Mindset Good Thoughts Marathi – suvichar – sunder vichar

0
452
mindset-good-thoughts-in-marathi-suvichar-sunder-vichae
mindset-good-thoughts-in-marathi-suvichar-sunder-vichae

कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत आहात…?

मग हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

 

नमस्कार,
माझ्या वाचनात आलेली माहिती मी तुमच्यासोबत शेयर करीत आहे…

या लेखाचा राजनीती किंवा कुणावर टिका अशा कोणताही विचार
माझ्या मनात नाही आहे. आणि आपणास ही आग्रहाची विनंती आहे की
आपण ही अशा अर्थ काढून घेऊ नये.

Mindset | Good Thought Marathi | sunder vichar

भारतात Computer आयात करण्यासाठी लागणारा Tax ( कर ) कमी करावा का…?
या विषयावर एकदा पंतप्रधान श्री राजीव गांधी आपल्या कार्यालयात काम करत
असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होते.

बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने श्री राजीव गांधींना प्रश्न विचारला की…
तुम्ही ह्या विषयावर तुमच्या मंत्रिमंडळा सोबत का बोलत नाही…?

यावर राजीव गांधी म्हणाले की… माझ्या मंत्रिमंडळात सर्व म्हातारे आहेत.
त्यांना हे सगळे कळणार आहे का…?

एक व्यक्ती हे राजीव जी आणि अधिकारी यांच्यातील बोलणे ऐकत होते
ते व्यक्ती होते श्री पी. व्ही. नरसिम्हा राव.
त्यावेळी ते देशाचे रक्षा मंत्री होते आणि त्यांची वय ६४ वर्षं होती…!

थोडे विचार करा… समजा हे शब्द त्याच वयाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या कानावर
आले असते तर त्या व्यक्तीने काय केले असते…? किंवा दुसऱ्यांचे जाऊ द्या…
तुम्ही काय केले असते…?

नरसिम्हा रावांनी काय केले तर… त्यांनी त्यांच्या अमेरिकेत राहत असलेल्या
मुलाला फोन लावला. मुलाने फोन उचलताच पहिला प्रश्न विचारला की…
हे कॉम्पुटर म्हणजे नक्की काय आहे…?

नंतर त्यांनी अमेरिकेतून एक Computer मागवून घेतला. आणि काही स्वतः
Computer च्या काही भाषा शिकून घेतल्या. नरसिम्हा रावांनी नुसते शिकूनच
समाधान मानले नाही, तर….

FORTRAN ह्या प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरणात कसे सुधार करता येईल ह्यासाठी
त्यांनी IBN ह्या नावाजलेल्या कंपनीला पत्र पण लिहिले…!

नंतर श्री पी. व्ही. नरसिम्हा राव जेव्हा १९९२ मध्ये भारताचे पंतप्रधान झाले
तेव्हा त्यांनी Computer आयातीवरचा Tax मध्ये पूर्णपणे सुट दिली.

जे काम राजीव गांधींना चारसे पेक्षाही अधिक खासदार असतांना सुद्धा
जमले नाही… ते श्री पी. व्ही. नरसिम्हा राव ह्यांनी दोनशे पन्नास पेक्षाही
कमी खासदारांच्या जोरावर करून दाखविले…!

सॉफ्टवेयर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना 10 वर्षांसाठी Tax देण्यापासून पण सूट दिली.
वरील दोन घोषणांमुळे भारत सॉफ्टवेयर क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास आला.

सामान्य कुटुंबांच्या कर्तबगार मुला – मुलींचे नौकरीसाठी नेत्यांच्या आणि
अधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवणे बंद झाले आणि आत्मविश्वास असलेला
एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला.

इंफोसिस पासून तर विप्रो पर्यंत आणि फ्लिपकार्ट पासून तर OLA पर्यंत सर्वांचे
उगमस्थान हा एक नेता आणि त्यांची ती एक पॉलिसीच ठरली…!

आपल्या मनात विचार येत असेल कि हे मी सगळे तुम्हाला कशाला
सांगत आहे…?

Carol Dweck ( American Psychologist ) म्हणून एक लेखिका आहेत.
त्यांचे Mindset नावाचे एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी दोन प्रकारच्या लोकांचे
वर्णन केले आहे.

पहिला प्रकार :- Fixed Mindset या प्रकारच्या लोकांना नेहमी असे वाटत असते की…
माहिती… बुद्धी… आणि कौशल्य ( knowledge, talent, skill ) या सगळ्यांना वयाच्या…
जातीच्या… आणि लिंगाच्या मर्यादा असतात.
दुसरा प्रकार :- Growth Mindset या प्रकारच्या लोकांच्या तोंडून तुम्हाला कधीही…
मला ही अमुक गोष्ट येत नाही… समजत नाही… किंवा हे मला पटत नाही आहे…!
असे शब्द ऐकायला येणार नाही. जास्तीत जास्त सध्या मला हे अमुक समजत नाही…
येत नाही… किंवा पटत नाही… असे ऐकायला येईल…!

उदाहरणार्थ खालील वाक्य बघा पाहू…

माझ्या दुकानात जास्त वस्तूंची विक्री होत नाही आहे…
माझ्या दुकानात सध्या जास्त वस्तूंची विक्री होत नाही आहे…

मला नौकरीच मिळत नाही आहे…
सध्या मला नौकरी मिळत नाही आहे…

आता किंवा सध्या या एका शब्दामुळे किती फरक पडला जाणवत आहे ना…?
ह्या एका शब्दांमुळे हे अनुल्लेखित होते की आपण सध्या ज्या परिस्थितीत
आहोत ती परिस्थिती कायमस्वरूपी नाही आहे… तात्पुरती आहे.
बरोबर पाऊले उचलली तर ती बदलता येऊ शकते.

आता लॉकडाऊन सगळीकडे उघडलाच आहे… आता हा पूर्णपणे उघडल्यावर
जी वेळ आली आहे… ती कुणासाठी खूप कठीण होऊ शकते…

काहींच्या हाती कामच राहणार नाही… काहींच्या नौकऱ्या धोक्यात येऊ शकतात
आणि काहींना व्यापारात खूप मोठे नुकसान होऊ शकते…! आपण हे लक्षात ठेवणे
आवश्यक आहे की ही आलेली वेळ तात्पुरती आहे…. कायमस्वरूपी नाही.
आपणाला आपल्या मेहनत, जिद्द, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर ही
बदलता येऊ शकते.

हाच Growth Mindset तुमच्यात नेहमीच राहो आणि येणारा काळ तुमच्यासाठी
भरभरून प्रगतीच्या संधी घेऊन येवो…!
धन्यवाद

 

 

 
 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here