Navratri | नवरात्रीच्या उपासना मागील इतिहास | घटस्थापना

1
633
देवीचे शारदीय नवरात्र - त्याचे धार्मिक महत्व आणि माहिती-navratra-jai-mata-di-घटस्थापना-दुर्गा माता
देवीचे शारदीय नवरात्र - त्याचे धार्मिक महत्व आणि माहिती-navratra-jai-mata-di-घटस्थापना-दुर्गा माता
॥ जय मातादी ॥

Navratri | नवरात्रीच्या उपासना मागील इतिहास,
घटस्थापना | नवदुर्गा

1] प्रभु श्री रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने श्री रामाला नवरात्रीचे
व्रत करायला नारदाने सांगितले. आणि श्री रामाने हे व्रत पूर्ण केल्यावर लंकेवर
स्वारी करून रावणाला ठार मारून विजय मिळविले.

२. देवीने महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस
युद्ध करून नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी
म्हणू लागले.

नवरात्रीचे महत्व

जगात जेव्हा-जेव्हा आसुरी, क्रूर आणि तामसी लोक प्रबळ होऊन.. सात्त्विक…
आणि उदारात्धम आणि कर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापने
करिता पुन्हा पुन्हा अवतार घेते. जगज्जननी माता ही उपांग ललिता…
पालन पोषण करणारी माता जगद्धात्री…. संपत्ती दायिनी माता लक्ष्मी….
संहारकर्ती माता काली…. अशा स्वरूपात नवरात्रात उपासना आणि पूजन होते.
नेहमीपेक्षा नवरात्रीत देवीतत्त्व १००० पटीने कार्यरत असते.

देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात
श्री दुर्गादेव्यै नम: हा नामजप जास्तीत जास्त करावा.

घटस्थापना

घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून
घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे भगवंताकडून
आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते.
शास्त्रानुसार घटस्थापना केली तर… देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

अखंड दीपप्रज्वलन करणे

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित
असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी
आकृष्ट होतात.

अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते.
म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे

नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थां व्यतिरिक्‍त
विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती…?

देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये
देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची
क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी
देवीच्या दिशेने येईल. असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल….
अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली
आध्यात्मिक उन्नती व्हावी… यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
साडी, खण आणि नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने
तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण
करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळ
प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

Navratri | नवरात्रीच्या उपासना मागील इतिहास,
घटस्थापना | नवदुर्गा

कुमारिका-पूजन कसे करावे…?

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी
बोलवावे. नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संख्येत
कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी आसन द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे,
या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे.
( देवीला खीरपुरी आवडते.) कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना
आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.

देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया
अध्यात्म… शास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व.
शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी

जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृती
बंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते. म्हणून अशा आकृतीबंधांनी
युक्‍त रांगोळी काढतात.

गरबा खेळणे म्हणजे काय…?

गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण
गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून
श्री दुर्गा देवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक
रूप घेण्यास आवाहन करणे.

टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत
करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन
करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते.
गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

Navratri | नवरात्रीच्या उपासना मागील इतिहास | घटस्थापना

नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व

नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी नऊ धान्यं…
साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

दुर्गामातेचे नऊ अवतार

शैलपुत्री… ब्रह्यचारिणी… चंद्रघंटा… कुष्मांडा… स्कंदमाता…
कात्यायिनी… कालरात्री…. महागौरी…. सिद्धिरात्री…

दुर्गा देवीची नऊ नावे

अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी,
रेणुका.

महाराष्ट्रातली देवी मातेची प्रसिद्ध नऊ देवस्थाने

वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी),
रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर),
योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).

नवरात्रींचे नऊ रंग

लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी,
पांढरा, गुलाबी, जांभळा.

नवग्रहांच्या नऊ समिधा

रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

नवग्रहांची नऊ रत्ने

माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य, पीतवर्ण – मणी.

नऊ प्रकारचे दान

अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

नवविध भक्तीचे नऊ प्रकार

श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

प्रसिद्ध नऊ नाग

शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड

भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर),
वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य),

सुवर्णखंड (मध्य).

