125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी | VB

10
1122
Best Marathi Suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vbthoughts

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपल्यासाठी Marathi Suvichar,
प्रेरणादायी सुविचार मराठी, sunder vichar, good thoughts in marathi,
suvichar marathi, motivational quotes in marathi, marathi quotes,
happy thoughts, suvichar असे 125 पेक्षा अधिक सुविचारांचा संग्रह
आणला आहे.

हे मराठी सुविचार शांत मनाने वाचा आणि सुविचार कसे वाटले
ते कॉमेंट च्या माध्यमाने नक्की कळवा.

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी 

स्वतःला सुधारण्यात इतके
व्यस्त व्हा की तुम्हाला
दुसर्‍यांच्या चुका शोधायला
वेळच मिळणार नाही.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - suvichar marathi
marathi suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

पुन्हा जिंकण्याची तयारी
तिथूनच करायची जिथे
हरण्याची जास्त भीती असते.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - success
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

स्वतःच्या मनगटावर विश्वास
असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची
भीती कधीच वाटत नाही. आणि अशा
सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती
सुद्धा करत नाही.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - belive
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

वीर बाजीप्रभू देशपांडे म्हणतात
संकटावर अश्याप्रकारे तुटून पडायचे की
जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. आणि
हरलो तरी इतिहास घडला पाहिजे…!

******

शिवरायांची एक शिकवण
राज्य छोटे का असेना पण
स्वतःचे असावे. त्यामुळे
स्वतःचे अस्तित्व निर्माण करा
तर जग तुमचा आदर करेल.

******

विचार असे मांडा की
तुमच्या विचारावर कुणीतरी
विचार केला पाहिजे.
समुद्र बनून काय फायदा….?
बनायचे तर तळं बना. जिथे
वाघ पण पाणी पितो.. पण
तो ही मान झुकवून….!

******

ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल.
कारण वेडेच लोक इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात.

******

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही
तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्या जवळ
काही ध्यैयच नाही ही मात्र गंभीर समस्या
आहे.

******

कर्तृत्ववान व्यक्तीच्या पराक्रम
बघितला जात नाही. पण त्याचे
चाक जमिनीत कधी अळकतंय
याकडे मात्र अति जवळच्या
लोकांचे लक्ष असते.

******

कठीण काळ हाच माणसाचा
सर्वात मोठा गुरु असतो.
त्या काळात एवढे शिकायला
मिळते की त्याच ज्ञानाची
शिदोरी जन्मभर पुरते.

******

प्रेरणादायी सुविचार मराठी 

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय
पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न
करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

******

भरपूर पैसे कमावले तर खर्च होतात
माणसे कमावली तर ती नक्की कामी
येणार. पैसे कमावणारा कधी तरी
भिकारी होतो. पण माणसे कमावणारा
सर्वात श्रीमंत होतो…!

******

रात्र नाही स्वप्न बदलते….
दिवा नाही वात बदलते…
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो पण वेळ
नक्कीच बदलते.

******

पक्षी आकाशात हिंडतात त्यावेळी
वाटा नसतात. प्रत्येक पक्ष्याला
त्याची वाट अंतकरणातून शोधावी
लागते. त्याचप्रमाणे या सुंदर जिवनाचा
जीवन मार्ग हा ज्याच्या त्याला शोधावा
लागतो.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपले होईल
अपयश असे स्वीकारा की विजेता भारावेल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल.

******

प्रेरणादायी सुविचार मराठी 

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - sunder vichar marathi
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

वाटेवरून चालताना वाटे सारखे
वागावे लागते. आपण कितीही
सरळ असलो तरीही वळणावरून
वळावेच लागते.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - suvichar
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

नशिबाने मिळालेली गोड माणसे
क्षणी झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये,
कारण काय सांगावे….? उद्या सगळे असेल.
पण… सोबतीला कुणी हक्काचे भांडणारे….
रुसणारे नसेल…

******

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - good thoughts in marathi
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

आयुष्यात तुम्ही आजवर जे
करू शकला नाही ते
जीवन नाही… तर अजून
जे करू शकता ते म्हणजे जीवन.

******

काही माणसे शिऱ्यातील साखरे सारखी
असतात. ती दिसत नसली तरी त्याच्या
आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे जीवनाला
पूर्णत्व मिळते.

