Some Unique Words Used In Villages language – गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ

1
1295
बैल - पोळा - बैल पोळा - bullock- village india - vb good thoughts - विजय भगत - vijay bhagat

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

Bullock cart - rural india -bull vehical - vb good thoughts -विजय भगत - ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language - बैलगाड़ी - बंडी
Bullock cart – rural india -bull vehical – vb good thoughts -विजय भगत – बैलगाड़ी – बंडी 
आज आपल्या ग्रामीण भाषेत कित्येक शब्द लोप पावलेले आहेत अणि काही शब्दांचे आपल्याला
अर्थ ही माहित नाही…!
 मला माहित असलेले काही शब्द, माझ्या वाचनात आलेले आणि काही इंटरनेट च्या मदतीने
ही माहिती गोळा करून तुमच्या सोबत शेयर करीत आहे.
आपण ही माहिती वाचून घ्या तसेच आप आपल्या मुलानाही वाचायला द्या.
समजावून सांगा हि ग्रामीण भाषा आणि ग्रामीण शब्द.
तिवडा :- जुन्या काळी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसे टाकून, नंतर त्यावर 
बैल, गाय,म्हैस अशी जनावरे फिरवली जायची. सगळे एकाला एक बांधले राहत ( दावन ) व त्यांना गोल 
फिरता यावे म्हणून  खळ्याच्या ( खरयान )  मध्ये मधोमध एक उभे लाकूड रोवले जायचे त्याला
तिवडा म्हणत. किंवा तिपयी म्हणत.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

बैलगाडी :- बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे. बैलगाडी 
ओढण्यासाठी साधारणपणे दोन बैलांची आवश्यकता असते. बैलांच्या मानेवर जे लांब, आडवे, 
गुळगुळीत केलेले लाकूड असते त्याला जू म्हणतात. जुवाच्या दोन्ही टोकांला भोके पाडून टिपर्‍यासारखी 
दोन लाकडी दांडकी बसवतात, त्यांना शिवळा म्हणतात. शिवळा व बैलाची मान यांना बांधून ठेवणार्‍या 
सुती मफलर सारख्या पट्ट्याला जोते म्हणतात. जू हे लिंबाच्या झाडापासून बनवले जाते. लिंबाचे लाकूड 
उन्हामध्ये व घर्षणाने गरम होत नाही, फाटळत नाही व टिकाऊ असते.

 

साठी :-एक वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग
शेतातील माल, डबा, धान्याची पोती, शेणखत, बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो. त्याची
रचना अशी असते, खाली – वर बावकाडे असतात. खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडे
ताशीव नक्षीदार उभी केली जातात. त्याला करूळ म्हणतात.
करूळाच्या वर एक बावकाड असते, त्यामध्ये करूळी फिट केली जातात. ज्यामुळे साठीची उंची
वाढते व शेतीचा जास्त माल बसतो. साठीला खाली आडवी लाकडे टाकली जातात.
त्याला तरसे म्हणतात. त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक
करताना खाली पडत नाही. तसेच दुसऱ्या शब्दात याला साटा ही म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

जू ( जुआडी ) :- बैलगाडी, औत, कुळव, नांगर,वखार, इ. ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवे
लाकूड ठेवले जायचे  त्याला जू ( जुआडी ) म्हणतात.
आरपाटा :- बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या
खाली एक बूट असते. त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू
असते, त्याला मणी म्हणतात.
त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो. मण्याला ( गड्डा ) लहान-लहान छिद्र असतात. त्यामध्ये वर्तुळाकार
आरी ( लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या ) बसवल्या जातात. त्या आर्‍यामध्ये बसवतात. आर झिजू नयेत
म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात.
लाकडी चाकाचा मधला गोल भाग, गड्डा, चाकाची पाती, आरी, चाक घट्ट रहावे म्हणून त्यावर लावलेली
लोखंडी पट्टी धाव, दोन चाकाना जोडणारा लोखंडी एक्सल, आक. ( आस्कुड ) आकामधून चाक बाहेर
पडू नये म्हणून आकाच्या दोन्ही बाजूला छिद्रे पाडून त्यात लोखंडी खिळा बसविण्यात येतो याला उन्नी
(खिल्ली ) म्हणतात. या उन्नी वर ठेवलेला लाकडी चौकोनी भाग म्हणजे पेटी. पेटीवर ठेवलेला भाग
म्हणजे साटा, पेटीला वाय आकाराची लाकडे घट्ट बसविलेली असतात त्या दाड्यां, ( धुर ). दाड्यांवर
पुढील टोकावर ठेवतात तो जू, जू दांड्याला व पेटीला ज्या दोरीने बांधतात तो दांड, बैले जू ला जखडून
ठेवण्यासाठी सापती  वापरतात. ती  बैलाना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याच्या नाकातून दोरी घालतात
ती वेसण, बैलावर ऊगारला जातो तो चाबूक, चाबकाच्या टोकाशी लावली जाते ती सापती, ( तुतारी )
ढकली :- बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवे लांब लाकूड लावले जाते त्याला ढकली
म्हणतात. या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे
थांबतो.
दांडी :- बैलगाडीसाठी चाके तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्या खाली जो चौकोनी
लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन छिद्र पाडली जातात, त्यामध्ये तीन साठीपेक्षा पांचते सहा फूट
लांबीची लाकडे बसवली जातात. त्यावर जू ठेवले जाते. जू आणि बूट याला यटक घातले जाते.
त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