मानवी देहांतर्गत असलेले नऊ कोश
अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय ,
आकाशमय, विज्ञानमय.

मानवी मनाचे नऊ गुणधर्म

धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार,
क्षमा, स्मरण, चांचल्य.

मानवी शरीराच्या नऊ अवस्था

मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था,

जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व,

देवीचे शारदीय नवरात्र – त्याचे धार्मिक महत्व आणि माहिती

देवीचे शारदीय नवरात्र - त्याचे धार्मिक महत्व आणि माहिती-navratra-jai-mata-di-घटस्थापना-दुर्गा माता
देवीचे शारदीय नवरात्र – त्याचे धार्मिक महत्व आणि माहिती-घटस्थापना

नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होतात आणि या काळात
शरद ऋतू असतो म्हणून या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात.

नवरात्र हा अत्यंत महत्वाचा काळ असून तो आपल्या वडीलधाऱ्यांकडून
जसा पाळला गेला तसाच आपणही तो त्याच नियमाने पाळलाच पाहिजे.

आपल्या घरच्या देवघरात ज्या कुलदेवतेचे आपण दर रोज पूजन करतो
त्या देवताचे आशीर्वाद अधिक प्रभावी व्हावे… आपल्या देवताचे पूर्ण
कुटुंबावर आशीर्वाद व्हावा… नकारात्मक शक्ती पासून आपले… आपल्या
कुटुंबाचे… आणि घराचे संरक्षण व्हावे… यासाठी आपल्याकडे अनादी
काळापासून देवीचे नवरात्र पूजन हि परंपरा चालत आलेली आहे…

आपल्या शास्त्रात नवरात्रात देवी पूजन चे खूप महत्व सांगितले आहेत…
तसेच ह्या काळात केलेली देवीची आराधना खूप फलदायक असते…
म्हणून अनादी काळापासून हि परंपरा चालत आलेली आहे…

शास्त्रात उल्लेख आहे कि प्रभू श्री राम यांनी रावणावर विजय मिळविण्यासाठी
नवरात्र काळात देवीचे पूजन ( व्रत ) केले होते..

एका वर्षात चार नवरात्र ( व्रत ) येतात… तसेच यांना चार वेगवेगळ्या
नावाने ( व्रत ) ओळखतात…
पहिली नवरात्र – प्रतिपदा ते नवमी या नवरात्र ला
संपूर्ण नवरात्र असे म्हणतात.
दुसरी नवरात्र – प्रतिपदा ते सप्तमी या नवरात्री ला सप्तरात्री व्रत असे म्हणतात.
तिसरी नवरात्र – पंचमी ते नवमी या नवरात्री ला पंचरात्री व्रत असे म्हणतात.
चौथी नवरात्र – सप्तमी ते नवमी या नवरात्री ला त्रिरात्री व्रत असे म्हणतात.

या नवरात्री चे मुख्य चार अंग असतात… या चार अंगाप्रमाणे देवीचे पूजन केले
जाते…
प्रथम देवतास्थापन…
द्वितीय मालाबंधन….
तृतीय अखंड दीप ( नंदादीप )
चतुर्थ बालिका पूजन (कुमारिकापूजन ) अशी आहेत…

काही परिवारात शेत (वेदिका ) स्थापना करतात… शेतात जाऊन काळी
माती आणतात आणि त्या मातीत हळदीच्या पाण्यात सप्तधान्ये रंगवून
पेरतात…

अखंड दीप लावण्यासाठी धातूची जाड अशी समई वापरावी. तेलाची जोडवात
ही एक वीत लांब असावी आणि वातीला कुंकवाने रंगवावी. अखंड दीप हा अखंड
जळत असावा. जर अखंड दीप विझण्याची भीती असेल तर मग समया ह्या दोन
लावाव्यात. आणि जर नवरात्राचा अखंड दीप हा तेल संपल्यामुळे किंवा काजळी
झटकताना विझला तर आपल्या कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप
करावा अथवा विष्णुसहस्रनाम वाचावे.