******

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - lige quotes in marathi
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

माणसाने वस्तू वर जीवापाड प्रेम
करण्यापेक्षा आयुष्यावर… माणसावर…
प्रेम करा कारण ते आयुष्यभर उपयोगी
पडतील.

******

माणसाची आर्थिक स्थिती कितीही
चांगली असली तरीही जीवनाचा
खरा आनंद घेण्यासाठी त्याची
मानसिक स्थिती चांगली असावी
लागते.

******

प्रेरणादायी सुविचार मराठी 

marathi suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb good thoughts - vijay bhagat - happy thoughts marathi
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

माणसाने एकदम सुखाने आयुष्य
जगावे. काल आपल्याबरोबर काय
घडले याच्या विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याच्या विचार करा.

******

40 सुंदर शालेय सुविचार | marathi suvichar | प्रेरणादायी विचार | suvichar marathi | सुंदर विचार
Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

अतिशय सोपे शालेय मराठी सुविचार |
Atishay Sope Shaley Marathi Suvichar

श्रद्धा हीच जीवनाची
शक्ती असते.

******

कपटी मित्रापेक्षा
दिलदार शत्रू बरा.

******

मानव हा आपल्या
नशिबाचा शिल्पकार आहे.

******

सदाचारी माणसे
नेहमी निर्भय असतात.

******

मेणबत्ती प्रमाणे स्वतः जळून
दुसऱ्यांना थोडा जरी प्रकाश दिला
तरी मी स्वतःला धन्य मानीन.

******

पायदळी चोरलेली फुले
चुरणाऱ्या पायांना आपला
सुहास पण अर्पण करतात.

******

आपल्या यशाचे मोल आपल्याला
किती अडचणींशी झगडावे लागले
यावरून ठरवावे.

******

ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे
कामाचा त्रास वाटत नाही.

******

नम्रतेने जे लाभेल ते बळाने
कधीही मिळणार नाही.

******

सगळी नाती स्वार्था भोवती
गुंफलेली असतात. स्वार्थ संपला
की कोणतेच नाते उरत नाही.

******

तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

******

दुसर्‍याला उपदेश करण्यासारखी
सोपी गोष्ट नाही.

******

परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा
परिस्थितीवर मात करा.

******

कष्टाचा आवाज शब्दाच्या
आवाजा पेक्षा मोठा असतो.

******

आईसारखे जगात दुसरे
पवित्र दैवत नाही.

******

माता ही प्रेमाची सरिता आहे.

******

माता पिता गुरु आणि स्वदेश
यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.

******

निरोगी मुले ही राष्ट्राची
खरी संपत्ती आहे.

******

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा.

******

माणसाने माणसाशी माणुसकीने
वागणे हा खरा मानवधर्म होय.

******

भूतकाळासाठी रडण्यापेक्षा
वर्तमानकाळाशी लढण्यात आणि
भविष्याच्या शिखरावर चढण्यातच
खरा पराक्रम आहे.

******

शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा
कारण शब्दांची जखम सहसा
लवकर बरी होत नाही.

******

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे
त्याला कशाचेही भय वाटत नाही.

******

तुमच्यावर हल्ला करणाऱ्या
शत्रूला भिऊ नका. परंतु तुमची
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून
सावध राहा.

******

विद्यार्थी हा विद्येवर चरनारा
राजहंस पक्षी आहे आहे.

******

अपयश ही यशाची
पहिली पायरी आहे.

******

शिक्षण हा मानवाचा
तिसरा डोळा आहे.

******

विद्या विनयेन शोभते.

******

टाकीचे घाव सोसल्या शिवाय
देवपण अंगी येत नाही.

******

ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर.

******

गरज ही ज्ञानाची
जननी आहे.

******

आळस ही एक प्रकारची
आत्महत्या होय.

******

प्रेमाने जग जिंकता येते.

******

प्रयत्न हाच देव.

******

मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या
चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.

