Swami Vivekananda Marathi Suvichar |स्वामी विवेकानंद सुविचार

1
1289
Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb good thoughts
Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार

Swami Vivekananda Marathi Suvichar |
स्वामी विवेकानंद सुविचार

नमस्कार मित्रहो….
आज मी तुमच्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे सुंदर असे विचार
घेऊन आलो आहे.
या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना आपल्या आयुष्यामध्ये
बदल होण्यासाठी आजपासून वाटचाल सुरु होईल म्हणून
हे विचार आपण वाचावे… वाचले पाहिजेत. आपल्या जगण्याला
उर्जा येईल…. आपल्या जगण्यामध्ये बदल होईल.
याची मला खात्री वाटते.

मित्रांनो,
आपल्या देशात अनेक असे महापुरुष होऊन गेलेले आहेत
त्या महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार आपल्या काही शिकवतात.
त्यांचे विचार निराश झालेल्या व्यक्तीलाहि ध्येय गाठण्यासाठी प्रेरित
करणारे आहेत.

महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शन करत असतात.
या पैकी एक महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद.

मूळ नाव नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद यांचा
जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात
झाला. स्वामी विवेकानंदांचे विचार खुप प्रेरणादायी आहेत.
त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला उर्जा देते.

स्वामीजी ने आपल्या लहान जीवनात संपूर्ण जगावर
भारताची आणि हिंदुत्वाची खोल छाप सोडली.

शिकागो येथील त्यांचे भाषण आजही लोकप्रिय आहे आणि
आम्हाला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची कल्पना देते.

स्वामीजी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण सार्वजनिक सेवेत व्यतीत
करीत असत आणि प्रत्येकालाही असेच करण्याची प्रेरणा देत असत.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा आपल्या देशात
राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मित्रांनो या पोस्ट मध्ये मी स्वामी विवेकानंद यांचे पंच्याहत्तर प्रेरणादायी
सुंदर सुविचार आपल्यासाठी आणले आहेत. जे तुम्हाला प्रेरणा देतील.
तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शन करतील तसेच तुम्हाला यश मिळविण्यासाठी
मदत करतील.
चला, आज या महान माणसाचे अनमोल विचार आपण बघुया

Swami Vivekananda Marathi Suvichar |
स्वामी विवेकानंद सुविचार

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि
वाढ हीच जिवंतपणाची
लक्षणे आहेत.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील
तर एक रुपयाची भाकर घ्या आणि
एक रुपयाचे पुस्तक घ्या.
भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल
तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.

*****

तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत
कधीच पोहचू शकणार नाही.

*****

स्वतःला घडविण्यात आपला
वेळ खर्च करा. म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच
मिळणार नाही.

*****

जेव्हा आयुष्य हसवेल
तेव्हा समजा चांगल्या कर्माचे
फळ आहे आणि जेव्हा आयुष्य
रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.

*****

परमेश्वर नेहमी कृपाळू असतो
जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने
त्याची मदत मागतो त्याला ती
निश्चितपणे मिळत असते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - परमेश्वर
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

शून्यातून विश्व निर्माण
करण्याची जिद्द ज्याच्या
अंगी असते…
तोच खरा कर्तृत्ववान होय.

*****

थोर माणसांची एकाग्रता
सामान्य माणसापेक्षा
खूप अधिक असते.
ज्या मानाने तुम्ही एकाग्रता
साधाल त्या मानाने तुम्ही
थोर व्हाल.

*****

तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द
केलेला प्रत्येक विचार आणि
प्रत्येक कृत्य हे तुमचे
कर्म संचित घडवीत असते.
दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या
जश्या तुमच्यावर वाघासारख्या
झडप घालायला टपलेल्या असतात
तसेच तुमचे शुभ विचार, कृती, कर्मे
हजारो – लाखो देव दूताची शक्ती
धारण करून तुम्हाला सामर्थ्य
देण्यासाठी, तुमचे रक्षण
करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.

