जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

1
182
जीवन मनसोक्त जगा - Sunder Vichar - Good Thoughts In Marathi - vb
जीवन मनसोक्त जगा - Sunder Vichar - Good Thoughts In Marathi

जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

मित्रांनो नक्की वाचा १०१% आवडेल.

एक खुप मोठा श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ४-५ बंगले असतात….
महागड्या गाड्या असतात…. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नसते.
दर दिवशी तो भरपूर पैसे कमवत असतो…

एका रात्रीला त्याला दररोज च्या वेळे पेक्षा लवकर झोप आली
आणि तो झोपी गेला.

सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले तर त्याच्या समोर यमराज उभे होते.
तो माणुस एकदम दचकला. तसेच यमराज म्हणाले, आता चला….
तुमची जाण्याची वेळ आली आहे.

त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की….
मी तुम्हाला वीस करोड रुपये देतो. मला आजचा दिवस द्या.
त्यावर यमराज म्हणाले की…. तुम्ही उगाच आपला ही आणि
माझा ही वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला या क्षणीच माझ्याबरोबर
चालावे लागेल.

जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला पन्नास करोड रुपये देतो…
मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचे आहे.
त्यावर पुन्हा यमराज म्हणाले की, खरोखरच तुम्ही वेळ वाया घालवत
आहात. तुम्हाला यावेळीच माझ्याबरोबर चालावे लागेल.

परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो, मला फक्त
पाच मिनिट द्या. त्यावर पुन्हा यमराज म्हणाले. मी तुम्हाला एक मिनिट ही
देऊ शकत नाही. तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावेच लागेल.
तो श्रीमंत माणुस आता खुप रडू लागला आणि म्हणाला मला काही संकेड
तरी द्या. मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचे आहे.

यावर यमराज म्हणाले…. ठीक आहे…. लवकर लिहा जे लिहायचे आहे ते….
त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेले ते पत्र.

प्रिय मित्रहो…..
माझ्याकडे आज भरपूर पैसा आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे.
पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा
विकत नाही घेऊ शकत.

मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. आयुष्यातला प्रत्येक दिवस,
प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, मी केवळ पैसा कामविण्यातच घालवला.
परंतु आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला साधा एक मिनिट सुद्धा
मला देऊ शकला नाही.

म्हणुन सांगतोय मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा. कुणी आपल्याला वेडा म्हटले
तरी चालेल परंतु जीवनाला अगदी बालपणासारखे एन्जॉय करून जगा.

शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली.
जगा… मनसोक्त जगा.

जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

मित्रांनो… माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे काही
आपल्याकडे आहे, त्यातच भरभरून आयुष्य जगा. पैसा तर जीवनात
नक्कीच कमवा. परंतु तो इतकाही साठवून ठेऊ नका की जीवनाची
खरी मजा ही आपण कधीच नाही घेऊ शकत…..!

घरातून बाहेर पडतांना आपल्या देव घरातील देवाला नमस्कार करूनच
बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या. कारण तो
भगवंत तुम्ही घरी यायची वाट पहात असतो.

आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता….
तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून “हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला”
असे म्हणां. कारण तुमच्या हातामध्ये भले ही लाखांचे घड्याळ असेल…
परंतू त्यावर दाखवणारी वेऴ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे…!

जय श्री कृष्ण

जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here