******

40 सुंदर शालेय सुविचार | marathi suvichar |
प्रेरणादायी विचार | suvichar marathi | सुंदर विचार

 

Powerful best motivational quotes in marathi |
Inspirational quotes | Good thoughts | Suvichar

Best Marathi Suvichar - प्रेरणादायी सुविचार मराठी
Best Marathi Suvichar – प्रेरणादायी सुविचार मराठी

विचार जे तुमचे जीवन बदलून देतील

कोणासाठी जीवन थांबत नाही.
केवळ जीवन जगण्याची कारणे
बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून
सुटत नाही. काही प्रश्न सोडून
दिले, कि आपोआपच सुटतात.

**********

आयुष्यात आपण आपली इमेज
कितीही चांगली बनविण्याचा
प्रयत्न केला ना, तरी तिची
क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या
मनाच्या किल्यारीटीवरच
अवलंबून असते.

**********

मोड तोड करायला ज्ञान लागत नाही
परंतु तडजोड करायला मात्र खूप
शहाणपण लागतो.

**********

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी
आयुष्य केव्हाही चांगले. कारण
यशाची व्याख्या लोक ठरवतात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतःच सिद्ध करतो.

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

**********

यश हे सोपे कारण ते
कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महा कठीण
कारण त्याला मनाचीच
परवानगी लागते.

**********

सत्य सांगण्यासाठी कोणत्याही
शपथ तिची गरज नसते. नदीला
वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची
गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या
जोरावर जीवन जगतात. त्यांना
ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही
रथाची गरज नसते.

**********

समजा जीवनात एखाद्या गोष्टीत हरलो
तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि
दुःखदायक असते ना… त्या पेक्षा
पुन्हा त्याच गोष्टी जिंकायची इच्छा
नसणे, ही भावना भयंकर असते.
म्हणून प्रयत्न करत राहा.

**********

एका ठराविक वयानंतर आपल्याला
पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले.
याचे कारण हेच की आपल्या लक्षात
आले पाहिजे की, जसे जसे आपण मोठे
होत जातो, तस्यां तस्यां आपल्या चुका
खोडल्या नाही जात.

**********

छोट्या छोट्या गोष्टीत समाधान
मानून जीवनात हसायला शिका.
कारण कुणास ठावूक मोठ्या गोष्टी
मिळेपर्यंत समाधानाने हसून टिकवता
येईल का…? आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण
उद्याच्या काळजीत तुमचे आजचे सुख हरवू नका.

**********

एकाद्याला गुन्हेगार ठरवतांना
त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.

**********

जीवन हे आईसक्रिम सारखे आहे
टेस्ट केलं तरी वितळते…. आणि
वेस्ट केलं तरी वितळते…..!
म्हणून आयुष्यात टेस्ट करायला शिका.
वेस्ट तर ते तसेही होतचं आहे.

**********

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने
जग बदलतात. आणि अपयशी लोक
जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

**********

प्रत्येक माणसाची गोष्ट
मनावर घेवू नका.कारण
माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची पात्रता कळते….
तुमची नाही.

**********

झोपाळा जेवढा मागे जाईल
तेवढाच तो पुढे देखील येईल…
एकदम बरोबर… सुख आणि
दु:ख दोन्ही आयुष्यात बरोबर येतात.
आयुष्याचा झोपळा मागे गेला म्हणून
घाबरू नका. तो पुढेही तितकाच येईल
फक्त वाट पहा.

**********

राग हा माणसाचा कितीही मोठा
शत्रू असला तरी तो योग्य वेळी
आलाच पाहिजे. नाहीतर लोक
राग न आल्याचा फायदा उचलतात.

**********

अनुभवाने एक शिकवण दिली आहे.
कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करू नका.

**********

आयुष्यात त्याच गोष्टी करण्यात
मजा आहे, ज्या गोष्टी ला लोक
म्हणतात कि, हे तुला कधी जमणार
नाही.

**********

कोणतेही फुल दुसऱ्या फुलाची
स्पर्धा करत नसते. कारण त्याला
माहित असते, निसर्गाने प्रत्येकालाच
वेगळ बनवले आहे. प्रत्येकालाच
काहीतरी सुंदर दिले आहे.

**********

दुसऱ्याचे भले व्हावे असे
चिंतणारा माणूस त्याच वेळी
आपले ही भले साधत असतो.