आळदांडी :- गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात. त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात.
तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची, पण ज्वा पर्यंतच्या लांबीची असते. या आळदांडीमुळे जू मागे
सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही.
पिळकावणं :- गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातले जाते ते ढिले राहू नये म्हणून
दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळले जाते, जेणेकरून यटाक ढिल होत नाही.
त्याला पिळकावणं म्हणतात.
जूपणी, खिळ ( शिवर ) :- जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन छिद्रे पाडलेली असतात. त्यात
दोन – तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला थोडा जाड ठेवला जातो.
जुपणीला बारीक रस्सीने विणलेला तीन ते चार फुटाचा पट्टा बांधलेला असतो. जेव्हा बैल गाडीला जुंपतात,
तेव्हा जू उचले जाते.
बैल जू खाली घेतात, ज्वाच्या छिद्रात दोन्ही बाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत
अडकवला जातो. जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडे – तिकडे हलत नाहीत.
बैल सरळ चालतात. त्यामुळे इकडे – तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी, शिवर, किंवा खिळ
म्हणतात.
बूट :- बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा.
असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला
बूट म्हणायचे.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

गंज :- ज्वारी किंवा मका यांचे पिक काढून झाल्यावर त्यांची कणसे काढून झाली की, लांब देठाच्या पेंढ्या
बांधल्या जातात. त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्रित करून एका
ठिकाणी गोल किंवा आयताकार रचल्या जातात. वर काही उंच गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो.
त्यामुळे त्याचे वारा आणि पाऊस पासून संरक्षण होते. त्याला गंज म्हणतात.
पुंजना :- धान कापून झाल्यावर पूर्ण शेतातील कापलेला धान एका ठिकाणी गोळा करून त्याला
गोलाकार ठेवणे जेणेकरून त्याचे पावसा पासून रक्षण व्हावे त्याला पुंजना म्हणतात.
तिफण आणि चौपण :- पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा ( पाबर ) वापर करत. पिकामध्ये जास्त
अंतर ठेवायचे असेल तर तिपणीचा वापर करत, अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.
कुळव आणि फरांदी :- शेतात पेरणी करण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत, कचरा काढण्यासाठी
कुळवाचा वापर केला जात असे. आणि जर का जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर
फरांदीचा वापर करत.
माती उकरून गवत काढण्यासाठी कुळवाला जी लोखंडी पट्टी असते त्यास फास म्हणतात.
यटाक :- कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ किंवा जू याचा वापर करत असताना  ते जोडण्यासाठी
ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणतात किंवा येटाळं असे हि म्हणतात.
 शिवाळ, शिवर, शिवळ :- पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी, लोखंडी नांगराचा वापर केला जायचा.
नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे, ते ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची.
दूसरा शब्द शिवळ किंवा शिवर
रहाटगाडगे :-  शेतीला पाणी देण्यासाठी पूर्वी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला
जात असे. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढले
जात असे.त्याला रहाटगाडगं म्हणतात.
रहाट :- पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा. बादलीला
कासरा बांधला जायचा. ती राहाटावरून खाली सोडली जायची. पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची
व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचे.
चाड :- शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून एक सारखेच बी पडावे म्हणून चाड्याचा वापर केला
जायचा.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

ठेपा/ डेर/ मेडकं  :-  जनावरांना बांधण्यासाठी पूर्वी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड ) वापर
करून छप्पर तयार केले जात असे. पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून
लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला ठेपा म्हणत.
तुराटी :- तुरी बडवून ( तोडून ) जी काटके राहायची त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर
शेकारण्यासाठी केला तसेच पावसाच्या दिवसात चूल पेटवण्यासाठी केला जायचा.
काड :- गहू बडवून जी काटके राहायची त्याला काड म्हणतात. काडाचाही उपयोग
शेकरण्यासाठी केला जात असे.
भुसकाट :- धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा ( भुसा ) राहतो त्याला भुसकाट म्हणतात.
याला जनावरे खातात.
वैरण :- ज्वारी, बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण
म्हणतात.
कावळे :- गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे
कावळे तसेच दुसऱ्या शब्दात डाव ही म्हणतात.
कालवण , कोरड्यास :- पातळ भाजी
आदण, अंदन :– घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणतात, दुसऱ्या शब्दात उकळते पाणी.
कढाण :- मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात, दुसऱ्या शब्दात कढण, शेरवा
घाटा :- हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात. दुसऱ्या शब्दात
ढाळा, डहाळा
हावळा :- हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या किंवा वारलेला कचरा गोळा करुन त्यात
हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात. दुसऱ्या शब्दात हुळा, हुडा.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

