Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

0
473
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-wastav ani vishtav
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi

वास्तव आणि विस्तव  
Good Thoughts In Marathi 
Sunder Vichar 

वास्तवाच्या जवळ आणि 
  विस्तवाच्या दूर राहिले की 
चटका बसत नाही…!
वास्तव आणि विस्तव - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - wastav
वास्तव आणि विस्तव – Good Thoughts In Marathi – Sunder Vichar
 
माझ्या नोकरीच्या ठिकाणी एक गोडावून आणि ऑफिस चे काम सुरु झाले… सिमेंट, रेती, विटा
लोखंड येऊन पडत होता.

ठेकेदाराने मजूर बोलविले, एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात जवळपास
सहा महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक बारीक से कमजोर चार वर्षाचे पोर ओढल्या
सारखे चालत होते.

गाडीतून समान उतरवून लगेच त्या बाईने बांधकाम होत असलेल्या कंपनीच्या आवारात दोन लाकडी
खांबांना एक जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या
भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी
खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. नवीन ऑफिस इमारतीचे काम जोमात सुरु झाले.
दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.
कंपनीतील काही सामान वापरण्याची परवानगी घेण्यासाठी ते माझ्याशी बोलत असत…!

बघता-बघता गोडाऊन उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही आता
दगड-वाळूत खेळू लागले. पावसाळा सुरू झाला तशी तिची रवानगी अर्धवट बांधलेल्या गोडाऊनमध्ये
झाली.

मी तिला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा ठेकेदार सकाळी यायचा आणि
संध्याकाळी निघू जायचा… आमचे मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी एखाद्या वेळी यायचे.
एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे.
आमच्या बोलण्यात ती मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची.
हळुहळू गोडाऊन आणि ऑफिसची इमारत पूर्ण झाली… मग प्लास्टर. लवकरच ऑफिसच्या
आतबाहेर छान पांढरा रंग दिला गेला.

Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

एक दिवस एका लहान गाडीत ठेकेदाराचे सामान पावडा, कुदळ,घमेल, आणि इतर लहान सामान
ठेवतांना दिसले. गाडीचा ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या
मुलाला गाडीमध्ये उभे केले आणि दोघेही नवरा बायको त्या गाडीत बसले…
गाडी निघाली…!
गाडी फिरून माझ्याकडेच आली… ड्रायव्हर ने मला गाडीतील सामान दाखविला, आणि म्हणाला
साहेब.. मी ठेकेदाराचेच समान गाडीत टाकले आहे, तुमच्या कंपनीचा कोणताच सामान मी
गाडीत टाकला नाही…!
मी एक नजर गाडीतील सामानाकडे फिरवली… तसेच ते दोघेही मला म्हणाले…
साहेब, आमचा येथील मुक्काम संपलेला आहे आम्ही जात आहोत….!
मला बरे नाही वाटले…. मी म्हटले… का असे अचानकपणे जात आहात…?
काम तर खुप बाकी आहे…
ती बाई म्हणाली… ठेकेदाराचे नवीन साईटीवर काम सुरू होणार आहे…
गाडी सुरु झाली आणि निघू गेली.

मी आपल्या खुर्चीवर येवून बसलो आणि मला विचार पडला की… एखाद्या चिमणीने गवताची एकेक
काडी जमा करून घरटे बांधावे… तसे तिने जीव ओतून काम केले त्यांनी. कधी आपलेही असे घर
असावे असे त्यांना वाटत नसेल का…?  कसे यांचे जीवन…? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमारती

उभारायचे. ते पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे…!

जवळजवळ पूर्ण वर्षभर ते नवरा-बायको ज्या घरात राहिले… त्यांचा संसार फुलला,
जे इमारत त्यांनी इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ते चालले होते.
कसला मोह नाही…. कसला लोभ नाही…. कसलीच तक्रारही नाही.
अगदी आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर
पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला….

Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

मनात विचार आला. जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का…?
तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का…? जे मिळविले, निगुतीने सजविले,
ते तसेच सोडून जावे लागणार नाही का…? त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही

दुसऱ्या साईटीवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते…? अगदी एक क्षण, एक श्वासतरी
जास्त मिळतो
का कुणाला…? सर्वांना जावेच लागते की…! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर
करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का…?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here