Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

1
391
Suvichar - आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार - Motivational Suvichar - Sunder Vichar Status
Suvichar - आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार - Motivational Suvichar - Sunder Vichar Status

Suvichar | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार
Motivational Suvichar | Sunder Vichar Status

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
ज्या प्रमाणे झाडाला पाण्याची गरज असते….
लेकराला मायेची गरज असते… तसेच आपल्या मनाला
सुविचारांची….. चांगल्या विचारांची….
गरज असते.

सुविचार हे आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात… मार्गदर्शक असतात…
दिशादर्शक असतात…. सुविचार आपल्याला अगदी कमी शब्दात खूप
महत्वाच्या गोष्टी सांगून जात असतात. ज्या आपल्या आयुष्याला
अधिक उर्जावान बनवितात.
जीवन जगावे कसे… हे शिकवत असतात.

म्हणून मित्रांनो…
नियमित सुविचारांचे वाचन केले पाहिजे. नियमित सुविचार ऐकले पाहिजे.
आणि त्याचे मनन हि केले पाहिजे.

मित्रांनो, मी तुमच्यासाठी सुंदर विचार… प्रेरणादायी सुविचार, सुंदर विचार,
स्टेटस सुविचार, मराठी सुविचार, चांगले विचार, छान विचार मराठी,
पोस्ट च्या रुपाने आणि सुविचारांचे विडीओ आणतच असतो.
तुम्ही त्याची दाखल घेता… आणि सुविचार कसे वाटले ते कमेंट किंवा
मेसेज च्या माध्यमाने मला कळवता… मला खूप आनंद होतो…

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

मित्रांनो… आज हि मी तुमच्यासाठी असेच सुंदर सुविचार, marathi suvichar,
suvichar status, sunder vichar, sunder vichar status, good thoughts in marathi on life,
marathi quotes, घेऊन आलो आहे. नक्कीच ते तुम्हाला खूप आवडून जातील.
मित्रांनो नक्कीच वाचा आणि विडीओ ऐका….
त्याचे मनन करा, त्याचे वाचन करा. आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक
बदल करा.

आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप आनंदी आहे. फक्त ते समाधानाने….
उत्साहाने…. जगले पाहिजे.

मित्रांनो करूया सुरुवात सुंदर सुविचारांना…. सुंदर विचारांना…

जरी भूक ही पोटात लागत असली….
तरी त्याची त्रिवता डोळ्यात दिसते.
💞💙💛💗

मानवी जीवन यशस्वी होण्याचा
तडजोड हाही एक मार्ग आहे.
माणसाने ती करायला शिकले पाहिजे.
जिथे जिथे तडा जाईल. तिथे तिथे
जोड देता आला की… कुठलेच
नुकसान होत नाही.
तडजोड करणे म्हणजे
शरणागती नव्हे… तर ती
परिस्थितीवर केलेली मात असते.
💞💙💛💗

अपेक्षांचे ओझे वाहणारा

कष्ट इतक्या शांततेने करायचे की….
यशाने धिंगाणा घातला पाहिजे.
💞💙💛💗

आपल्या ध्येयांची जाणीव करण्यासाठी
आत्म शिस्त आवश्यक आहे.
आत्मविश्वासाने आपल्या ध्येयांकडे
वाटचाल करण्यासाठी आपल्याला
आपल्यातील शक्ती संयोजित करण्याची
आवश्यकता असते.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

जीवनात कार्य असे करायचे की…
आपली युगेन युगे कीर्ती आभाळभर
शिल्लक राहिले पाहिजे.
💞💙💛💗

प्रत्येक लहान गोष्टी मध्ये
केलेली सुधारणा ही
मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.
💞💙💛💗

अडचणीच्या वेळी
सगळ्यात मोठा आधार म्हणजे…
स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो..
सगळे व्यवस्थित होईल.
💞💙💛💗

जे प्रामाणिक आणि ध्येयाने प्रेरित असतात
ते अपयशाला काय जगाला हादरण्याची
ताकद ठेवतात….!
💞💙💛💗

