बोधकथा | प्रेम, शांती, आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नांदते

0
491
बोधकथा इन मराठी - ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते...!-jai laxmi mata
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते.

बोधकथा | ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते

 

एका माणसावर एकदा लक्ष्मीमाता रुसली आणि त्याच्या घरून जाता जाता
त्या माणसाला म्हणाली…
माझ्या गेल्यावर आता माझ्या ऐवजी तुझ्या घरात गरिबी येणार आहे.
पण तुला मी एक वरदान मागण्याची संधी देत आहे… तुझी जे इच्छा असेल ते मागून घे.
तो माणूस चांगला हुशार आणि समजूतदारही होता, तो म्हणाला.. माते जर माझ्या घरी गरिबी
येतच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही…! फक्त एक विनंती आहे की, गरिबीला
सांगावे माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा कायम असू दे.
लक्ष्मीमाता तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.
काही दिवसानंतर त्या माणसाची लहान सून पूर्ण परिवारासाठी जेवण बनवत होती…
तिने भाजीत मीठमसाला टाकला आणि घरातील दुसरे काम करायला निघून गेली.
त्यानंतर जेवणाच्या जवळ त्या माणसाची सगळ्यात मोठी सून आली… तिने शिजत असलेल्या
भाजी ची चव न चाखताच भाजीत मीठ टाकले आणि ती पण कामाला निघून गेली.
अशाच प्रकारे त्या माणसाच्या आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकून दिले.
आणि तिथून निघून गेल्या.
जेव्हा तो माणूस आला आणि जेवायला बसला तर त्याला भाजी खूपच खारट वाटली,
त्याच्या लक्षात आले की गरिबी आपल्या घरी आलेली आहे. त्याने काहीच न बोलता गुपचूप
जेवण केले आणि निघून गेला.
त्याच्या नंतर त्याचा मोठा मुलगा जेवायला आला.. जेवतांना त्यालाही भजी खारट लागल्यावर
त्याने विचारले की…  बाबूजीचे जेवण झाले का…? तेव्हा बायकोने हो झाले म्हटल्यावर त्याने
विचार केला की… जेव्हा आपले वडीलच काही बोलले नाही तर मी कशाला बोलू…?
त्याचप्रमाणे कुटुंबातील सगळ्या लोकांनी जेवण करतांना भाजी खारट वाटल्यावर एकमेकांविषयी
विचारले आणि काहीच न बोलता सर्वांनी वडिलांसारखे गुपचूप जेवण करून आपापल्या कामाला
लागले.
संध्याकाळी गरिबी त्या माणसासमोर आले आणि म्हणाली मी निघून चाललो आहे.
माणूस म्हणाला कां…? गरिबी म्हणाली… पूर्ण कुटुंबाने जवळपास अर्धा किलो मीठ खाल्ले…
तरीही भांडण केले नाही.
ज्या घरात इतक्या खारटपणा नंतरही तुमची गोडी कमी झाली नाही
त्या घरात माझे राहणे शक्यच नाही आहे.
लक्ष्यात ठेवा
 भांडण आणि ईर्ष्या यामुळे आपले नुकसानच होते.
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here