50+ Best Marathi Suvichar
मराठी सुविचार फोटो – सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो…
मी तुमच्यासाठी सुंदर, चांगले, प्रेरणादायी, सकारात्मक, Good Thoughts In Marathi,
Positive quote, sunder vichar, suvichar marathi, marathi quotes,
marathi suvichar with image, suvichar sangrah, सुविचार संग्रह,
लघु सुविचार, सुविचार फोटो, सकारात्मक सुविचार, चांगले विचार असे
मराठी सुविचार आणि सुविचार फोटो आणले आहेत.
मला विश्वास आहे कि हे मराठी सुविचार तुम्हाला नक्की आवडतील…
तसेच तुमच्या जीवनात प्रेरणादायक, सकारात्मक, ठरतील.
हे मराठी सुविचार वाचा आणि आपल्या मित्र, नातेवाईक, संबधी,
यांना नक्की शेयर करा हि विनंती.
Best Marathi Suvichar | मराठी सुविचार फोटो – सुंदर विचार
अनुभवासारखा
दुसरा कुणी गुरू नाही.
काही लोक तर
मुळीच दुःखी होत नाही…
कारण त्यांना या जगात
आनंदीत करणारे
कुणीही नसते…!
जे आवडते
फक्त तेच करू नका….
जे करावे लागते
त्यातही आवड निर्माण करा.
Best Marathi Suvichar | मराठी सुविचार फोटो – सुंदर विचार
व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका..
जो परिणाम समोर आहे…
त्याला स्वीकारा.
कौतुक हा खुप लहानसा शब्द आहे…
परंतु कुणाचे कौतुक करायला मात्र
खूप मोठे मन लागते…!
Best Marathi Suvichar | मराठी सुविचार फोटो – सुंदर विचार
जीवनातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
एखाद्याला
गुन्हेगार ठरवीत असतांना…
अगोदर त्याच्या ठिकाणी
स्वत:ला ठेवून बघा.
तुम्हीं किती जगलात…
ह्या पेक्षा कसे जगलात…
याला अधिक महत्त्व आहे.
जीवनात प्रेम नक्की करा…
परंतु त्या प्रेमाचे प्रदर्शन
कधीही करू नका.
जीवन अगदी
सरळ आणि साधे आहे…
ओझें आहे तर
ते फक्त गरजांचेच….!
जेव्हा कांहीच नसते
तेव्हा अभाव नडतो…
जेव्हा थोडे असते
तेव्हा भाव नडतो…
आणि
जेव्हा सगळे काही असते…
तेव्हा मात्र स्वभाव नडतो…!
सगळे निर्णय मनानेंच घेऊ नका..
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
नेहमी हसत राहा… आनंदित राहा…
ह्यासाठी नाही की तुमच्याकडे
हसण्याचे कारण आहे…
ह्यासाठी की… तुमच्या दुःखाचा
या जगाला थोडा सुद्धा
फरक पडत नाही…!
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी
नेहमी कृतज्ञ रहा.
आपल्या मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा
नेहमी मोठीच असते.
आपल्या मनाचे दरवाजे
नेहमी खुलेच ठेवा…
ज्ञानाचा प्रकाश कधी
आणि कुठुन येईल…
हे सांगताच येत नाही.
Best Marathi Suvichar | मराठी सुविचार फोटो – सुंदर विचार
प्रत्येकालाच
आपल्या अडचणी
सांगत बसु नका…
कारण औषध
प्रत्येकाच्या घरी नसते…
परंतु मीठ तर असतेच…!
जगण्यात तर मौज आहेच…
परंतु त्याहून आणखीन मौज
फ़ुलण्यात आहे…!
जीवनात
माणसे सांभाळायची असतात
आणि पैसा वापरायचा असतो…
परंतु आजची लोकं पैसाला
सांभाळतात आणि माणसांना
वापरतात…!
suvichar marathi – sunder vichar – Good Thoughts In Marathi on life
मोठे विचारवंत
होण्यापेक्षा..
आचारवंत व्हा.
जीवनात कोणतेही नाते
ठरवून जोडता येत नाही.
आपण जीवनात
किती माणसे जोडली आहेत…
यावरुनच आपली श्रीमंती कळते.
संकटे तुमच्यातली
शक्ती आणि जिद्द
पाहण्यासाठीच
येत असतात.
समाधानी राहण्यातच जीवनातले
सगळ्यात मोठे सुख आहे.
अत्तर सुगंधी व्हायला…
फ़ुलेही सुगंधीच असावी लागतात.
फक्त आपल्या स्वार्थासाठीच
दुसऱ्याचा वापर कधीही करु नका…!
तसेच आपला वापर कुणालाही
करु देऊ नका.
जर मनात आणले तर या जगात
अशक्य असे काहीच नाही.