इतरांच्या चुकीतुनही शिका
कारण…. स्वतःवर प्रयोग करत राहिलात
तर संपूर्ण जीवन कमी पडेल…
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

प्रेरणा देणारी प्रतीक
काळजात कोरली की
अस्मिता आपोआप जपली जाते
💞💙💛💗

कर्माची परतफेड करावी लागते…
त्यासाठी कर्म करतांना नेहमी
सजग होऊन कर्म करा.
कारण ब्रह्मांडातील कोणताही
नियम बदलू शकतो पण
कर्माचा सिद्धांत बदलत नाही…
💞💙💛💗

एक तरी स्वप्न असे बाडगा….
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील…!
💞💙💛💗

मराठी प्रेरणादायक सुविचार | Marathi Suvichar

कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा
प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती
सोबत असावी जी आयुष्यातील
सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल…
💞💙💛💗

जीवनाच्या वाटेवर
जो धावता – धावता पडतो
तोच यशस्वी होत असतो.
💞💙💛💗

प्रतिबिंब ते उकळत्या पाण्यात
कधीच दिसत नाही.
ते दिसेल तर फक्त
शांत आणि स्थिर पाण्यातच.
तसेच मन व विचार सैरभैर असतांना
मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा
आणि मन एकाग्र करून विचार करा…
तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

दर दिवशी आपल्याला आयुष्य
नवीन कोरे चौवीस तास देते.
आपण त्यात भूतकाळाशी झगडत
बसायचे की…. भविष्याचा विचार
करत बसायचे की… आलेला क्षण
जगायचे. हे आपण ठरवायचे असते.
💞💙💛💗

जगणे संघर्षाचे असले तरी चालेल
परंतु त्याला स्वाभिमानाची झालर
असली पाहिजे…
💞💙💛💗

Sunder Vichar Status | सुविचार

संघर्षाचा काळ
हा यशाची बीजे पेरण्याचा
सर्वात उत्तम काळ असतो.
💞💙💛💗

जर सूर्यासारखे
जगायची इच्छा असेल
तर प्रथम त्याच्यासारखे
जळावे लागते…!
💞💙💛💗

जीवनात आणि लढाईत
प्रत्येक क्षणाला महत्त्व असते.
एका क्षणाचा अवधी सुद्धा
जय-पराजय ठरवू शकतो.
तिथे बेफिकीर पणाला थारा नाही.
त्यामुळे लढाईत आणि जीवनात
नियोजन एवढ्या शांततेने तसेच
हुशारीने केले पाहिजे की….
अंमलबजावणी नंतर आपल्याच
यशाचे नगारे वाजले पाहिजेत…..
💞💙💛💗

मोठेपणा येण्यासाठी
अधिक कष्ट करण्याची आणि
संकटे सहन करण्याची ताकद ठेवा…!
💞💙💛💗

जोपर्यंत तुम्ही जिद्द आणि चिकाटी
सोडत नाही तोपर्यंत परिस्थिती
तुम्हाला बळकावू शकत नाही….!
💞💙💛💗

तुम्ही जीवनात कितीही उंचीवर जा
परंतु जे तुमच्यासाठी तुमचा मजबूत
पाया म्हणून उभे आहेत त्यांना कधी
विसरू नका.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य
ज्यांच्याकडे असते. तो जग जिंकण्याची
जिद्द राखून पुढे जातो…
💞💙💛💗

स्वप्न फुकटच असतात
केवळ त्यांचा पाठलाग करतांना
किंमत मोजावी लागते….!
💞💙💛💗

कोणतीही गोष्ट
जीवनात अवघड नसते.
फक्त विचार सकारात्मक पाहिजे.
💞💙💛💗

यशातून आपण थोडे शिकतो
परंतु अपयशातून आपण
सर्व काही शिकतो….
💞💙💛💗

आपल्या कर्तृत्वाला
कल्पकतेची जोड द्या…
म्हणजे अचंबित कार्य घडेल….!
💞💙💛💗

जगाला जर स्वप्नांच्या पलीकडचे
पाहायचे असेल तर स्वप्नदेखील
जगाच्या पलीकडचे ठेवा…!
💞💙💛💗

