निरोप | Marathi Social Poem | Lock down वर मराठी कविता

0
919
निरोप - Marathi Social Poem - निरोप - Lock down वर मराठी कविता - Good Thoughts In Marathi - suvichar - vb
निरोप - Marathi Social Poem

निरोप – Marathi Social Poem – Lock down वर मराठी कविता – Good Thoughts In Marathi

निरोप - Marathi Social Poem - निरोप - Lock down वर मराठी कविता - Good Thoughts In Marathi - vijay bhagat - vb - suvichar

 

चिमणीला झाडावर स्वच्छंद फिरतांना बघून… आज मानवाचे मन आले भरुन…!
पूर्णपणे मुक्त  ह्या जगात आणि बंदिस्त मी स्वत:च्याच घरात…?

नजरानजर होताच चिमणी ही आली खिडकीवर.
काय रे दादा…शेवटी झालेय तरी काय…?
दहा दिवसा पासुन बघतेय… कुणीच घराबाहेर पडतच नाय…!

ईवलासा जीव आमचा घाबरुन जायचा…!
कर्ण कर्कश आवाजाने दचकून उडायचो…!
पण आता मात्र फक्त आमचाच चिवचिवाट ऐकायला येतो…!

खूप छान वाटतेय रे दादा स्वच्छ हवेत उडायला…!
पण पूर्ण जग जिंकायला निघालेला तू…! का रे दादा झालास  हताश…?
स्वत:च्याच घरात बंदिवान झालास…?

कसे आणि काय सांगू तुला चिमणे, अवघडच झालय गं आता जगणे…!
विज्ञानाची धरुन कास… जग जिंकण्याची होती आस…!

होती मनात इर्ष्या आणि चढला होता माज…
फक्त आपलीच सगळी पृथ्वी… आपणच करुया राज…!
तळे बुजवून… डोंगर फोडून… निर्सगाचा केला ऱ्हास…
कधी वाटलेही नव्हते की… होऊ शकेल असाही त्रास…!

स्पर्शाला लोटुन मायेच्या… दूर रमलो आभासी जगात
पैश्यामागे धावतांना जगत होतो भ्रमात…!
चुकीची शिक्षा आमच्याच… आता आम्ही भोगतोय….

न दिसणारा एक सुक्ष्म विषाणू… मानवालाच संपवतोय…!
जग सारे झालेय हतबल… त्याच्या अस्तित्वाने
बंदिस्त केलेय आम्ही स्वत:ला….. स्वत:च्याच घरात नाईलाजाने.

निघालाय तो केवळ स्पर्शाने मानवाला संपवायला….
आम्ही आता पूर्घाणपणे घाबरलोय… स्पर्श कुणालाही करायला
सगळ्यांची काळजी आता लांबूनच करतो…! असो नातवंड की आजी – आजोबा

फक्त अंगठ्याच्या स्पर्शाने पूर्ण जग… आले होते आमच्या मुठीत
पण मन आता आसुसलेय… घेण्या जिवलगांना मिठीत…!

चिमण्या पाखरा जा रे… माझ्या जिवलगांना निरोप दे…!
घ्या रे स्वत:ची काळजी…. महत्त्व द्या केवळ सुरक्षित जगण्याला…
केवळ सुरक्षित जगण्याला…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here