Negative Energy – घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची ८ लक्षणे

0
195
Negative Energy - घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची ८ लक्षणे
Negative Energy - घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची ८ लक्षणे

Negative Energy –
जाणून घ्या घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची ८ लक्षणे

१). घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो
कोणत्याही कामात मन लागत नाही . शरीरात ऊर्जा म्हणजे
एनर्जीनसल्यासारखे…. गळून गेल्यासारखे वाटते.

२). मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे
असे वाटते.

३). घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्याच
कामात यश मिळत नाही.

४). घरातील साहित्य सतत तुट-फुट, टीव्ही, फ्रिज वॉशिंग
मशीन, मिक्सर, इलेक्ट्रॉनिक ची साधने वारंवार खराब होतात.

५). घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषध
उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत..

६). विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा
चिंता वाटत राहते. पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशन
मध्ये होते.

७). काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता
राहून जाते. एखादी चालून आलेली संधी आश्चर्य कारक
रित्या हातातून जाते. सतत वाईट स्वप्न पडणे .

८). घरात कुणीतरी असल्याचा भास होणे. .

Negative Energy

घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसे
ओळखावे…..?

एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा.
थोडेसे गंगाजल मिसळा. मूठभर गुलाबाच्या
पाकळ्या त्यात टाका . हा ग्लास घराच्या
एखाद्या कोपऱ्यात ठेवा.

24 तासानंतर ग्लास मधील पाण्याकडे निरखून पहा….
जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल
तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका
गडद असेल तितकी निगेटिव्हटी एनर्जी जास्त
आहे. आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात.

निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय

१). घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी
पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा
खडे मीठ म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू
नये.

२). निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान
मोहरीचे दाणे, लाल मिर्ची आणि मिठाने नजर उतरवा.
या तिन्ही वस्तू आपल्या घरातएकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा.

३). किचन मध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा.
ही मिठाची फुरसुंडी प्रत्येक व्यक्तीला दिसणार नाही अशी
ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन
मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात… तलावा मध्ये टाकून
द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेट मध्ये प्लश करावे.

४). दर सायंकाळी अंगणातील तुळशी जवळ तुपाचा किंवा
तेलाचा दिवा न चुकता लावा .

५). घरात हनुमान चालीसा ऐका.

६). अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजा जवळ सांजवेळी
दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा.

पोस्ट आवडली असेल तर लाईक करा. आणि
जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद

जय श्री कृष्ण

जाणून घ्या घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची ८ लक्षणे #jaishreekrishna #marathiknowledge

Suvichar Marathi | 500+सोपे प्रेरणादायी सुंदर मराठी सुविचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here