नमस्कार मित्रांनो, त्यांच्यासोबत असे वागा.. जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
एक वेळ अशी येईल तेच तुमची आस धरतील. Act like this
only those who ignore you will crave for you.
Heart touching motivational and inspirational
speech for breakup.
एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते. तुमच्याकडे
लक्ष देत नाही. तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच
फरक पडत नाही…! तर नेमके काय करायचे.
त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो… याचे त्या व्यक्तीला
काहीच पडलेले नसते. त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने वागायचे….?
आपण कसे वर्तन ठेवायचे.
असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील
जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत
असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले…? तू माझ्याशी
का बोलत नाही….? माझे काय चुकले…? जर असे पुन्हा पुन्हा विचारत
जाल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल…. म्हणजेच…. माझ्याशिवाय याच्या
आयुष्यात काहीच नाही. मी कसाही वागलो… तरी हा माझ्याकडे येणार…
असे त्याला वाटत राहते. आणि तो जास्त भाव खातो. म्हणून तुम्ही त्याला
जास्त भाव देणे प्रथम बंद करा. तुम्ही बिझी व्हा… स्वतःला कामांमध्ये गुंतवून
ठेवा. तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल.
हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का…? असे केल्याने
तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल. आपली
किंमत आपणच वाढवायची आहे. त्या व्यक्तीला दाखवून द्या की….
मी ही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काही अडत नाही.
Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी
अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही.
पण आपल्या भल्यासाठी करावाच लागेल. तुम्हाला किंमत देत नसेल….
तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच लागेल. आणि हा बदल तुमच्या
नेहमी हिताचाच असतो.
हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल. तुम्ही
तुमची किंमत कमी करून घेऊ नका. तू कुठे होतास…..? मला का
सांगितले नाही…? मला विचारले का नाही…? असे प्रश्न विचारून तुम्ही
त्याला जास्त भाव अजिबात देवू नका.
त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ करू नका. यामुळेही
ते तुम्हाला इग्नोर करत असतात. जर एखादी गोष्ट त्याला आवडत
नसेल तर करू नका. तुम्ही परिस्थिती नुसार तुमचे वर्तन ठेवा.
तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही… तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात
काही अर्थ नाही. असे बोलणे प्रथम बंद करा.
असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील
यासाठी तुम्ही तुमच्या मध्ये बदल करा. स्वतःला महत्त्व द्या. तेव्हाच
समोरची व्यक्ती तुम्हाला ही महत्व देईल. स्वतःमध्ये बदल घडवा.
आपण कुठे चुकतो… आपण काय केले पाहिजे… यावर काम करा
आणि तुमच्या चुका दुरुस्त करा. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा.
ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो… त्या गोष्टी नक्की करा.
आणि आनंदी राहा. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा. त्यामध्ये
तुमचा वेळ घालवा. तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा
प्रयत्न करा.
तुम्ही दुसऱ्याचे नाही…. तर तुमचे दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे…
एवढे परफेक्ट स्वतःला बनवा. आणि महत्त्वाचे म्हणजे एटीट्यूड
मध्ये जगायला शिका.
नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. असे जगा की…
समोरच्याला आपल्याकडे बघून जगायची इच्छा झाली पाहिजे.
तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा. तुमच्याकडे बघून वाटले
पाहिजे. याला कशाचा एवढा सुख आहे… की तो तेवढा आनंदी आहे….!
एवढे स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.
Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी
यासाठी स्वभावामध्ये बदल करणे मात्र फार महत्त्वाचे आहे.
ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि विचारात बदल कराल
त्यावेळेस समोरची व्यक्ती आपोआप बदलेल.आणि तुमच्या
मध्ये झालेला बदल तो व्यक्ती नक्की स्वीकारेल. आणि त्याच्याकडून
झालेल्या चुका तो नक्की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल.
जर त्याला गरज असेल तर तो त्याच्या कडून तुमच्या सोबत
असलेले नाते टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल.
असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील
sunder vichar in marathi –
अशी वाढवा स्वतःची किंमत….. तरच लोकं तुमचा
मानसन्मान करतील…

१. दिलेला शब्द मोडू नका.
आजच्या जगात खूप कमी लोकं असे आहेत जे स्वतः दिलेला
शब्द पूर्ण करतात. जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल
तर स्वतःला असे बनवा की लोकं लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला
तयार होतील. म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा.
तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच
पाहिजे. अशा व्यक्तींना लोकं खुपच महत्त्व देतात. व त्यांचा आदर करतात.
२. गबाळ्यासारखे राहाणाऱ्या व्यक्तीचा लोकं कधीच आदर करीत नाही.
जे लोकं स्वतः ला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोकं
वेगळ्याच नजरेने बघतात. म्हणून सगळ्यात आधी आपल्या
व्यक्तीमत्वात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा.
नेहमी चांगले कपडे घालून स्वतः ला प्रेझेंट ठेवा. तुम्ही कितीही ज्ञानी असले
तरीही सगळ्यात आधी लोकं तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात.
आणि जर आपला पेहरावच चांगला नसेल तर लोकं दुर्लक्षच करतात. आणि
मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही.
३. आपली कमजोरी कोणालाच सांगू नका.
एक मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले
दुःख एकटाच सहन करत असतो. पण आपल्या आयुष्यातले सुख
तो इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो.
अशी व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायक असते. कारण
हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो. आजकालचे लोकं
दुसऱ्यांमध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात. की आपण त्याची
कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू. त्याची खिल्ली
उडवू आपल्या आजूबाजूला असेच लोकं असतात. त्यामुळे आपण हे
लक्षात ठेवले पाहिजे…. की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच
कोणालाच कळता कामा नये. नाहीतर लोकं तुमच्या त्याच कमजोरीचा
फायदा घेतील.
४. कोणालाच घाबरू नका.
जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःचा मान वाढवून घ्यायचा असेल
लोकांनी आदर द्यावा असे वाटत असेल तर कधीच कोणाला
घाबरू नका. अशा वेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये
सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत. की कोणीच तुम्हाला मारू
शकत नाही. कोणीच तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. फक्त
तुम्ही कधीच चुकीच्या मागनि जाऊ नका. व चुकीचे कार्य करू नका.
हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात
कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाही आहे. व तुम्ही नेहमीच सत्य
आणि न्यायासाठी आणि खरे बोलण्यासाठी तयार आहात.
स्वतः ला मजबूत दाखवताल तरच लोकं तुम्हांला मान देतील.
निडर लोकांना समाजात नेहमीच आदर दिला जातो.
५. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा.
मानसन्मान त्याच व्यक्तीला मिळतो… जी व्यक्ती इतरांना
मानसन्मान देते. जर तुम्ही सगळ्यांबरोबरच भांडण.. तंटे…
करत बसलात तर समाजात तुमची प्रतिमा खराब होईल. आणि
कोणीच तुम्हाला मानसन्मान देणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट
आहे जी एका अज्ञानी किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा सगळ्याकडून
आदर मिळतो. जरी कोणी लहान असेल किंवा मोठे सगळ्यांसोबत
प्रेमाने राहा.
असे वागा…जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील
सगळ्यांशी बोलताना हसत हसतमुखाने आणि मनमिळाऊपणे बोला.
त्यामुळे सगळ्याच्या मनावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल. व प्रत्येक
जण तुम्हाला चांगल्या हेतूने लक्षात ठेवेल. व त्यांच्या मनात तुमच्याविषयी
खूपच इज्जत वाढेल.
६. प्रत्येक वेळी सर्वांसाठी उपलब्ध राहू नका.
तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल की एकाच ठिकाणी सारखे सारखे
गेल्यामुळे आणि दुसऱ्यासाठी लगेच हजर राहिल्यामुळे माणूस
स्वतःचा मान कमी करून घेतो.
