सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life – Suvichar

0
825
सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-life-quote-marathi-सुविचार-मराठी-जीवन-विचार-फोटो-सुविचार-प्रेम-love
सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar

सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life
Suvichar

 

सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar-ashru-shakti-nastech-image-suvichar

 

अश्रू हे कितीही प्रामाणिक असले
तरीही त्यांच्यात
भूतकाळ परत आणण्याची शक्ती नसतेच…

 

सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-life-quote-marathi-सुविचार-मराठी-जीवन-विचार-फोटो-सुविचार-प्रेम-love

 

आपल्या जीवनात एक पत्र असेही असावे की…
जिथे तुझ्या आणि माझ्या प्रेमाची साठवण असावी…
आपल्या भावनांची अभिव्यक्ती असावी… 
आणि आपल्या प्रेमाची कबुलीही असावी…

 

मनातले सगळे काही सांगण्यासाठी 
समोर मना सारखा माणुस असावा लागतो…
फक्त एवढे असूनही चालत नाही… 
तर त्या माणसाला हि मन असावे लागते…
 

 

सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-life-quote-marathi-सुविचार-मराठी-जीवन-विचार-फोटो-सुविचार


सर्व काही सोडूनी आता स्वतःसाठीच जगायचे आहे…
आपल्या अर्धवट राहिलेल्या स्वप्ननांना आता पूर्ण करायचे आहे…
जीवनाचा प्रत्येक क्षण आता सुखाने घालवायचा आहे…
उरलेले जीवन आता प्रत्येक रंगात रंगवायचे आहे…
प्रत्येक रंगात रंगुनी आता मनसोक्त जगायचे आहे…

जेव्हा चणे गुळा च्या सोबत असतात…
तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात…!
आणि जेव्हा चणे हे दारू च्या सोबत असतात…
तेव्हा त्याला चकना म्हणतात…!
शेवटी संगतच महत्त्वाची….
आपल्याला वाया घालविणारे नाही…
तर आपल्याला घडविणारे मित्र शोधले पाहिजे…!

झिजून गेलात तरी चालेल… 
पण गंजून जायला नको…!

लांब धागा आणि लांब जीभ
फक्त अडचणीच निर्माण करतात…
म्हणून धाग्याला गुंडाळून
आणि जिभेला सांभाळून ठेवलेच पाहिजे…!
 

 

Best Marathi Suvichar With Images
सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life

मित्रांनो…
सांगा तर खालील तीन पैकी कोण अधिक चांगली व्यक्ति आहे…
असे आपल्याला वाटते….?

साहेब अ ] – या साहेबाची गलिच्छ राजकारण्यांशी चांगली मित्रता होती.
ज्योतिषावर ही चांगला विश्वास होता. याला दोन‌ बायका होत्या.
चेनस्मोकर होता… दिवसातून आठ ते दहा वेळा पिणे असायचेच…..

साहेब ब ] – दोन वेळा ऑफिसातून लाथ मारून बाहेर हाकलेले…
रात्रीला उशीरापर्यंत झोपायचा… शिकत असतांना अफूचे व्यसन होते.
दररोज संध्याकाळी व्हिस्की प्यायचा.

साहेब क ] – युध्दाचा नायक होता…. या साहेबाला कुठलेही वाईट
व्यसन नव्हतेच. पूर्णतः शाकाहारी होता. बायकोशी एकनिष्ठ होता
आणि त्याचा पेंटीगचा व्यवसाय होता.

मला वाटते तुमचे उत्तर नक्कीच [ साहेब क ] असेल
बरोबर ना मित्रांनो….? पण
साहेब अ ] – हा फ्रँकलिन रुझवेल्ट होता ( अमेरिकेचा ३२ वा अध्यक्ष )
साहेब ब ] – हा विस्टन चर्चिल होता ( ब्रिटनचा माजी पंतप्रधान )
साहेब क ] – हा अडाल्फ हिटलर होता.

marathi-status-on-life-जीवनावर-आधारित-मराठी-प्रेरणादायक-सुंदर-विचार

हे जरी तुम्हाला चमत्कारिक वाटत असले तरी ही हे सत्य आहे.
एखाद्याच्या सवयी नुसार त्याच्या आयुष्याच्या प्रवासाचा अंदाज
घेणे चुकीचे आहे.