विचार करायला लावणारे मराठी प्रेरणादायक सुविचार
[ Best ] मराठी ह्रदयस्पर्शी सुविचार | Sunder Vichar
Good Thoughts In Marathi On Life
मदत करणाऱ्याला व्यक्तीला
कधीही दगा देवू नका…
आणि दगा देणाऱ्याला व्यक्तीला
कधीही मदत करू नका…!
जर आई- वडिलांपेक्षाही
मुलगा जास्त कमवायला लागला की…
तो पैशापुढेही आपले
आई वडील आहेत
हे विसरलेला असतो…!
जीवनात कितीही मोठे बना…
परंतु माणुसकी सोडू नका…!
मदत एक अशी गोष्ट आहे की…
जर का केली तर लोक लगेच विसरतात…!
आणि जर मदत केली नाही…
तर नेहमीच लक्षात ठेवतात…!
रात्री सुखाची झोप येणे…
साधी गोष्ट नाही आहे…
त्यासाठी संपूर्ण दिवसभर
प्रामाणिक असावे लागते…!
पायाला झालेली जखम…
ही सांभाळून चालायला शिकविते…
आणि मनाला झालेली जखम ही
जीवन कसे जगायचे हे शिकविते…!
लहान असतांना वाटत होते की…
परीक्षा फक्त शाळेतच असतात…!
परंतु आता समजले की…
जीवन जगतांनाही
खूप परीक्षा द्याव्या लागतात…!
वाईट दिवसांचा
अनुभव झाल्याशिवाय…
चांगल्या दिवसांची
किंमत कळतच नाही…!
जरी लोखंडाने
सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची
किंमत काही कमी होत नाही…!
घर हे किती मोठे आहे,
याला महत्त्व नसते…
तर त्या घरात किती सुखी आहेत…
हे खूप महत्त्वाचे असते…!
आपल्यामधील विश्र्वास
हा मोठ्या पर्वतालाही
हालवू शकतो…!
परंतु आपल्या मनामधील शंका
ह्या आपल्यासमोर मोठा पर्वत
उभा करू शकतात…!
suvichar marathi – sunder vichar – Good Thoughts In Marathi on life
गोड बोलण्याचे नाटक करणारा व्यक्ती
कधीही कुणाचाही हितचिंतक नसतोच…
हे नेहमी लक्षात ठेवा…!
कुत्र्याचे सर्व गुण माणसांनी घेतले…
परंतु इमानदारी हे गुण घेतले नाही…!
स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून…
त्यानेच पाटी लिहिली….
स्त्रियांना येथे प्रवेश नाही आहे.
लय भारी कमाल आहे माणसा तुझी…!
जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत…
पहिले, आपण आयुष्याभर
ज्या मी बरोबर राहतो…
त्याचें स्वरूप आपल्याला कळतच नाही…!
दुसरे, ज्या मनाच्याद्वारें आपण आयुष्याचे
संपूर्ण व्यवहार करतो…
ते मन आपल्या ताब्यांत येतच नाही…!
तिसरे, क्षणोक्षणीं ज्या प्रपंचांत
आपण सुखीच नाही…
अशी सगळेच तक्रार करतात…!
परंतु त्या प्रपंचाला सोडायला कुणीही
तैयार नसतात…
हे तिसरें आश्चर्य आहे..!
मला कुणाचीही गरज नाही आहे…
हा अहंकार आणि सगळ्यांनाच
माझी गरज आहे हा भ्रम
जर या दोन्ही गोष्टी टाळल्या
तर माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळच लागणार नाही…!
जीवन सुंदर आहे….
आनंदात जगा…
[ Best ] मराठी ह्रदयस्पर्शी सुविचार
Sunder Vichar – Good Thoughts In Marathi
थकलेल्या माणसाची वाट
आणि झोप लागत नसलेल्या
माणसाची रात्र मोठी असते…!
कुठलेही चांगले करण्याची सुरुवात
आपल्या कडूनच करावी…
कारण दुसऱ्याच्या कपाळाला कुंकू
लावण्यापूर्वी आपल्या बोटाला
लावावे लागते….!
आपल्याला जीवनात हे मिळाले नाही…
ते मिळाले नाही…
या तक्रारी करीत असतांना
आपल्या जीवनाचा प्रवास सुरु असतो…
कालांतराने आपण थकतो….
वयाने नाही तर… त्या निरर्थक
तक्रारीच्या ओझ्याखाली दबून…!
suvichar marathi – sunder vichar – Good Thoughts In Marathi on life
त्यासाठी एक सोपा उपाय…
जीवनातील अशी माणसे….
ज्यांनी मुद्दामून किंवा नकळतपणे
तुमचे मन दुखवले…
त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर
क्षमा करत चला…
ओझे नसले तर प्रवास मजेत जातो…
आणि आपण उगाच नको असलेल्या
गोष्टींसाठी मनाला खातो…!
प्रतिक्रिया देण्यापेक्षा…
प्रतिसाद द्या.
निश्चीतच बदल घडेल…
मग ती परिस्थिती असो किंवा मनस्थिती…!