नवरात्रात माळ बांधतांना ( मालाबंधन करतांना ) त्या काळात जे उपलब्ध
आहे त्याच सुगंधीत फुलांची माळ बांधावी.

शेवटी कुमारिका पूजन हा नवरात्र व्रताचा प्राण आहे…! जर आपल्याला
शक्य असल्यास पूर्ण नवरात्र म्हणजे नवही दिवस दररोज किंवा नवरात्रीच्या
शेवटच्या दिवशी बालिकेचे पाय धुवून तिला गोडधोड जेवायला द्यावे.

स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितलेले आहेत.

२ वर्षाची कुमारिका – कुमारी
३ वर्षाची कुमारिका – त्रिमूर्तीनी
४ वर्षाची कुमारिका – कल्याणी
५ वर्षाची कुमारिका – रोहिणी
६ वर्षाची कुमारिका – काली
७ वर्षाची कुमारिका – चंडिका
८ वर्षाची कुमारिका – शांभवी
९ वर्षाची कुमारिका – दुर्गा
१० वर्षाची कुमारिका – सुभद्रा

तसेचे कुमारिकापूजनाचे मिळणारे फळ हि सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे

१ कुमारिका पूजन – ऐश्वर्य प्राप्ती
२ कुमारिका पूजन – भोग आणि मोक्षची प्राप्ती
३ कुमारिका पूजन – धर्म आणि अर्थ प्राप्ती
४ कुमारिका पूजन – राज्यपद प्राप्ती
५ कुमारिका पूजन – विद्या प्राप्ती
६ कुमारिका पूजन – षट् कर्म सिद्धी
७ कुमारिका पूजन – राज्य प्राप्ती
८ कुमारिका पूजन – संपत्ती
९ कुमारिका पूजन – पृथ्वीचे राज्य मिळते.

सप्तशतीपठणाचे नवरात्रात विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील
एक एक अक्षर म्हणजे अग्नी सारखा आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे
म्हणते की… जो ही मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याचे
संपूर्ण कष्ट मी दूर करीन. त्याचप्रमाणे दुःस्वप्न – कष्टदायक अशा
ग्रहपीडा असल्यास… त्या सप्तशती चा पाठ केल्याने दूर होतील असे
देवी माहात्म्य सांगते.

राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे.
अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते.
तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस
महाअष्टमी म्हणतात.

भागवतात सांगितले आहे की… नवरात्रात कोणत्या दिवशी कोणते नैवेद्य
देवीला दाखवावे….
रविवार ला खीर
सोमवार ला – गायीचे तूप
मंगळवार ला – केळी
बुधवार ला – लोणी
गुरुवार ला – खडीसाखर
शुक्रवार ला – साखर
आणि शनिवार ला – गायीचे तूप.

नवरात्र या काळात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र / महालक्ष्मी अष्टक/कनकधारा
स्तोत्र / रामरक्षा / देव्यपराध स्तोत्र / श्रीसूक्त/शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी
स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास काही नियमांचे पालन करण्याचा
नक्कीच प्रयत्न करावा.

या सात्विक अन्नाचेच सेवन करावे जमल्यास उपवास ठेवावा..
ब्रम्हचर्याचे पालन करावे… कटिंग आणि दाढी करू नये….
गादीवर…पलंगावर… झोपू नये… जमिनीवर झोपावे.

नवरात्रात नियमांचे जेवढे अधिक पालन होईल तेवढा भक्तिभाव
अधिकच वृद्धिंगत होतो. हेच आपल्या धर्मशास्त्र सांगितले आहेत.
जय मां अंबे गौरी…

चांगली धार्मिक माहिती आपल्या पर्यंत पोहचवणे हा या मागचा उद्देश आहे…

काही चूक झाल्यास क्षमा करावे… हि विनंती.

अशा येणाऱ्या परम पावन मंगलमय नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा…!

॥ जय मातादी ॥

Also Read :- ११ प्रकार शुद्धीकरणाचे | सुंदर माहिती | सकारात्मक विचार करा

अडणी – शंख ठेवण्याचे आसन | पूजा पाठ माहिती

                   जानिए अपने हिंदु धर्म और संस्कृति के बारे में | सनातन धर्म जानकारी

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here