**********

देव हा माणसाच्या मनात
जेवढा असतो, त्यापेक्षा
जास्त माणसाच्या कर्मात असतो.
आणि आपल्या चांगल्या कर्मात देव
कोणाला दाखविण्याची गरज नसते.
तो सर्वांना दिसत असतो. म्हणून
मंदिरातला देव टाळला तरी चालेल.
पण कर्मातला देव कधीही टाळू नका.

**********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन
खूप छोटेसे शब्द, तुमच्या विचार
क्षमतेची…. तुमच्या व्यक्तिमत्वाची…
तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने
तुमच्या जीवनाची दिशा ठरवतात.

**********

काही वेळा आपली चूक नसतांनाही
शांत बसने योग्य असते. कारण जो
पर्यंत समोरच्याचा मन मोकळ होत
नाही तो पर्यंत त्याला त्याची चूक
लक्षात येत नाही.

**********

25 Marathi Motivational Quotes Video in inspirational speech

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखे
असतात. ज्यांना बनवणे सोपे पण
टिकवणे खूप अवघड असते. दोघांना
वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय…
कायम शीतलता ठेवा…!

********

संपूर्ण जगाला विसरुन मनाची
शक्ती दृढपणे स्थिर करून
मन एकाग्र झाल्यावर अशक्य
असे एकही काम नसते.

********

अतिकष्ट व संकटे सहन
केल्यानंतर, मनुष्य ज्ञानी
व विनम्र बनतो.

********

जो दुसऱ्यांना ओळखतो तो
शिक्षित, पण जो स्वतःला
ओळखतो तो खरा बुद्धीवान

********

आयुष्य हे एकदाच आहे, मी पणा नको.
सर्वांशी प्रेमाने वागा. सोने वितळले की
दागिने बनतात. माती नरम झाली की
शेती बनते. तशाच प्रकारे माणूस नम्र
झाला की लोकांच्या हृदयात त्याची
जागा बनते.

********

कधी कधी चुक आपली नसते पण नाते
टिकवण्यासाठी आपल्याला चूक मान्य
करावीच लागते. कारण नाती ही झाडांच्या
पानांसारखी असतात, एकदा तुटली कि
त्याची हिरवळ कायम निघून जाते…!

********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

कितीही गैरसमज झाले कितीही
राग आला तरीही थोड्याच अवधीत
मनापासून सर्व माफ करून पूर्ववत
होते….. तेच नाते सुंदर असते….!

********

कोणाला किती सांभाळून घ्यायचे
याला सुद्धा एक मर्यादा आहे. कारण
एकदा का मर्यादेचे बांध तुटले की पुन्हा
सावरणे कठीण जाते. म्हणून मर्यादा
जपा म्हणजे नाते जपायला सोपे जाते.

********

पैशाला जर तुम्ही ईश्वर समजाल
तर तो तुम्हाला सैताना प्रमाणे
भ्रष्ट करून टाकेल.

********

जेव्हा आपल्याला राग येतो
तेव्हा माणसाने परिणामांचा
विचार करावा.

********

काहीतरी उच्च ध्येय डोळ्यासमोर
ठेवून त्यात आपले आयुष्य धन, बुद्धी
व विचार खर्च करण्यातच जन्माचे
सार्थक आहे.

********

नाते सांभाळणे प्रत्येकाला
जमत नाही. स्वतःचे मन
सुद्धा दुखवावे लागते
दुसऱ्याच्या आनंदासाठी.

********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

छोट्या छोट्या गोष्टी जर
मनात साठवून ठेवल्या तर
नात्यांमध्ये दुरावा निर्माण
व्हायला सुरुवात होते.

********

सर्वच नात्यांना चुकाच कारणीभूत
नसतात… तर काही नाती
अहंकारामुळे देखील तुटतात.

********

गर्व करून कुठलेही नाते तोडण्यापेक्षा
माफी मागून ती जपा. कारण वेळ
आल्यावर पैसा नाही, तर माणसेच
साथ देतात.

********

सर्वांच्या कल्याणातच आपले
कल्याण असते.
हे कधीच विसरू नये….!

********

जेव्हा आपल्यातला सद्गुन कर्म बनतो
तेव्हाच तो साऱ्या जगाला माहिती होतो
तोपर्यंत तो स्वतःला हि कळत नाही.

