एक सुंदर बोधकथा | देण्याचे महत्व | Moral Story in Marathi

2
1477
एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - vb thoughts
एक सुंदर बोधकथा | देण्याचे महत्व
Moral Story in Marathi – Bodh Katha
एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - vb thoughts
एक सुंदर बोधकथा – देण्याचे महत्व – Moral Story in Marathi – vb thoughts

एक सुंदर बोधकथा  

एक व्यक्ती मागील दोन दिवसा पासुन वाळवंटात हरवला होतात्याच्या जवळचे पाणी आणि जेवण संपले 
होते. आता त्याची परिस्तिथी अशी होती कि जर का त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचे मरण निश्चित 
होतेयाची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल 
तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होतात्याची नजर जीव वाचवण्यासाठी पाणी शोधत होती
तेवढ्यात त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झोपडयावर गेलीतसाच तो थबकला.
त्याला वाटले हा भास तर नाही

नाहीतर मग नक्की हा मृगजळ असेलपण काही असोतिकडे जाऊयाकाही असेल तर मिळेल असा विचार 
करत पाय ओढत स्वतःचे थकलेले शरीर घेऊन तो निघालाकाही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो 
भास नव्हताझोपडी खरोखरच होतीपण ती झोपडी रिकामी होती,  त्या झोपडीत कोणीच नव्हते आणि 
झोपडीला बघितल्यावर असे वाटत होते कि बऱ्याच दिवसांपासूनकदाचित वर्षांपासून तिथे कुणीही 
आलेला नाही.

एक सुंदर बोधकथा – देण्याचे महत्व – Moral Story in Marathi – Bodh Katha

 

आता हा पाणी मिळेल या आशेने तो आत शिरलाआणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाचमाणूस मागतो
एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली होतीतिथे बोरिंग ( एक हातपंप ) होता आणि

त्याचा पाईप जमिनीत शिरला होतात्याच्या लक्षात आले की जमिनीखाली पाणी आहे.

हा पाईप तिथेच गेलायत्याच्या अंगात एकदम उत्साह संचारलापुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात
वरखाली करायला सुरवात केलीपण पाणी काही येइनापाण्याचा एक थेंब हि आला नाही,
नुसतात पंपाचा फक्त आवाज येत राहिलाअखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला

आता त्याला आपले मरण जाणवत होतेत्याला आता वाटायला लागले की आपले मरण निश्चिंत आहे
आणि तेही इथेच आहेअसा विचार करत तो भगवंताची आठवण करीत वर बघायला
लागलातसेच त्याचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेले.

परत… एक अत्यानंदाची लहर उठलीबाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून
व्यवस्थित सिल केलेली होतीचटकन तो पुढे सरकलात्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात
बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेलेत्यावर लिहिले होते…

 ह्या बाटली मधील पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचे काम

 झाल्यावर ही बाटली परत पाण्याने भरून ठेवायला विसरू नका.

कागदावरील सुचना वाचून त्याचा डोका चक्रावला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले. काय करावे..?
या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळे व्हावे…की सुचनेप्रमाणे करावे…?
त्याला काही समजत नव्हते. तो विचारात पडला कीसमजा… सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतले आणि…. 
पंप खराब असेल तर…पंपाचा पाईप तुटला असेल तर…खालचे पाणी आटून गेले असेल तर…?
पाणी वायाच जाईल… सगळा खेळ खल्लास… पण… सुचना बरोबर असतील तर…तर मग… 
भरपूर पाणीच पाणी…  

पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.  
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतलेडोळे मिटून देवाचा धावा केला 
आणि पंप वरखाली करायला सुरवात केलीहळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच
पाणी यायला सुरवात झाली.  पम्प मध्ये भरपूर पाणी यायला लागले,
त्याला काय करू नी, काय नको करू,असे झाले. तो ढसाढसा पाणी प्यायला लागला.
मनसोक्त पाणी प्याला. आणि स्वतः जवळच्या सगळ्या बाटल्या पण काठोकाठ भरल्यातो खुप खुश झाला 
होताआणि त्याचे मन ही आता शांत झाले. पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले.
 तो त्या परिसराचा नकाशा होतात्यावरून सहज लक्षात येत होते की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर
होतापण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होतीत्याने निघायची तयारी
केलीसुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.  
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.  

विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता… पाणी येतोच 

आणि तो पुढे निघाला

तात्पर्य…

ही गोष्ट आहे देण्याचे महत्व सांगणारी
काही मिळवण्यासाठी काही द्यावे लागते हे अधोरेखित करणारी
काही दिल्यानंतर मिळते ते भरपूर असते आणि खूप आनंददायी असते
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगतेविश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारलीया गोष्टीतले पाणी म्हणजे… 
आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.  त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या मोबद्ल्यात कितीतरी

जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here