चारित्र्य हे असेच चमत्कारिक आणि गुंतागुंतीचे असते.
त्यामुळेच… आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
महत्वाची आहे. हे समजुन त्याचा स्विकार केलाच पाहिजे….!

उकळते पाणी अंड्याला टणक बनविते आणि
तेच उकळते पाणी बटाट्याला मऊ करते.

तनावपुर्ण वातावरणात आपण त्या तणावाचा कसा प्रतिकार
करतो हे प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वभावावर अवलंबुन आहे.
आयुष्य विचित्र आहे…‌ आपण फक्त प्रवासाचा आनंद लुटावा….
बस्स….

सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

एखाद्या वाहत्या नदी सारखाच हा वेळ असतो.
ज्या प्रकारे एक वेळा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही परत स्पर्श करू शकत नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीच परत येत नाही.

अगदी तसेच वेळेचेही असते…
एक वेळा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीही परत येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा
भरपूर आनंद लुटा.
🥀💞

suvichar-status-marathi-with-image

जीवन म्हणजे काय…..?
जरी गेलेला काळ हा दु:खात गेला…
तरी पण येणारी सकाळी
ही सुखाचीच असणार….
या आशेवर जगणे
म्हणजे जीवन आहे…!
🥀💞

जीवन म्हणजे काय-marathi-suvichar

आपल्याकडे काय आहे
अथवा आपण कोण आहोत…
यावर सुख हे कधीच अवलंबून नसते.
तर आपल्या मनात कोणते विचार
चालू आहेत….
यावर आपले सुख अवलंबून असते.
🥀💞

मराठी-स्टेट्स-फोटो-सुविचार-सुख

जिथे मनातले सगळे काही
रिकामे करता येईल
अशी हक्काची व्यक्ती
जीवनात एक तरी असावीच…..!
🥀💞

मराठी-स्टेट्स-फोटो-सुविचार-vb-good-thoughts-सुंदर-विचार-जीवनात-आयुष्यात

आठवणी या
मेणासारख्या असतात…
जरीही वितळल्या
तरीही मागे राहतातच
चटके देत.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts-naati

हृदयात गोडपणा ठेवण्यासाठी
बस एकच अट आहे….
वापर हृदयाचा करा…
डोक्याचा नाही…!
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts-फोटो

दाटून आलेली प्रत्येक गोष्ट
सुंदर असते….
मग ते आभाळ असो की मन….!
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts

अप्रतिम वाक्य…

काही व्यक्तींचे जीवनातील स्थान हे
एखाद्या हातातल्या दोऱ्या प्रमाणे असते….
ते दिसणे महत्त्वाचे नसते…
तर असणे महत्त्वाचे असते.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts

सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

ज्यावेळी घर शेणाने सारवली जात होती
त्यावेळी घरात आपुलकीची ऊब असायची.
आता मात्र घरातल्या फरशी सारखी
माणसे ही थंडीगार पडलेली आहेत.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार

जीवन बदलण्यासाठी
वेळ सर्वांना मिळते….
परंतु वेळ बदलण्यासाठी
जीवन पुन्हा मिळत नाही.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts-life-quotes

जोवर श्वास घेतोय…
तोवर जगून घ्यावे छान
झाडालाही माहित नसते
कोणते पडेल पान.
🥀💞

सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life Suvichar

दगड पाण्यात फक्त भिजतो
आणि
माती निरागसपणे विरघळते.
भिजणे आणि विरघळण्यातला
फरक कडला की सगळी नाती
गुळगुळीत होतील.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-नाती-सुविचार

स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा.
कारण…
इतिहास कॉपी करणाऱ्यांची
नोंद ठेवत नाही.
🥀💞

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts

जगात प्रत्येक वस्तू
महाग आहे
भेटण्या आधी आणि
गमावल्यानंतर…
                                                              🥀💞
marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts-suvichar

भगवंतावर सर्वांचेच प्रेम आहे… परंतु
भगवंताच्या घरी जायची घाई मात्र
कुणालाही नाहीच.

