Birthday Wishes For Brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
53
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो, आपला भाऊ आपल्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो…
भावाभावांचे नाते किंवा बहीण भावाचे नाते हे खूपच गोड असते. त्यांच्यामध्ये
लहान सहान भांडणे होतच असतात, पण माहीत दोघांनाही असते की…
आम्ही भावंडे एकमेकांवर खूप प्रेम करतो. हा हि गोष्ट वेगळी आहे कि…
आम्ही आपले एकमेकांवरचा प्रेम दाखवत नाही.

मित्रांनो, आयुष्यात काही प्रसंग येतात ज्या वेळी आपल्या प्रेमाचे पाझरे फुटतात
त्याच प्रसंगातून एक प्रसंग म्हणजे आपल्या भावाचा वाढदिवस.
या प्रसंगाला… वेळेला आणखी सुंदर बनविण्यासाठी…. आपल्या प्रेमाची अमीट
छाप सोडण्यासाठी… सुंदर अश्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहे.

या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी सुंदर, मनाला भिडतील अश्या भावाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. मग भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असो
किंवा लहान असो Birthday Wishes For Brother In Marathi या शुभेच्छा
तुमचे नाते आणखीन घट्ट बनवेल. भावा भावा मधील प्रेम वाढेल.
तर मग चला आपल्या लाडक्या भावाला सुंदर, प्रेमळ शुभेच्छा द्या.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या प्रिय व्यक्तींचा वाढदिवस म्हटल्यावर आपण आवर्जून शुभेच्छा देतोच.
मग बाबांसाठी वाढदिवस शुभेच्छा असो, आईसाठी वाढदिवस शुभेच्छा असो
अथवा त्यातही जर लाडक्या भावाचा वाढदिवस असेल तर शुभेच्छा रूपी प्रेमाचा
वर्षाव करावासा वाटतो नाही का. मग तुमच्या भावासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा
(Birthday Wishes For Brother In Marathi)

Birthday Wishes For Brother in Marathi  भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी
तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची
नवी सुरूवात ठरो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक
प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ
आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला माहित आहे का आज मला काय वाटत आहे
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.

देवाने मला तुझ्यासारखा भाऊ दिल्याबद्दल
मी त्याची सदैव कृतज्ञ आहे. या संपूर्ण
जगातील सर्वोत्तम भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
हॅपी बर्थडे भावा…!

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

मी स्वतःला खूप भाग्यवान
व्यक्ती समजतो. कारण….
मला माझ्या भावामध्ये
एक चांगला मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
ज्याच्याशी मी मनातील
सर्व काही शेअर करू शकते,
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

तुझ्यासारख्या भाऊ असणे
ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला
असतोस. खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस
मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.

ईश्वर तुझ्यावर प्रेमाचा…..
आनंदाचा….. भरभरून वर्षाव
करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय बंधूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझे संपूर्ण आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणिसूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा…..!

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.

मला आनंद आहे की तुझ्या रूपात
मला एक अशी व्यक्ती मिळाली आहे
जिच्याशी मी जशी आहे तशी वागू शकते.
त्याच्यापुढे मला कोणताही मुखवटा
घालावा लागत नाही. ज्याला मी जशी आहे
तशीच आवडते. माझ्या प्रिय छोट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्
तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

भाऊ म्हणजे मित्र, भाऊ म्हणजे पाठीराखा…..!
कधी तो मित्र बनून आपले आयुष्य सुंदर बनवतो
तर कधी वडिलांच्या मायेने काळजी घेतो.
कधी आईच्या मायेने जखमेवर फुंकर घालतो….
तर कधी आजोबांसारखा मोलाचा सल्ला देतो.
भाऊ असणे ही एक देवाने दिलेली सुंदर भेट आहे.
भाऊ आपल्यापेक्षा लहान… असो की मोठा…..
त्याच्या नुसत्या असण्यानेच आयुष्याला किती
आधार वाटतो…..!

अशा लाडक्या भावाचा वाढदिवस हा खास दिवस असतो.
मग आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी संदेश (Birthday Wishes For Brother In Marathi)
पाठवून द्यायलाच हव्या. तुम्हाला वरीलपैकी काही शुभेच्छा
संदेश तुमच्या भावासाठी नक्कीच आवडले असतील.
मग वेळ न घालवता पाठवा भावाला वाढदिवसाच्या
मराठी हार्दिक शुभेच्छा
(Happy Birthday Wishes For Brother In Marathi).

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा,
तुम्ही आम्हाला जीवनात अनेक धडे
शिकवले आणि प्रत्येक संकटात
साथ दिली.

