Marathi Suvichar – पूर्णतः माणसे बदलली आहेत – सुंदर विचार
सुंदर विचार
समजा तुम्हाला आंबा खुप खुप आवडतो आणि मी तुम्हाला एक आंबा दिला तर….
तुम्ही तो आवडी ने खाल आणि तुम्हाला खुप आनंद होईल. तो आंबा खाऊन झाल्यावर
लगेच मी तुम्हाला दुसरा आंबा खायला दिला तर तुम्ही तो पण खाल आणि तुमचा आनंद
पुर्वी पेक्षा थोडा कमीच राहील.
दुसरा आंबा संपल्यावर मी तुम्हाला तिसरा आंबा खायला दिला तर तो मी तुम्हाला खूप आग्रह केला
तरच तुम्ही खाणार… तो ही माझा मान राखण्यासाठी.पण यावेळी तुम्हाला आनंद मुळीच होणार नाही.
आणि यानंतर प्रत्येक आंबा खाल्यावर त्याची उपयोगिता कमी कमी होत जाईल आणि आंबा तुम्हाला
नकोसा वाटेल. यालाच म्हणतात सीमांत उपयोगिता क्षीणता चा नियम
( Law of Diminishing Marginal Utility )
सुंदर विचार
आता बघा..
मागील खूप वर्षा पासुन आपण दुर होतो, आपला एकमेकाशी काहीही संपर्क नव्हताच.
एकमेकांची आठवण यायची. कोणाशी बोलायला मिळाल की अप्रूप वाटायचे.
मग एक दिवस आपल्यापैकी एकाने ग्रूप बनविला आणि आपल्या आनंदाला उधाण आले.
डोळे आणि मन एकदम भरून आले. विचारांच्या अनेक लाटा आल्या…! आता आपले विचार
आपण मनमोकळे पणाने मांडायला लागलो… मग हळू-हळू चोर पावलांनी हा क्षीणता नियम
आपल्यात शिरला…
कुणी कमी बोलायला लागला, कुणाचे बोलणे बंदच झाले….
कोणी रुसले…. कोणी रागावले… तर कोणी ग्रूपच सोडून जाऊ लागले.
ह्या ग्रूप ने आपण सर्व एकत्र आलोत, आणि ग्रुप ही आपणा सर्वांना
एकत्र आणण्या साठी केला आहे… ही प्रांजळ भावना विसरू नका.
ह्या ग्रुप ने आपल्याला भावनिक आनंद आणि बळ मिळतो….
एखादी व्यक्ती… गोष्ट… जवळ नसल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळते.
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल… तुमचा जेव्हा मुड असेल… तेव्हा संदेश पाठवा…
ग्रुप वरील एखाद्या विचारला प्रतिउत्तर द्या… एखादा फोन करा….
कुणी आपल्याला फोन केला म्हणजे तो रिकामा नसून
तुम्हाला प्राधन्य देत आहे.
तेव्हा संवाद साधत राहा. कारण आता प्रत्येक माणूस बदलला आहे,
त्याचे राहणीमान,सवयी,जगण्याचे सिद्धांत सगळे काही…..
Marathi Suvichar – सुंदर विचार
बघा….
पूर्वी माणूस जेवण आपल्या घरी करीत होता. आणि शौचास बाहेर जायचा….
आता तोच जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे.
पुर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस चौकीदार म्हणुन ठेवायचे…
की कुणी कुत्रा वगैरे घरात येऊ नये…
आता त्याच घराच्या दारावर कुत्रा बांधुन ठेवतात…
की कुणी माणुस घरात येऊ नये.
पुवीॅ लग्नात घरच्याच स्त्रीया पुर्ण जेवण बनवायच्या…
आणि नाचणार्या स्त्रीया बाहेरून नाचायला यायच्या.
आता जेवण बनवणाऱ्या स्त्रीया बाहेरून जेवन बनवायला येतात.
आणि घरातल्या स्त्रीया नाचतात.
पुवीॅ जो माणूस सायकल चालवत असे
त्याला गरीब माणुस समजला जात असे.
आता श्रीमंत माणुस आपल्या कार ने जिममध्ये जातो
आणि तिथे सायकल चालवितो.
पुर्वी लैंडलाइन वायरीच्या फोनने लांब असलेलीची माणसे ही
जोडली जात असे. आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या
नात्याचे दोर ही खुप कच्चे झाले आहेत.
पुर्वी माणुस घरी चुलीवर स्वैपाक करत होते.
मग गैस वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरचे जेवण खायला ढाबा शोधुन जेवण करतो.
पुर्वी माणसे खुप हुशार होती. आता माणसे येडी
आणि हातातले फोन स्मार्ट झालेत.
पूर्वी रस्ते मुरूम- मातीचे होते.
आणि माणसे खुप साधी होती..
आता रस्ते डांबरचे आणि माणसे
डांबरट झाले आहेत.