*****

कोणतेही कार्य अळथळ्यांवाचून
पार पडत नाही. शेवट पर्यंत जे
प्रयत्न करीत राहतात त्यांनाच
यश प्राप्त होते.

*****

अनुभव हा आपला सर्वोत्तम
शिक्षक आहे. जो पर्यंत
जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - अनुभव

आयुष्यात जोखीम पत्कारा
जिंकलात तर नेतृत्व कराल
हरलात तर मार्गदर्शन कराल.

*****

जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळून
पाहू नका. कारण पुन्हा – पुन्हा
मागे वळून पाहणारे इतिहास
घडवीत नाहीत.

*****

श्रीमंती हि वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे चारित्र्य

*****

स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य घडविणारे सुंदर प्रेरणादायी सुविचार,
Motivational quotes in marathi

75 Motivational Quotes Of
Swami Vivekananda In Marathi |
स्वामी विवेकानंद यांचे 75 प्रेरणादायी विचार

इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही.
शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर
उभे राहून काम केले पाहिजे.
हळू हळू सर्व काही ठीक होईल.

*****

जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी
मदत करत असेल तर त्याचे मूल्य आहे
नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे
त्यापासून जितक्या लवकर सुटका
मिळेल, तितके चांगले आहे.

*****

हजार वेळा ठेच लागल्यानंतरच
एक चांगले चरित्र निर्माण होते.

*****

देशातील दरिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - ईश्वर सेवा

जो अग्नी आपल्याला उब देतो
तोच अग्नी आपल्याला नष्टही
करू शकतो. पण हा त्या अग्नीचा
दोष नाही

*****

समजदार व्यक्तीसोबत केलेली
काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके
वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते

*****

जीवनात कोणतीही गोष्ट
गरजेपेक्षा जास्त मिळाली की
ती विष बनते मग ती
ताकत असो, गर्व असो, पैसा असो.

*****

देशातील दरिद्र व अज्ञान
घालविणे म्हणजेच
ईश्वराची सेवा होय

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - ईश्वराची सेवा

बदल घडविल्या शिवाय
प्रगती होऊ शकत नाही आणि
ज्यांना स्वतःचे मन बदलता येत
नाही, ते कशातच बदल घडू
शकत नाही

*****

तुम्ही जितके बाहेर पडाल आणि
दुसऱ्यांचे चांगले कराल तितके
तुमचे मन शुद्ध राहील आणि
त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.

*****

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य
व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महान
आत्मा असते. तसे नसेल तर ती
दूरआत्मा आहे.

*****

Swami Vivekananda Marathi Suvichar |
स्वामी विवेकानंद सुविचार

जे कोणी आपल्याला मदत करतात
त्यांना विसरू नका. जे कोणी
आपल्यावर प्रेम करतात त्यांचा
द्वेष करू नका. आणि जे कोणी
आपल्यावर विश्वास ठेवतात
त्यांना फसवू नका.

*****

धैर्य, दृढ़ता, पवित्रता
या तिन्ही गोष्टी
यशासाठी आवश्यक आहेत.

*****

मेंदूच्या शक्ती सूर्याच्या
किरणांसारखेच असतात.
जेव्हा ते केंद्रित असतात
तेव्हा ते चमकतात.

*****

स्वतःच्या हेतू प्रबळ ठेवा लोकांना
जे बोलायचे असेल ते बोलू द्या
एक दिवस हीच लोक तुमचे
गुणगान करत येतील.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - सुविचार
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

दिवसातून कमीत कमी
एकदा स्वतःची बोला.
नाहीतर तुम्ही तुमच्यातील
एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची
बैठक गमवाल.

*****

ज्यावेळी तुम्ही काम करण्याची
प्रतीज्ञा करता त्याचवेळी ते काम
पूर्ण केले पाहिजे. नाहीतर लोकांचा
तुमच्यावरील विश्वास नाहीशा होतो.

*****

जग एक विशाल व्यायामशाळा आहे
जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान
बनविण्यासाठी आलो आहोत.

*****

अनुभव हा आपला
सर्वोत्तम शिक्षक आहे.
जोपर्यंत जीवन आहे
तो पर्यंत शिकत राहा.

