Bayko Kavita | बायकोसाठी कविता | बायकोवर कविता

0
1222
Bayko Kavita | बायकोसाठी कविता | बायकोवर कविता

Bayko Kavita |
बायकोसाठी कविता |
बायकोवर कविता

Hindhu-marriage-बायकोसाठी-कविता- Bayko-Kavita-बायकोवर-कविता-lagna-bayko-status

 

आपल्या जीवनात बायकोचे येणे… किती किती सुखदायक असते…

श्वासांशिवाय या नात्याला दुसरे कुठलेही नाव नसते
बायको आपल्या घरामध्ये एका सुंदर क्षणी येते…
बायको आपले संपूर्ण जीवन… आपल्याला बक्षीस म्हणून देते.
बायको सगळ्यांशी नाते किती सहज बनवत जाते
बघता बघता अनोळखी घरबायकोचेच बनून जाते….
दुःखामध्ये सुखामध्ये… बायकोच सोबत असते ना...
सगळे काही सहन करून बायको… आमच्यासाठीच हसते ना…?

सकाळी उठल्यापासून… रात्री झोपेपर्यंत राबत असतात बायकोचे हात…

मनात बायकोच्या सतत असते, सासू सासरे, मुले आणि घर..
सगळ्यांना देते चहा दूध नाश्ता- डबा आणि आंघोळीला गरम पाणी…
प्रत्येकाची कामे करूनही…. बायकोची मात्र गोड वाणी….
सगळ्यांच्याही पूर्वी उठून… सगळ्यांत शेवटी झोपते दिवसभर राबण्यासाठी
देवच जाने बायको एवढी शक्ती आणते तरी कुठून…?
घरामधले सगळे काम आवरूनबायको कामासाठी बाहेर पडते…
बायको जेव्हा घरामध्ये नसते तेंव्हाच बायकोची खरी किंमत कळते…
Legs-of-bride-and-bridegroom-Tradition-saptpadi-Hindhu-marriage-बायकोसाठी-कविता- Bayko-Kavita-बायकोवर-कविता-lagna-bayko-status

Bayko Kavita |
बायकोसाठी कविता |
बायकोवर कविता

जेंव्हा बायको घरामध्ये नसते… तेव्हा पूर्ण घर होते अस्ताव्यस्त

बायको शिवाय व्हायचेसे?
तेव्हा होते मनात उत्फुल्ल… जेव्हा बायकोच्या परतीची बातमी येते
पदर खोचून घरामध्ये… बायको दाखवते बोलून मलाच
वरती हे टोचून टोचून की मी म्हणून टिकले…
गेली असती दुसरी केव्हाचीच पळून…
महत्त्व माझे येत नाहीअजून कसे तुम्हांला कळून…?

राग- लोभ रुसवे फुगवेउणी- दुणी मानपान…

बायको प्रत्येकाला समजून घेतेजुळवून कित्ती छान घेते…
थकून भागून आल्यावरहसून चहा देते आणून…
दिवसभराचे आपले कष्ट अलगदपणे घेते जाणून….
बायको जेंव्हा सगळे भांडण विसरूनघराशी ती एकरूप होते…
घर बायकोचेच होऊन जाते… जेंव्हा ती कुशीत घेते…..
जीवनभर उपयोगी पडते… नेहमी संसारी धोरण बायकोचे…
म्हणून प्रत्येक घरात सजते… बायको नावाचे मखमली तोरण….

बायको आहे, म्हणून आहेआपल्या घरादाराला किंमत….

तिला विरोध करण्याची इथे…. कुणात आहे हिंमत….?
कुठून येतात जीवनात आपल्याइतक्या समजूतदार मुली….?
उगाच म्हणत की आहेत घरोघरी मातीच्याच चुली…!
फक्त काही क्षणांचीच साथ नव्हे… तर साताजन्मांची ही सोबत असते…
नवरा, जीवनभर नवराच राहतोनवरी मुलगी मात्र, बायको बनते….

 

बायकोच्या कष्टाची जाणीव | बायकोवर सुंदर विचार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here