चेतन आणि अवचेतन मन | Body mind spirit | Marathi Information

0
671
body-mind-spirit-marathi-information-vijay-bhagat-vb-good-thoughts
body-mind-spirit-marathi-information

अवचेतन मन – आपल्याला कुठलाही आजार
का होतो. तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे.
तो आपण स्विकारल्यामुळे…!

पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती मनुष्याच्या शरीरात आहे. तरीही माणसाचा पाण्यात बुडून
मृत्यू होतो. आता याला तुम्ही काय म्हणाल…? आपल्या मनाने अतिशय ठामपणे स्विकार केले आहे की…
मला पाण्यात पोहता येत नाही. तसेच दुसऱ्या कोणालाही पाण्यात पोहायला येत नाही हा लोकभ्रम आहे.

बघा हत्ती किती भारी असतो, तो ही तर पाण्यात पोहतोच ना…! कारण कि त्याला चांगल्या प्रकारे माहित
आहे की तो पाण्यावर तरंगणार…! त्याने असे काही ठरवलेले नाही की, मी पाण्यात पोहणार…
त्याला त्याचा ठामपणे विश्वास आहे.

एक सापाला बघा, सापाला हाथ-पाय नसतात… तरीही तो पाण्यात पोहतोच न…! म्हणजेच आपण
हात पाय लावल्यावरच पाण्यावर तरंगू किंवा पोहू शकतो.. मग हा ही तर गैरसमजच आहे.

आता बघा जो माणुस किंवा कोणताही प्राणी घ्या… जर त्याचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास काही वेळाने
त्याचे शरीर पाण्यावर तरंगायला लागतेच.

चेतन आणि अवचेतन मन 

अशाच प्रकारे आपल्या शरीरात सुद्धा एक प्रतिकारशक्ती आहे. जी आपल्याला कुठलाही आजार होवू
नये यासाठी सतत कार्यशील असते. या प्रतिकार शक्ती ला मनापासून ठामपणे मान्य करा. या शक्तीचा
वापर करा हेच खरे शरीरशास्त्र आहे.

जर का ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीही करू शकत नाही. थोडा ताप आल्यावर,
सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर, किंवा कसलाही आजार झाल्यावर थोडेसे थांबा. या आजारावर
तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

अशा छोट्या – मोठ्या आजारासाठी खूप औषध खाणे, एक प्रकारे आपल्या शरीरावर अत्याचार
करण्यासारखे आहे. तसाच हा एक लोकभ्रम ही आहे. शरीर शास्त्रात खरे विज्ञान म्हणजे नैसर्गिक
प्रतिकारशक्तीच आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्यापेक्षा जास्त आजारांच्या मागे आपले अवचेतन मन असते. पण याची माहिती
खुपदा रोग्याला नसतेच. आपण डॉक्टरांकडे जातो, आणि उपचार घेतो, उपचार घेतल्यावर तात्पुरते
बरेही वाटते, पण काही दिवसांनी पुन्हा तेच दुखणे उफाळून येते, काय करावे आणि काय नाही..
ते समजत नाही.

काही लक्षणे आपले मन आणि शरीर यांना जोडणारी बघूया :-

एखाद्या गोष्टीची खूपच जास्त चिंता किंवा भिती वाटली की गळ्याला कोरड पडते.
कामाचा, परीक्षा किवा इतर कसलाही तणाव असेल तर पोटात गोळा येतो.
आपण काही क्षणासाठी अपघाताने बचावलो किंवा आपल्या समोर एखादा अपघात, एखादी
दुर्दैवी घटना पाहिल्यावर आपले हात पाय सुन्न झाल्यासारखे वाटतात. किंवा सुन्न होतात.

तसेच याउलट नेहमी हसत असणारी हसमुख व्यक्ती एखादे वेळीच आजारी पडते.

आता हे तर चांगल्या प्रकारे समजले आहे की आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात
मनाचे वर्चस्व किंवा प्रभाव आहेच. समजा हवा आली आणि धूर उडल्यावर लगेच, सेकंदा पेक्षाही
कमी वेळात आपल्या पापण्या मिटतात. आपले अवचेतन मन खूप शक्तीशाली आहे पण ते एखाद्या
सेनापतीसारखे… त्याच्यावर सत्ता चालते विचारांची…! जरी तो खूप शक्तिशाली असला तरी तो
एक प्रकारे ताबेदारच…! त्याचे काम फक्त दिलेला आदेश पाळणे एवढेच…!
आपले विचार म्हणजेच आपण जे काही बोलतो तेच आहेत.

1) डोकेदुखी :-

खूप स्त्री किंवा पुरुषांना रात्री डोक्यावर बाम लावल्या शिवाय झोप येत नाही.

काय कारण असेल…?

ह्या माणसाला पहिले की माझे डोकेच दुखते…!
या माणसाने माझे खूप डोके खाल्ले…!
ह्यांच्या समोर तर तुम्ही कितीही आपले डोके फोडा, काहीही फायदा होणार नाही…!

कळत – नकळत सतत असे बोलत राहिल्यास आपल्या अज्ञ मनात निरोप जातो की, आता माझ्या
डोक्याला दुखायचे आहे. आणि त्रीव डोकेदुखी (अर्धर्शिशी) चा त्रास सुरु होतो.

तसे डोके दुखीची इतरही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक अप्रिय
घटना घडलेलीच असते. पण त्या घटनेला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा आठवण्याचा स्वभाव असेल
तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा अश्या वाईट अनुभवांना विसरुन जाणेच चांगले.

कधी-कधी नकोसे वाटणारे काम, किंवा त्रासदायक कामाची जवाबदारी आपल्यावर येऊन पडते…
आणि डोके दुखायला लागते. आपण जेवढा कामाला पुढे ढकलतो तेवढा त्रास वाढतो… म्हणून
अशी कामे त्याचवेळी करून मोकळे व्हायचे.

2) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार :-

एखादे व्यक्ती नेहमी – नेहमी अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल की…

त्याला पहिले कि माझे रक्त खवळायाला लागते.
ह्या माणसासाठी मी आपल्या रक्ताचे पाणी केले… आणि हा माणुस बदललाय…!
माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते…!

कधी काळ अशी वाक्ये वापरली गेली तर काही हरकत नाही, पण… पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि
जर का हे आपल्या अवचेतन मनास गेल्यास याचा विसंगत परीणाम शरीराच्या रक्ताभिसरणावर नक्कीच
होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध – उपचाराने काहीकाळ बरेही वाटते, पण अवचेतन मन त्याचा पाठलाग करणे
काही सोडत नाही.

अशा प्रकारची वाक्ये सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच
त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

थोडक्यात सांगायचे तर नेहमी मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणाऱ्याला हृदयाचे रोग
लवकरच होतात.

3) आतड्यांचे विकार :-

जो व्यक्ती स्वतःलाच दोषी समझून टाकुन बोलतो, स्वतःला खूप कमजोर समजतो, जीवनात कोणतेही
अपयश आल्याश स्वतःला हीन समझोतो… त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या निर्माण होते.

4) अपचन :-

अपचन च्या आजाराचा त्रास खूप लोकांना आहे. खरेतर मलविसर्जन ही नैसर्गिक आणि अतिसहज क्रिया
आहे, तरीपण काही लोकांना पोट साफ होण्यासाठी कृत्रिम उपायांचां, जसे की एखादे चुर्ण किंवा औषध
ह्यांची मदत घ्यावी लागते.

ह्याची ही खूप कारणे आहेत… हा एक उदाहरण बघूया…

 Marathi Information

खुपदा याचे एक कारण आपल्या लहानपणीच्या सवयीत सापडते. लहानपणात मस्ती किंवा
चूक केल्यास कडक शिस्तीच्या नादात, आई -वडलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते.

त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मुले आई – वडीलांवर राग काढु शकत नाही.

आपल्या आई – वडिलाने सांगितलेली गोष्ट मनात नसतांनाही, मुलाला मान्य करावीच लागते.

याचा राग म्हणून ही क्रिया तो थांबवून ठेवतो.

यासाठी आई वडील तर त्याला जबर – जोराई करुच शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा
काळ ही संपतो पण आपल्या आतड्यांवरचे नैसर्गीक नियंत्रण तो बळ हरवून बसतो.

असे ही आढळून आले की, एखाद्याला आर्थिक संकट आले, तेव्हा त्याची पचनशक्ती कमजोर झालेली होती.
तसेच जे लोक खूप बारीक वृत्तीचे, म्हणजेच एक प्रकारे कंजूष प्रवूत्ती चे होते, त्या लोकांमध्ये
मुळव्याध्याची समस्या जास्त आढळली.

5) जठर आणि पित्ताशय :-

एखादी व्यक्ती लहान लहान गोष्टींवरही वेळोवेळी रागाला येते, चिडते, आणि लवकरच अस्वस्थ होते,
त्याचा परीणाम त्याच्या जठर आणि पित्ताशयावर होतो.

6) पाठदुखी :-

जेव्हा एखादा व्यक्ती जवाबदारीने वाकुन थकला असेल तेव्हा त्याला पाठदुखीचा त्रास सुरु होतो…
खूपच असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायु आखडले जातात. त्यांच्यवरचा
ताण जाणवतो.
चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो…

आता मनात प्रश्न येतो… हे सगळे तर ठीक आहे पण, ह्यावर उपाय काय आहे…?

सध्या जी औषधे, उपचार सुरु आहे त्याला सुरूच राहू द्या. पण शरीरातून हे रोग समुळ करायचे
असतील तर स्वयं सुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसे की डोकेदुखीचे उदाहरण घेऊया…
तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या…

आता माझे डोके एकदम हलके हलके होत आहे…
आता ते अजून निवांत आणि हलके झाले आहे…
आता डोके दुखण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे…
आता माझ्या डोक्यात जमा झालेले अतिरीक्त रक्त शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
आता माझा हा डोकेदुखीचा त्रास बंद झालेला आहे, काही क्षणांमध्ये ही रुखरुख बंद होईल…!
आणि डोकेदुखी गायब…!

अशा प्रकारे प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.

चेतन आणि अवचेतन मन | Body mind spirit | Marathi Information

मित्रांनो… थोडक्यात असे समजा की… आपल्या भावनांचा पेच प्रसंग करुन जगू नका…
रोग बनून ते शरीराला आतून पोखरतील… म्हणून आपला राग व्यक्त करा आणि मोकळे होऊन जा…!

असाच मला एक कीर्तनात सांगितलेला एका संताचा दृष्टांत आठवत आहे. त्यांना ज्या क्षणी राग यायचा
त्याच क्षणी ते संत एक कागद घ्यायचे आणि त्यावर सविस्तर लिहून काढायचे, आपल्या मनातील संपुर्ण भाव
त्या कागदावर ओतून रिकामें होऊन त्या कागदाला तीन – चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर
जाळून किंवा फाडून टाकायचे.

अशा प्रकारेही मनात झालेला गोंधळ बाहेर काढून टाकता येतो. याने रागाची भावना नाहीशी होत जाते
आणि मनाला हलके हलके वाटते.

माझ्या वाचनात आलेल्या सूचना आणि आपले काही अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे…
आशा आहे नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल.

तुम्हा सर्वांना तुमच्या निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा…!

धन्यवाद…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here