*****

शक्यतेच्या सीमेला जाणून
घेण्याच्या सर्वोत्तम उपाय म्हणजे
असंभवतेच्या सीमेला ओलांडून
पुढे निघून जाणे.

*****

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास
ठेवत नाही तोपर्यंत देवालाही
तुमच्यावर विश्वास वाटत नाही.

*****

असे कधीच म्हणू नका की
मी करू शकत नाही. कारण
तुम्ही अनंत आहात. तुम्ही
कोणतीही गोष्ट करू शकता.

*****

जोखीम उचलायला घाबरू नका
जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल
आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना
मार्गदर्शन कराल.

*****

जेव्हा तुम्ही व्यस्त असता
बिझी असता तेव्हा सगळे
सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही
आळशी असता तेव्हा काहीच
सोपे वाटत नाही.

*****

अनुभव हा आपला
सर्वोत्तम शिक्षक आहे.
जो पर्यंत जीवन आहे
तो पर्यंत शिकत राहा.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb अनुभव

मोठ्या योजनांना पूर्ण करण्यासाठी
कधीच मोठी उडी घेऊ नका.
हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर
पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.

*****

ज्या दिवशी तुमच्या समोर कोणतीही
समस्या नसेल, तेव्हा समजुन जा की
तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.

*****

Swami Vivekananda Marathi Suvichar 

कोणाचीही निंदा करू नका
जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी
हात पुढे करू शकत असाल तर
नक्की करा. जर ते शक्य नसेल
तर हात जोडा आणि त्यांना
आशीर्वाद द्या आणि त्यांना
त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

*****

एका वेळेस एकच काम करा
ते करतांना त्यामध्ये स्वतःची
पूर्ण आत्मा टाका आणि बाकी
सर्व विसरून जा.

*****

जसा तुम्ही विचार करता
तुम्ही तसेच बनता.
स्वतःला कमजोर मानाल तर
कमजोर बनाल आणि स्वतःला
सक्षम मानाल तर सक्षम बनाल.

*****

स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा
लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या
एक दिवस हीच लोक तुमचे
गुणगान करतील.

*****

जी लोक नशीबावर विश्वास ठेवतात
ती लोक भित्री असतात. जे स्वतःचे
भविष्य स्वतः घडवतात तेच खरे
कणखर असतात.

*****

महान कार्यासाठी नेहमी
महान त्याग करावा लागतो.

*****

सत्यासाठी काहीही सोडून द्यावे
पण कोणासाठीही सत्य सोडू नये.

*****

उठा, जागे व्हा, ध्येय
पूर्ण होईपर्यंत थांबू नका.

*****

 

संघर्ष करणे जितके कठीण असेल
तितकेच तुमचे यश शानदार असेल.

*****

स्वामी विवेकानंद सुविचार

स्वतःला कमजोर समजणे
हे सर्वात मोठे पाप आहे.

*****

एक रस्ता निवडा
त्यावर विचार करा
त्या विचाराला आपले
जीवन बनवा.
यशाचा हाच मार्ग आहे.

*****

जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात
तुमची निंदा करतात तेव्हा त्यांना
आशीर्वाद द्या. असा विचार करा की
ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट
काढून तुमची मदत करत आहेत.

*****

मन आणि मेंदू च्या युद्धात
नेहमी मनाचे ऐका.

*****

परमेश्वर नेहमी कृपाळू असतो.
जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने
त्यांची मदत मागतो त्याला
ती निश्चितपणे मिळत असते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - परमेश्वर

स्वतंत्र होण्याचे धाडस करा
जिथपर्यंत तुमचे विचार जात
आहेत तिथपर्यंत जाण्याचे
धाडस करा. आणि ते तुमच्या
रोजच्या जगण्यातही आणण्याचे
धाडस करा.

*****

ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे
हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात
ठेवुन म्हणत आहोत की समोर काळोख आहे.

*****

चिंतन करा चिंता नाही
नव्या विचारांना जन्म द्या.