स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय
स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा
उत्पन्न होत नाही…. आणि
स्वतःला सिद्ध करायच्या
इच्छे शिवाय कर्तुत्व घडत नाही….
💞💙💛💗

जर तुम्ही बघितलेले स्वप्न
पूर्ण होत नसतील तर
तुमच्या कामाची पद्धत बदला
तुमची स्वप्न नाही….!
💞💙💛💗

धाडस असे करावे की…
जे जमणार नाही कुणा दुसऱ्याला
कार्य असे करावे… इतिहास असा घडवा….
की शत्रूची मान झुकेल मुजऱ्याला…..!
💞💙💛💗

ठाम राहायला शिका
जरी निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की….
आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि
कधीही करता येते.
💞💙💛💗

मोठे व्हायला ओळख नाही….
माणसांची मने जिंकावी लागतात….!
💞💙💛💗

जेव्हा मन कमकुवत असते….
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते.
जेव्हा मन संतुलित असते….
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते.
जेव्हा मन मजबूत असते…..
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते. म्हणूनच
मन आनंदी आणि खंबीर असेल तर
परिस्थिती वर निश्चित विजय मिळवता येतो…..
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

जीवनात कठीण परिश्रम
हेच तुम्हाला एक शक्तिशाली
योद्धा बनविते….!
💞💙💛💗

एक लहान दिवा सगळीकडे
आपला प्रकाश पसरवू शकतो….
तर तुम्ही का नाही. गरज आहे….
स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी
नवीन काही तरी करायची.
💞💙💛💗

नशिबावर अवलंबून राहू नका
कारण यशस्वी होण्यासाठी
नशीबाचा भाग हा एक टक्के असतो….
तर मेहनतीचा भाग नव्यान्नव टक्के असतो..
💞💙💛💗

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की….
जणू विजयाची सवयच आहे. हराल तेव्हा
असे हरा की…. जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
💞💙💛💗

संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार
आईकडून शिकावे बाकी सगळे
जग शिकवते.
💞💙💛💗

स्वतःच्या यशापर्यंत पोहोचण्याचा
नकाशा बनवायचा असेल तर
अपयश हाती आलेल्या सगळ्या जागा
लिहून ठेवत चला….!
💞💙💛💗

आयुष्यात जे झाले त्याचा विचार करू नका.
पुढे जे होणार आहे आणि काय होऊ शकते
याचा विचार करा.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि
चारित्र्यात सत्यता ठेवा. जीवनाच्या
जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी
पडणार नाहीत….!
💞💙💛💗

यश हे तळहातांवरील रेषांतून नव्हे…
ते कष्ट आणि घामाच्या धारांतून मिळते…
💞💙💛💗

तुम्ही प्रत्येक वेळेस
नवीन चूक करत असाल
तर नक्कीच समजा
तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात…
💞💙💛💗

आपल्या यशाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ
वाढवायचे असेल तर कष्टाच्या त्रिज्येची
लांबी वाढवावी लागते…!
💞💙💛💗

आयुष्यात जगाला नाही तर
स्वतःला बदला जग आपोआप
बदलेल….
💞💙💛💗

पराभवानेच माणसाला स्वतःची
खरी ओळख पटत असते.
एकदा हरलो म्हणून
प्रयत्न करणे सोडायचे नसते…!
💞💙💛💗

प्रत्येकाचा दिवस येतो
फक्त वेळे सोबत संघर्ष करण्याची
तयारी ठेवा…!
💞💙💛💗

न हरता…. न थकता….. न थांबता….
प्रयत्न करणाऱ्यां समोर नशीब सुध्दा
हारत….. नेहमी प्रयत्न करत रहा….
💞💙💛💗

Suvichar | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार | Motivational Suvichar | Sunder Vichar Status

 

Suvichar | शांततापूर्ण आयुष्यासाठी चे सात नियम

1] भूतकाळाशी तह करून टाका
म्हणजे तो तुमचे भविष्य नासवून
टाकणार नाही.

💞💙💛💗

2] तुमच्याविषयी बाकीचे
काय विचार करतात
याच्याशी तुम्हाला
काही देणे-घेणे नसावे.

💞💙💛💗

3] काळ हा
सगळ्या गोष्टी बऱ्या करत जातो.
त्यासाठी काही वेळ जाऊ द्या…
थोडा वेळ तरी द्या.

💞💙💛💗

4] तुमच्या आनंदासाठी
केवळ तुम्हीच कारणीभूत असता.
बाकीचे कुणीही त्याच्यासाठी
जबाबदार नसतात.

💞💙💛💗

5] तुमच्या आयुष्याची
इतरांशी तुलना करू नका.
त्यांच्या प्रवास कसा झालेला आहे
याची तुम्हाला काहीही माहिती नसते.

💞💙💛💗

6] अति विचार करणे थांबवा.
सगळ्याच गोष्टींची उत्तरे
माहिती असली पाहिजेत
असा काही नियम नाही.

7] चेहऱ्यावर हास्य ठेवा
जगातील सगळ्या प्रश्‍नांची जबाबदारी
तुमच्यावर देण्यात आलेली नाही.
💞💙💛💗

Sunder Vichar | शांततापूर्ण आयुष्यासाठीचे सात नियम
मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts

आयुष्यातील आनंदाला दुप्पट करणारे सुंदर विचार
Marathi Suvichar
Good Thoughts In Marathi On Life

👉जिथे आपली कदर नाही….
कधीही तिथे जायचे नाही.
ज्यांना खरे सांगितल्यावर
राग येतो…. त्यांची कधीच
मनधरणी करत बसायचे नाही.
💞💙💛💗

👉जे आपल्या नजरेतून
उतरलेले आहेत…
त्यांचा त्रास करून
घ्यायचा नाही……!
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

👉जर एखाद्याचे काम
आपल्या हातून होत असेल…
तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि
निःसंकोचपणे करा.
नेहमी दुसऱ्याला मदत करा.
दुसऱ्याला त्रास होईल
असे कधीच वागू नका……!
💞💙💛💗

👉नेहमी स्वतःसोबत शर्यत लावा…..
जर जिंकलात तर तुमचा
आत्मविश्वास जिंकेल. आणि
जर हारलात तर तुमचा अहंकार हारेल……!
💞💙💛💗

Sunder Vichar Status | Marathi Suvichar

👉पाण्याने भरून असलेल्या तलावात
मासे किड्यांना खातात. आणि
जर त्याच तलावाचे पाणी आटले आणि
तलाव कोरडा झाला तर किडे
माश्यांना खातात.
वेळ सगळ्यांची येते….
केवळ आपली वेळ येण्याची वाट बघा….!
💞💙💛💗

👉एखाद्या माणसाजवळ आपल्या काही
अशा आठवणी ठेवून जा की….
जर नंतर त्याच्याजवळ आपला
विषय जरी निघाला तर…..
त्याच्या ओठांवर थोडसे हसू आणि
थोडसे डोळ्यात पाणी नक्कीच आले पाहिजे…..!
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

👉आपण आपल्या खांद्यावर डोके ठेवून
रडू शकत नाही आणि आपणच
आपल्याला आनंदाने मिठी ही
मारू शकत नाही……!
जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी
जगायची गोष्ट आहे……!
💞💙💛💗

👉जगातील सर्वात सुंदर रोपटे
भरवसाचे असते आणि ते काही
जमिनीवर नाही तर आपल्या
हृदयात रुजवावे लागते…..!
💞💙💛💗

👉जेव्हा खूप वेगावान वारा येतो
तेव्हा आपण आपल्या मातीला
मजबूत पकडून राहायचे असते….
तो वेगवान वारा ज्या वेगाने येतो…
त्याच वेगाने निघूनही जातो….
मित्रांनो….
तो वेगवान वारा महत्त्वाचा नसतो….
सवाल असतो की…. त्या वाऱ्यासोबत
आपण कशी लढाई देतो आणि
त्यातून किती प्रमाणात
चांगल्या परिस्थितीत बाहेर येतो याचा……!
💞💙💛💗

