सतत खूप नकारात्मक भावना येत असतात
ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच मन दुखावतात
पण ठीक आहे हेच दिवस तुम्हाला माणसांची
ओळख करून देतात. शेवटी आपणच असतो
स्वतःला सांभाळणारे पण ठीक आहे ही वेळ सुद्धा
निघून जाते. आपण पुढे जायचे असते.

विचार येतो रोज की नेहमी मीच का….?
भेटणारी सगळी माणसे वाईट का
भेटतात…? जे ठरवले आहे ते कधी पूर्ण
होणार…? माझ्या जीवनातील सगळ्या
अडचणी कधी संपणार…? पण मग
विचार येतो की सगळ्या गोष्टींना वेळ
लागतो. असे एकाच दिवशी काही होत नाही

जर कधी एकटे वाटले… कोणी सोबत
नाही, अशी जाणीव झाली. सगळे दुर्लक्ष
करतात असे वाटले तर स्वतःला सांगा की
तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे. तुम्ही
स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करू शकता.
फक्त अजून थोडे दिवस जाऊ दे….
मग सगळे ठीक होईल.

तू बेस्ट आहेस हे कधीच विसरू नकोस
मग कोणी काहीही बोलले तरीही…
कारण जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास
असतो ना तेव्हा लोकांच्या बोलण्याने
काही फरक पडत नाही.

ओंजळीत बसेल एवढे नक्की घ्या
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही
शिका. माणुसकी कमी होत चालली
तेवढी फक्त जपायला शिका.

suvichar marathi | Good Thoughts In Marathi,
वाईट वेळात हे प्रेरणादायी सुविचार लक्षात ठेवा

काही वेळा आपली चूक नसतांनाही
शांत बसणे योग्य असते. कारण
जोपर्यंत समोरच्याचा मन मोकळा होत
नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातच
येत नाही.

सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी
येतात. पण त्या सुटणाऱ्या असतात
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो
त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल
पण वेळ कधीही गमावून नका. वेळेचा
उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी
धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते.

suvichar marathi

नाते आणि विश्वास हे एकमेकांचे
खूप चांगले मित्र आहेत. नाते ठेवा
अथवा ठेवू नका विश्वास मात्र नक्कीच
ठेवा. कारण जिथे विश्वास असतो…
तिथे नाते आपोआप बनत जाते.

रागात बोललेला एक शब्द
एवढा विषारी असतो की
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एका क्षणात संपवून टाकतो.

सुखासाठी कधी हसावे लागते
तर कधी रडावे लागते कारण
सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही
उंचावरून पडावे लागते.

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच
असते असे नसते. आपल्याकडे
जे आहे आपण त्यात समाधानी
कधीच नसतो.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

आयुष्यात अचूक व योग्य निर्णय
घेण्याची क्षमता अनुभवातून येत असते.
काही वेळेस मात्र अनपेक्षित अनुभव हा
बहुतेकदा चुकीच्या माणसापासून व
निर्णयातून पण येत असतो

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो…!

ज्या जखमेतून रक्त येत नाही
समजून जायचे की तो घाव
जवळच्याच कुणाचातरी आहे.

नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका. कारण पाणी
कितीही घाण असले तरी ते तहान
नाही पण आग विझवू शकते.
3

नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ दिवस
आज तुमच्यासाठी मी एक सुंदर विचार
घेऊन आलो आहे.

इतका सुंदर आहे, की हा विचार तुम्ही
काळजाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवाल
इतका सुंदर…..!

कुटुंब टिकवणे का महत्त्वाचे आहे….?

आज परत एकदा नकळत एक मुंगी
तळ्यात पडली. स्वतःला वाचवण्यासाठी
झाडाचे पान आणि कबुतराची वाट
पाहायला लागली.

मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा
अहंकार आड आला. झाडावरच बसून
असाह्य मुंगीला मरताना पाहू लागला.

कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी
जीवाच्या आकांताने ओरडली. कबुतर
आपल्याच विचारात मश्गूल झाला. मुंगी
असहायतेमुळे शेवटी मरून गेली.

