चांगले संस्कार…..!!!
१. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर
एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः
त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा
डावीकडे स्वाईप करू नका. तुम्हाला
माहित नाही की पुढे त्यांचे पर्सनल
फोटो असतील.
best lines | quotes in Marathi |
चांगले संस्कार | चांगले विचार
२. लोकांशी बोलत असतांना
“मध्येच त्यांना टोकू नका.”
त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण
करण्याची संधी द्या.
३. एकासारखे दोन पेक्षा जास्त कॉल
कुणालाच करू नका. जर ते तुमचे
“कॉल उचलत नसतील” तर हे
समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी
महत्त्वाचे काम करत असणार.
४. जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर
भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती
त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत
त्यांना त्याचे वय किंवा त्यांचा पगार
विचारू नका.
५. जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या
लोकांसोबत आदराने वागत
असाल… तर लोक तुम्हाला
नोटीस करतील.
६. जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर
देत असेल तर… तुम्ही चुकुन सुध्दा
मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका.
जर “शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या
आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर
करायला सांगा.”
७. “अरे”…. तुम्ही अजून लग्न नाही केलं….!
किंवा “अरे” तुम्हाला अजून मुलं नाहीत….?
असे प्रश्न “विचारू नका.” “तुम्ही स्वतःचे घर
का नाही घेतले…?” किंवा “तुम्ही फोर व्हीलर
का नाही घेत….?” हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे.
best lines | quotes in Marathi |
चांगले संस्कार | चांगले विचार
८. “ते पैसे लवकर देऊन टाका”
जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापुर्वी
किंवा त्याने मागण्याच्या आधीच….
“हे तुमचा प्रामाणिकपणा आणि
व्यक्तिमत्व दाखवून देते.”
९. तुमच्या “मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी
कायमच दरवाजे उघडे ठेवा.” याच्याने
काही फरक पडत नाही… की तो मुलगा
आहे की मुलगी. सीनियर आहे की जुनियर.
तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत “चांगलाच
व्यवहार करा.” कारण तुम्ही चांगले आहात
मग दुसरे कसेही असू देत.
१०.जर कोणी तुमची मदत करत
असेल तर त्याला धन्यवाद
नक्कीच बोला
११. कुणाच्याही वजनावरून कधीच कुणाला
काही बोलू नका. कारण त्याचा काहीच
नसतो. फक्त एवढेच बोला तुम्ही खूप
छान दिसता.
१२. जर तुमचा सहकारी तुम्हाला जर सांगतो
की मला डॉक्टरला भेटायचे आहे तर त्याला
हे नका विचारू की कशासाठी…? फक्त
एवढेच बोला आय होप तुम्ही ठीक आहात.
स्वतःच्या व्यक्तिगत आजाराबद्दल
सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये
टाकू नका.
१३. जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत
तुमच्या समोर बोलत असेल तर
तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणे
ही अशिष्टता आहे.
१४. जोपर्यंत तुम्हाला कोणी
विचारत नाही तोपर्यंत
न मागता तुमचा सल्ला
कुणालाच देऊ नका.
best lines | quotes in Marathi |
चांगले संस्कार | चांगले विचार
१५. स्वतःच्या कामाशी काम ठेवा
१६. जर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीं सोबत
कॅब शेअर करत असाल… आणि जर ते
आत्ता पैसे देत असतील… तर पुढच्या वेळी
“तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा.”
१७. “वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा
नेहमी आदर करा.” लक्षात ठेवा की…
तुम्हाला जो 6 दिसत आहे तो समोरून
येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो.
१८.जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि
ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत
तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि
परत कधी तसे करू नका.
१९.तुमचे सनग्लासेस त्यावेळी काढा
ज्या वेळी तुम्ही कुणाशी तरी
रस्त्यावर बोलत असाल. ही एक
सन्मानाची गोष्ट आहे. आय कॉन्टॅक्ट
तुमच्या बोलण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
२०.गरिबांच्या मध्ये
आपल्या संपत्ती बद्दल
आपल्या पैशाबद्दल
कधीच उल्लेख करू नये.
best lines | quotes in Marathi |
चांगले संस्कार | चांगले विचार
हल्ली लोकं या बेसिक गोष्टी
विसरत चालले आहेत. त्यासाठीच
ही पोस्ट मी घेऊन आलो आहे..