👉विश्वातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही.
देवाने सोने निर्माण केले आहे…..
चाफ्याची फुले सुद्धा देवानेच
निर्माण केली आहेत…
मग देवाला सोन्याला चाफयाचा सुवास
का देता आला नसता……?
अपूर्णतेतही काही आनंद राहते की…..!
💞💙💛💗

👉मूर्ती ही दगडात असतेच.
फक्त दगडाचा नको असलेला भाग
काढून टाकायचा असतो. आणि
आता ह्याच भावनेने माणसाकडे पहा.
माणसातही नको असलेला भाग
दूर करायला शिका…..!
नाती आणखीनच सुंदर होतील.
💞💙💛💗

👉तुम्ही जेव्हा अडचणीत असाल
तेव्हा प्रामाणिक रहा.
जेंव्हा तुमची आर्थिक परिस्थिती
चांगली असेल तेंव्हा अगदी साधे रहा.
जेव्हा तुमच्याजवळ एखादे
पद किंवा अधिकार असेल
तेव्हा विनयशील रहा. आणि
जेव्हा खूप रागात असाल
तेव्हा केवळ शांत रहा.
💞💙💛💗
आयुष्यातील आनंदाला दुप्पट करणारे सुंदर विचार | Marathi Suvichar | Good Thoughts In Marathi On Life

Sunder Vichar | समोरच्याला प्रेम देणे ही सर्वात मोठी भेट असते
Marathi Suvichar | Suvichar Status

जोपर्यंत घरातील निर्णय
मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात
तोपर्यंत घर टिकून राहते. पण जेव्हा
सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात
तेव्हा मात्र घर ताब्यात राहत नाही.

💞💙💛💗

आपली माणसे
संकटांशिवाय कळत नाहीत……

💞💙💛💗

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल
हे सांगता येत नाही.
💞💙💛💗

Sunder Vichar Status | Marathi Suvichar

देवळातला देव सहज ओळखता येतो
पण माणसातला देव ओळखायला
पुर यावा लागतो.
मग तो पाण्याचा असो अथवा भावनांचा
💞💙💛💗

मनात जी गोष्ट आहे…
ती बोलण्याची हिम्मत ठेवा.
समोरच्या व्यक्तीच्या मनात
जी गोष्ट आहे ती
समजून घेण्याची क्षमता ठेवा.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

बाहेरून शांत दिसण्यासाठी
अनेक लढाया आतून जिंकाव्या
लागतात…
💞💙💛💗

देवाने जश्या हृदयात
Feeling दिल्या आहेत…
तसेच जर Delete चे बटन
दिले असते तर किती
Better झाले असते.
💞💙💛💗

यश मिळवण्यासाठी
जेवढी मेहनत करावी लागते…
त्यापेक्षा दुप्पट मेहनत
ते टिकवण्यासाठी करावी लागते.
💞💙💛💗

संयम हा
यश मिळवण्यासाठी
लागणारा
सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
💞💙💛💗

Sunder Vichar Status | Marathi Suvichar

सर्वात मोठे यश
खूप वेळा सर्वात मोठ्या
निराशे नंतरच मिळत असते.

💞💙💛💗

सगळ्या झेललेल्या दुःखाचे ही
एक सेविंग अकाउंट असतो.
💞💙💛💗

देवाला सांगू नका….
माझ्यासोबत खूप संकटे आहेत….
संकटांना सांगा की…
देव माझ्यासोबत आहे.
💞💙💛💗

स्वार्थाची पट्टी खूप मजबूत असते
एकदा ती डोळ्यावरती चढली ना
की ती व्यक्ती मग कुणाचीच राहत नाही.
💞💙💛💗

जितके महत्त्व ध्येयाला आहे
तितकेच महत्त्व त्यासाठी चालू
असलेल्या प्रवासाला असते…..!
💞💙💛💗

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे
हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.
💞💙💛💗

भूक लागली म्हणून
भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही.
आणि पैसा जास्त आहे म्हणून
भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही.
म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक
रेषेपर्यंतच स्थान आहे.
💞💙💛💗