आपल्या घरात भगवंत सर्वांनाच पाहिजे
आहे. परंतु… भगवंताच्या घरी आपण
जायच्या विचारानेही मात्र आपल्या
मनात धडकी भरते.

भगवंत आपल्या घरी आले म्हणजे
सण उत्सव आणि आनंद….! परंतु
जर आपण भगवंताच्या घरी गेलो…
म्हणजे दुःख… शोक…..!
भगवंत आपल्या घरी यावे म्हणून
आटापिटाच
परंतु आपण भगवंताच्या घरी जाऊ नये…
म्हणून ही आटापिटाच.

भगवंताच्या घरून येणे म्हणजे… जन्म….!
भगवंताच्या घरी जाणे म्हणजे… मृत्यू….!
दोन्ही अटळ आहेत. परंतु
या दोघांमधील ची गंमत आहे ना…
यालाच तर जीवन असे नाव आहे.
🥀💞
जग कसे अजब आहे….!

marathi-status-suvichar-sunder-vichar-छान-विचार-vb-good-thoughts-भगवंत-ईश्वर

कधी क्षमा करावी लागते आणि
कधी क्षमा मागावी सुद्धा लागते.
नाते टिकवायचे म्हटल्यावर….
कधी पुढाकार तर कधी माघारही
घ्यावी लागते…..
🥀💞

सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

अर्थहीन वाद – विवादा पेक्षा
अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते…!
🥀💞

माणसाला आधी जगता आले पाहिजे…
मरता तर केव्हा ही येते.
🥀💞

रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी
या अधिक चांगल्या असतात.
म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा
बोलून मोकळे होता आले पाहिजे.
🥀💞

धावत्या जगात माज कसला करता साहेब
जसे आपण जन्माला आलो तसेच….
एक ना एक दिवस आपल्याला जायचेच आहे.
🥀💞

जेव्हा जीवन हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि
जेव्हा जीवन रडवेल तेव्हा समजा
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
🥀💞

डोळे तर जन्मताच मिळालेले असतात
परंतु कमवायची असते ती नजर….!
चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले
ओळखायची.
🥀💞

जीवानात कधीच कुणावर बोलण्यासाठी
जबरदस्ती करू नका आणि ज्या व्यक्तीला
आपल्याशी मनापासून बोलावेसे वाटते
त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका.
🥀💞

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले…
त्याकरिता त्यांना दोष देऊ नका.
स्वतःला दोष द्या. कारण तुम्ही
त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.
🥀💞

सगळे दुःख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे.
मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील.
🥀💞
जग तर फक्त अनुभव देते….
साथ तर फक्त आपली माणसेच देतात.
🥀💞

आपण ज्या माणसाचा टेन्शन घेऊन
आपल्या आयुष्यात खूप खचून जातो ना…
तीच माणसे आपले आयुष्य अगदी सुखात जगत असतात…!
🥀💞

आपल्या घरापेक्षा घराचा दरवाजा लहान असतो.
दरवाज्या पेक्षा कुलूप लहान असतो.
कुलूपा पेक्षा कुलुपाची चावी लहान असते.
परंतु या लहान चावीनेच पूर्ण घर उघडल्या जाते.
तसेच लहान लहान विचार तुमच्या आयुष्यात
खूप मोठा बदल घडवण्यासाठी सक्षम असतात…
🥀💞

सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here