कबूतर मात्र आपल्याच गर्वात गढून गेला
आणि पारधी येणार हे विसरूनच गेला
पारध्याने या संधीच्या फायदा घेतला.
कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर
मुंगी पायाला चावायची आणि निशाणा
चुकायचा. म्हणून मुंगीच्या अनुपस्थित
डाव साधला.

शेवटी कबूतर आणि मुंगी दुर्दैवी पणाने गेलेच
झाड मात्र त्यादिवशी खूप रडले मुंगी आणि
कबूतर मेल्याचे दुःख होतेच पण त्याहूनही
परोपकाराची भावना मेल्याचे होते.

मित्रांनो कोणाला कोणाची कधीही मदत
किंवा गरज लागते. अहंकार नाशाकडे नेतो
तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

सर्वांशी प्रेमाने वागा.
सर्वांकडून प्रेम मिळवा
हा जन्म पुन्हा नाही.

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका.
आज वेळ आणि आपला रुबाब आहे
म्हणून कोणाचा नुकसान होईल असे
वागू नका. आपल्या सत्तेचा गैरवापर
करू नका.

आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल
तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा
आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं
बोलत नाही आणि सावली कधी साथ
सोडत नाही.

suvichar marathi

मित्रांनो निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशी
केली की आपण स्वतःची पाठ ही थोपटू शकत
नाही. आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांची
आणि निंदकांची आवश्यकता आहे.

मित्रांनो
पूजा करायच्या आधी
विश्वास ठेवायला शिका.
बोलायच्या आधी
ऐकायला शिका.
खर्च करायच्या आधी
कमवायला शिका.
लिहायच्या आधी
विचार करायला शिका.
हार मान्यआधी
प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी
जगायला शिका.

जीवनात एवढ्याही चुका करू नका
की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि रबराला एवढाही वापरू नका की
जीवनाच्या अगोदर कागज फाटून जाईल

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

जीवन जगतांना संगत
ही खूप महत्त्वाची आहे.

आपले वय आणि पैसा यांच्यावर
कधीच गर्व करू नका. कारण
ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपत असतात.

मृत्यूनंतरचे हेच कटू सत्य आहे
पत्नी दरवाज्यापर्यंत….
समाज स्मशानापर्यंत…..
पुत्र अग्निदानापर्यंत आणि
फक्त आणि फक्त कर्म
मोक्षापर्यंत…..!

जिच्या उदरात जन्म होतो ती माता
जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक म्हणजेच
माणसाचे जीवन……!

जन्म दुसऱ्याने दिला
नाव दुसऱ्याने ठेवले
शिक्षण दुसऱ्याने दिले
रोजगार दुसऱ्याने दिला
इज्जत दुसऱ्याने दिली
पहिली आणि शेवटची
आंघोळ सुद्धा दुसरेच
घालणार…..!

मरणा नंतर संपत्ती दुसरेच
वाटून घेणार आणि स्मशानभूमीत
दुसरेच घेऊन जाणार तरी देखील
संपूर्ण आयुष्यभर माणसाला
कोणत्या गोष्टीच्या गर्व असतो
हे सांगणं मात्र कठीणच.

suvichar marathi

दुःख इतके नशीबवान आहे….
की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या
माणसांना आठवतात. धन इतके दुर्दैवी
आहे की, ज्याला मिळवून नेहमी लोक
आपल्या माणसांना विसरतात….!

किती विचित्र आहे ना हे….
माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी
आहे. पण जखम झाली की रक्त येते.
आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले
असूनपण हृदय दुखावले की डोळ्यातून
पाणी येते.

मित्रांनो विचार आपण करायचे आहे
जीवन इतके सुंदर आहे इतके आनंदी
आहे. पण आपण त्याला दु:खी बनवतो
आपण त्याला आनंदी बनवले पाहिजे.

suvichar marathi | हृदय स्पर्शी प्रेरणादायक सुविचार
Sunder Suvichar Good Thoughts In Marathi

नमस्कार मित्रांनो,
सर्वांना शुभ दिवस

जर तुम्ही देखील अपयश
वाईट परिस्थितीतुन जात असाल
तर हा विडीओ नक्की बघा…..!

मित्रांनो अपयश, वाईट परिस्थिती ही
प्रत्येक माणसाच्या जीवनात येतच
असते. तो जीवनाचा एक भागच
असतो. जो त्या परिस्थितीला समजून
घेऊन जीवन जगतो तोच यशस्वी होतो.

खूप वेळा असे होते…
आपण प्रयत्न करतो….
खूप प्रयत्न करतो आणि
तरीही आपल्याला अपयश
येते.

मग आपण खचून जातो. आणि
प्रयत्न सोडून देतो. आपल्याला
माहिती नसते की पुढच्या प्रयत्नामध्ये
यश मिळणार आहे. त्यामुळे आलेल्या
एका अपयशामुळे प्रयत्न करणे
थांबवले नाही पाहिजे.

मित्रांनो जीवनात अश्या व्यक्तीवर
जास्त विश्वास ठेवा जी आपल्या
अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल.

हसण्यामागील दुःख….
रागवण्यामागील प्रेम….
आणि शांत
राहण्यामागील कारण.

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला
तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे. नाहीतर
लोक राग न आल्याचा फायदा घेतात.

suvichar marathi

जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे
लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि
पाठीच राहणार आणि तुम्हाला प्रसिद्ध करणार.
त्यांची लायकीच ती आहे असे समजून सोडून द्या.

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण
आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.
म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून
पुन्हा नव्याने कामाला लागले पाहिजे.

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत
असतो. काहींना आपल्या वेदना लपवता
येतात काहींना नाही.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न सोडून दिले की
आपोआपच सुटतात.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही. कारण
मी अजून जिंकलेलो नाही.

फेसबुकवर हजारो मित्र जमा करणे ही
अचिव्हमेंट नाही आहे. ज्यावेळी हजारो
लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात तेंव्हा
तुमच्या बाजूने उभा राहणारा एक मित्र
उभा करता येणे ही खरी अचिव्हमेंट आहे.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे
चांगली नोकरी लागणे ही संकल्पना
पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून
निघत नाही ना तोपर्यंत समाजात
नोकरच जन्माला येतील मालक नाही.

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी
तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा
त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या
पंखांवर विश्वास असतो.

अहंकार हा डोळ्यात गेलेल्या धुळीप्रमाणे
आहे. धूळ स्वच्छ केल्याशिवाय काहीच
स्पष्टपणे दिसू शकत नाही आपल्याला…
म्हणून अहंकार सोडा त्याच उघड्या
डोळ्यांनी जगाकडे पाहायला शिका.

आजचा संघर्ष उद्याचे
सामर्थ्य निर्माण करतो.

विचार बदला
आयुष्य बदलेल.

suvichar marathi

जीवन ताण – तणावपूर्ण करू नका
नेहमी हसण्यासाठी वेळ काढा
त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच
असे नाही परंतु वर्षातील आयुष्य
मात्र नक्की वाढेल.

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके
मोठे व्हा की भाग्यवान ह्या शब्दाचा
अर्थ तुमच्याडे बघूनच समजेल.

अनुभवामुळे चांगला निर्णय घेता
येतो. मात्र दुर्भाग्य हे आहे की
अनुभवाचा जन्म नेहमीच
चुकीच्या निर्णयामुळे होतो.

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे
तोपर्यंत इतरांना माझ्याविषयी काय
वाटते याने मला काहीच फरक पडणार
नाही. असे तुमच्या मनाला सांगा.

जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारू शकतो. त्याला
कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

योग्यवेळी स्पष्टपणे नाही म्हणायला
शिकले तर तुमच्या मनाची शांती
कधीच भंग होणार नाही.

ऐकून घेतल्याने खूप काही बोलता
येते आणि बोलतच राहिल्याने
काही ऐकायचे राहून जाते.

जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला
एकाकडे मागा हजारजन देतील. आणि
जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत
हजारोंकडे मागा कदाचित एखादाच करेल.

झोपाळा जितका मागे जाईल तितकाच
तो पुढे देखील येईल. अगदी सुख आणि
दुःख दोन्ही आयुष्यात बरोबर येतात.
आयुष्याचा झोपाळा मागे गेला म्हणून
घाबरू नका. तो पुढेही तितकाच येईल.

जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते.
आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो.
रिकामा खिसा मात्र त्याच जगातील
माणसे दाखवतो.

एक इच्छा काही बदलू शकत नाही
एक निर्णय काहीतरी बदलू शकतो
परंतु एक निश्चय मात्र सर्वकाही
बदलू शकतो.

आयुष्यात यश मिळते तेंव्हा कळते की
आपण कोण आहोत….? पण आपण
जेंव्हा अपयशी होतो तेंव्हा कळते की
आपले कोण आहेत…..?

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची
नसते, एकतर तिचा काळ संपून जातो
किंवा आपली वेळ संपून जाते.

तुम्ही जीवनात केवळ दोनच गोष्टींमुळे
ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे
काहीही नसतांना तुम्ही दाखवलेला संयम
आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेली नम्रता.

suvichar marathi

कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा
स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. बरोबर ठरलात
तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि चुकीचे
ठरलात तर अनुभव मिळतो.

स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी
पेटून उठायला शिका. नाहीतर
समोरचा व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण
करण्यासाठी तुम्हाला धूर बनून
जाईल.

प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम
चेष्टा होते. नंतर त्याला विरोध
होतो. आणि शेवटी त्याच
विचारांचा स्वीकार केला जातो.

suvichar marathi | लोक तुम्हाला दुर्लक्ष करीत असतील
तर हे सुंदर विचार नक्की ऐका | happy thoughts

आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे
आपण जर हताश होऊन बसलो
तर पुढे आयुष्यात येणारी सुखे
आपल्यावर रुसून निघून जातील

अपयश दोन प्रकारे येऊ शकते
एक कुणाचे न ऐकल्याने
आणि दोन सर्वांचे ऐकल्याने….!

प्रत्येकाने आपल्या चुकांना
दिलेले नाव म्हणजे अनुभव

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते
जास्त वापरली तर झिजते. काहीही झाले
तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग
कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा
मित्रांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच.

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा
घेते. तर दुःख माणसाच्या धैर्याची
दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो
तोच माणूस जीवनात यशस्वी होतो
नम्रपणा हा गुण आपल्यातल्या
अहंकाराचा नाश करतो….!

माणूस परिस्थितीचा गुलाम
नसून तो त्याच्या स्वतःच्या
विचारांचा गुलाम असतो…!

स्वप्न आणि सत्य यात
साक्षात परमेश्वर
उभा असतो…..!

आयुष्यातील कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका….!

स्वतःच्या आत डोकावून
पाहण्याची संधी म्हणजे
परीक्षा….!

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

लोकांना गमवायला घाबरू नका
कारण जाणाऱ्याला निमित्त लागते
आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते.

काळा रंग अशुभ समजला जातो
पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा
हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य
उजळवत असतो.

संघर्षाला संयमाची साथ लाभली
की यश प्राप्ती निश्चित होते

लागणारी ठेच प्रत्येक वेळी
नीट चालायला शिकवते…!

अपयश म्हणजे चुका
सुधारण्याची अजून एक संधी

मन पाऱ्यासारखे असते
त्याला स्थिर ठेवण्याचे
प्रयत्न केले तरच यश मिळते….!

काय चुकले हे शोधायला हवे
पण आपण मात्र कुणाचे चुकले
हेच शोधत राहतो

सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावर
मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय आहे….!

ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो
आणि दुःख अर्धे होते तीच माणसे
आपली असतात. बाकी फक्त जग आहे.

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

माणसाला माणसाजवळ आणणे
हीच खरी समाजसेवा आणि
हीच खरी प्रगती आणि माणसाने
माणसाशी माणसासारखे वागणे
हाच खरा धर्म.

