life changing motivational story –
रागावर नियंत्रण – सुंदर प्रेरणादायी मराठी कथा
एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट
आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध
झाले की संतापायचा. एके दिवशी
वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी
दिली आणि म्हणाले… यात हातोडी
आणि खिळे आहेत. तुला राग आला
की… तू सरळ जायचे आणि घराला
कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे…
त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा.
पहिल्याच दिवशी त्याने पस्तीस खिळे
ठोकले. पुढच्या काही दिवसात तो
रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला.
त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या
जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी
झाली. पण त्याला जाणीव झाली की…
रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर
नियंत्रण ठेवणे सोपे आहे.
life changing motivational story,
रागावर नियंत्रण, मराठी कथा
एक दिवस असा उजाडला की त्या
मुलाला एकदाही राग आला नाही
आणि खिळा ठोकण्याची वेळ
त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट
वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे
कौतुक केले आणि सांगितले की आता
तू राग आवरलास की प्रत्येकवेळी
तिथला एक खिळा काढायचा.
मुलगा त्याप्रमाणे करू लागला.
एके दिवशी तेथे एकही खिळा
उरला नाही. मग त्याने ही बाब
वडिलांना सांगितली. रागावर
नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे
वडिलांनी कौतुक केले.
मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी वडील
त्याला घेऊन त्या भिंतीपाशी गेले. त्याला
म्हणाले…. “हे बघ, तू रागावर नियंत्रण
मिळवलेस… ही गोष्ट चांगलीच आहे.
पण… बघ भिंतीवरील हे छिद्र तशीच
राहणार आहेत.
आपण रागात… काहीतरी बोलून जातो
आणि दुसऱ्याच्या मनावर असेच
ओरखडे उठतात. नंतर शांत झाल्यावर
आपल्याला चूक कळते. पण दुसऱ्याच्या
मनावरील ओरखडे तसेच राहतात.
तू भिंतीवरील खिळे काढलेस पण
दुसऱ्याच्या मनावर झालेले ओरखडे
कसे मिटवणार….?” “लक्षात ठेव….
रागाच्या भरात कधीही दुसऱ्याला बोलू
नकोस. जेणेकरून राग विसरल्यावर
तुला खेद व्यक्त करावा लागेल.”
Good Thoughts In Marathi | Suvichar | नाती | सुंदर विचार
आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात.
तोडणे हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणे
हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो…!
आयुष्य खुप सुंदर आहे.
पाच सेकंदाच्या छोट्याश्या
स्माईल ने जर आपला….
फोटो छान येत असेल….
तर जरा विचार करून पाहा…
“नेहमी स्माईल केले तर आपले
आयुष्य किती सुंदर दिसेल…
🙏😊🙏👍
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
।।सदैव हसत रहा।।
एक सुंदर बोधकथा | देण्याचे महत्व | Moral Story in Marathi
life changing motivational story
रागावर नियंत्रण | सुंदर प्रेरणादायी मराठी कथा |
राग आल्यावर असे वागा | थोडेही नुकसान होणार नाही | How To Control Anger
राग….!!
राग आल्यावर असे वागा
थोडेही नुकसान होणार नाही
रागावलेले लोक सहसा काही
जवळच्या लोकांना वाईट बोलत
असतात. मात्र…. राग शांत
झाल्यानंतर त्यालाही आपल्या
कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो.
राग ही नैसर्गिक क्रिया आहे. पण
अनेकवेळा राग आपल्याला नको
असतांनाही राग आवरत नाही.
रागामुळे आपले कामच बिघडते
तर काही लोकांमधील नातेही बिघडते.
म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी विचार
करून बोलावे असे म्हटले आहे.
life changing motivational story, रागावर नियंत्रण, मराठी कथा
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार
व्यक्तीने परिस्थितीनुसार स्वतःला
बदलले पाहिजे. अनेकवेळा आपल्याला
राग आल्यावर काय करावे हे समजत
नाही. त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या
जातात. जास्त राग आल्यास चाणक्य धोरण
तुमच्यासाठी उत्तम मार्गदर्शन ठरू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही
व्यक्तीने विचार करूनच बोलावे. केव्हा…
काय आणि कसे बोलावे हे समजून घेणे
महत्वाचे आहे कारण नंतर बोललेले शब्द
परत घेता येत नाहीत. चाणक्याच्या
म्हणण्याचातात्पर्य असा आहे की वाणीच्या
सहाय्याने माणसाच्या मनात आदर निर्माण
करता येतो. अनेकवेळा असे घडते की
रागाच्या भरात काहीतरी चुकीचे बोलून
नंतर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते.
माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याला
कळत नाही किंवा उलट आपण बोललेले
विषारी शब्द, काय बोलले जात आहे…
हे त्याला कळत नाही. तेव्हा त्याच माणसाचा
राग शांत होतो आणि त्याला त्याने सांगितलेले
शब्द आठवतात तो पश्चाताप करू लागतो.
म्हणूनच असे म्हणतात की, बोलताना नेहमी
बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. बोलतांना ते
काय बोलत आहेत आणि त्याचा परिणाम
काय होणार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.
लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
life changing motivational story, रागावर नियंत्रण, मराठी कथा
आचार्य चाणक्य असेही म्हणतात की…
कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया
देऊ नये. कुणी काही बोलले तर आधी
त्याचा विचार करायला हवा. तत्काळ
प्रतिसाद दिल्यामुळे अनेक वेळा
आपल्याला योग्य शब्द वापरता येत
नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर
चुकीचा परिणाम होऊ शकतो.
शांत राहण्याचा थोडा प्रयत्न करा…
मित्र-मैत्रिणींनो राग हा प्रत्येकाला
येतो पण रागामुळे फक्त आपले
नुकसानच होत असेल तर थोडे
शांत राहिला काय हरकत आहे
शांत राहिल्याने आपली नाती
टिकतील. आपले व्यक्तिमत्व
खराब होणार नाही. त्याचबरोबर
आपल्यावर पश्चातापाची वेळ येणार
नाही. आणि मनस्तापही होणार नाही.
41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
राग आल्यावर असे वागा | थोडेही नुकसान होणार नाही | How To Control Anger
life changing motivational story, रागावर नियंत्रण, मराठी कथा
Your Quaries :- रागावर नियंत्रण,सुंदर कथा,प्रेरणादायक कथा,मराठी स्टोरी,marathi katha,marathi story,motivational story in marathi,inspirational story in marathi,vb good thoughts,vijay bhagat,मराठी story,कथा लेखन मराठी,प्रेरणादायी मराठी कथा,how to control anger in marathi,control your anger,how to,rag yene,राग,राग आला तर काय करायचे,राग कसा कंट्रोल करायचा,#Marathi,marathi motivational speech,marathi motivational videos,marathi success,happy life,#suvichar
सुंदर सोपे सुविचार | Good Thoughts In Marathi