500+ Best suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

1
1286
suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar
#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

#suvichar_marathi | आज चा सुविचार
प्रेरणादायी सुंदर सुविचार

प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून
परमेश्वरासमोर नतमस्तक रहा.
प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून
समाजाचे आभारी रहा. परंतु
मनवृत्तीअहंकार स्वतःकडून मिळतो
त्यापासून मात्र सावध राहा.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

अहंकाराची उडी काही कामाची नसते.
कारण वेळ आली की टप्पा येतो आणि
टप्प्यात आला की माणसाचा कार्यक्रम
होतो. आणि म्हणून अहंकार करू नका.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत
असेल आणि आपण ते करू शकू असा तुम्हाला
विश्वास वाटत नसेल तरी हो म्हणा. ते काम कसे
करायचे हे नंतर शिका. याचे कारण कोणीतरी
तुम्हाला चांगली संधी देत आहे. आणि ही संधी
वाया घालवू नका.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

शारीरिक आणि आर्थिक प्रगती
करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा
आणि रात्रीचे मित्र कमी करा.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

दररोज सुंदर विचारांची
शिदोरी वाचण्यासाठी
ब्लॉगला नक्कीच
सबस्क्राईब करून ठेवा.

परिस्थितीची कावड” खांद्यावर
पडली की पोटाची “काशी“यात्रा
सुरू होते.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार
#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

कठीण प्रसंगात कासवा प्रमाणे पाठीच्या
ढालीत सर्व अवयव ओढून घेऊन, प्रसंगी
दणके सुद्धा खावे लागले तरी चालेल.
परंतु योग्य वेळ येताच सापा प्रमाणे फणा
वर काढण्यात योग्य ठरते.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

दुसऱ्याचा द्वेष करण्याच्या वृत्तीमुळे
माणूस कधीच सुखी होत नसून
त्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य मात्र
गमावून बसतो.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

#suvichar_marathi | आज चा सुविचार
प्रेरणादायी सुंदर सुविचार

आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत
नाही. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी
खूप महत्त्वाच्या असतो…

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्त साठी
आहेत. जादा पैसा…. जादा ओळख….
जादा कीर्ती…. जादा प्रतिष्ठा…. जादा
मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप
साधे आहे… मजेत आहे.

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

खूप चटके सोसल्यावरच
कडकपणा येतो. मग तो
चहा असो की आयुष्य असो….

आज चा सुविचार

#suvichar_marathi | आज चा सुविचार |प्रेरणादायी सुंदर सुविचार

दररोज सुंदर विचारांची
शिदोरी वाचण्यासाठी
ब्लॉगला नक्कीच
सबस्क्राईब करून ठेवा.

जे मिळाले आहे त्यात समाधान मानणे
आणि नाही मिळाले त्यासाठी प्रयत्न करणे
हे आपल्या मनाची बैठक असली पाहिजे….!

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

प्रेमळ हृदयाची माणसे कितीही भांडण
झाले तरी स्वतःहून परत परत बोलायचा
प्रयत्न करतात. कारण प्रेमळ माणसांना
अबोलण्याची धग सोसवत नाही.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

सरळ आणि स्पष्ट बोलत असाल
तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो.
आणि तो म्हणजे… तुम्ही भांडखोर
आहात.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

एखाद्याचा विश्वास मिळवणे अवघड आहेच
पण त्यापेक्षाही अवघड आहे तो विश्वास
टिकवून ठेवणे आणि जो विश्वास टिकवून
ठेवतो त्यालाच नात्यांची खरी किंमत माहिती
असते…..!

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

मुलीची सासरी पाठवणी करताना तिला अवश्य
सांगा… माणसाबरोबर लग्न लावून दिले आहे.
पण जर तो माणूस जनावर निघाला तर बिनधास्त
माहेरी परत ये. कारण लग्न परत होऊ शकते पण
अशा स्वार्थी लालची माणसांमुळे जीव गेला तर
तो परत मिळणे शक्य नाही.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

कर्मात गद्दारी… कार्यात बेईमानी…
वागण्यात लाचारी… बोलण्यात लबाडी…
जी माणसे करतात आयुष्यात ती कधीच
सुखी नसतात.

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी
कारण कुठलाच खोड रबर जिभेवर
चालत नाही.

