Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

0
1137
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar-vb
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

Sunder Vichar | Suvichar
मराठी प्रेरणादायी सुविचार

नमस्कार मित्रांनो…
माणसाच्या जिवनातील सगळ्यात मोठी शक्ति म्हणजे… चांगले विचार ,
सुंदर विचार , सुविचार , प्रेरणादायी विचार , सकारात्मक सुविचार ,
sunder vichar , suvichar ,

माणसाला आपली जीवनरूपी इमारत उभी करण्यासाठी सुंदर विचार…
चांगले विचार… सकारात्मक सुविचार.. प्रेरणादायक सुविचार यांचा शक्तिशाली…
बळकट… असा पाया असणे आवश्यक असते.

समजा ती जीवनरूपी इमारत उभी राहिली तर ती बळकट असेलच असे
आपण विश्वासाने म्हणूच शकत नाही…

मानवी जीवन जगत असतांना अनेक प्रसंगांना समोर जावे लागते…
यश – अपयश… सुख – दुख… मान – अपमान.. आशा – निराशा…
असे अनेक…!

परंतु चांगल्या विचारांचा बळकट… मजबूत… पाया असणाऱ्यांच्या जीवनात
कोणताही प्रसंग आल्यास ते ठामपणे उभे राहतात…!

आपण आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतो… शक्य ते प्रयत्न करतो…
पण प्रत्येक वेळी यशच आपल्या पदरात येईल हे निश्चीत नसते… अशे अपयश
पचवायला सुंदर विचार… प्रेरणादायी सुविचार… चांगले विचार… साकारात्मात
सुविचारांचा बळकट पाया असणे महत्वाचे असते…!

जीवनात नातेवाईक… आपले घर… दुकान… कुटुंब… समाजात संकटांना तोंड द्यावे
लागते… संकटांना थांबविणे आपल्या हाथी नसतेच….! पण त्या संकटांना हिमतीने
तोंड देणे… त्या संकटामुळे मनात कुविचार न येवू देणे… हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा
आपल्या मनात सुविचारांचा पाया बळकट आहे…! मजबूत आहे…!

सुविचार असल्याने आपला एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलून जातो…!
प्रत्येक संकटांसोबत हसत हसत लढण्याची शक्ति विचारांमध्येच असते…!
म्हणूनच मी तुमच्यासाठी भरपूर सुविचार आणले आहेत…

हे सुविचार वाचून आपल्या जीवनात नक्कीच बदल होईल हा विश्वास आहे…!

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

विश्वास हा अगदी
स्टिकर सारखाच असतो…!
पाहिल्यासारखा
दुसऱ्यावेळी चिकटतच नाही…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar-vb

आत्मविश्वास
ही यश मिळविण्याकरिता
सगळ्यात मोठी शक्ती आहे…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar-vb

प्रत्येकाच्या मनात…
एक आदर्श व्यक्ती
असलाच पाहिजे…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जे आपण पेरतो…
तेच नेहमी उगवते…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जीवनात भावनांपेक्षा
कर्तव्यच मोठे असते.

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

आपण आपल्या कार्याची
सुरुवात कश्याप्रकारे केली…
यावरच काही गोष्टींचा
शेवट अवलंबून असतो.

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

चुकीच्या माणसाला
आपले आदर आणि चादर
कधीही देवू नये…
नाहीतर आपणच उघडे पडतो…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जो चुकतो तो माणूस, आणि
जो आपल्या चुकांना सुधरवितो
तो म्हणजे देवमाणूस…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

चूक होणे ही प्रकृती आहे…!
चूक मान्य करणे ही संस्कृती आहे…!
आणि चुकलेले सुधरविण्यासाठी
प्रयत्न करणे… ही म्हणजे प्रगती आहे.

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

केवळ प्रथम येणेच म्हणजे…
जिंकणे असे नेहमी नसते…
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षाही
आणखीन चांगली करणे
म्हणजेही जिंकणेच आहे…!

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

पसंत केलेली व्यक्ती
सुंदर असणे आवश्यक नाही आहे…!
परंतु… तुमचे जीवन ती व्यक्ति
कितपत सुंदर बनविणार…
हे नक्की आवश्यक असते…!

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जगाला प्रेमानेच जिंकता येते…
शत्रूतेने नाही.

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

भगवंताच्या आशीर्वादा शिवाय
कोणतेही कार्य बरोबर होत नाही.मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जे सत्याने मिळते तेच टिकते…!
जो व्यक्ती दुसऱ्यांना देत असतो…
त्याला भगवंत देत असते…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

समजविण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच
खरी परीक्षा असते. कारण…
समजविण्यासाठी अनुभवाचा
भरपूर कस लागतो…!
आणि समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो.

