Good Thought | तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात | Marathi Suvichar

0
548
Good Thought | तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात | Marathi Suvichar
Good Thought | तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात | Marathi Suvichar

Good Thought |
तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात |
Marathi Suvichar

तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात…

एक तर तुम्ही कशा पद्धतीच्या पुस्तका वाचता आणि दुसरे म्हणजे तुमचे मित्र कोण आहेत,

जर का तुम्ही चांगल्या पुस्तकांचे वाचन करता तर… नक्कीच तुमच्या अवती – भोवती चांगलीच

माणसे असतील. आणि चांगली मित्र – मंडळी असली कि जीवन चांगल्या उंचीवर जातो.

फक्त हे करून बघा…

काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये

बदल दिसेल आणि तुम्ही आनंदी व्हाल.

1 ) जगण्याची दिशा शोधा.

स्वत:लाच विचारा…! आपण जगतोय तरी कशासाठी…? आपले ध्येय तरी काय आहे…?
जग आणि जीवन खूप सुंदर आहे, जगाला हि दोष देवू नका आणि जगण्यालाही नाकारू नका.
ते म्हणतात ना… न करून पश्चाताप करण्यापेक्षा करून पश्चाताप करणे केव्हाही चांगले,
जगण्याची दिशा ठरवा.

2 दिवसाची सुरुवात आनंदाने करा.

आपल्या दिवसाची सुरुवात आनंदाने होईल असा प्रयत्न करा, आता आपण उठलो कि फोन असे होते,
त्या फोन मध्ये आपण काहीतरी नकारात्मक बघतो आणि आपला मूड ऑफ होतो,
आणि गंमत म्हणजे त्या विचारासी किवा त्या घटनेसी आपला काहीही संबंध नसतो,
आपल्याला राग येतो, आपला पूर्ण दिवस खराब होतो,
म्हणून उठल्यावर स्वत:ला सकारात्मक उर्जेचा डोस द्या.

3 ) जे काम करता ते अति उत्तम करा.

जे काही करा ते अतिउत्तमच करा, मन लाऊन करा आणि थोडा जास्तच करा,
कुणी आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात…

आपण अपेक्षे पेक्षा जास्तच करायचे, जेमतेम तसेच सांगितलेले काम तर कुणीपण करते,
नेहमी काहीतरी खास करण्याची तैयारी ठेवा.

Good Thought |
तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात |
Marathi Suvichar

4) चांगल्या मित्रांची निवड करा.

चांगले मित्र निवडा, मित्र चांगले असतील तर सल्ला हि चांगलाच देतील,
दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता, आणि अर्जुन श्रीकृष्णाचा, स्वतावर नेहमी विश्वास ठेवा,
नेहमी मित्रांसोबत चांगले वागा, स्वतःवर प्रेम करा,
तुम्हाला बघुन दुसरेही आनंदी होतात.

मनसोक्त जगायचे आणि आपल्याला जे पटते ते करायचे….

आपल्या जन्मदिवशच्या दिवशीच मृत्यूचाही दिवस ठरलेला असतो,

आता आपण ठरवायचे कि जन्म पासून तर मृत्यू पर्यंतच्या मधील काळ कसा जगायचा,

इतरावर टीका करत जगायचे कि जीवनाचा भरपूर आनंद घेऊन जगायचा,

आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तसेच सगळ्यांच्या अपेक्षेवर खरे हि
उतरू शकत नाही,

आठ दहा दिवसा अगोदर एक सात आठ वर्षाची मुलगी माझ्याजवळ येवून मला म्हणाली…

काका एक विचारू का…?

मी विचार बाळा म्हटल्यावर ती म्हणाली काका ATM चा फुलफॉर्म सांगता का…?

बाळा हे तर खूप सोप्पे आहे, A    All  T- Time  M –  Money

 माझे उत्तर तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते, ती हसली आणि म्हणाली काका तुम्ही चुकलात,

बर बाळा तू तुझे उत्तर सांग….

काका उत्तर आहे…. A – असेल T – तरच M – मिळेल

उत्तर एकुण मी तिच्या अपेक्षे प्रमाणे हरण्याचा भाव आपल्या चेहऱ्यावर आणला,
ती जिंकण्यासाठी आनंदी होऊन पुन्हा दुसऱ्याला विचारायला निघून गेली.

मुलगी निघून गेल्यावर मी मात्र विचारात पडलो, मुली ने दिलेले उत्तर किती खरे आहे,
तो उत्तर बँक  आणि पैशाला तर लागू पडतोच पण माणसाच्या बाबतीतही तितकाच खरा आहे,

बँकेच्या बाबतीत तुमच्या खात्यात पैसे असतील तर मिळतील तसेच माणसाच्या बाबतीत
निसर्ग नियमाप्रमाणे आपण निसर्गाजवळ काही जमा केले तर त्या मोबदल्यात
निसर्ग आपल्याला त्यापेक्षाही मौल्यवान आपल्याला देतो.

Good Thought |
तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात |
Marathi Suvichar

चला बघू या…

जर का निसर्गा जवळ व्यायाम जमा केला तर आरोग्य परत मिळते.

विश्वास जमा केला तर निष्ठा परत मिळते.

प्रेम जमा केले तर समर्पण परत मिळते.

कर्म जमा केले तर साफल्य परत मिळते.

असेच  माणसाने स्वतःच्या किंवा इतर माणसांच्या बाबतीत

जे पण जमा केलेली असतील त्याप्रमाणे त्याला निसर्गनियमानुसार

कितीतरी अधिक प्रमाणात…!

(A) अपेक्षित (T) ते (M) मिळेल

अर्थात… माणसांच्या बँकेतही आपली जमा मात्र सतत करावी लागते.

ही स्थिती माणसांची तर भगवंताच्या बाबतीत….?

भगवंताच्या बँकेचे नियम काय असतील…?

हे समजण्या इतकी बुद्धी माझ्यात नाही. पण…

संतांच्या शिकवणुकीमधून
एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे की,

भंगवंताच्या बँकेत आपण अगदी थोडी थोडी
भक्ती समर्पण भावाने जमा करत राहिलो तर…
आपण न मागताही… भगवंताकडून…
(A) आवश्यक (T) ते (M) मिळेलच

पण भगवंताच्या बँकेची बम्पर ऑफर आहे….

आपला अहंकार…!

हा आपला अहंकार आयुष्यात

फक्त एकदाच आणि कायमचा जमा केला की
त्या दयासागर भगवंता कडून आपल्याला

ध्यानी मनी नसताना एका सुवर्णक्षणी…

(A) अलौकिक (T) तेही (M) मिळेल…!

धन्यवाद

Marathi Suvichar | स्वतःसाठी जगा | मराठी प्रेरणादायक सुविचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here