********

लबाडी ही एक
आखूड चादर आहे
तोंडावर घेतली की
पाय उघडे पडतात.

********

द्वेष भावनेने खोदलेला खड्डा
कदाचित खोदणाऱ्याचाच
कर्दनकाळ ठरू शकतो.

********

चांगले विचार मनात फार वेळ
टिकत नाहीत. म्हणून ते मनात
येताच कृती करा.

********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

मित्र आणि ओळखी यामुळे
हमखास दैवत हाती येते.

********

मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या
तुटत नाही. मनुष्यच त्याला संपवतो.
कारण ते मरते एकतर तिरस्काराने
किंवा दुर्लक्ष केल्याने किंवा लोकांनी
कान भरल्यामुळे……!

********

नाते म्हणजे परीक्षा नाही पास – नापास
ठरवायला….! नाते म्हणजे स्पर्धा नाही
जिंकणे हरणे ठरवायला…..! समोरच्याच्या
मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा
जास्त घेता याची जाणीव म्हणजे नाते…..!

********

एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष
देण्यापेक्षा, केलेल्या हजार
चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
नात्यांमध्ये कधीही दुरावा येणार नाही….!

********

माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो
आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला
तो परक्या माणसांकडून घेतो.
जी व्यक्ती फक्त तुमच्या आवाजावरून
तुमच्या मूड ओळखते त्या व्यक्तीला
आयुष्यात कधीही दुखवू नका…..!

********

जेव्हा कुटुंबातील माणसे परकी वाटू
लागतात आणि परकी माणसे आपली
वाटू लागतात तेव्हा घर उद्ध्वस्त
होण्याची वेळ आली आहे हे समजावे.

********

स्वार्थासाठी कामापुरती जवळ आलेली
माणसे काही क्षणात तुटतात पण
विचारांनी व प्रेमाने जोडलेली माणसे
आयुष्यभर सोबत राहतात.

********

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात
पण जे आपल्या सुख दुखात सामील
होतात. त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचे नसते….!

********

घराला कुटुंबाला मोठे करण्यासाठी
किंवा उध्वस्त करण्यासाठी कुटुंबातला
फक्त एकच सदस्य कारणीभूत असतो….!
एक खरा मित्र हजार नातेवाईकांपेक्षा
श्रेष्ठ असतो….!

********

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष
नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात
तर आयुष्यभर एकटे राहाल.

********

हल्ली आपल्याच माणसावर हक्काने
रागावतांना सुद्धा दहा वेळा विचार
करावा लागतो…! नात्यांचे पण तसेच
असते, ज्यांच्यासाठी आपण आटापिटा
करतो, नेमके तेच आपल्यापासून दुरावतात….!

********

जिथे विश्वास नाही तिथे कोणतेच नाते
जुळत नाही आणि जरी जुळले तरी ते
टिकत नाही. संवाद संपला की नाते
संपते, म्हणूनच बोलून बघा तुमचे
हरवलेले उत्तर सापडेल….!

********

आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा
माहित नसतो. कारण कव्हरेज क्षेत्राच्या
पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो…!

********

चांगले हृदय आणि चांगला स्वभाव
दोन्ही आवश्यक आहे. चांगल्या
हृदयाने खूप नाती बनतात आणि
चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात….!

********

नाते आणि विश्वास एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत. नाते ठेवा अगर ठेवू
नका. विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण
जिथे विश्वास असतो तिथे नाते आपोआप
बनत जाते.

********

सावधपण, उत्तम निर्णयशक्ती,
स्वावलंबन आणि दृढनिश्चय
हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

********

धडपड हे मानवाचे भाग्य आहे
चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा
पाया आहे. जीवन ही चैनीची
वस्तू नसून कर्मभूमी आहे.

********

जसे प्रकाशा शिवाय
वस्तू दिसत नाही
तसेच विचारांशिवाय
ज्ञान प्राप्ती होत नाही.

********

पैसा बोलू लागतो….
तेव्हा सत्य गप्प बसते.

********

अज्ञान हे स्वार्थ आणि मोह
यांचे निर्मिती केंद्र आहे.

********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

आहे त्यातच समाधान मानले तर
काम क्रोध आणि मोह नष्ट होतात.