जे बदलता येईल ते बदला
जे बदलता येत नाही ते स्वीकारा
आणि जे स्वीकारता येत नाही
त्यापासून दूर जा परंतु….
स्वतःला आनंदी ठेवा

जोपर्यंत पूर्ण सत्य माहित नसते
तोपर्यंत शांत राहणेच योग्य असते.
कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य
जास्त घातक असते.

घरटे कसे बांधावे हे फक्त
निसर्गाकडूनच शिकावे.
नाही तर माणूस बांधलेले
घरटे सुद्धा मोडतो.

आपल्या वाईट सवयीवर विजय मिळवा
नाहीतर त्या वाईट सवयीच तुमचा
पराभव करतील….!

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

जीवनातील प्रत्येक क्षण
आपल्याला काही ना काही
शिकवत असतो

यशस्वी व्हायचे असेल
तर अपयशी लोकांचा
आधी अभ्यास करा…!

चिंता कराल तर भटकाल
आणि चिंतन कराल तर
भटकलेल्यांना मार्ग दाखवाल…!

चुकीची माणसे दूर झाली की
आयुष्यात चांगल्या गोष्टी
घडू लागतात…!

स्वातंत्र्य म्हणजे फक्त
अधिकार नाही तर
जबाबदारी सुद्धा आहे…!

हक्क आणि कर्तव्य
एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत

Best Motivational quotes in marathi |
आयुष्य बदलवून टाकणारे प्रेरणादायी
मराठी सुविचार | सुंदर विचार

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट
घटनांनी भरलेली पाने येतात….
तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून
नवीन प्रकरणाला सुरुवात करा.

आयुष्यात तीन व्यक्तींना
कधीही विसरू नका….
ज्यांनी तुम्हाला तुमच्या
कठीण वेळी मदत केली
जे तुम्हाला कठीण वेळी
एकटे सोडून गेले.
ज्यांच्यामुळे तुमची
कठीण वेळ आली

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

संवादाचे दरवाजे बंद करू नका
अनेकदा राग आला की आपण
लगेच अबोला धरतो. पण त्यामुळे
संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती
अधिक चिघळत जाते. शेवटी संवाद हाच
सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे.

दोष लपवला की मोठा होतो
आणि
कबूल केला की नाहीसा होतो

यशाचा आनंद भोगण्यासाठी
आधी आयुष्यात संकटे गरजेची
आहेत.

कुणी कौतुक करो वा टिका लाभ
तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधारण्याची संधी देते.

जी माणसे अजूनही तुमची परीक्षा
तुमच्या भूतकाळावरून करत आहेत
त्यांना तुमच्या भविष्यात अजिबात
स्थान देऊ नका.

suvichar marathi | रोज पाच मिनिटे
काढून हे विचार नक्की ऐका

आयुष्यात जर दोन नियम लक्षात ठेवले
तर नाती अतूट राहतील… जपता येतील….
समजून घेतल्याशिवाय नाते जोडू नका.
गैरसमज करून नाते तोडू नका.

नात्यांची गणिते कळाली नाही
तर आयुष्याचा हिशोब चुकतो.

जीवनात नाती तशी अनेक
असतात. पण ती जपणारी
लोक फार कमी असतात

प्रेमाला नसते जात
नसतो कुठला धर्म
प्रेम म्हणजे निखळ
भावना….
मनातून केलेले कर्म.

जीवनात नाती तशी अनेक असतात. पण…. |
Good thoughts in marathi on relationship

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी |
suvichar marathi – best lines marathi
– Intelligent people habits

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi
बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी – good thoughts in marathi

1. बुद्धिमान लोक खऱ्या-खोट्या गोष्टींचा
विचार करून मगच निर्णय घेतात.
इतर लोकांप्रमाणे ते अफवांवर विश्वास
ठेवत नाहीत.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi
बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी – good thoughts in marathi