तुला आणखी एक वर्ष सहन केल्याबद्दल
माझा आभारी रहा. जस्ट जोकिंग….!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा….!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

तुझे जीवन गोड क्षणांनी,
आनंदी स्मितांनी आणि आनंदी
आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुझ्या आयुष्यात
कधी न आटणारा आनंदाचा
झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.

आमच्या घरातील लाडोबाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी
तुला खूप खूप शुभेच्छा.

आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला
बेस्ट फ्रेंड असतो. माझ्याकडेही आहे
माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचे असेल
तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्रांनो, काहीजणांना साध्या सरळ शुभेच्छा द्यायला
आवडतात, तर काहींना कविता करायला आवडते.
मग तुमच्या भावाला कविता रुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा
संदेश (Birthday Messages For Brother In Marathi) द्या.

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण, आज तुझा वाढदिवस आला
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा
भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप
मोठा आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…!

मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर
मनापासून प्रेम करतो. माझ्या प्रिय भावा…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन
येवो. या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे
हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा….!
हॅपी बर्थडे भावा….!

संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ
संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ.
प्रिय दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

बोलायचे तर खूप काही आहे….
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहू ही शकत
नाही. कधी अभ्यासासाठी दूर जावे
लागले, कधी होता कामाचा बहाणा…
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय
एक दिवसही नाही गेला….!
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर
असते तुझे नाव…. दुसरे कोणी नाही
दादा तूच आहेस आमचा अभिमान…
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान….!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दादा….!

प्रिय दादा,
तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत राहो.
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.
तू नेहमी हसत राहा आणि तुला
कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये.
तूला उत्तुंग यश मिळो… आणि तुझे
माझ्यावर असलेले प्रेम असच टिकून राहो.
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

आनंदाने होवो तुझ्या दिवसाची
सुरूवात तुझ्या आयुष्यात
कधी ना येवो दुःखाची सांज.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!
तुझी अजून पुढची शंभर वर्ष
खूप आनंदात आणि सुखात जावोत
हीच देवाकडे प्रार्थना…..!

येणारे वर्ष तुला आनंदाचे जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि
सुखाचा वर्षाव करो.
हॅपी बर्थडे दादा.

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
तुझ्या कर्तृत्वाची ख्याती
स्नेह आणि जिव्हाळ्याने
वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती.
तुझ्या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा दादा….!

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल. तुला उज्वल भविष्यासाठी
आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…!

मी एकटा होतो या जगात,
पण सोबतीला तू आलास आणि
माझे आयुष्यच बदलून गेले…!
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिल्याबद्दल….!
हॅपी बर्थडे भावा.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरे
करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसे असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा…!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला आपुलकीच्या शुभेच्छा…!

जो माझ्यासाठी
एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या
सर्व इच्छा पूर्ण होतात अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर
मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतलेस मला
रुसले कधी तर जवळ घेतलेस मला.
रडवले कधी तर कधी हसवलेस.
पुर्ण केल्या सर्व इच्छा माझ्या
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा…!

तुम्हाला दररोज आनंदी राहण्याची
आणखी कारणे मिळू दे…..!
जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लहानपणीची आपली भांडणे…
मोठेपणी तु मला दिलेला आधार….
आणि आजही मिळणारे तुझे
अमूल्य मार्गदर्शन….. हा माझ्या
आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा दादा.

वर्षात 365 दिवस… महिन्यात 30 दिवस….
हफ्त्यात 7 दिवस…. आणि माझ्या आवडीचा
एकच दिवस…. तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎
वाढदिवस‬.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी
ओली असो वा सुकी असो… पार्टी तर ठरलेली
मग भावा कधी करायची पार्टी…?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!

दूर असलो म्हणून काय झाले…
आजचा दिवस कसा विसरणार…
तू नसलास जवळ तरी तुझी
आठवण सोबत आहे दादा.
आज तुझा वाढदिवस आहे
जणू काही आमच्यासाठी सण आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…..
तुझे आयुष्य असो समृद्ध
सुखांचा होवो वर्षाव असा
असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा

लाखात आहे एक माझा भाऊ
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या भावा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार.
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ
मिळाला. जीवनाच्या सुख-दुःखात साथ
देणारा भाऊ मिळाला.
भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ

माझ्या भावाच्या प्रेमाची
तुलना कोणत्याच गोष्टीशी
केली जाऊ शकत नाही,
लव्ह यु ब्रो.
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

नवा गंध, नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला
माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं
अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार,
समजूतदार भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच
माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस,
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात,
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची
सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

फुलांमध्ये गुलाब आहेस तू…
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू…
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू…
हॅपी बर्थडे भावा.

सुख – दुःखाचे आपले नाते आहे
कधी रूसणे… तर कधी मनवणे आहे.
चल एक गोड केक आणूया….
तुझा वाढदिवस साजरा करूया.
हॅपी बर्थडे भावा.

हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचे कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो.
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Elder Brother In Marathi

मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला
आदर्श असतो. ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो.
जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि
ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या
भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास
वाढदिवसाच्या शुभेच्छा

(Birthday Wishes For Elder Brother In Marathi).

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा
भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात
तू ढाल होऊन उभा राहिलास. थँक्यू दादा माझी
नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या
भावा कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली
तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत
सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड
सगळे काही आहेस. माझा बेस्ट भाऊ
होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी
तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा
मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे
उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हॅपी बर्थडे दादा… येणारे वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस
वाटते की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.

marathi language big brother birthday wishes for brother in marathi

हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील
आयुष्य हे तुम्हाला सुखाचे जावो. भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझे
साकार होवो. हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

Happy Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Younger Brother in Marathi

मित्रांनो, मोठा दादा जसा हक्काचा तसाच छोट्या भावावरही हक्क आपणच
गाजवतो, नाही का, भावा हे कर रे….. ते कर रे म्हणत…. त्याच्याकडून
सगळी काम करून घेतो. आपल्या छोट्या भावाला तुम्हीही नक्कीच तुमच्या
कामाला लावून हैराण करत असाल. पण त्याच्या वाढदिवशी मात्र प्रेमळ
संदेश (Birthday Wishes For Younger Brother in Marathi) करून तो
अविस्मरणीय करा.

लहान भाऊ असल्याचे कर्तव्य नेहमीच निभावलेस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलेस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवले ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नशीबाच्या भरोश्यावर राहायचे नाही हे सांगितलेस
कोणापुढेही झुकायचे नाही हे शिकवलेस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

हॅपी बर्थडे भावा…..
आज तुझा दिवस…..
सगळीकडे आनंद आहे
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझे कर्तव्य
पार पाडले आहे.

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला
तू सक्षम आहेस. छोट्या भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा
समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम…
हॅपी बर्थडे.

तुला हात पकडून चालायला शिकवले
प्रत्येक संकटात लढायला शिकवले
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितले.

परिस्थिती कोणतीही असो.
कोणी नसो माझ्या सोबतीला
पण एकजण नक्कीच असेल सोबत…
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुला कचरापेटीतून उचलेल म्हणून चिडवले…
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त
लाडका आहेस.

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.

भावाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा | Best Birthday Wishes For Brother In Marathi
भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस – Birthday Status For Brother In Marathi
Birthday Status For Brother In Marathi

आता भावाचा वाढदिवस म्हटल्यावर स्टेटस
(Birthday Status For Brother In Marathi)
रखना तो बनता है. मग तुमच्या भावाच्या
वाढदिवसासाठी खास सोशल मीडियावर
शेअर करण्याठी मराठमोळे बर्थडे मेसेजेस.

जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखे
बनू इच्छितो. जो मला दादा म्हणतो…..
तोच माझ्या मनात बसतो.
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पुन्हा तो दिवस आला आहे
आनंदाने नाचू गाऊ या.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊन त्याचा वाढदिवस साजरा करूया.

रोज सकाळ आणि संध्याकाळ….
ओठावर असते तुझे नाव.
भाऊ अजून कोणी नाही तूच आहेस
आमचा अभिमान. ज्याचा करतो आम्ही
मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचे प्रत्येक भांडण, बाबांकडून
ओरडा खाणे असो वा आईच्या हातचे
गोड खाणे असो. पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात
सुख… आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा…!

भांडणं आणि वाद पण आहेत
गरजेचे भेटणे आणि दूर जाणेही
आहे गरजेचे. पण आपण तर एकाच
घरात राहतो. त्यामुळे कशाला चिंता.
हॅपी बर्थडे माझ्या भावा.

वाद झाला तरी चालेल
पण नाद झालाच पाहिजे.
कारण आज दिवसच तसा आहे
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे.
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है.
हॅपी बर्थडे भाऊ.

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा
तुझे हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावे….!
भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

दादा आपणास वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा….!
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो.

भावाला वाढदिवसाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा |
Happy Birthday Wishes For Brother In Marathi |
Birthday Quotes For Brother In Marathi
तुमच्या लाडक्या भाईच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा
(Birthday Quotes For Brother In Marathi)
तर द्याच आणि त्यासोबत कोट्स सुद्धा शेअर करा.

मित्रांनो, जर आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसाला
काय सरळ साध्या मुळमुळीत किंवा गंभीर शुभेच्छा
द्यायच्या, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला
आपल्या लाडक्या भावाला मजेदार….. गमतीदार….
शुभेच्छा द्यायच्या असतील… तर
भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा |
Funny Birthday Wishes For Brother In Marathi

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला
ढगात घालवणारे…. पण मनाने दिलदार….
बोलणे दमदार…. आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट
गाणे वाजवून नाचत – गाजत शुभेच्छा.

