Best Motivational Quotes In Marathi |
प्रेरणादायी सुविचार मराठी
नमस्कार मित्रांनो,
आज तुमच्यासाठी best motivational quotes in marathi,
प्रेरणादायी मराठी सुविचार, सुंदर विचार, घेऊन आलो आहे.
मला विश्वास आहे आपल्याला हे मराठी सुविचार नक्कीच आवडतील.
बेस्ट सुविचार
सुख आपल्या हातात नाही
पण सुखाने जगणे हे नक्की
आपल्या हातात आहे.
******
वाणी आणि पाणी जपून वापरा.
वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ
आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ
सुरक्षित राहणार आहे.
******
स्वतःची वाट स्वतःच बनवा
कारण इथे लोक वाट दाखवायला
नाही…. वाट लावायला बसलेत…!
******
आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास
कधीच ठरवून करायचा नसतो
जशी वळणे येतील तसे वळावेच लागते.
******
नेहमी अशा लोकांसोबत राहा
जे तुम्हाला जास्त यशस्वी
होण्यास मदत करतील.
******
आपल्याला चटके देणारे काही दिवे
तेच असतात… ज्यांना आपण वाऱ्यामुळे
विझतांना वाचवलेले असते.
******
बिना रडता तर कांदा पण
कापता येत नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल…
संघर्ष तर करावाच लागेल.
*****
ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण आपली पुढची पायरी
गाठली आहे, त्या पायरीला
कधीच विसरू नये. कारण
त्या पायरीचा आधार घेतला
नसता तर आपण पुढची पायरी
कधीच ओलांडू शकलो नसतो.
******
जिवंत आहे तो पर्यंत
नात्यांना वेळ द्या.
ताजमहाल जगाने पाहिला
मुमताज ने नाही.
******
Good Thoughts In Marathi
एका मिनीटात तुमचे आयुष्य
बदलू शकत नाही…. पण
एक मिनिट नीट विचार करून
घेतलेला निर्णय मात्र तुमचे
आयुष्य नक्की बदलू शकतो…!
******
कुणाकडूनही अपेक्षा ठेवून
नाराज राहू नका कारण
आयुष्याचा सोहळा संपला की
घाटावर फक्त कावळा शिल्लक
राहतो.
******
वाढत्या वयापेक्षा
वाढत्या अपेक्षा
माणसाला
जास्त थकवतात.
******
माणसाची सवयच अशी आहे
जो उपयोगाला येईल त्याला धरून
चालायचे आणि गरज संपली की
त्याला सोडून द्यायचे.
******
Best Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार
माणसाने शिक्षणा आधी संस्कार
व्यापारा आधी व्यवहार आणि देवा आधी
आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात
कोणतीच अडचण येणार नाही.
******
योग्य ठिकाणी मिळालेली
अयोग्य वागणूक माणसाला
त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे
प्रवाह बदलण्यास भाग पाडते.
******
गती येण्यासाठी आपले चरण
आणि प्रगती होण्यासाठी आपले
आचरण खूप महत्वाचे आहे.
******
सुंदर विचार
एक व्यक्ति म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तित्व म्हणून जगा…
कारण व्यक्ति कधी ना कधी संपते
पण व्यक्तिमत्व मात्र नेहमी जिवंत राहते.
******
जगात सर्वात जास्त तिरस्कार हा
खरे बोलणाऱ्या व्यक्तींचाच केला जातो.
******
शत्रू बनविण्यासाठी भांडणच करणे
गरजेचे नाही. केवळ स्वतःच्या
हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा
बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील.
******
सगळे आपलेच आहेत
हाच तर मोठा गैरसमज आहे.
******
Motivational Quotes In Marathi
माणूस किती आपला आहे आणि
किती आतला आहे ह्याचे उत्तर फक्त
वेळेकडे असते. कारण गरज संपली की
विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे.
******
नेहमी तयारीत राहा
हवामान आणि माणसे
कधी बदलतील सांगता
येत नाही….!
