Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | मोकळे व्हा….

0
223
good-thoughts-in-marathi-मोकळे-व्हा-sunder-vichar
good thoughts in marathi

नमस्कार मित्रांनो,
माझ्या वाचनात आलेला सुंदर विचार ,
खूप छान वाटला म्हणून आपल्यासाठी
शेअर करत आहे.

Good Thoughts In Marathi | Sunder Vichar
मोकळे व्हा….

लाखो जीव घेणार्‍या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली…..!
खूपच सुंदर सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात
करुन घेतात.

मनाला धीट करण्याचे…. आत्मविश्वास वाढविण्याचे शिक्षण देणारे….
लोणावळ्याचे मनशक्ती नावाचे स्वामी श्री विज्ञानानंद जी
मंत्रालयावरुन उडी मारुन आपला जीवन संपवतात.

कित्येकांना आधार देणारे आणि आध्यात्मिक गुरु अशी ओळख
निर्माण केलेले भैय्युजी महाराज आपले जीवन आपल्याच
हाताने संपवतात.

सकारात्मक संदेश आणि प्रेरणादायी विचार देणारा
चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतने नैराश्यातून
आत्महत्या केली.

आणि एक बातमी पुन्हा आठवत आहे… नैराश्याशी
लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी
आपले जीवन संपवतात.

अंदाजे सहा महिन्या अगोदर ची नागपूर ची बातमी….
उच्च विद्याविभूषित…. दिवंगत कुलगुरू च्या पत्नी
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी
नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या
करतात.

अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात…

सेलिब्रिटींच्या बातम्या सगळ्यांना माहित होतात म्हणून
हे उदाहरण दिले आहेत.

आता आपल्याला या सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचे…?

अगदी शांतपणाने पाण्यात पोहोणारे बदक जरीही आपल्याला
वरुन शांत दिसत असले तरी पाण्याखाली त्याचे पाय खूप वेगाने
हलत असतात.

फक्त शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी
बदकाचे कष्ट बदकालाच माहित असतात.

वर वर जितका माणुस खंबीर… आत्मविश्वासी दिसतो….
तितका तो आतून खंबीर…. आत्मविश्वासी असेलच असे नाही.
त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते….
जी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी
आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो….!
किंवा लपवण्याचा प्रयत्न करत असतो…! परंतु
शेवटी काय…?

जरी वर खूप सुंदर असा ताजमहाल असला…..
तरी खाली पायात तर कबरच आहे….
हे विसरुन चालत नाही.

Outlet [ बाहेर जाण्याची वाट , भावना व्यक्त करण्याचा मार्ग ]

ABP माझा या न्यूज चँनलने भय्यूजी महाराजांनी आत्महत्या
केल्या नंतर एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलत असतांना भय्यूजी महाराजांचे जवळचे मित्र….
श्री अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला
पैलू सांगितला.

भैय्यूजी महाराज स्वतः एक “अध्यात्मीक” गूरू होते….
परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील “स्ट्रेस”
बाहेर काढायला त्याच्या जवळ “outlet” नव्हता.

डॉ. शितल आमटे ( बाबा आमटे यांची नात – त्याचे ही अगदी
भैयु महाराजासारखे झाले )

हे Outlet इतके महत्वाचे असते का….?
होय….!
समजा पाण्यासाठी एक विशाल धरण… जे कोट्यावधी रूपये
खर्च करून बांधले. आणि त्याला जर Outlet च दिले नाही…
तर काय होईल….?
निश्चितच धरण फूटेल. इतके महत्वाचे असते हे Waste Weir…

मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेले
एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात
झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील…?

मुंबई का तुंबते…..? पुरेसे Outlets राहिले नाहीत.

म्हणून आपले Outlet नेहमी सरळ उघडे ठेवा. आपल्या तोंडाचे Outlet
वापरून आपल्या समस्या… आपल्या जवळच्या माणसांना सांगा.
आपल्या अंर्तमनाचं Outlet Open करण्यासाठी विपश्यना….
ध्यान साधनेचा अवलंबन करा आणि शक्य झाल्यास जगातील
सगळ्यात मोठे Outlet म्हणजे आपले डोळे…. यांना उघडा.
फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस…. दूःख…. उपेक्षा…..
इमारतीवर चढून उडी घेण्यापेक्षा…. बंदुकाच्या गोळीने डोक्याला
छिद्र पाडण्यापेक्षा…. पंख्याला लटकण्यापेक्षा……
केव्हाही हे सोप्प नाही का….?

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. त्याच्या जवळ
मन मोकळे करा. आपले आई… वडील…. भाऊ…. बहिण…
परिवार… आणि मित्र… हे बेस्ट आउटलेट….!

हसा…! बोला….! रडा….! भांडा…!
व्यक्त व्हा….! मुक्त व्हा….!
काळजी घ्या….!

मन मोकळे करा…. प्रेरणा घ्या…. आणि प्रेरणा द्या…

Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | मोकळे व्हा….

good-thoughts-in-marathi-मोकळे-व्हा-sunder-vichar
good thoughts in marathi | मोकळे व्हा

मित्रांनो….
मोठ्या हत्तीला माहूत ट्रकवर ढकलून देऊ शकत होता
असे नाही. परंतु माहूत ने हत्तीच्या पाठीमागून हात ठेवल्यामुळे….
हत्तीला विश्वास वाटत होता की…. आपला मालक आपल्याला
मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर
चढवून घेत होता.

आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत…..
ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे
कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.

कधीकधी काहींना तर असे वाटत असते….
जर आम्ही जागरूक…. अपडेट…. असतो….

जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती
तर आम्ही फार काही करू शकलो असतो…

आपण हे सर्वाणसाठी करू शकत नाही….
परंतु काहींसाठी…. काही कठीण वेळी
आपण ते करू शकतो.

प्रेमाचा एक साधा शब्द…. सकारात्मकता किंवा शक्ती
आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे जीवन
कायमचे बदलू शकतात. म्हणून प्रेरणा द्या…. आणि
जीवन बदलवा.
मित्रांनो,
🙏😊🙏सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ” म्हणा.
आपुलकीची माणस मिळायला खुप मोठे नशीब लागते.

धन्यवाद

🙏🙏🙏 आवडल्यास नक्की शेअर करा.

                                               🙏🙏🙏🙏 सुप्रभात 💐💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here