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

माणसाची चौथी मूलभूत गरज
म्हणजेच पुस्तक आहे…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जर तुम्हाला
यश मिळवायचेच असेल…
तर स्वत:च स्वत:वर
काही बंधने घाला.

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

जो माणूस प्रतिकूलतेतही
अनुकूलता निर्माण करतो…
तोच खरा माणूस…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

छंद आपल्याला जीवनावर
प्रेम करायला शिकवितात…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar
मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

प्रार्थना म्हणजेच
आपल्या मनाचे स्थान असते.

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

ज्या व्यक्तीने स्वत:चे मन जिंकले…
त्याने संपुर्ण जग जिंकले…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

आपले मित्र…
हे अगदी परिसा सारखे असावेत…
म्हणजे आपल्या जीवनाचे सोने होतेच…!

मराठी-प्रेरणादायी-सुविचार-sunder-vichar-suvichar

एखाद्या स्वार्थाची अपेक्षा ठेवून
सत्कर्म कधीही करु नयेत.

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

कुणाची जागा कोणीच भरत नाही
किंवा कुणामुळे एखाद्याचे दुःख
सरत नाही. पण तरी सोबतीच्या
जाणिवेने जगायला बळ मिळते.
आणि तेव्हाच तर खरे कोण कुणाचे
ते कळते….
नाही कुणी बोलले तर श्वास
थांबत नाही किंवा कोणाच्या बोलण्याने
मूठभर मास चढत नाही. पण तरी
चार शब्द आपुलकीचे आधार
देऊन जातात. मरगळलेल्या मनास
धीर देऊन जातात.

♦♦♦♦♦♦♦♦

काहीच अशक्य नाही
जे गेले ते सोडून द्या
जे आहे त्याचा स्वीकार करा
आणि जे घडवायचे आहे
त्यावर विश्वास ठेवा.

♦♦♦♦♦♦♦♦

मस्करी केली असे बोलून
अनेकदा
मनातले बोलुन जातात….

शत्रू हा यशस्वी माणसाच्या
वाट्याला येणारा वारसा आहे.
अपयशी माणसाचा
कुणीच हेवा करीत नाही.

♦♦♦♦♦♦♦♦

माणुसकी
बघितली तर दिसते
भेटली तर भेटते
केली तर कळते
मानली तर मिळते
ओळखली तर
शेवटपर्यंत राहते.

♦♦♦♦♦♦♦♦

अपेक्षा आणि विश्वास
यात फरक कमी आहे
अपेक्षा ठेवायची असेल
तर विश्वास कमवावा लागतो.

♦♦♦♦♦♦♦♦

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

जीवनात आपण सगळी पुस्तके
वाचू शकतो. पण कुणाच्या
मनातले पुस्तक कोणी
कधीच वाचु शकत नाही…

♦♦♦♦♦♦♦♦

हृदय हे जगातील सर्वात मोठे
सुंदर मंदिर आहे.
हसणाऱ्या चेहऱ्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
हसणाऱ्या हृदयावर
विश्वास ठेवावा. कारण
असे हृदय फारच कमी
लोकांजवळ असते.

♦♦♦♦♦♦♦♦

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

घरात डबा भरुन खिळे असतात.
त्यापैकी एक खिळा कॅलेंडर ला
भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो.
तो ठोकता ठोकता वाकडा होतो.
तर आपण तो वाकडा झालेला खिळा
फेकुन देत नाही.
बोटांवर हातोडीचे एक – दोन फटके बसले
तरी चालतील…. पण तोच वाकडा खिळा
सरळ करुन आपल्याला परत वापरायचा असतो.

हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी,
सहकार्यांशी सकारण – अकारण वाकडे झाले आहे.
ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर…?

खरचं आपण राग, लोभ, मद, मत्सर
सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध
टिकवण्यावर भर देऊ शकतो का….?
जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा….

सहज खिळा ठोकता ठोकता सुचल.

♦♦♦♦♦♦♦♦

नाती जपा | सुंदर विचार | Most Motivational Thoughts In Marathi
सोबतीच्या जाणिवेने जगायला बळ मिळते

Sunder Vichar | Suvichar
मराठी प्रेरणादायी सुविचार

अपेक्षा थोड्या असल्या की
समाधान जास्त मिळते.

♦♦♦♦♦♦♦♦

पाण्यातच वीज असते…
त्याला फक्त गतीची गरज असते.
ताकातच लोणी असते…
त्याला फक्त घुसण्याची गरज असते.
सुख सुद्धा माणसाच्या स्वतःजवळच असते
त्याला फक्त शोधण्याची गरज असते.
तसेच चांगुलपणा, प्रामाणिकपणा, आणि
दयाळूवृत्ती ही प्रत्येकालाच असते. परंतु
फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे…
आणि योग्य वेळी व योग्य लोकांसाठी
त्याच्या वापर करता आला पाहिजे.
ज्याला या गुणांचा वापर करता आला
तो समाजसेवक समजला बनला.

