15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्या [ ध्वजारोहण ] मधला फरक

0
440
red-fort-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस
red-fort-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला
झेंडा फडकविण्या [ ध्वजारोहण ] मधला फरक

नमस्कार मित्रांनो…. VB Good Thoughts या संकेतस्थळावर
आपले मनापासून स्वागत आहे.

काल रस्त्यावर शालेय मुलांना बोलतांना बघितले. त्यांची आपसातील
झेंडा फडकावण्यावरून चर्चा सुरु होती.

मी थोडा वेळ थांबून त्यांचे बोलणे ऐकत राहिलो आणि त्यांच्या चर्चेत मी सहभागी
झालो आणि कळले की ते ट्युसन करून येत होते. आणि बोलता बोलता सहज
त्यांचा 15 ऑगस्ट चा विषय निघाला आणि त्यांची चर्चा रंगली.

काही मिनिटे त्यांच्या सोबत बोलून त्यांचा समाधान केले. आणि सगळ्यांना
एक – एक चॉकलेट देऊ मी निरोप घेतला.

घरी आल्यावर वाटले की जी मला थोडीशी माहिती आहे.. ही माहिती
आपल्या सोबतही शेयर करावीसी वाटली.

तर मग चला…. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्या
[ ध्वजारोहण ] मधला फरक जाणून घेऊया.

15 ऑगस्ट ला आपला देश स्वतंत्र झाला आणि ब्रिटीश झेंडा खाली उतरवून
आपला भारतीय ध्वज वर करून फडकविण्यात आला. आमचा राष्ट्रीय ध्वज
तिरंगा आमच्या अभिमान आणि गौरव चा प्रतीक आहे.

दर वर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविला जातो. 15 ऑगस्ट
आणि 26 जानेवारी आपले खूप महत्वाचे राष्ट्रीय उत्सव आहेत. या दिवशी
प्रत्येक भारतीय एक विशेष अभिमान बाळगत असतो.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविला जातो. परंतु 15 ऑगस्ट
आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्यात थोडा अंतर असतो.

ध्वजारोहण ( Flag Hoisting ) आणि
झेंडा फडकविणे ( Flag Unfurling )

15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी आपला
राष्ट्रीय ध्वज तिरंगा वर ओढून नंतर फडकविला जातो. याला ध्वजारोहण
असे म्हणतात.
तसेच 26 जानेवारी ला आपला प्रजासत्ताक दिवस [ गणतंत्र दिवस ] असतो.

या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज वर बांधलेला असतो. त्याला उघडून फडकाविला जातो.
याला झेंडा फडकविणे असे म्हणतात. इंग्रजीत ध्वजारोहण करीता Flag Hoisting
आणि झंडा फडकविण्यासाठी Flag Unfurling या शब्दाचा वापर केला जातो.

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपति

15 ऑगस्ट ला आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात
देशाचे प्रधानमंत्री असतात.

या प्रसंगी फक्त देशाचे प्रधानमंत्रीच ध्वजारोहण करतात.
प्रधानमंत्री हे राजनीती प्रमुख असतात.

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

26 जानेवारी ला आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपति
झेंडा फडकवितात. राष्ट्रपती हे घटनेचे [ संवैधानिक ] प्रमुख असतात.

flag-nation-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस

लाल किला आणि राजपथ

15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस समारोहाचे आयोजन लाल किल्यावरच केला जातो.
या ठिकाणी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. आणि या प्रसंगी ते पूर्ण
देशाला संबोधित करतात.

तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस [ गणतंत्र दिवस ] च्या मुख्य कार्यक्रमाचे
आयोजन हे राजपथ वर होतो. आणि या दिवशी आपले राष्ट्रपती झेंडा
फडकावितात.

26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा का फडकवितात….?

आपला देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला होता. स्वतंत्र देशाचा संविधान
26 जानेवारी 1950 पासून लागू झाला. आणि राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख असतात.

या पूर्वी देशाचा संविधान नव्हता. आणि राष्ट्रपती हि नव्हते. यामुळेच दरवर्षी
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस खूप जोरात साजरा केला जातो. आणि
या दिवशी देशाचे राष्ट्रपती झेंडा फडकवितात.

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपति यांचे देशाला संबोधन

15 ऑगस्ट ला प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत
असतात. तर या अगोदर संध्याकाळी म्हणजे 14 ऑगस्ट ला संध्याकाळी
राष्ट्रपति देशाला संबोधित करतात. गणतंत्र दिवस [ प्रजासत्ताक ] या दिवशी
कुणाचेही संबोधन होत नाही.

उत्सव मध्ये बदल

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे देशाच्या इतिहासातील खूपच महत्त्वपूर्ण दिवस
आहेत. या दोन्ही दिवशी खूप उत्साहाने देशाची राजधानी दिल्ली मध्ये सरकारी
स्थरावर सार्वजनिक समारोह [ उत्सव ] आयोजित केले जातात.

तसेच देशात इतर ठिकाणी आणि सगळ्या राज्यात या प्रसंगी भरपूर कार्यक्रम
आयोजित होत असतात. असे असूनही या कार्यक्रमात काही मूलभूत फरक
असतात.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ला परेड चे आयोजन होत नाही. तर 26 जानेवारीला
सैनिक, अर्धसैनिक बल, इत्यादींची खूप लांब परेड होत असते. यामध्ये खूप
मनोहारी झांकी… आणि भरपूर रंगारंग कार्यक्रम होतात.

