किर्तनात सांगितलेला सुंदर दृष्टांत | Sunder Vichar | वारकरी बाबा
९० वर्षाचा एक गरिब वारकरी म्हातारा बाबा
त्याच्या गुडघ्या पर्यँत धोतर… गळ्यात पविञ तुळशीची माळ
डोक्याला फेटा बांधलेला आणि कपाळाला गोपी चंदनाचा टिळा.
या म्हाताऱ्या बाबाची भगवान पांडुरंगावरती निस्वार्थ
श्रद्धा होती पण बाबांना भक्तिचा गर्व अजिबात नव्हताच…
असे हे म्हातारे वारकरी बाबा.
एकदा बाबा रस्त्याने जात असतांना एक राजा मोठया थाटात
देवीची पुजा करत होता. हजारोंच्याच्या संख्येत लोकं गोळा
झालेले होते…
आजूबाजूला भालदार… चोपदार… उभे होते. त्या ठिकाणी हे
वारकरी बाबा आले आणि नित्यनेमाप्रमाणे म्हाताऱ्या वारकरी बाबाने
वाकुन राजाला नमस्कार केला…!
रामराम राजा साहेब…
राजाने वर पहिले आणि म्हणाला….
रामराम…. रामराम…. बाबा, पंढरीचे वारकरी का तुम्ही…?
बाबा म्हटले…. होय राजा साहेब…
राजा म्हणाला….
काय आहे बाबा तुमच्या देवाजवळ एक पितांबर आणि तुळशीची माळ…
त्यावर त्याचे तुम्ही दरिद्री भक्त….
बाबा… आमची देवी बघा…. पायापासुन तर डोक्यापर्यँत कशी
सोन्याची आहे.
म्हाताऱ्या बाबाला पांडुरंगाचा केलेला हा अपमान सहन झाला नाही…
आणि बाबा राजाला म्हणाले….
हे राजा साहेब… आम्ही ज्याचे भक्त आहोत ना त्याचे पूर्ण नगरच
सोन्याचे आहे… आणि ज्या देवीची आपण एवढी बढाई करीत
आहात ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात झाडपुस
करायला आहे.
बाबाचे हे बोलणें एकताच राजा एकदम चकीत झाला…
आणि म्हणाला… म्हातारे बाबा… जर का नगर सोन्याच आणि
देवी झाडपुस करायला नसली तर भर सभेत तुमचे मुंडके
उडवल्या जाईल.
त्यावर वारकरी बाबा म्हणाले… जर का नगर सोन्याच आणि देवी
झाडपुस करायला असली तर आपण काय कराल राजा साहेब…?
राजा म्हणाला…. जर का हे खरे असेल तर…
आयुष्यभर खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारी करीन.
आणि मग राजा आणि वारकरी बाबा निघाले पंढरपुरला.
वारकरी बाबा भगवंताला विनवनी करु लागले
हे पांडुरंगा… १० वर्षाचा होतो तेव्हापासुन न चुकता तुझी
वारी करतो. आजवर आयुष्यात कधीच सुतळीचा तोळा सुद्धा
मागितला नाही रे तुला… पण आज राजाने मला दुःखी केले आहे
त्याच्या करिता फक्त….
ह्या दोन गोष्टी पंढरपुरात तयार ठेव….!
एक नगर सोन्याचे आणि दोन देवी झाडु घेऊन
उभी ठेव.
ईकडे राजाच्य मनात कुजबुज चालु होती…
कसा असेल हा सोन्याचा नगर पंढरपुर… आणि
पाहता पाहताच पंढरपुर जवळ आले…
आणि वारकरी बाबा म्हणाले…
राजा साहेब हे जे दिसत आहे ना… हेच पंढरपुर आहे…!
राजाने टाका उंच करुन बघितले तर…
काय दिसले राजाला…
झळझळित सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ।।
बरवे बरवे पंढरपुर । विठोबारायाचे नगर ।।
माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ।।
आणि राजा म्हणाला…
खरे आहे बाबा तुमचे नगर सोन्याच आहे.
आणि नंतर पुढे चंद्रभागेतुन आंघोळ करुन नामदेव
पायरी जवळ आले.
राजाने वर पाहायच्या आत महाद्वारात झाडु घेऊन
उभ्या असलेल्या देविनेच विचारले…
राजा ईकडे कुठ रे…
राजा म्हटला
आई तु ईकडे कुठे…
अरे राजा ही झाडपुस करायची सेवा रोज माझ्याकडे आहे.
आणि वारकरी बाबाच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागले…
राजा म्हणाला….
वारकरी बाबा तुम्ही सांगितलेले खरे आहे…
तरीपण तुम्ही का रडत आहात…?
वारकरी बाबा म्हणाले….
राजा साहेब ८० वर्ष झालेत… पंढरीची न चुकता वारी करतो पण…
अजुनही मी सोन्याचे नगर आणि झाडु घेऊन देवी उभी पाहली नाहि…
पण आज या भक्ताची लाज राखण्याकरिता माझ्या पांडुरंगाने
या दोन्ही गोष्टी इथे तयार ठेवल्या म्हणुन रडतो…. राजा साहेब……
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरु ।।
पढिये देहभाव पुरवी वासना । अंती ते आपणापाशी न्यावे ।।
तात्पर्य : भक्ती करा पण त्या भक्तिचा अहंकार करु नका आणि
समोरच्या व्यक्तिच्या श्रद्धेत असलेल्या देवतेचा अपमान आणि
त्या श्रद्धेपोटी असलेल्या त्याच्या मनातील
भावना कदापी दुखऊ नका.
राम कृष्ण हरी…