Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी
नमस्कार मित्रांनो….
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी छान विचार, सुंदर मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, सकारात्मक सुविचार, सुविचार स्टेटस, suvichar status, marathi quotes, motivational suvichar, sunder vichar marathi, असे वेगवेगळे सुविचार वाचायला मिळतील.
खास सुविचारांचे…. सुविचार फोटो, suvichar with image, सुविचार फोटोसह ही असणार. हे सुविचार वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल…. सकारात्मक शक्ती मिळेल, नक्की वाचा आणि आपल्या मित्र, नातेवाईकांना facebook, wahatsapp, instagram, वर शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद
देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता…?
यापेक्षा देवाकडे पाठ असतांना तुम्ही कसे वागता
यावरच खूप काही गोष्टी अवलंबून असतात…!
💐💞🕉️🌈💯
marathi-suvichar-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
जीवनात संगतीला खूप महत्व आहे…!
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते.
आणि विचार सोबतच्या व्यक्तीं मधुन येतात.
💐💞🕉️🌈💯
भावनांच्या तव्यावर
स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसे
आपली कधीच नसतात.
कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त
तहान लागल्यावरच दिसतात…!
💐💞🕉️🌈💯
कमाईचा अर्थ केवळ
धन मोजणेच असा नाही…..
तर अनुभव…. नाती….
मान….. सन्मान…. संस्कार….
आणि वागणूक….. हे सुद्धा
कमाईतच मोजले जाते.
💐💞🕉️🌈💯
केवळ संशयावरून
कोणालाही आरोपी समजू नये.
कारण चित्र स्पष्ट झाल्यावर
कदाचीत पश्चाताप करायची
संधी मिळणे कठीण होऊ शकते.
💐💞🕉️🌈💯
सुख – समाधान सत्यात असते…
मिथ्यात नसते. आजपर्यंत
आपण विषय उपभोगले परंतु
त्यात आपल्याला सुख झाले नाही….
मग विषय मिथ्या आहेत याची
भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली….?
तरी सुद्धा तुम्ही या विषयांतच
प्रपंच कसा सुधारेल असे
सद्गुरूंना विचारात असतो.
याला काय म्हणावे…?
💐💞🕉️🌈💯
लागलेली भुक…. नसलेले पैसे…..
तुटलेले मन….. आणि मिळालेली वागणुक….
जे आपल्याला शिकवते…. ते जीवनात
कोणतीही डिग्री घेतली…. तरी शिकता
येत नाही. म्हणुन देवाने जे दिले आहे
त्यातले थोडसे इतरांना देऊन पहा…
आणि देव होता आले नाही तरी
माणूस होऊन पहा…..!
💐💞🕉️🌈💯
वाळू मध्ये पडलेली साखर
मूंगी सहजपणे खावू शकते.
परंतु हत्ती साठी ते अशक्य आहे…
म्हणून छोट्या माणसांना कधी
छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा
मोठ मोठी कामे करून जातात.
💐💞🕉️🌈💯
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका.
जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुध्दा
मान वाकवूनच घेत असतात……
💐💞🕉️🌈💯
भगवान श्री कृष्णाने
खूप मोठी गोष्ट सांगितली आहे….
जर तुम्ही धर्म कराल…
तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल…
आणि जर तुम्ही कर्म कराल…
तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल….!
💐💞🕉️🌈💯
प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती
आपल्या सहवासात असणे….
ही निसर्गाची एक देणगी असते.
अशी व्यक्ती लाभणे….
हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल
परतफेड होय….!
💐💞🕉️🌈💯
चुकणे हि ‘प्रकृती’….
मान्य करणे ही ‘संस्कृती’…..
आणि सुधारणा करणे ही
‘प्रगती’….. आहे.
💐💞🕉️🌈💯
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो…. तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
💐💞🕉️🌈💯
एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही
गमावण्याची जास्त भीती वाटते….
कारण हरवलेले एकवेळ शोधता तरी येते
परंतु गमावलेले पुन्हा कधीच सापडत नाही.
💐💞🕉️🌈💯
केवळ संशयावरून कोणालाही आरोपी समजू नये | Sunder Vichar Status | Marathi Suvichar | सुविचार स्टेटस
आपल्या स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय
स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा
उत्पन्न होत नाही.
जर प्रेम असेल तर राग हा येतोच
आणि राग हा केवळ हक्काच्या
माणसावरच येतो.
जीवन म्हणजे नुसता पत्त्यांचा खेळ आहे.
चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसतेच.
परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे
यावरच आपले यश अवलंबून असते.
दवाखाना जरी कितीही मोठा असला
तरी आपल्या लोकांनी मनाला दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्ट मध्ये कळत नाही.
एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा.
कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते
पण सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जिवंत राहते.
जर प्रत्येकाने आपला विचार करतांना
दुसऱ्याच्या मनाचा विचार केला…
तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच
दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.
जीवन चहा बनवण्यासारखे आहे….
अहंकाराला उकळू द्या…..
चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या…
दुःखांना विरघळून जाऊ द्या….
चुकांना गळून द्या… आणि
सुखाचा आनंद हसत हसत घ्या.
प्रेम असलेल्या व्यक्तीला
आपण जाऊन भेटतो….
जरी ती सातासमुद्रापलीकडे असली
प्रेम नसलेल्या व्यक्तीला आपण
नेहमी टाळतो जरी ती रस्त्यापलीकडे दिसली….!
जीवनात प्रत्येक गोष्टी
हव्या त्या वेळेवर मिळत नाही.
पण आपल्या जवळ जे आहे….
त्या गोष्टीत समाधान मानले
तर प्रत्येक दिवस आनंदाचा जातो.
आपण पाहिलेले स्वप्न
साकार करण्यासाठी किती वेळ लागेल
हे महत्त्वाचे नसून स्वप्नांची सुरुवात आणि
आपला विश्वास सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.
कर्तबगार माणसे आपल्या निर्णयांनी
जगाला बदलतात तर निष्क्रिय माणसे
जगाच्या भीतीने आपले स्वतःचे निर्णय
बदलतात.
Sunder Vichar Status | जर प्रेम असेल तर राग हा येतोच | सुंदर विचार मराठी | प्रेरणादायक सुविचार
देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्या सारखे दिले आहे.
फक्त एक अट घातली आहे की…
तो झिजेल तोच चमकेल.
संघर्ष करण्याचीसंधी
त्यांनाच मिळते….
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
रिकाम्या भांड्यावर झाकण आणि
चुकीच्या विचारांची पाठराखण
काही उपयोगाची नसते…
जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नाही…
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजे
जिंकणे होय.
बोलताना जरा जपून बोलावे
कधी शब्द ही अर्थ बदलतात.
चालतांना जरा जपुन चालावे….
कधी रस्तेही घात करतात.
वाकतांना जरा जपुन वाकावे…..
कधी आपलेच खंजीर खुपसतात.
पाउल टाकतांना जरा जपुन टाकावे….
कधी फुलेही काटे बनतात.
मागतांना जरा जपुन मागावे….
कधी आपलेच भावं खातात.
आणि नाते जोडताना जपुन जोडावे…..
कधी नकळत धागेही तुटुन जातात.
आपल्यावर टीका करणाऱ्यांचा
नेहमी आदर करत जा. कारण
आपले दोष शोधण्यासाठी ते
जीवाचा खूप आटापिटा करत असतात.
काहीं नात्यात सुरुंग लावणारे
नातेवाईकच असतात…..
हे नाते उध्वस्त झाल्यावरच कळते.
कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला
तरी त्रास करुन घ्यायचा की नाही….
हे आपल्या हातात असते.
माणूस किती आपला आहे आणि
किती आतला आहे याचे उत्तर फक्त
वेळे जवळ असते. कारण गरज संपली की…
विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे.
आपल्याला जीव लावणारे आपल्याला
मोठ्या नशिबाने मिळाले आहेत.
हे समजायला काहींना वेळही लागत नाही
आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही.
सीता होऊन “मौनाचं” रामायण
सहन करता येते पण….
शब्दांचे “महाभारत” सोसायला
पाठीशी कृष्ण हवा असतो….!
देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्या सारखे दिले आहे | सुंदर विचार | मराठी सुविचार
कधी नवऱ्याने झुकावे… कधी बायकोने झुकावे | नवरा बायको सुंदर विचार | Sunder Vichar Marathi
कधी नवऱ्याने झुकावे….
कधी बायकोने झुकावे…
एकमेकांच्या समजूतदारीतूनच
प्रत्येक घर टिकावे.
बायकोच्या कष्टांची दखल घेणारा तो नवरा
आणि नवर्याकच्या छोट्या-मोठ्या कर्तृत्वाचा
अभिमान बाळगणारी ती बायको.
हे गणित छान जमले की….
भलेभले संसार सुखी होतात….!
[…] Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी […]