Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

0
552
Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा

Moral Story Marathi | एक किलो तूप |
मराठी बोधकथा | सुविचार

good-thoughts-in-marathi-on-life-सुविचार-फोटो-मराठी-सुविचार-images-vb-good-thoughts-सुंदर-विचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

आयुष्यात मनस्ताप अवस्था
टाळायची असेल तर…
कोणाकडून कोणतीही
अपेक्षा ठेवू नका.

 

एक गरीब शेतकरी आपल्या गावामधून तालुक्यातील बाजारात तूप

विकण्यासाठी जायचा.

 

एका दुकानदाराला त्याचे तूप खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दर

आठवड्याला एक किलो तूप घेऊन ये असे सांगितले.

 

शेतकरी सुद्धा हे ऐकून आनंदी झाला.

शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली.

आणि सामान घेऊन तो घरी आला.

 

नंतर शेतकरी जेव्हा हि तूप घेऊन जायचा तर सरळ त्या दुकानदारालाच देत असे.  

दुकानदारही नेहमी शेतकऱ्याला तुपाचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले.

 

एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या तुपाचे वजन केले तर

ते 900ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो आणि

तूप 900ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.

शेतकरी आपली फसवणूक करत आहेअसा विचार त्याच्या मनात आला…!

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

 

दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या

समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या

रागाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला तू मला मूर्ख

बनवीत आहेस.

 

शेतकरी म्हणाला अहो दादा… माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच

नाही आहे. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप

बनवूनच मी तूप मोजून आणतो.

 

शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान लाजेने खाली गेली…! कारण

तो स्वतःच चुकीचे काम करत होता…!

त्याच्या लक्षात आले की, आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते.

 

कथेची शिकवण :-  या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की

आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.

कारण शेवटी जैसी करनी…. वैसी ही भरनी…!

 

मी जगाला जसे देईन तसे जग मला देईल

ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

 

सुगंध देणारी अगरबत्ती संपली की

मागे फक्त राख उरते…

त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही …..

सेच मनुष्य देहात जो पर्यंत जीव आहे

तो पर्यंत छान जगा…

कारण जीवन खूप सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवा.

 

भूक लागली म्हणून

भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही….

आणि पैसा जास्त आहे म्हणून

भुकेपेक्षा जास्त अन्न ही खाता येत नाही...!

म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक

रेषेपर्यंतच स्थान आहे….!

 

पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा

आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली

सोन्यासारखी माणसे हिच आपली श्रीमंती आहे…!

 

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

नाती सुंदर व्हायला माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

वर्षातले दोन दिवस तुम्ही काहीही करु शकत नाही…

कालचा दिवस आणि उद्याचा दिवस

जीवनात तुम्हाला काही करायचे असेल

तर ते आजच करा.

कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे…!

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

सुखी माणसाचा सदरा

कोठेही विकत मिळत नाही…!

तो आपल्या स्वतःलाच शिवावा लागतो

आपल्या स्वभावाच्या मापाने

आणि भावनांच्या धाग्यांनी.

 

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

जर खरेच आयुष्यात… 
आनंदी राहायचे असेल ना…
तर पैसा पाकिटात ठेवा…
डोक्यात नाही…
 
हर कोई सुख की चाबी ढूंढ़ रहा हैं

लेकीन सवाल यह है की…

सुख को ताला किसने लगाया हैं?

 

(संकलित कथा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here