आयुष्याला दुःखाच्या तडा जाऊ न देता
सुखाची जोड देणे म्हणजे तडजोड.
💞💙💛💗

शांत आयुष्य जगण्यासाठी
मनातले असंख्य आवाज
थांबवता यायला हवे….
💞💙💛💗

चक्रव्यूह रचणारे
आपलेच असतात
हे काल ही खरे होते
आणि आज ही खरे आहे.
💞💙💛💗

माणसाने दुसऱ्याला Judge
करण्याअगोदर आपण
किती perfect आहोत
हे बघावे.
💞💙💛💗

Sunder Vichar Status | Marathi Suvichar

जे तुमचे खास असतात
खुपदा तेच विषारी साप
असतात.
💞💙💛💗

जेव्हा एखादी घटना आपल्याला
धडा शिकवून जाते. तेव्हा त्याचा
प्रत्येक शब्द न शब्द आठवणीत राहतो…!
💞💙💛💗

जीवनात माणसे कमावणारा
सर्वात श्रीमंत असतो. कारण
पैशा तर भिकारी पण कमावतो.
💞💙💛💗

पैसा सगळेच कमावतात
आशीर्वाद ही कमवा.
आशीर्वाद तिथे उपयोगी पडतो
जिथे पैसा उपयोगी पडत नाही.

💞💙💛💗

कुठलेच सुख असे नाही…
जे जीवनभरासाठी समाधान देईल
पण समाधानातच इतके सुख आहे
जे जीवनभर पुरून जाईल.

Sunder Vichar | समोरच्याला प्रेम देणे ही सर्वात मोठी भेट असते
Marathi Suvichar | Suvichar Status

जीवन जगताना… | Sunder Vichar | छान विचार मराठी
Suvichar Status | quotes in marathi on life

मुलावर प्रेमाचे पांघरूण घाला पण दृष्टी ला झाकू नका.
मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये.
चटके बसल्या शिवाय…. अपमान पचविल्याशिवाय वाढ अपुरीच असते.
आयत्या सुखाला किंमत नसते स्व कष्टाची भाकरी गोड लागते.
शिक्षण द्या… संस्कार द्या…. अडचणीला आधार द्या…
आयुष्यभर मुले बसून खातील इतके मागे ठेवूच नका.
जसे अति पाणी रोप कुजवते तसे अति प्रेम मुलांना पंगू बनविते.
💞💙💛💗

 

आयुष्याचे पाच नियम | सुंदर विचार 

१] स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.
२] जास्त विचार करणं बंद करा.
३] भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा.
४] दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका.
५] सतत आनंदी राहा.

💞💙💛💗
सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा
आजचा दिवस खूप सुंदर आहे.
मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते
त्यापेक्षा मी खूप काही अधिक करू शकतो.

केवळ काळजी आणि दुःख करून
काहीच होणार नाही. मी स्वतःला
झोकून प्रयत्न केले तर नक्कीच
मला समाधान होईल.

रोजच असे क्षण असतात
जे आनंदाने भरलेले असतात.
आज मी स्वतः आनंदी राहील
आणि इतरांनाही आनंद देईल.

जीवन सुंदर आहे आणि मी ते
अजून सुंदर करणार….
येणारे दिवस आनंदाने जगणार.

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा | Suvichar Status
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार

Most Motivational Sunder Vichar Status
माणूस अपमानाला मुळीच घाबरत नाही
Marathi Suvichar | Marathi Quotes

माणूस अपमानाला
मुळीच घाबरत नाही.
तो घाबरतो की
तो अपमान चारचौघात होऊ नये.
💞💙💛💗

इच्छा असून चालत नाही
निश्चय असणे गरजेचे आहे.
💞💙💛💗

नाते एवढे सुंदर असावे की….
तिथे सुख दुख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आले पाहिजे.
💞💙💛💗

नात्यामुळे विश्वास नसतो.
तर….
विश्वासामुळे नाती असतात….
💞💙💛💗

तीच नाती खरी असतात…
जी एकमेकावर नुसती रागावतात
भांडतात पण साथ कधीच सोडत
नाहीत.
💞💙💛💗

