सुंदर विचार – मराठी प्रेरणादायी सुविचार –
Good Thoughts In Marathi
![]() |
कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो…
ती संपल्यावर शेवटी निव्वळ
राखच उरलेली असते.
त्या राखेला पुन्हा कधीही
सुगंध येत नाही.
त्याचप्रमाणे मानव शरीरात
जो पर्यंत जीव आहे…
तो पर्यंतच मस्त जगा…
कारण जीवन खूप सुंदर आहे…
त्याला अधिक सुंदर बनवा.
सुंदर विचार – मराठी प्रेरणादायी सुविचार –
Good Thoughts In Marathi
भूक लागली तर…
भाकरी च्या जागी
पैशाला खाता येत नाही….
आणि पैसा भरपूर आहे म्हणून…
भुके पेक्षाही अधिकचे
अन्न खाताही येणार नाही…
म्हणजेच आयुष्यात पैशाला
ठराविक सीमे पर्यंतच जागा आहे….
पैशाच्या गादित झोपणाऱ्या माणसांपेक्षा…
जीवनभर प्रामाणिक राहून कमाविलेली
सोन्यासारखी माणसे हिच खरी श्रीमंती आहे.