प्रजासत्ताक दिवस समारोहाच्या माध्यमातून देश आपल्या जल, थल आणि
नभ मध्ये आपली सैन्य शक्ती आणि आपल्या संस्कृतिच्या झलक चे प्रदर्शन
करीत असतो.

प्रमुख पाहुणे

15 ऑगस्ट च्या कार्यक्रमात, या कार्यक्रमाचे चे प्रमुक पाहुणे म्हणून बाहेरच्या
कुणी प्रमुख पाहुण्याला प्रमुखपदासाठी पाहुणा म्हणून बोलविण्याची परंपरा
नाही आहे. पण 26 जानेवारीला समारोहात कोणत्या ना कोणत्या राष्ट्राध्यक्षाला
प्रमुखपदी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले जाते.

सामान्य माणसाला 26 जानेवारी 2002 च्या अगोदर फक्त स्वतंत्रता दिवस
आणि प्रजासत्ताक दिवस या दोनच दिवसाला झेंडा फडकविण्याचे स्वातंत्र्य
होते. किंवा परवानगी होती. पण 26 जानेवारी 2002 ला भारतीय राष्ट्र ध्वज
संहिता [ इंडियन फ्लैग कोड ] मध्ये संशोधन केले गेले.

या संसोधना नंतर प्रत्येक भारतीयाला अधिकार मिळाले कि तो कोणत्याही
दिवशी ध्वजारोहण करू शकतो.
[ झेंडा फडकवू शकतो. / झेंडा वंदन करू शकतो. ]

या संशोधना नंतर जरी प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहणा ची परवानगी
मिळाली…. तरीपण ध्वजारोहणासाठी काही नियम हि बनविले गेले.

आता बघूया ध्वजारोहण चे काय नियम आहेत.

तिरंगा ध्वजारोहण चे नियम

1] ध्वज संहितेनुसार तिरंगा ध्वज [ झेंडा ] हा हाताने विणलेल्या
सिल्क…. लोकर…. सूत…. अथवा खादीपासून तयार केलेला असावा.
ध्वज [ झेंडा ] हा आयताकार असायला पाहिजे.
ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असेच असावे. कधीही
केशरी रंग खालच्या बाजूला ठेवून झेंडा लाऊ अथवा फडकवू नये.

2] सूर्योदया पासून तर सूर्यास्ता दरम्यान तिरंगा ध्वजारोहण करता येतो.
ध्वजाला कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून
फडकवू नये.

काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील
तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

3] ध्वजाला कधीही पाण्यात बुडवू नये. ध्वजाचे कसल्याही प्रकारचे नुकसान
करू नये. ध्वजा चा कोणताही भाग जळलेला असल्यास किंवा ध्वजाबद्दल
अपमानास्पद टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास अथवा दंड अथवा
दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

4] ध्वजाचा व्यावसायिक वापर करू शकत नाही. जर ध्वजाचा कुणी
गैरवापर करीत असेल…. ध्वजाला कुणी साधा कापड समजून वापर करीत
असेल…. अथवा ध्वजाने मृतदेह गुंडाळत असेल [ शहीद जवान सोडून ]
तर तो भारतीय ध्वज [ तिरंगा ] याचा अपमान समजला जातो.

5] ध्वजा चा गणवेश म्हणून वापर करू नये. एखादी व्यक्ती जर कमरेच्या
खालील वस्त्रासाठी ध्वजाचा कापड म्हणून उपयोग करीत असेल तर…
तो ध्वजाचा अपमान आहे. ध्वजाचा रुमाल अथवा उशीसाठीही वापर
करता येणार नाही.

6] ध्वजा वर कुठल्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी अथवा
राष्ट्रीय दिवश जसे प्रजासत्ताक दिन [ गणतंत्र दिवश ] आणि स्वातंत्र्य दिनाला
ध्वज फडकविण्या अगोदर त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.

7] कार्यक्रम…. सभारंभ…. काहीही असो. व्यासपीठावरील टेबलाला झाकण्यासाठी
किंवा त्या मंचाची सजावट करण्यासाठी ध्वज वापर करू नये.

तसेच गाडी…. रेल्वे…. अथवा विमानाचे छत किंवा दुसरा कुठलाही भाग
झाकण्यासाठी ध्वजाचा वापर मुळीच करता येणार नाही.
इमारतीत…. घरी…. कुठेही ध्वजा चा पडदा म्हणून उपयोग करण्यास
सक्त मनाई आहे.

8] फडकविलेला ध्वज त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला….
मळलेला…. किंवा चुरगळलेला ध्वज फडकवू नये. जर ध्वज फाटला वा
मळला तर एकांतात सन्मानाने पूर्णतः नष्ट करावे.

9] जर ध्वज एखाद्या मंचावर फडकवला असल्यास….. वक्ता भाषण करीत
असतांना ध्वज हे वक्त्याच्या उजव्या वाजूला असणे आवश्यक आहे.

10] दुसरे कोणतेही पताका वा झेंडा आपल्या राष्ट्रध्वजापेक्षा उंच अथवा
ध्वजावर… वा ध्वजा बरोबर लावू नये.

आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा देशाच्या अस्मितेचा प्रतीक आहे. कुठेही आपल्या
तिरंग्याचा अपमान होऊ देऊ नये. हा आमचा कर्तव्य आहे.

जय हिंद – वंदेमातरम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here