दोरीला पीळ पडला की
दोरी आणखीन मजबूत होते.
पण नात्याचे उलट आहे.
नात्यात पीळ पडला की
नाते कमकुवत होते.
💞💙💛💗

एक लहानसे जग आपले ही असावे….
ज्यात तुमच्यासारखी जिवलग माणसे
नेहमी दिसावी…..!
💞💙💛💗

जशी जेवणात स्वीट डिश
महत्त्वाची असते. तसेच….
जीवनात तुमच्यासारख्या
गोड माणसांची साथ
महत्त्वाची असते.
💞💙💛💗

जीवनात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल…. पण प्रेमाची माणसे
अशी मिळवा की कोणाला
त्याची किंमत करता येणार नाही.
💞💙💛💗

वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात.
पण वेळ नसतांना सुद्धा
जे आपल्याला वेळ देतात
तेच खरे आपले असतात.
💞💙💛💗

पक्ष्यांना उडण्या करीता
आकाश मोकळे असले
तरी घरटे मात्र
झाडावरच बांधावे लागते….
💞💙💛💗

झोपेत बघितलेल्या स्वप्नां पेक्षा
उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न
अधिक त्रासदायक असतात.
💞💙💛💗

जेव्हा पैसे येतात
तेव्हा इज्जत पण येते.
पण लक्षात ठेवा….
ती इज्जत पैशाची आहे
तुमची नाही.
💞💙💛💗

जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते. कारण
समजण्यासाठी अनुभवाचा
कस लागतो तर समजण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो…
💞💙💛💗

जीवनात पैसा महत्वाचा नसतो.
महत्त्वाचे असते आपले प्रेमाचे माणूस.
त्याचे असणे…. त्याचे आपल्यासोबत चालणे…..
पैसा येतो जातो पण एकदा गेलेला माणूस
परत येत नाही.
💞💙💛💗

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा
एक लहानशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखे जिवलग माणसे तिथे
नेहमी दिसावी.
💞💙💛💗

कधी चुकलो तर माफ करा
आणि रागावलो तर समजून सांगा
कारण नाती टिकवायची आहे
तोडायची नाही.
💞💙💛💗

स्वार्थासाठी आणि कामापुरती
जवळ आलेली माणसे
काही क्षणात तुटतात.
परंतु विचारांनी आणि प्रेमाने
जोडलेली माणसे आयुष्यभर
सोबत राहतात.
💞💙💛💗

माणसाला वाईट वेळ खूप त्रास देते
पण त्याही परिस्थितीत जगायचे कसे
हे ती वेळच शिकवते.

💞💙💛💗

वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते
आणि मागे लक्ष ठेवण्याच्या आरसा मात्र
अगदी छोटासा असतो. कारण….
तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा
मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा
आणि पुढे जात राहा.
💞💙💛💗

जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

माणसाने कसे समुद्रासारखे असावे
अथांग… भरतीचा माज नाही
आणि ओहोटी ची लाज नाही….!
💞💙💛💗

माणसाजवळ त्याच्या जीवनभराची
संपत्ती म्हणजे… त्याचे चांगले विचार
कारण धन आणि बळ कोणालाही
वाईट मार्गावर नेऊ शकतात
परंतु चांगले विचार माणसाला
सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित
करत असतात.
💞💙💛💗

जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

अंतःकरणात दुःखाचा
कितीही अंधार असला तरी
चेहऱ्यावर हास्या चा दिवा
नेहमी तेवत ठेवा.
💞💙💛💗

प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे
जे तुमच्याशी वाईट वागतात
त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे.
ते चांगले आहेत म्हणून नाही….
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

मला कोणाची गरज नाही…..
हा अहंकार आणि सर्वांना
माझी गरज आहे हा भ्रम
या दोन्ही गोष्टी टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी लोकप्रिय
व्हायला वेळ लागणार नाही.
💞💙💛💗