♦♦♦♦♦♦♦♦

दुसऱ्यांना त्रास देऊन….
जो स्वतःला मोठे समजतो,
तो कधीच मोठा नसतो….
तर जो स्वतः त्रास सहन करून
दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
निर्माण करतो.
तोच खरा मोठा होतो.
फक्त तो स्वतःला कधी
मोठे समजत नाही….!

♦♦♦♦♦♦♦♦

दगडाचे काळीज असलेल्या माणसांवर
जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर
दगड ठेवून जगायला शिका.

♦♦♦♦♦♦♦♦

काही लोकांना आयुष्यात
जास्त स्थान दिले की ती
कारस्थान करायला मोकळी होतात.

♦♦♦♦♦♦♦♦

सर्वांना
उपलब्ध असणाऱ्या माणसाला
कोणीही उपलब्ध नसते.

♦♦♦♦♦♦♦♦

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

सगळे महागले मात्र काडेपेटी
अजूनही एक रुपयावर ठाम आहे.
आग लावणाऱ्यांची किंमत
कधीच वाढत नसते.

♦♦♦♦♦♦♦♦

काटे पेरून प्रत्येकालाच
गुलाब हवा असतो.

♦♦♦♦♦♦♦♦

जीवनात काही गैरसमज
इतके मनाला टोचतात की
नकळत सुंदर नाते सुद्धा
तुटून जातात.

♦♦♦♦♦♦♦♦

आयुष्य म्हणजे अनुभव…
प्रयोग…. अपेक्षा…. यांचे
समीकरण आहे.
कालचा दिवस हा अनुभव होता….
आजचा दिवस हा प्रयोग असतो…..
उद्याच्या दिवस ही अपेक्षा असते.

♦♦♦♦♦♦♦♦

माणसे वाचता आली की
आयुष्यातले सगळे प्रश्न्
सुटू लागतात.

♦♦♦♦♦♦♦♦

प्रयत्न करून चुकलात तरी चालेल
पण प्रयत्न करण्यास कधीही चुकू नये.
कारण हिम्मत नाही तर किंमत नाही
विरोधक नाही तर प्रगतीही नाही.

♦♦♦♦♦♦♦♦

वाघ आणि हरणाच्या शर्यतीत
बहुतेक वेळेस हरिण जिंकतो.
कारण वाघ भुकेसाठी पळतो…
हरिण जीवासाठी…!
उद्दिष्ट गरजेपेक्षा महत्त्वाचे असते…

♦♦♦♦♦♦♦♦

न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून
दुखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे
त्यात आनंदात जगणे म्हणजे खरे आयुष्य होय.

♦♦♦♦♦♦♦♦

Sunder Vichar | Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे
लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत
साथ देऊन चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधीच विसरू नका.
त्या साठी ठाम राहायला शिकावे.
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते….!

♦♦♦♦♦♦♦♦

माणसांचा संग्रह करणे इतकेही सोपे नसते…
जितके पुस्तकांचा संग्रह करणे…. कारण
पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची
गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह
करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते…

♦♦♦♦♦♦♦♦

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात सावली म्हातारपणात शरीर
आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा
कधीच साथ देत नाहीत… साथ देतात…
ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसेच….!

♦♦♦♦♦♦♦♦

जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर
हास्य फुलवू शकते तीच तुमच्या
आयुष्याला अर्थ देऊ शकते.

♦♦♦♦♦♦♦♦

स्वाभीमानाने स्वीकारलेला एकटेपणा
लाचारीच्या सहवासापेक्षा कधीही
योग्यच असतो…

♦♦♦♦♦♦♦♦

माणसे जोडणे यापेक्षा आता
माणसे ओळखणे जास्त महत्वाचे
वाटत आहे…!

♦♦♦♦♦♦♦♦

जीवन आहे तर स्वप्न आहे…
म्हणून प्रवासात वेळ महत्त्वाची नाही
जीवन महत्त्वाचे आहे. कारण….
घड्याळाचे काटे थांबले तर सेल टाकून
सुरू करता येईल. परंतु…
हृदयाचे ठोके थांबले तर जगातल्या
कुठल्याही सेलने सुरू करता येणार नाही.

♦♦♦♦♦♦♦♦

बळ आल्यावर प्रत्येक पाखराने
आभाळात जरूर उडावे. पण ज्या
घरट्याने आपल्याला उब दिली
ते घरटे कधी विसरू नये…

♦♦♦♦♦♦♦♦

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते
दुःखाचे काटे टोचतानांही खळखळून हसावे
लागते. जीवन यालाच म्हणायचे असते.
दुःख असूनही दाखवायचे नसते मात्र
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी
हसायचे असते…

♦♦♦♦♦♦♦♦

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here