असे असल्यावर लोकं तुम्हांलाकाहीच महत्त्व देत नाहीत. तेअसे समजतात
कि याला पाहिजेतेव्हा बोलवून घ्या. नाहीतर त्यालाबोलवायची गरज नाही आहे.
तो तर कायमच येतो. म्हणजे तुम्हाला कोणीच सिरीयसली घेत नाही.
आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट बघायला लावणे गरजेचे आहे.
तरच ते तुमची किंमत समजतात. आणि तुम्हाला मानसन्मान देतात.
७. सडेतोड उत्तर द्यायला शिका.
आज काल चे जग असे आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला
जातो. आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो… तर ती व्यक्ती मुद्दाम
तुम्हाला नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्नकरते. आणि मग त्यांना बघूनलोकं पण तुमची
मजा घ्यायलालागतात. असे झाल्यास आपणलगेच याला विरोध केला पाहिजे.
जर कोणी भांडण्याच्या आवेशामध्ये तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही
पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे.
त्यामुळे आपल्या वाट्याला कोणी जात नाही. आणि लोकांमध्ये आपल्याविषयी
भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहाते.
८. वेळेचा सदुपयोग करा.
जर तुम्हाला एक अप्रतिम व्यक्तिमत्व बनायचे असेल तर वेळ वाया घालवणे
बंद करा. आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोकं बघतो की जे खूपच
कडक शिस्तीचे जीवन जगत असतात.
त्यांची बरोबरी करणे कठीण आहे.पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया
घालवत असाल तर कोणीच तुम्हालापसंत करणार नाही. सगळेजण
तुम्हाला टोमणेच मारतील. म्हणूनरिकाम्या वेळेत असे काहीतरी काम
करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काहीतरी फायदा होईल.
९.यशस्वी बना.
जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोकं स्वतःहूनच तुमचा
आदर करतील. मग तुम्हालाकोणाकडूनच जाणून घ्यायची गरज
नाही की आपला मानसन्मान कशा वाढवायचा. कारण आजच्या जगात
लोकं फक्त सक्सेसफुल लोकांचाच आदर करतात.
तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले… तरीही जोपर्यंत तुमच्याकडे
एखादी चांगली नोकरी नाही… किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाहीं..
तुम्ही यशस्वी होत नाही. तोपर्यंत लोकं तुम्हाला विचारणार पण नाही. त्यामुळे
आजच्या तरुण पिढीने आपल्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोकं तुम्हाला मानसन्मान देतील.
१०. आपले कौशल्य जगाला दाखवून द्या.
काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्याने
सगळे जण माझे नाव काढतील. पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न
कोणीच करत नाही. हो हे खरे आहे. लोक इज्जत करतात ते
फक्त माणसामध्ये असलेल्या प्रतिभेची… माणसाची नाही….!
ते जग कधीचेच गेले… ज्यावेळीमाणसांचा आदर केला जात होता.
आत्ताच्या जगात फक्त माणसामधल्या प्रतिभेचा आदर केला
जातो. आजच्या जगात लोकाकडून आदर मिळवायचा असेल तर
तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुम्ही लोकांना दाखवूनच दिली पाहिजे.
तरच लोकं तुम्हाला मानसन्मान देतील. त्यामुळे तुमच्या मध्ये जेवढे
पण चांगले गुण आहेत आणि काही करून दाखवण्याची क्षमता आहे
तर तुम्ही लोकांना दाखवून द्या. मगच लोकं तुमचा आदर करतील.
असे वागा…जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील
हे मराठी प्रेरणादायी सुविचार – सुंदर विचार आणि पन्नासपेक्षा जास्त मराठी कोटस एकदा नक्की वाचा.
50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी | Sunder vichar
Hello my loved one I want to say that this post is amazing great written and include almost all significant infos I would like to look extra posts like this
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back