*****

मनुष्य सेवा हीच
खरी देवाची सेवा आहे.

*****

धन्य आहेत ते लोक जे
दुसऱ्यांच्या सेवेसाठी
आपले आयुष्य खर्च करतात.

*****

जर तुम्ही मला पसंत करत असाल
तर मी तुमच्या हृदयात आहे
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल
तर मी तुमच्या मनात आहे.

*****

स्वतःच्या विकास हा तुम्हाला
स्वतःहूनच करावा लागेल
ना कोणी तुम्हाला तो शिकवतो
ना कोणतेही आध्यात्म तुम्हाला
घडवू शकतो.
कुणीही दुसरे शिक्षक नाही
उलट तुमचा आत्मा शिक्षक आहे.

*****

जर आपण परमेश्वराला आपल्या
हृदयात आणि प्रत्येक जिवंत
प्राण्यात पाहू शकत नाही
तर आपण त्याला कुठेच
शोधू शकत नाही.

*****

आपले कर्तव्य आहे की
आपले उच्च विचार इतरांच्या
जीवनातील संघर्षासाठी
प्रेरणादायी ठरतील. आणि
सोबतच आदर्शाला जितके
शक्य आहे तितके सत्य
ठेवण्याच्या प्रयत्न करा.

*****

वारंवार देवाचे नाव घेतल्याने
कोणी धार्मिक होत नाही.
जी व्यक्ती सत्य कर्म करते
ती धार्मिक असते.

*****

आपण तेच आहोत जे आपल्या
विचारांनी आपल्याला बनवले आहे.
त्यामुळे तुम्ही काय विचार करता
याची काळजी घ्या.
शब्द राहत नाहीत विचार राहतात
आणि विचार दूरपर्यंत प्रवास करतात.

*****

मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये या विचारांचा
नक्कीच आपण विचार करावा. आणि जर आपण
विचार केला, तर मित्रांनो नक्कीच आपले आयुष्य
बदलायला मदत होईल अशा माझा विश्वास आहे.

दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही
आपल्याला जबरदस्तीने काही
करावयास भाग पडेल अशी
कोणतीही गोष्ट या जगात नाही.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - दैव
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

मोठ्या योजनांना पूर्ण करण्यासाठी
कधीच मोठी उडी घेऊ नका. हळूहळू
सुरुवात करा. पाय जमिनीवर कायम
ठेवा आणि पुढे चालत राहा.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb -छान विचार
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

भयातून दुःख निर्माण होते
भयापोटी मृत्यू येतो आणि
भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - भय

द्वेष, कपट वृत्तीचा त्याग करा.
व संघटित होऊन इतरांची सेवा
करायला शिका.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - सुंदर विचार

आयुष्यात कधीही कोणाचाही
विश्वास तोडू नका. म्हणजे
अगदी स्वतःच्या ही…. कारण
दुसऱ्याचा गमावलेला विश्वास
कदाचित तुम्ही परत मिळवू शकाल…
पण स्वतःचा गमावलेला विश्वास
परत मिळवणे खूप कठीण असते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - विश्वास सुविचार

पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि
प्रतिष्ठित माणसाकडे आदराने
पाहू नका. जगातील सर्व महान
आणि प्रचंड कामे गरिबांनी केली
आहे. आणि चांगल्या कामाची
सुरुवात गरीबां कडूनच होते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb -पैसा-श्रीमंत
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याच्या
सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या
सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - happy thoughts

आस्तिका पेक्षाही एकवेळ नास्तिक
परवडले कारण नास्तिकाकडे
स्वतःच्या आणि स्वतंत्र असा
तर्क तरी असतो. पण आस्तिकला
आपण आस्तिक आहोत याचे एकही
समाधानकारक उत्तर देता येत नाही.