आज चा सुविचार

#suvichar_marathi | आज चा सुविचार | प्रेरणादायी सुंदर सुविचार

#suvichar_marathi | खूप चटके सोसल्यावरच कडकपणा येतो | good thoughts in marathi on life by vbthoughts

माणसाचे आयुष्य एका थेंबासारखे
आहे. पण त्याचा अहंकार मात्र
समुद्रापेक्षा मोठा आहे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त
आहे. असा व्यक्ती गरीब असतो.
ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे
त्यापेक्षा जास्त गरीब दुसरा
कोणीही नसतो.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

कुठे जिंकायचे आणि कुठल्या क्षणी
हरायचे हे ज्याला समजते. त्याला
हरवणे सर्वात जास्त अवघड असते.
कारण अशा व्यक्तीच्या पराभवात
सुद्धा मोठा विजय लपलेला असतो.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

पानगड झाल्याशिवाय झाडाला नवी
पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात
कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय
चांगले दिवस येत नाहीत.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

आता संकटांना निमंत्रण देणे टाळाल
तर उद्या त्यातून बाहेर पडण्यासाठी
धडपडावे लागणार नाही.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

दररोज सुंदर सुविचारांची शिदोरी
ऐकण्यासाठी चॅनलला नक्की
सबस्क्राईब करा.

जीवन जगत असताना जगाचा
जास्त विचार करू नका. कारण
जग ज्याच्याकडे काही नाही
त्याच्यावर हसते आणि त्याच्याकडे
सर्व काही आहे त्याच्यावर जळते.

*********

वेळ लागला तरी चालेल, पण
आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा.
कारण लोक भेटल्यावर…..
तू कसा आहेस….? हे नाही विचारत.
तर तू काय करतोस…? हे विचारतात.

*********

चूक ही चूकच असते
कोणी केली याला
महत्त्व नसते

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

#suvichar_marathi | आज चा सुविचार
प्रेरणादायी सुंदर सुविचार

या जगात निसर्गाकडून
शिकण्यासारखे खूप काही
आहे. फक्त योग्य ते योग्य
वेळी शिकता आले पाहिजे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

चुकलेल्या वाटा आपल्याला
नव्या नाहीत. खरे अप्रूप तर
ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या
रस्त्यांचे आहे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यातील
सर्वोत्तम देण्यासाठी असतो. त्याबाबत
आपण किती प्रयत्नशील असतो….
यावरून आपल्या आयुष्याचा मार्ग
ठरत जातो.

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला
डोळ्याने दिसत नाहीत, त्या गोष्टी
हृदयाने दिसतात. पण त्यासाठी
तुमच्याकडे ही हृदय असायला हवे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

दररोज सुंदर सुविचारांची शिदोरी
ऐकण्यासाठी चॅनलला नक्की
सबस्क्राईब करा.

पोटात गेलेले विष
एकाच माणसाला मारते.
कानात गेलेले विष
शेकडो नाती बरबाद करते.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न
करणारी माणसे या जगात
कधीच एकटी नसतात. कुणाचा
साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा
नसतो ते त्याचे संस्कार असतात.

आज चा सुविचार

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत अनेक
मार्गानी मृत्यू आपल्याला येऊ शकतो
पण जन्म घेण्यासाठी फक्त आई आहे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

कुणाला तुमची किंमत नसेल तर
नाराज होण्यात काय अर्थ….
भंगारवाल्याला हिऱ्याची पारख
थोडीच असते.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

आज चा सुविचार

आयुष्यात अशा व्यक्तींशी नाते
जोडण्याच्या प्रयत्न करा ज्यांना
खरोखर तुमच्या भावनांची
कदर आहे.

*********

वाद शक्यतो टाळायलाच बघा
कारण त्यातून क्वचितच प्रश्न
सुटतात. पण नको ते प्रश्न
निर्माण मात्र नक्कीच होतात.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

देवा जवळ नेहमी प्रार्थना करतांना
म्हणा, हे देवा प्रेमाने भरलेले डोळे दे.
श्रद्धेने झुकणारे मस्तक दे.
मदत करणारे दोन हात दे
सत्य मार्गावर चालणारे पाय दे.
नामस्मरण करणारे मन दे आणि
अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसाऊ दे.