********

माणसाचे सर्वात मोठे शत्रू
आळस अज्ञान व अंधश्रद्धा.

********

मौन हा रागाला
जिंकण्याच्या
एकमेव उपाय आहे.

********

ज्याचे शरीर व बुद्धी उद्योगात
असते… त्याला कसलीही
काळजी नसते.

********

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर
रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या
कुठल्याही कृतीच्या परिणाम त्याच्यावर
होत नाही, तेव्हा समजुन जा तुम्ही
त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची
जागा गमावली आहे.

********

वेळ, मित्र आणि नाती ह्या अश्या
तीन गोष्टी आहेत की, त्यांना
किंमतीचे लेबल नसते. पण त्या
हरवल्या की समजते त्यांची
किंमत किती मोठी असते…!

********

नाती तेव्हाच टिकतात जेव्हा आपण
एकमेकांपासून काहीच लपवत नाही
आणि जी नाती खरी असतात त्यांना
सांभाळण्याची कधीच गरज भासत नाही.

********

नाते हे हात आणि डोळ्यांसारखे असले
पाहिजे. हाताला लागले तर डोळ्यात
पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले
तर ते पुसायला हातच पुढे येतात.

********

काळ हा अखंड असून सर्वांचा
न्यायनिवाडा करणारा एकमेव
नि:पक्षपाती न्यायाधीश आहे.

********

ज्ञानी डोळ्यांनी जगतो तर
अज्ञानी कानांनी जगतो.

अहंकार व लोभ हे माणसाच्या
दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.

********

ज्याच्या वर्तमान काळ प्रयत्नवादी
असतो, त्याच्या भविष्यकाळ ही
उज्वल असतो.

********

Marathi Suvichar |
प्रेरणादायी सुविचार मराठी

मनुष्य कितीही श्रीमंत असला तरी
एकदा का दुर्गुणांच्या तावडीत
सापडला की त्याचे वैभव नाश पावते.

********

एक ऐरण शेकडो हातोडे तोडतो
कारण घाव हातोडे घालतात
ऐरण सहन करते. तोडणारे
तुटून जातात सहन करणारे
आणखी मजबूत होतात.

********

जोवर श्रद्धा, सचोटी व अढळ निष्ठा
तुमच्याठायी आहे, तोवर सर्व बाजूंनी
तुमची भरभराट होईल.

********

जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या
अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीला
उतरून खरी ठरत नाही, तोपर्यंत तरी
कोणीही सांगितलेली असली तरी
खरी मानू नका.

********

संपूर्ण जगाला विसरुन मनाची
शक्ती दृढपणे स्थिर करून
मन एकाग्र झाल्यावर अशक्य
असे एकही काम नसते.

********

अतिकष्ट व संकटे सहन केल्यानंतर
मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.

********

जो दुसऱ्यांना ओळखतो तो
शिक्षित, पण जो स्वतःला
ओळखतो तो खरा बुद्धीवान

********

पैशाला जर तुम्ही ईश्वर समजाल
तर तो तुम्हाला सैताना प्रमाणे
भ्रष्ट करून टाकेल.

********

जेव्हा आपल्याला राग येतो
तेव्हा माणसाने परिणामांचा
विचार करावा.

********

काहीतरी उच्च ध्येय डोळ्यासमोर
ठेवून त्यात आपले आयुष्य धन, बुद्धी
व विचार खर्च करण्यातच जन्माचे
सार्थक आहे.

********

अनुभवाने मनुष्य शहाणा होतो
अनुभवाने आलेले शहाणपण हे
हजारो पुस्तके वाचून आलेल्या
शहाणपणा पेक्षा कितीतरी पटीने
श्रेष्ठ आहे.

********

कितीही बिझी झालात तरी, आपल्या
माणसांसाठी वेळ जरूर काढत जा
नाहीतर जेव्हा तुम्हाला आपल्या
माणसांची गरज लागेल तेव्हा
तुमच्याकडे वेळ असेल पण माणसे
असणार नाहीत.

********

Good thoughts in marathi | सुंदर सुविचार |
Motivational quotes in marathi | Suvichar Marathi | Vichar

सोपे प्रेरणादायी सुविचार मराठी |
Marathi Suvichar | Good Thoughts In Marathi

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes

10 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here