******
एक वेळ माणसे लांब गेली
तरी चालेल पण लांबून मजा
बघणारी माणसे आयुष्यात
नसावीत.
******
शोधायचे आहे तर
काळजी करणाऱ्यांना शोधा
वापर करणारे तर गरज पडल्यावर
आपोआप तुम्हाला शोधत येतील.
******
जेव्हा लोकांना तुमच्या
चांगल्या गोष्टी सहन होत
नाही ना… तेव्हा लोक तुमच्या
वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात
******
तुम्ही स्वतःच्या नजरेत
योग्य असाल तर लोकांच्या
नजरेकडे लक्ष देऊ नका…
कारण त्यांच्या नजरा
गरजेनुसार बदलतात.
******
प्रेरणादायी सुविचार
लोक जर त्यांच्या बोलण्याच्या
मर्यादा विसरून जात असतील
तर उलट उत्तर देणे हाच सगळ्यात
चांगला पर्याय असतो….
******
परक्यानी दिलेला मान आणि
आपलयांनी केलेला अपमान
माणुस कधीच विसरत नाही
******
गळून गेलेल्या पाकळ्या
जश्या पुन्हा जुळत नाही
तसेच मनातून उतरलेले
काहीजण पुन्हा मनात
भरत नाहीत..!
******
मनापासून बोलणे आणि
मन राखण्यासाठी बोलणे
यातला फरक तुम्हाला
जरी कळत नसला तरी तो
समोरच्याला जाणवतो..!
******
ओझे आणि मन अशा ठिकाणी
हलके करावे ज्या ठिकाणी
ते सुरक्षित राहील..!
******
प्रत्येकाचे दिवस पलटत असतात
आयुष्यात थोडी सहनशक्ति ठेवावीच
लागते. आजची परिस्थिति उद्या तशीच
राहत नसते….
म्हणून
नेहमी सुखी रहा
हसत रहा
आनंदी रहा.
******
प्रेरनादायी सुविचार मराठी | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi
Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes
Suvichar Marathi | 500+सोपे प्रेरणादायी सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो ,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर सुविचार घेऊन आलो आहे
हे सुविचार जेवढे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, तेवढेच
माझ्यासाठी ही महत्वाचे आहेत. कारण या सुविचारणेच
हा विषय समृद्ध होतोय. माझे होते तुमचे ही तुम्ही करा.
आपले जीवन घडवणारे सुंदर प्रेरणादायी सुविचार | suvichar status
चांगला विचार कराल तर चांगले होईल
वाईट विचार कराल तर वाईट होईल
आपण दिवसभर जसा विचार करतो
तसेच घडत असते.
*****
मोह असला की वाईट गोष्टी
आपल्याला दिसत नाही
आणि घृणा कराल तर
चांगल्या गोष्टी आपण
पाहू शकत नाही.
*****
नवे काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी
*****
माणसाची चौथी
मूलभूत गरज म्हणजे
पुस्तक.
*****
सत्याने मिळते तेच टिकते
*****
जग जर स्वप्नांच्या पलीकडचे
जर पहायचे असेल तर स्वप्न देखील
जगाच्या पलीकडचे ठेवा.
*****
आपण त्यांच्याच समोर नतमस्तक
झाले पाहिजे, ज्यांच्यामुळे
आज आपले अस्तित्व आहे.
*****
संघर्षाच्या मार्गावर जो
मार्गक्रमण करतो…..
तोच जग बदलून टाकतो.
*****
एकमेकांची प्रगती साधते
ती खरी मैत्री
*****
ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा
सामना करावा लागतो.
तोच अनुभव तुमची शक्ति, धैर्य,
आणि आत्मविश्वास वाढवतो.
*****
माणूस चालतांना कोसळावा म्हणून
ठेच लागत नाही. त्याला सावरण्याची
सवय लागावी म्हणून ठेच लागते….!
*****
स्वतः तील उणिवा जाणून घेणे
हेच आयुष्यातील सर्वात मोठे
बलस्थान आहे.
*****
बदल घडवण्यासाठी योग्य माणसाची
किंवा योग्य वेळेची वाट पाहू नका
तर स्वतः आजच बदल घडवण्याची
सुरुवात करा.