*******

दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही
स्वतःची सावली कधीच बनवू
शकत नाही. त्यासाठी एकट्याला
उन्हात उभे रहावे लागते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb -सावली
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

असे कधीही म्हणू नका की
मी करू शकत नाही. तुम्ही
कोणतीही गोष्ट करू शकता
कारण तुम्ही अनंत आहात.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - सुंदर सुविचार
Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद सुविचार

जीवनात एक ध्येय ठरवा
त्याबद्दल विचार करा.
स्वप्न पहा, ते ध्येय जगा.
आपल्या मेंदूत, स्नायूत, नसा-नसात
शरीराच्या प्रत्येक भाग त्या ध्येयाच्या
विचारात बुडवून राहू द्या. आणि उर्वरित
विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी
होण्याच्या सर्वात प्रभावी मार्ग आहे.

*******

चिंता नाही चिंतन करा आणि
नव्या विचारांना जन्म द्या.
जसा तुम्ही विचार कराल
तसेच तुम्ही बनाल.
तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजाल
तर दुर्बळच बनाल आणि जर
सामर्थ्यशाली समजाल तर
सामर्थ्यशालीच बनाल.

*******

जोखीम उचलण्याची भीती बाळगू
नका. जर तुम्ही जिंकलात तर
तुम्ही नेतृत्व कराल. आणि जर
तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना
मार्गदर्शन करू शकाल.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - जोखीम

मनाची शक्ती सूर्याच्या
किरणांसारखी आहे.
जेव्हा सक्ती केंद्रित होते
तेव्हा ती प्रखरतेने चमकते.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - मनाची शक्ति

उठा जागे व्हा आणि तो पर्यंत
थांबू नका… जो पर्यंत तुमचे
ध्येय पूर्ण होत नाही.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - उठा जागे व्हा

स्वतःला कमकुवत समजणे
हे सर्वात मोठे पाप आहे.

*******

ब्रम्हांडामधिल सर्व शक्ती आपल्याच
आहेत. पण ते आपणच आहोत जे
आपल्या डोळ्यासमोर हात ठेवतो
आणि किती अंधार आहे म्हणून रडत
बसतो.

*******

अगदी सरळमार्गी असणे हे ही
एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या
दुर्बलतेचे कारण बनते.

*******

आपले मन आपल्या लाडक्या
मुला प्रमाणे असते. ज्याप्रमाणे
लाडकी मुले नेहमी असंतुष्ट
असतात… त्याप्रमाणे आपले
मन नेहमी अत्रुप्त असते.
म्हणूनच मनाचे लाड कमी
करा आणि त्याला सतत
लगाम घाला.

*******

आपल्याला अनंत शक्ती….
अतिशय उत्साह, अपार साहस
आणि धीर पाहिजे तरच
आपल्याकडून महान कार्ये होतील.

*******

तारुण्याच्या जोम अंगी आहे
तोवरच कोणतीही गोष्ट शक्य
होईल कामाला लागण्याची
अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

*******

कोणताही कार्य अडथळा वाचून
पार पडत नाही. जे शेवटपर्यंत
प्रयत्न करीत राहतात.
त्यांनाच यश प्राप्त होतो.

*******

जग तिरस्कार करो किंवा निंदा
माणसाने या गोष्टीच्या विचार
न करता आपले काम करत
राहिले पाहिजे.
कोणाचीही निंदा करू नका
जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी
हात पुढे करू शकत असाल तर
नक्की करा. जर ते शक्य नसेल
तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद
द्या. आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

*******

स्वतःचा विकास करा
ध्यानात ठेवा, गती आणि
वाढ हीच जिवंतपणाची
लक्षणे आहेत.

Swami Vivekananda Marathi Suvichar - स्वामी विवेकानंद सुविचार - vb - विश्वास सुविचार - विकास

तर मित्रांनो युवकांचे प्रेरणास्थान असलेले महापुरुष स्वामी विवेकानंद
यांच्या विचारांचा हा विडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर विडिओ ला
लाईक करा. हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटच्या माध्यमातून
नक्की कळवा. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला विचार
नक्की कळवा.

अशाच प्रेरणादायी विचारांसाठी Blog सबस्क्राईब करा.

हे ही वाचायला आवडेल

#suvichar marathi | सुंदर सोपे लहान प्रेरणादायक सुविचार

75+ Best Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here