पोस्ट कसी वाटली नक्की सांगा
आणि लाईक करा, कमेंट करा म्हणजे
मला समजेल की खरोखरच तुम्हाला
पोस्ट आवडली आहे. आणि
जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा..!
Sudha Murti Thoughts |
डॉक्टर सुधा मूर्ती यांचे विचार |
Marathi Quotes | Best lines
नमस्कार मित्रांनो,
डॉक्टर सुधा मूर्ती या भारतीय शिक्षिका
आणि लेखिका आहेत. याशिवाय
त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षांही
आहेत. त्यांचे लग्न इन्फोसिसचे
सह संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती
यांच्याशी झाले आहे.
आज आपण डॉक्टर सुधा मूर्ती यांचे
अनमोल असे विचार बघणार आहोत.
डॉक्टर सुधा मूर्ती यांचे विचार
1. माणसाने अधिक संवेदनशील नसावे
कारण संवेदनशील माणसाला
जीवनात खूप त्रास होत असतो.
2. पुरुष आणि स्त्री चा सर्वात चांगला
मित्र कोण आहे…? उत्तर आहे…
एका बायकोसाठी तिचा नवरा
आणि नवऱ्यासाठी त्याची बायको.
3. जीवन ही एक अशी परीक्षा आहे
ज्याचा अभ्यासक्रम माहीत नसतो
आणि त्याचे प्रश्नपत्रिका आणि
उत्तरपुस्तिका ही नसते…..!
4. जीवन एक संघर्ष आहे.
5. मुली मोठ्या झाल्यावर आपल्या
आईच्या चांगल्या अश्या मैत्रिणी
होतात. परंतु जेव्हा मुलं मोठे होतात
त्यावेळी ते अनोळखी बनतात……!
6. विश्वास संपादन करणे खूप कठीण
आहे. ते तयार करण्यासाठी अनेक
वर्षे लागतात. आणि एका वाईट
कृत्याने ते एका क्षणात नष्ट होऊ
शकते.
7. जेव्हा एखाद्याची फसवणूक होते
तेव्हा तो सर्व गमावून बसल्यामुळे
नाही तर एखाद्याला फसवणे सहज
असते ह्यासाठी नाराज होतो…..!
8. तुलना करून दुसऱ्याचा मत्सर
करत बसण्यापेक्षा स्वतःत
सुधारणा करणे कितीतरी चांगले.
9. अंधारात बसण्यापेक्षा
एक दिवा लावणे
कधीही चांगलेच….!
10. जर डॉक्टरा कडून चूक झाली
तर माणूस जमिनीपासून सहा फूट
खाली जातो….! जर न्यायाधीशा कडून
चूक झाली तर माणूस जमिनीपासून
सहा फूट उंच टांगला जातो…! परंतु
जेव्हा एखाद्या शिक्षक चूक करतो….
तेव्हा विद्यार्थ्यांची संपूर्ण तुकडीच
उध्वस्त होते. शिक्षकांना कधीही
तुच्छ समजू नका.
11. जीवनात सर्व अडचणी
आणि अपयशाला निमूटपणे
सामोरी जावे.
12. जर सर्वांना तुम्ही समाधानी करण्याचा
प्रयत्न कराल तर तुम्ही कुणालाही
समाधानी करू शकणार नाही.
दुसऱ्यांच्या समाधानासाठी
स्वतःचे जीवन जगणे कठीण होते.
13. जर एखाद्या स्त्रीची प्रकृती निरोगी
असेल… तर तिला दुसऱ्या कोणत्याही
दागिन्याची गरज पडत नाही. दागिने
न घालताच ती अधिक सुंदर दिसते.
14. स्त्री सुद्धा सक्षम आहे
हे त्यांनी दाखवून
दिलय….!
15. एका आगीला दुसऱ्या आगीने
विझवता येत नाही. हे कार्य
केवळ पाणीच करू शकतो.
16. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत
नाही. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला
जर आनंदी राहायचे असेल तर
स्वतःला बदला.
17. जीवनातील अनुभवाने सांगायचे
की…. पुरस्कार, पद, यश,
पैश्यांपेक्षा चांगले संबंध आणि
मानसिक शांती असणे खूप
महत्वाचे आहे.
Sudha Murti Thoughts |
डॉक्टर सुधा मूर्ती यांचे विचार |
Marathi Quotes | Best lines
18. जेव्हा लोकांना फार कमी
काळात फार जास्त पैसा
मिळून जातो… तेव्हा लोकांचे
वागणे बदलून जाते…!
19. पैसा ही एक अशी गोष्ट आहे
जी क्वचितच एकत्र होते
आणि जर झालीच तर बहुधा
लोकांना विभक्त करत असते.
20. जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी
प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच
लागतात. त्या मर्यादानीच तुमचे जीवन
खऱ्या अर्थाने उजळून निघते.
21. कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी
करत राहणे फार सोपे असते.
पण त्यातील चांगला भाग ओळखून
त्याचे कौतुक करता येणे फार
कठीण असते. ते करायला शिका.
22. प्रामाणिकपणा हे कुठल्या विशिष्ठ
वर्गासाठी नाही… कुठल्याही
शाळेत शिकवले जात नाही.
प्रामाणिकपणा हा नैसर्गिकच
असतो आणि नैसर्गिकरित्या
मनात उमलत असतो.
23. तुम्हाला मी अशा लोकांची अनेक
उदाहरणे देऊ शकतो ज्यांनी
जास्त अभ्यास केला नाही. पण…
ते आज यशस्वी आहेत. कारण…
त्यांना विश्वास होता की ते करू
शकतात.
Sudha Murti Thoughts |
डॉक्टर सुधा मूर्ती यांचे विचार |
Marathi Quotes | Best lines
24. जे लोक संवेदनशील असतात
त्यांना वास्तविक जग समजून
घेण्यासाठी अधिक वेळ लागत
असतो…!
25. स्वतःवर अवलंबून राहा आणि हे
जाणून घ्या की धैर्य तुमच्यातच निर्माण
झाले पाहिजे. यास वेळ लागतो पण
त्यासाठी काम करावे लागेल.
26. आमच्या मुलांना आम्ही
आयुष्यात दोनच गोष्टी
देऊ शकतो. ज्या आवश्यक
आहे. मजबूत मूळ आणि
शक्तिशाली पंख.
त्याच्याने ते उंच भरारी घेऊ
शकतात आणि स्वतंत्ररित्या
जीवन जगू शकतात.
Sudha Murti Thoughts |
डॉक्टर सुधा मूर्ती यांचे विचार |
Marathi Quotes | Best lines
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला कमेंट करा.
धन्यवाद
नातेवाइकांनी पगार विचारल्यावर
काय सांगावे….?
नमस्कार मित्रांनो,
आपला पगार किती आहे
हा प्रश्न नेहमीच शेजाऱ्यांसाठी…
नातेवाइकांसाठी… कधी न संपणारा
संशोधनाचा विषय आहे. जो पर्यंत
आपण उत्तर देत नाही त्यांचे समाधान
होत नाही. आणि त्या प्रश्नाचा ते तकादा
लावूनच ठेवतात.
मग ह्या नातेवाइकांना कसे
उत्तर द्यावे. हे आपण
आजच्या पोस्ट मध्ये
बघणार आहोत.
खरे तर आपला पगार कितीही असला
तरी तो दुसऱ्यांना सांगितले की जास्तच
आहे असे वाटते. म्हणून म्हणतात ना
“पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना
त्यांचे वय कधीही विचारु नये“
आपला पगार आणि आपण काय
करतो….? हे जेव्हा विचारले जाते
तेव्हा समोरचा व्यक्ती आपली
लायकी ठरवत असतो.
( की आपल्याला किती आदर आणि
सन्मान द्यायचा हे ठरवत असतात ).
कटू पण सत्य आहे.
आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना
सांगु नये… कारण माणसांची किंमत
त्यांच्या पगारावरुन केली जाते…
समजा जरी चुकून कोणाला पगार
सांगितलाच तर लगेच हिशोब करून
मोकळे होतात. महिन्याचा अमुक
अमुक खर्च होत असणार आणि
मग बक्कळ शिल्लक राहत असेल.
पण त्यांना कुठे माहिती असते
जेवढा पगार तेवढ्या गरजा
देखील असतात.
शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल
तर अरेरे खूपच कमी आहे की पगार
आणि जास्त असेल तर आँ चांगलाच
आहे की पगार.
आपल्या आई-वडिलांशिवाय कधीही
कुणाला आपला पगार किंवा मासिक
उत्पन्न सांगू नये. कारण जर कमी
असेल तर लोक मनातून खुश होतात
आणि जर जास्त असेल तर जळतात.
जेव्हाही कुणी पगारविषयी खोदून खोदून
विचारले तर सरळ सांगा की तुम्हाला
काय करायचे आहे…? किंवा कशाला
पाहिजे आहे…? बऱ्याच वेळेला
समोरच्याला राग येतो पण कधीही आपण
किती कमावतो हे कुणाला सांगू नये.
बस आपला खर्च पाणी निघून जातो
असे सांगा. पगाराची random range
सांगा. जसे हो ३५ – ४० हजार पर्यंत आहे.
कसेतरी भागून जातो.
त्यांना confuse करून टाका.
“तुम्हाला काय वाटते तुम्हाला
माझा पगार किती असेल ते….?
” जर त्यांनी काही रक्कम सांगितली
तर त्याना सांग हो तेव्हडीच आहे.
जेणेकरून ते आनंदी होऊन जातील
आणि मग विषयच बदलून टाका.
“का मुलगी देणार आहात का मला….?”
“माझ्या दैनंदिन खर्चाची वव्यस्था
होऊन जाते आहे.”.
“देवाच्या कृपेने जेवढे आहे
ते पुरेसे आहे”
सर्वसाधारणपणे, जेव्हा तुम्ही तुमचा
पगार इतरांना सांगता तेव्हा त्यांच्यात
दोन प्रकारच्या भावना निर्माण होऊ
शकतात:
मत्सराची भावना किंवा स्पर्धेची भावना.
यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्याविरुद्ध
जाऊ शकते. तुम्हाला त्यांच्या वागण्यात
बदल जाणवू शकतो.
बऱ्याच प्रकरणांमध्ये, तुमच्यापेक्षा
जास्त अनुभवी असलेला तुमचा
सहकारी (कमी पगार मिळवणे)
तुम्हाला judge करायला लागतात.
तुमची प्रतिमा खराब करण्याचा
प्रयत्न करतात…..!
तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी
बँक बनू जातात. तुमच्या कडून
उधारी मागतात आणि तुम्ही
द्यायला बदं केल्या नंतर त्यांना
राग येतो.
जॉब लागल्यावर नातेवाईकांना
सांगूच नका की जॉब लागला आहे.
आणि बाकी ज्यांना माहित आहे…
त्यांना हे सांगू नका की नेमका काय
जॉब करता. मग त्यांनी पगार विचारला
की सांगा कि माझा पगार आणि बाबा
थोडे पैसे देतात त्यात भागत असते.
परदेशात कमवणाऱ्या लोकांच्या पगारात
इतरांना खास इंटरेस्ट असतो. लोकं सरळ
डॉलर, युरो, पाउंडला रुपया मधे convert
करून परदेशात राहणारे करोडपती असा
समज करून घेतात. त्यात युरोप मधले पगार
हे अमेरिकेच्या मानाने कमी असतात. मग
आमच्या अमक्या तमक्याला अमेरिकेत एवढा
पगार आहे तुम्हाला फार मिळत नाही वाटत
असे देखील म्हणतात.
कधीही नंबर सांगू नका. संदिग्ध राहा
आणि त्यांना निराश करा जेणेकरुन
ते हार मानून विचाराने बंद करतील.
पगार विचारणाऱ्यांचे प्रकार आहेत.