*****
काही लोक यशाची स्वप्ने पाहतात
आणि इतर लोक ती जगतात…
कठोर कष्ट घेतात…
*****
motivational Quotes In Marathi
निघून गेलेला क्षण कधीच
परत आणता येत नाही.
*****
उद्याचे काम आज करा
आणि आजचे काम आत्ताच
करा.
*****
चुकीचा व्यवहार माणसे तोडतो
म्हणून तो सत्याने आणि
सन्मानाने करा.
*****
यशाचा, वयाचा आणि अनुभवाचा
काही संबंध नसतो. कारण…
तोरणा किल्ला महाराजांनी
वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकला होता.
*****
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खूप ससे येतील आडवे. बस….
त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा.
*****
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची
असेल तर,नोटा मोजू नका. कधी चुकून
डोळ्यात दोन अश्रु आले तर ते पुसायला
किती जण येतात ते मोजा.
*****
स्वतः शीच शर्यत लावून एकदा
स्वतः लाच हरवले की जगात
दुसरे कोणीच तुम्हाला हरवू
शकत नाही.
*****
लढाईत आणि आयुष्यात
प्रत्येक क्षणाला महत्व असते
एका क्षणाचा अवधी सुद्धा
जय – पराजय ठरवू शकतो
तिथे गफीलपणाला थारा नाही
त्यामुळे लढाईत आणि आयुष्यात
नियोजन एवढ्या शांततेत आणि
हुशारीने केले पाहिजे की
अंमलबजावणी नंतर आपल्याच
यशाचे नगारे वाजले पाहिजेत.
*****
जेव्हा स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा
दृढतेने केली जाते तेव्हा अडचणी
देखील संपतात आणि यामुळे
आपल्याला यशापर्यंत पोहोचण्याचा
मार्ग मिळतो.
*****
कोणत्याही संकटा शिवाय मिळणारे
यश हा विजय ठरतो. पण अनेक
संकटांशी सामना करून मिळालेला
विजय हा इतिहास घडवतो.
*****
तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल
तेवढेच मोठे यश तुम्हाला मिळेल
त्यामुळे संघर्षाला न घाबरता
ध्येयाचा पाठलाग करा.
यश नक्कीच प्राप्त होईल.
*****
काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता
त्यात सर्वोकृष्ट स्थानी पोहचा….!
*****
सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतः चे राज्य हे स्वतः च मिळवावे
लागते. कारण ह्या जगात नुसत्या
डरकाळीला महत्व नाही…..!
*****
अनेक वेळा हार पत्कारून सुद्धा
जिंकण्यासाठी जो जिद्धीने उभा
राहतो. तो काहीही करू शकतो.
*****
प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या
बदल नक्कीच घडेल. मग ती
परिस्थिति असो वा मनस्थिति
*****
सोपे सुंदर प्रेरणादायी सुविचार
कठीण काळात स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलोच नाही .
*****
अपयशाने खचू नका
अधिक जिद्धी व्हा.
*****
दुःख कवटाळत बसू नका
ते विसरा आणि सदैव
हसत राहा.
*****
आपल्यामुळे दुसऱ्याला
दुःख होईल असे कधीही
वागू नका.
*****
कधीच कोणावर अवलंबून राहू नका
जे करायचे आहे ते करून दाखवा
दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास
आपण स्वतःची क्षमता विसरतो
*****
मित्रांनो असे सुंदर विचार घेऊन आपल्या साठी येतोय
जर आपल्याला हे विचार आवडले असतील तर कृपया
ह्या ब्लॉगला सबस्क्राइब करा. भेटूया नविन पोस्ट मध्ये
नविन सुंदर विचारासह.
[…] 75+ Best Motivational Quotes In Marathi |प्रेरणादायी सुविचार […]
[…] हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे !! हरे राम हरे राम, राम राम हरे हरे !! 75+ Best Motivational Quotes In Marathi |प्रेरणादायी सुविचार […]
[…] motivational quotes in marathi […]