सोमवार – रविवार नसलेत
तरी चालतील. पण भाऊंचा
बर्थडे तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा.

शहराशहरात चर्चा……
चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य
करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे…..
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाने तुझ्या आजचा
दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी
मिळाली तर सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सगळेजण…. तुमच्या
हरण्याची वाट पाहत असतात.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

छोट्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Little Brother In Marathi

जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
तू कायम सुखी व आनंदी राहावे
हीच देवाकडे प्रार्थना…..!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

जुळ्या भावांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Twins Brother In Marathi

मला हेवा वाटतो की
तुम्हा दोघांचा वाढदिवस
एकत्र आहे. आणि तुमचे
एकमेकांवर खूप प्रेम आहे.
माझ्या जुळ्या भावांनो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही दोघे फक्त जुळे नसून
देवाने दिलेला डबल आशीर्वाद
आहात. माझ्याकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या दिवशी दुप्पट धांदल उडवा….
दुप्पट मजा करा…. कारण
आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आहे.
माझ्या जुळ्या भावांना वाढदिवसाच्या
दुप्पट शुभेच्छा.

आज आपला वाढदिवस आहे
पण मी तुला सांगू इच्छितो की
तू माझा जुळा भाऊ आहेस म्हणून
मी भाग्यवान आहे. माझ्या जुळ्या
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(Birthday Wishes For Twins Brother In Marathi)

जुळे असण्याबद्दल आपण दोघे
भाग्यवान आहोत. आणि ही
दुर्मिळ भावना अनुभवणार्‍या
मोजक्या लोकांपैकी एक आहोत.
माझ्या जुळ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू फक्त माझा जुळा भाऊ नाहीस,
तर ती व्यक्तीही आहेस जिच्यासोबत
मी माझा पहिला श्वास आणि हृदयाचे
ठोके शेअर केले आहेत. माझ्या
पार्टनरला, माझ्या लाडक्या जुळ्या
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे.
माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे.
जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा
ज्यामधे तुझी सोबत नाही.
हॅप्पी बर्थडे भावा

भावासाठी त्याच्या जुळ्या भावापेक्षा
जवळचा व चांगला मित्र दुसरा कोणीच
नसतो आणि आपण दोघेही भाग्यवान
आहोत की आपल्या दोघांना जन्माच्या
आधीपासूनच एक मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर.

तुझ्यापेक्षा मला इतर कोणीही चांगले
समजून घेऊ शकत नाही. माझ्या
प्रिय जुळ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes For Twins Brother In Marathi

खूप कमी भाग्यवान लोक असतात
ज्यांना आयुष्यभर मित्राची साथ मिळते.
पण आपण दोघे खूप भाग्यवान आहोत
की माझा मित्र माझा जुळा भाऊच आहे.
आपल्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जुळे भाऊ असण्याबद्दल सर्वात महत्वाची
गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीही एकटे वाटत
नाही. कारण देवाने तुमच्यासोबत तुमचा
सर्वात चांगला मित्र पाठवला आहे.
हॅपी बर्थडे भावा.

भावाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर भावाने तर शुभेच्छा दिल्याच पाहिजेत.
कितीही पटत नसले तरी या दिवशी सगळे विसरून नक्की तुमच्या
भावाला बर्थडे विश करा.

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार
व्यक्तीमत्त्वाचा….
जन्मदिवस लाडक्या दादाचा.
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा

वादळाला त्याचा परिचय द्यायची
गरज नसते. त्याची चर्चा ही होतच
असते. लेका…. भावड्या….
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही. या जन्मदिनी
दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

तुझे व्यक्तिमत्त्व असे दिवसेंदिवस
खुलणारे… प्रत्येकवर्षी वाढदिवस
नवे क्षितीज शोधणार… अशा
उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दादा माझा आधार आहेस तू ….
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात
माझ्या पाठीशी आहेस तू….
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मित्रांनो, आपल्या भावांवर असलेले प्रेम लपवू नका. तुमच्या शुभेच्छा संदेश मधून
ते व्यक्त करा. तुम्ही गप्प राहिलात तर तेही व्यक्त होणार नाहीत. कारण…..
नात्यात कितीही चढउतार आले तरी एक भाऊच असतो. जो आपल्याला साथ देतो.
प्रत्येक सुखदुःखात आणि संकटात आपल्यासोबत उभा राहतो. मग तुमच्या भावाच्या
वाढदिवसाला हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा. आणि त्यांना कसे वाटले….
ते आम्हाला नक्की कळवा.

Thank You For Birthday In Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here