#suvichar_marathi - आज चा सुविचार - प्रेरणादायी सुंदर सुविचार

#suvichar_marathi | कधीकधी आपल्याला
ज्या गोष्टी डोळ्याने दिसत नाही त्या हृदयाने दिसतात | Happy Thought

दररोज सुंदर सुविचारांची शिदोरी
ऐकण्यासाठी ब्लॉग ला नक्की
सबस्क्राईब करा.

प्रत्येक वस्तूची किंवा व्यक्तीची
किंमत ही नेहमी जागेप्रमाणे
बदलत असते.

टपरीवर एक पाण्याची
बॉटल दहा रुपयाला मिळते.

हॉटेलमध्ये तीच पाण्याची बॉटल
वीस रुपयाला मिळते आणि
एअरपोर्टवर पन्नास रुपयाला.

तीच बॉटल तोच ब्रँड तरी
सुद्धा, फक्त एका गोष्टीमुळे
एवढी किंमत बदलते….
ती म्हणजे जागा.

***********

जर तुम्हाला
तुमचे आयुष्य वर्थलेस
वाटत असेल तर जागा
बदला तुमचे आयुष्य
निश्चितच बदलेल.

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

ज्या व्यक्तीला खरे
बोलायची सवय असते….
लोक सर्वात जास्त चुकीचे
त्यालाच समजतात.

***********

जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची
गरज वाटू लागते, तेव्हा समजून जा
तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही.

#suvichar_marathi | ज्या व्यक्तीला खरे
बोलायची सवय असते | मराठी प्रेरणादायक
सुंदर सुविचार

एक घर बांधण्यासाठी
घरा बाहेर काय पडलो..

मी माझ्याच घरात
पाहुणा झालो..

आता आई हक्काने
काम नाही सांगत..

पाहुण्यासारखा
माझा थाट करते..

बाबा पहिल्या सारखे
छोट्या चुकांवर
ओरडत नाहीत..

थोडयाच दिवसासाठी
आला आहे..
म्हणून दुर्लक्षित करतात..

सतत घरात
झोपून राहिलो..
तर आई ओरडत होती..

आता तिचं आई
तो आराम करतोय
म्हणून.. सगळ्यांना
शांत करते..

घरात कधी पाहुणे
आले की.. ज्या सोयी
एकेकाळी पाहुण्यांना
होत्या… त्या आज
मला आहेत..

एक घर बांधण्यासाठी
घरा बाहेर काय पडलो..
मी माझ्याच घरात
पाहुणा झालो..

#suvichar_marathi | मी माझ्याच घरात पाहुणा झालो
| good thoughts in marathi | हृदयस्पर्शी सुंदर विचार

दररोज सुंदर सुविचारांची शिदोरी
ऐकण्यासाठी ब्लॉग ला नक्की
सबस्क्राईब करा.

Relationship Thoughts In Marathi | नाती टिकवण्यासाठी हे करा

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

मनासारखी एखादी गोष्ट घडली की
आपण आनंदी होतो. विरोधात घडली की
दुःखी होतो. आणि स्वतःविषयी नाराज
होतो. पण आयुष्य हे असेच असते….
सुख दुःखाचे हेलकावे घेत चालावे लागते.
आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष
असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो.
आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी.
तडजोडीमुळे नुकसान होत नाही….. तर
संधी मिळते आपले इंद्रधनुष्य फुलवण्याची.

************

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच
असतात परंतु…. स्वतःची वाट
निर्माण करणारा एखादाच असतो.
नशीबवान तर सर्वच असतात
नशिबाला बदलणारा एखादाच असतो.

************

जीवन जगत असतांना जगाचा
जास्त विचार करू नका.
ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर
जग हसते आणि ज्याच्याकडे सर्व
काही आहे त्याच्यावर जग जळते.

************

तुमच्यासाठी हसणे हे एक उत्तम
औषध आहे. पण जर तुम्ही
विनाकारण हसत असाल तर मात्र
तुम्हाला नक्कीच औषधाची गरज आहे.

************

जगात तीन मुख्य आश्चर्य आहेत….
पहिले म्हणजे, आपण जन्मभर ज्या
“मी” बरोबर राहतो त्याचे स्वरूपच
आपल्याला कळत नाही….!
दुसरे म्हणजे, जीवनाचे सारे व्यवहार
ज्या मनाच्याद्वारे करतो ते मन आपल्या
ताब्यातच येत नाही….! आणि तिसरे
म्हणजे क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही
अशी सर्वजण तक्रार करतात पण तो
प्रपंच सोडायला कोणीही तयार नाही…..!