ओंजळीत घेऊन समुद्र
कधी दाखवता येत नाही.
निळ्याभोर गगनाचा अंत
कधी लागत नाही.
हाताने काढलेल्या फुलाला
सुगंध कधी येत नाही.
खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख
कधी शब्दात करता येत नाही.
💞💙💛💗

भेट होत नसली तरी चालेल
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे.
💞💙💛💗

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्कीच असली पाहिजे.
💞💙💛💗

येणारी प्रत्येक रात्र सांगते
कर विचार सरलेल्या दिवसाचा
शिकायचे घडलेल्या क्षणातून
सकारात्मक विचार कर उद्याचा….!
💞💙💛💗

गरुड भरारी घ्यायची असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.
💞💙💛💗

हृदयातील दुःख लपवता आले
तर डोळ्यात अश्रू असून सुद्धा
हसता येते.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

सतत चालून चालून….
चालू असलेल्या पायवाटा
जुन्या झाल्या आहेत.
जीवनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण
करण्यासाठी नवीन पायवाट बनवावी
लागते. कारण…. त्या मार्गावर तू हे करू
शकत नाहीस….
असे सांगायला कोण नसते….
💞💙💛💗

मित्र किती आहेत हे महत्त्वाचे नाही….
तर त्यातले कितीजण मैत्री निभावतात
हे महत्त्वाचे असते.
💞💙💛💗

डोळ्यात स्वप्नं असणारी माणसे
खिशात पैसे असणाऱ्या माणसांपेक्षा
जास्त श्रीमंत असतात.
💞💙💛💗

आपणच आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे
कारण आलाराम चे काम फक्त वाजत
राहण्याचे असते. झोपेतून उठायचे की नाही
हे शेवटी आपल्यालाच ठरवायचे असते.
💞💙💛💗

खरेपणा नजरेत असतो….
बोलणाऱ्याच्या शब्दात नाही.
मन ही वाचता येते डोळ्यांना
त्या साठी कोणते शिक्षण लागत नाही.
💞💙💛💗

ध्येय गाठतांना
जर प्रयत्न प्रामाणिक असतील
तर रस्ता किती ही कठीण असो
तुम्ही चालत राहा.
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

लक्ष केंद्रित करणाराच
यश मिळवतो…
💞💙💛💗

क्षणभर टोचणारी सुई
सगळ्यांच्या लक्षात राहते.
पण जीवनभर जोडून ठेवणारा
धागा कुणालाच दिसत नाही.
💞💙💛💗

आयुष्याच्या वाटेवर चालतांना
पडलेच पाहिजे…. तेव्हाच तर कळते
कोण हसत आहे… कोण दुर्लक्ष करत
आणि कोण सावरायला येत आहे….!
💞💙💛💗

मनाला फार मोकळे सोडायचे नाही
आणि फार पकडून ठेवायचे नाही
कारण फार मोकळे सोडले तर
लोक गैरफायदा घेतात आणि
पकडून ठेवले तर घमंडी आहे
असे म्हणतात. म्हणून….
माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग
करायचा. म्हणजे आपल्याला त्रास किंवा
पश्चाताप करण्याची पाळी येत नाही
💞💙💛💗

Suvichar Status | आयुष्याला उर्जावान बनवणारे सुंदर विचार

या जगात जर काही सुंदर असेल…
तर ते आपले मन….. आपला दृष्टिकोण….
आपले विचार…. आपले वागणे….. आणि
काहीही न लपवता मनमोकळे जगणे
यातच खरी सुंदरता आहे.
💞💙💛💗

समाधान म्हणजे
एक प्रकारचे वैभव असून
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते….
तो खरा सुखी होतो.
💞💙💛💗

हे जग त्याच्या पुढे झुकते….
जो परिस्थिती समोर
झुकलेला नसतो.
💞💙💛💗

खिशात किती आहेत
ते महत्वाचे नाही…. तर
तुम्ही खुशीत किती आहात
हे महत्त्वाचे आहे….!
💞💙💛💗

मी काहीतरी चांगला करणार
हा विश्वास आणि मी काहीतरी
चांगला करणारच हा आत्मविश्वास.
💞💙💛💗

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here