प्रकार १ :-
फक्त माहिती करून घेणारे
ह्या लोकांना ना जगातल्या भेटेल
त्या व्यक्तीचा पगार जाणून घेण्याची
इच्छा असते.
प्रकार २ :-
तुलना करणारे
ह्या प्रकारातील लोक आपल्या
घरातल्या व्यक्तींच्या पगाराशी
इतर लोकांच्या पगाराशी तुलना
करतात.
प्रकार ३ :-
जळणारे
ह्या प्रकारातील लोकांना
समोरच्याचा पगार ऐकून
कधीही आनंद होत नाही.
प्रकार ४ :-
निर्लज्ज
ह्या प्रकारातल्या लोकांना कोपरापासून
नमस्कार. ह्यांना कितीही टाळण्याचा
प्रकार केला तरी ते निर्लज्जपणे पन्नास
वेळा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा
पिच्छा पुरवतात. आपण सांगितले नाही
तरी आपल्या भावाला, आईला, वडिलांना
जो भेटेल त्याला तुमच्या पगाराबद्दल
विचारून विचारून हैराण करून सोडतात.
प्रकार ५ :-
सज्जन आणि चांगला सल्ला देणारे
छान, नोकरी टिकवून धर.
पुढे जाण्यासाठी जे असेल ते शिकायचा
प्रयत्न कर. सहकाऱ्यांशी वाद करायचा
नाही. कामाला नाही म्हणायचे नाही.
प्रामाणिक पणे काम करायचे. बचत
करायला शिक. प्रकार पाच च्या लोकांना
खरा पगार सांगायलाही काही वाटत नाही
आणि त्याचा सल्ला ऐकायला बरा वाटतो.
चांगले विचार | good thoughts In Marathi
चांगले संस्कार best lines | marathi quotes |
moral story
चांगले संस्कार..!
आयुष्यासाठी
काही महत्त्वपूर्ण सल्ला….!
1. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवत चला
हे गरजेचे नाही की सगळ्याच
गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.
2. रोज अर्धा तास चालणे
खूप गरजेचे आहे.
3. आपल्या घड्याळाला कायम
वेळेच्या पाच मिनिटे
आधी सेट करा.
4. खोटा दिखावा आणि
अहंकार टाळा.
5. छोट्या छोट्या आणि फालतू
गोष्टींवर वादविवाद करणे टाळा.
6. कोणावर उपकार केले
तर ते विसरून जावा.
7. जिथे पण राहा तिथे लोकांच्या
मनामध्ये आपली जागा
बनवण्याचा प्रयत्न करा.
8. जेव्हा ही कोणाकडून गाडी उधार
घ्याल… तेव्हा पूर्ण पेट्रोल आणि
डिझेल भरूनच परत करा.
9. धूम्रपान पासून लांबच राहा.
10. खूप स्वस्त वस्तू खरेदी करू नका.
11. कोणत्याही राजकारणी
व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
12. कोणी सांगण्याच्या आधीच
त्यांच्या पगारा बद्दल विचारू नका.
13. कर्ज त्यालाच द्या
जो न मागता परत करेल
आणि ज्याच्यावर तुमचा
विश्वास असेल.
चांगले विचार | good thoughts In Marathi
चांगले संस्कार best lines | marathi quotes |
moral story
14. कोणाशीही वादविवाद किंवा
चर्चा करत असतांना तुमची
नैतिकता आणि सभ्यता सोडू नका.
15. जर कोणी चांगले काम करत
असेल… तर त्याची प्रशंसा
करतांना कंजूसी करू नका.
16. तुमच्या ज्ञानाला पसरवणे आणि
लोकांना त्याचा फायदा करून
देणे…. हे कायमच जीवन
जगण्याचा एक मात्र मार्ग आहे.
17. काम पूर्ण होण्याच्या आधीच
मजुरी देऊ नका, परंतु काम
पूर्ण होताच लगेच मजुरांना
मजुरी देऊन टाका.