2. बुद्धिमान लोक त्यांचे प्रत्येक काम
वेळेनुसार पूर्ण करतात. रिकाम्या
वेळेचा सुद्धा ते पूर्ण उपयोग करून
घेतात. इतकेच नाही तर ते आपल्या
पूर्ण कामाची लिस्ट बनवून ठेवतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi
बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी – good thoughts in marathi

3. बुद्धिमान लोक काम पूर्ण
झाल्यानंतरच इतरांना
त्याच्याबद्दल माहिती देतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi
बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी – good thoughts in marathi

4. बुद्धिमान लोक आपल्या
मनातील गोष्टी कोणालाही
बोलून दाखवत नाहीत.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi
बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी – good thoughts in marathi

5. बुद्धिमान लोकांना स्वतःचे
काम स्वतःच करायला
आवडते. दुसऱ्यांची लुडबुड
त्यांना आवडत नाही.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

6. बद्धिमान लोक सर्वांबरोबर
संवाद साधतात. कारण की
प्रत्येक माणसाचा अनुभव
त्यांना शिकायला मिळावा.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

7. बुद्धिमान लोकं नेहमी आपला वेळ
वाचन आणि लिखाणात घालवतात.
कारण कोणतेही काम चांगल्या
पद्धतीने करण्यासाठी वाचन
खूप महत्त्वाचे असते.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

8. बुद्धिमान लोक कधीही आपला
आत्मविश्वासाचे रूपांतर गर्वामध्ये
करत नाहीत. ते नेहमी नवीन नवीन
गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात.
आणि स्वतःला परिपूर्ण बनवतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

9. बुद्धिमान लोकांमध्ये असा गुण
असतो की… त्यांना इतरांबद्दल
तक्रार नसते. त्यांना समजते
की माणूस चुका करणारच.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी |
suvichar marathi – best lines marathi
– Intelligent people habits

10. बुद्धिमान लोक नेहमी खऱ्याची साथ
देतात. आणि ते त्यांचे काम इमानदारी
आणि सत्याने करतात. ते कधीही
कोणाची फसवणूक करत नाहीत.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

11. बुद्धिमान लोकांची एक ओळख असते
की ते आपले काम आणि आयुष्याच्या
मध्येच व्यस्त राहतात. आणि दुसऱ्या
लोक आणि त्यांच्या गोष्टींचा त्यांच्यावर
काही फरक पडत नाही.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

12. बुद्धिमान लोकांची अशी सवय असते
की… कोणतेही काम प्लॅननुसार पूर्ण
होत नसेल तर ते स्वतःला दोष देतात.
आणि ते काम पूर्ण करण्यासाठी
खूप मेहनत घेतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

13. बुद्धिमान लोकांना एकटे राहायला
आवडते. कारण त्यांना असे वाटते
की… लोकांमध्ये राहिले तर ते
आपल्या ध्येयापासून विचलित होतील.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

14. बुद्धिमान लोक नेहमी दुसऱ्यांच्या
अनुभवावरून शिकतात. आणि
परत झालेल्या चूक करत नाहीत.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

15. बुद्धिमान लोकांची अशी एक सवय
असते की… ते पुराव्याशिवाय
कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत
नाहीत…..!

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी |
suvichar marathi – best lines marathi
– Intelligent people habits

16. बुद्धिमान लोक अपयशाला घाबरत
नाहीत. तर ते अपयशाला शस्त्र
बनवून परत आपल्या कामामध्ये
व्यस्त होतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

17. बुद्धिमान लोक आपला पूर्ण
वेळ चांगले विचार करण्यामध्ये
घालवतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

18. बुद्धिमान लोक स्वतःशीच
संवाद साधतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

19. बुद्धिमान लोक नेहमी
दुसऱ्यांचा आदर करतात.

बुद्धिमान लोकांच्या चांगल्या सवयी - good thoughts in marathi

मित्रांनो हे मराठी सुविचार, चांगले विचार, सुंदर विचार,
motivational thoughts in marathi आणि
motivational quotes in marathi, good thoughts in marathi
आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा.

Also Read :-

Best 500 Suvichar | Good Thoughts In Marathi | सुंदर सुविचार

नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here