************

आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ
किंवा घटना कधी येईल हे सांगणे
कठीण आहे. आणि एखाद्यावर वाईट वेळ
आलीच तर आयुष्याच्या त्या सत्याचा
सामना करून देते…. ज्याची आपण
चांगल्या वेळेतही कल्पना केली नसेल.
त्यामुळे माणसाला आपला समतोल
राखता आला पाहिजे, मग वेळ चांगली
असो….! किंवा वाईट असो….!

************

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

सुख म्हणजे काय…..?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने
जगणे आणि उद्याची चिंता न करणे
या गोष्टी म्हणजेच सुख होय.

************

देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे
माझ्याकडे मागून मिळाले असते…
तर भिकाऱ्याला “भीक” आणि
शेतकऱ्याला “पीक” कधीच कमी पडू
दिले नसते. त्यासाठी माणसाने श्रमाने
कष्ट करणे हेच “कर्म” आहे…!

************

फक्त निवडलेला “रस्ता” जर इमानदारीचा
व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर
“थकून” जाण्याचा प्रश्नच उरत नाही.
भले सोबत कुणी असो वा नसो….!

************

#suvichar_marathi | सुख म्हणजे काय |
Good Thoughts In Marathi |
प्रेरणादायी सुंदर सुविचार मराठी

औषधात आनंद नाही
आणि आनंदासारखे
दुसरे औषध नाही.

***************

प्रत्येकाशी भांडत नाही बसायचे
It’s Ok म्हणून त्यांना आयुष्यातून
काढून टाकायचे….!

***************

अडचणी कितीही येऊ द्या
प्रारब्धाच्या पुढे कोणीही
जात नाही. त्यामुळे लक्षात
ठेवा वादळात दिवा लावण्याचे
स्वप्न बाळगा. नियती मदत
केल्याशिवाय राहतच नाही.

***************

दुःख इमानदार असते. थेट
काळजात शिरते आणि
दीर्घकाळ तुमच्या सोबत राहते.
सुख मात्र वाफेसारखे असते
घडीभर रेंगाळते आणि
बघता बघता उडून जाते.

***************

स्वतःची चूक स्वीकारण्याची
हिंमत, सुधारण्याची जिद्द व
स्वतःवरील आत्मविश्वास असेल
तर माणूस खूप काही शिकतो.

***************

बिनधास्त जगणेही सोपे नसते
त्यासाठी जुन्या आठवणींचा
कवडीमोल भावात लिलाव
करावा लागतो….

***************

आयुष्य खूप छोटे आहे
हां हां म्हणता संपून जाईल.
प्रेम करायचे राहिले म्हणून….
शेवटी खूप पश्चाताप होईल.

***************

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

आपली माणसे ओळखायला
वेळ लागत नाही. कारण
त्यांना पहिल्यावर गालावर
हसू येते आणि निरोप घेतांना
डोळ्यात पाणी येते….!

***************

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी
अशी Some One Special व्यक्ती
असते, की त्याच्या दिसण्याने…
बोलण्याने…. आपल्या चेहऱ्यावर
440 volt ची Smile येते.

***************

संसाराचा खेळ जर जिंकायचा
असेल तर जोडीदार जिथे कमी
पडेल तिथे आपणच उभे राहायचे
असते.

***************

संपत्ती आणि स्थिती एखाद्याला
तात्पुरते महान बनवते ही
पण माणुसकी आणि नैतिकता
माणसाला नेहमीच आदर्श बनवते.

***************

आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी
कधीही लबाडी करू नये. कारण ती
कालांतराने उघड होते व आपली
काहीच किंमत राहत नाही.
लबाडी ही एक आखूड चादर आहे
ती तोंडावर घेतली तर पाय उघडे
पडतात आणि पायावर घेतली तर
तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने
आपल्या विचारासी व आचारासी
ठाम राहावे.

***************

कुणाचे जर काही चांगले होत असेल
तर आपण का वाईट विचार करायचा.
आयुष्य हा प्रवास असतो स्पर्धा
अजिबात नाही.

***************

सगळ्याच गोष्टी आपल्या
सुखासाठी करायच्या नसतात.
काही दुसऱ्यांच्याही सुखासाठी
करा. त्यातही एक सुप्त सुख
दडलेले असते.