18. मोबाईलचा उपयोग चांगल्या
गोष्टींसाठीच करा. आणि ह्याची
खात्री करा की मोबाईल तुमचे
आयुष्य उध्वस्त होण्याचे
कारण बनणार नाही.
19. तुमच्या संपत्ती बद्दलची वाचता
त्या लोकांसमोर करू नका….
जे तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत
किंवा जास्त गरीब आहेत.
20. लहान मुलांना त्यांच्या मूडनुसार
आणि त्यांच्या आवडीप्रमाणे
जगू द्यावे. त्यांना चुकून सुद्धा
आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न
करू नका. परंतु त्यांना चांगले
संस्कार नक्कीच द्या. म्हणजे ते
चांगले व्यक्ती बनू शकतील. आणि
चांगल्या-वाईट गोष्टींमधील पारख
करू शकतील.
चांगले विचार | good thoughts In Marathi
चांगले संस्कार best lines | marathi quotes |
moral story
21. मित्रांना पैसे उधार देतांना
सावधान रहा. कारण असे
नको व्हायला की… मित्र
आणि पैसे दोन्ही हातातून
निसटतील.
22. जर कोणी तुमच्या मित्राची
प्रशंसा करत असेल तर
तुम्ही तुमच्या मित्राला त्याबद्दल
नक्की सांगा.
23. आवश्यक तिथेच तुमचे
व्यक्तिगत आणि
आर्थिक विवरण करा.
24. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला
एक – दोन पेक्षा जास्त वेळा
उधार घ्यावी लागत असेल….
तर ती वस्तू तुम्ही खरेदी
करणेच योग्य आहे.
25. दुसऱ्यांच्या कडून कोणतीच
अपेक्षा नाही ठेवलात……
तर खुश रहाल.
26. जर तुम्ही वेळेवर पैसे
देऊ शकत नसाल…..
तर तुम्ही कर्ज घेणे टाळा.
27. जेवढ पण मिळाले आहे
त्याच्यामध्ये आनंदी राहायला
शिका आणि दुसऱ्यांच्यावर
ईर्षा करू नका.
28. आपल्या ऐपतीप्रमाणे
नेहमी गरीब आणि गरजू
लोकांना मदत करा.
29. जर लग्न करायचे असेल
तर सौंदर्याला नाही….
चांगल्या चारित्र्याला महत्त्व द्या.
चांगले संस्कार | चांगले विचार | good thoughts in marathi |
best lines | happy thoughts in marathi
जर लोक तुम्हाला इग्नोर करतात तर त्यांच्याशी असे वागा
Good Thoughts Marathi | Motivational thoughts
नमस्कार मित्रांनो,
लोक जर तुम्हाला इग्नोर करत
असतील…. तर तुम्ही त्यांच्याशी
असे वागा.
एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून
इग्नोर करते, तुमच्याकडे लक्ष देत
नाही. तुमच्या असण्याचा किंवा
नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत
नाही…! तर नेमके काय करायचे…?
त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास
होतो… याचे त्या व्यक्तीला काहीच पडलेले
नसते. त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत कशा
पद्धतीने वागायचे….? आपण कसे वर्तन
ठेवायचे…..? ते आता आपण या विडियो
मध्ये पाहू.
जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल
तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा
तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले…?
तू माझ्याशी का बोलत नाही….? माझे काय
चुकले…? जर असे पुन्हा पुन्हा विचारत जाल
तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल….
म्हणजेच माझ्याशिवाय याच्या आयुष्यात
काहीच नाही. मी कसाही वागलो, तर हा
माझ्याकडे येणार, असे त्याला वाटत राहते
आणि तो जास्त भाव खातो. म्हणून तुम्ही
त्याला जास्त भाव देणे प्रथम बंद करा.
तुम्ही बिझी व्हा… स्वतःला कामांमध्ये
गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा
विचार नक्कीच करू लागेल. हा
आपल्याला काहीच विचारत नाही
विसरून गेला का…?
असे केल्याने तीच व्यक्ती तुम्हाला
किंमत देईल आणि तुमच्या मागे
लागेल. आपली किंमत आपणच
वाढवायची आहे, त्या व्यक्तीला
दाखवून द्या की…. मी ही खूप
कामात असतो तुझ्यामुळे माझे
काही अडत नाही.
अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष
करणे आपल्याला शक्य होत नाही.
पण आपल्या भल्यासाठी करावाच
लागेल. तुम्हाला किंमत देत नसेल….
तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच
लागेल. आणि हा बदल तुमच्या
नेहमी हिताचाच असतो.
हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही
स्वतःला व्यस्त ठेवाल. तुम्ही तुमची
किंमत कमी करून घेऊ नका.
तू कुठे होतास…..?
मला का सांगितले नाही…?
मला विचारले का नाही…? असे प्रश्न
विचारून तुम्ही त्याला जास्त भाव
अजिबात देवू नका.
त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त
ढवळाढवळ करू नका. यामुळेही
ते तुम्हाला इग्नोर करत असतात.
जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल
तर करू नका. तुम्ही परिस्थिती नुसार
तुमचे वर्तन ठेवा. तुझ्याशिवाय मी जगू
शकत नाही, तुझ्याशिवाय माझ्या
आयुष्यात काही अर्थ नाही. असे बोलणे
प्रथम बंद करा.
यासाठी तुम्ही तुमच्या मध्ये बदल
करा. स्वतःला महत्त्व द्या. तेव्हाच
समोरची व्यक्ती तुम्हाला ही महत्व
देईल. स्वतःमध्ये बदल घडवा.
आपण कुठे चुकतो…
आपण काय केले पाहिजे…
यावर काम करा आणि
तुमच्या चुका दुरुस्त करा.
तुम्ही स्वतःला डेव्हलप करा.
ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद
मिळतो, त्या गोष्टी नक्की करा.
आणि आनंदी राहा. स्वतःच्या
आवडीनिवडी जोपासा. त्यामध्ये
तुमचा वेळ घालवा. तुमचा
व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा
प्रयत्न करा.
तुम्ही दुसऱ्याचे नाही….
तर तुमचे दुसऱ्यांनी
आचरण केले पाहिजे…
एवढे परफेक्ट स्वतःला
बनवा. आणि महत्त्वाचे
म्हणजे एटीट्यूड मध्ये
जगायला शिका.
नवीन गोष्टी आत्मसात करायला
शिका. असे जगा की…
समोरच्याला आपल्याकडे बघून
जगायची इच्छा झाली पाहिजे.
तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा.
तुमच्याकडे बघून वाटले पाहिजे याला
कशाचा एवढा सुख आहे… की तो
तेवढा आनंदी आहे….! एवढे स्वतःला
आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न
करा. यासाठी स्वभावामध्ये बदल
करणे मात्र फार महत्त्वाचे आहे.
ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि
विचारात बदल कराल त्यावेळेस
समोरची व्यक्ती आपोआप बदलेल.
आणि तुमच्या मध्ये झालेला बदल तो
व्यक्ती नक्की स्वीकारेल. आणि
त्याच्याकडून झालेल्या चुका तो नक्की
दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल.
जर त्याला गरज असेल तर तो
त्याच्या कडून तुमच्या सोबत
असलेले नाते टिकवण्याचा
नक्की प्रयत्न करेल.
असा हा लहानसा विडियो कसा
वाटला नक्की सांगा. विडियो ला
लाईक, शेयर करायला विसरू
नका. चॅनल ला सबस्क्राईब केला
नसेल तर नक्की सबस्क्राईब करून
ठेवा.
धन्यवाद.
Also Read :-
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
Your Queries :- motivational quotes, motivational speech, how to think positive, चांगले विचार, चांगले विचार कसे करावे, चांगले संस्कार, चांगले विचार, चांगले सुविचार, मनात चांगले विचार कसे भरायचे, best lines, अतिशय सोपे सुंदर विचार, संस्कार सुविचार, changle vichar marathi, सुविचार दाखवा, aaj ka suvichar, most Motivational quotes in marathi, विचार कसे बदलायचे, good thoughts in marathi, motivational thoughts in marathi, Suvichar marathi, मराठी सुविचार छोटे, सुंदर सुविचार,
[…] […]