***************

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

हट्ट स्वतःचा आणि तो पुरवायचा
हक्क इतरांजवळ म्हणजे बालपण
हट्ट अट्टहास आणि शक्ती ह्या दोन्ही
गोष्टी मालकीच्या म्हणजे तारुण्य
आणि ताकद संपून परस्वाधीनता
येणे आणि अट्टाहास तसाच रेंगाळणे
म्हणजे वार्धक्य.

दुःख इमानदार असते, थेट काळजात शिरते |
Good Thoughts In Marathi | suvichar marathi | Sunder Vichar

हृदयातल्या मंदिरात अंधार असेल
तर तुम्ही जगातल्या कुठल्याही
मंदिरात कितीही दिवे लावा
काहीच उपयोग नाही.

***************

इतरांनी आपल्याला हृदयात ठेवावे
असे वाटत असेल तर तीन गोष्टींमध्ये
कधीच बदल करू नका. चांगले विचार
सत्यता आणि जीव लावणारी माणसे.

***************

दगड पाण्यात फक्त भिजतो आणि
माती निरागसपणे विरघळते. भिजणे
आणि विरघळण्यातला फरक कळला
की सगळी नाती नितळ होतील….!
कुठे भिजायचे आणि कुठे विरघळायचे
हे आपल्याला ठरवायला हवे.

***************

या जगात निसर्गाकडून
शिकण्यासारखे खूप काही
आहे. फक्त योग्य आणि ते
योग्य वेळी शिकता आले पाहिजे.

***************

मदत करणाऱ्या हातांची
ओंजळ देव कधीच रिकामी
ठेवत नाही. म्हणून जमेल
तेवढी मदत इतरांना करत राहा.

***************

अपयश संध्याकाळी विसरून
जायचे असते कारण उद्याची
सकाळ ही तुम्हाला नवीन
संधी असते….

***************

समर्थक कमी झाले तरी चालतील
पण विरोधकांची गर्दी कमी होता
कामा नये. कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो…

***************

माणूस कितीही चांगला असला
तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ
पाहतोच. मग तो माणूस घरचा
असो की बाहेरचा माणूस असो.

***************

suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar

ज्या संगतीमध्ये चांगले विचार
आणि ज्या पंक्तीमध्ये चांगला
आहार नसेल तर सोडून
देण्यातच बुद्धिमत्ता आहे.
अशा ठिकाणी अजिबात थांबू नये.

***************

एकदा गंगेला विचारण्यात आले
तुझ्या पाण्यात अंघोळ केली की
सगळी पापे धुतली जातात म्हणे
त्या सर्व पापांचे तू काय बर करतेस….?
त्यावर ती म्हणाली, मी हे सगळे पाणी
समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला
विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय
करतोस….? समुद्र म्हणाला….
मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला
विचारले… तू काय करतोस त्या पाण्याचे…..?
ढग म्हणाला… मी पावसाच्या स्वरूपात
माणसांच्या घरावर नेऊन ते टाकतो.
लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे.
तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत
मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच
राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी रहा.

***************

कुठलेही काम करण्यापूर्वी
आपल्या चांगल्या कर्माची
मनापासून आठवण काढा
प्रत्यक्षात परमेश्वर तुमच्या
पाठीशी असेल.

***************

टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता
बेचैनी माणसाला तेव्हाच येते
जेव्हा तो स्वतःसाठी कमी
आणि दुसऱ्यासाठी जास्त
जगत असतो.

***************

कोणालाही तुमचे दुःख तो पर्यंत
जाणवत नाही जोपर्यंत तुमच्या
दुःखाचे रूपांतर रागात होत
नाही. आणि जेव्हा तुमच्या
दुःखाचे रूपांतर रागात होते
तेव्हा मात्र प्रत्येक जण तुमचा
राग राग करू लागतो.

***************

जोपर्यंत तुम्ही सर्वांशी चांगले
वागता तोपर्यंत सगळ्यांना
तुम्ही चांगले वाटता आणि
जेव्हा केव्हा तुम्ही तुमचे
अस्तित्व दाखवू लागतात
तेव्हा मात्र तुम्ही प्रत्येकाचे
ना आवडते होऊ लागता.

कोणालाही तुमचे दुःख तो पर्यंत
जाणवत नाही, जोपर्यंत |
Good Thoughts In Marathi |
Sunder Suvichar

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here