कंदुरी :- पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरे कापले जायचे, व ते खाण्यासाठी
गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली
भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणत.
हुरडा :- ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसे भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते
खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात.
आगटी :- हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसे भाजली जातात
त्याला आगटी म्हणतात.
कासूटा, काष्टा :- पूर्वी माणसे सर्रास धोतर नेसत असत, धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर
राहिलेल्या धोतराच्या निर्‍या ( चिन्या ) घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणतात.
आणि हाच प्रकार जर स्त्रियांनी केला तर त्याला काष्टा म्हणतात.
घोषा :- पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना
घोषा पद्धत असायची. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट
गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे.
शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे. परंतु चेहरा दिसायचा नाही.
शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही.
दंड :- एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा. येथे दंड म्हणजे पूर्वी
कपड्यांची कमतरता असायची. अशा वेळी स्त्रीया, एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला
भाग कापून काढायचा आणि दुसर्‍या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग
शिवून एक साड़ी तयार करायची. याला दंड घातला म्हणायचे.
धडपा :- साडीचा जो भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर
साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारी साडीची सहावारी साडी करून नेसली
जाते. त्याला धडपा म्हणतात.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

कंबाळ / कयाळ :- पूर्वी स्त्रीयांच्या  नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर
साडीच्या निर्‍या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा
केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला कंबाळ तर काही भागात त्याला
क्याळ म्हणायचे.
दंडकी :- म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट. दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरले जायचे.
त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे, आतल्या बाजूला एक मोठा खिसा. तसेच त्याला गळ्याजवळ
एक चोरखिसा असायचा. दुसऱ्या शब्दात खमीस.
बाराबंदी :- पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा, जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू
शर्टसारखा आकार असायचा, त्याला बटण नसायची, बटणा ऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर
केला जायचा. तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला बाराबंदी म्हणत.
शेकरण ( सावन ) :- पूर्वी घरे कौलारू होती. तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून
दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची अणि जे कौलं फुटलेले आहे त्या ठिकाणी नविन कौलं लावायचे,
त्याला शेकरण म्हणत.
हिसकी :- खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू
दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला हिसकी म्हणतात.

 

कोळप :- पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा
उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

फड :- फड तीन प्रकारचे असतात…! जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड, जेथे कुस्त्या चालतात
त्याला कुस्त्यांचा फड, जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात.
पास :- पूर्वी शेतातील तण, गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन
जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत, तण
मरून जाते.
वसाण :- शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची
जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत.
उंडकी :- पूर्वी पेरतांना तीन किंवा चार नळ असायचे. पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर
त्याला उंडकी म्हणायचे.
आडणा :- वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवे लाकूड लावले जायचे, जेणेकरून दरवाज्याचे
दार जोरात ढकलले तरीही उघडू नये.
फण :- कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी छिद्र असतात त्यात फण बसवला जातो. फणाला मध्येच
एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून
बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडते. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर
लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.
भूयट्या ( वखर ) :- जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभे न राहता
मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचे. त्याला भूयट्या म्हणतात.
रूमण :- औत भूयट्या चालवतांना दिंडाला मधोमध एक छिद्र असते. त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो
व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवे लाकूड लावले जाते. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.
त्याला रूमण म्हणतात.
उभाट्या :- जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवले
जाते त्याला उभाट्या म्हणतात.
खांदमळणी :- बैलांचा महत्त्वाचा सण ( पोळा ) बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामे खरीपाची पेरणी ही
का उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट
केलेले मेअसतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला
असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.
कंडा :- पोळाबेंदरा ) च्या दिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या
गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.
चाळ :- बैलाच्या माने एवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला

चाळ म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language - बैल - पोळा - बैल पोळा - bullock- village india - vb good thoughts - विजय भगत - vijay bhagat
ग्रामीण बोली भाषांतील शब्द – गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – Some Unique Words Used In Villages language 

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

शेंट्या :- बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून
शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.
झूल :- बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते.
त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.
आंबवणी, चिंबवणी ( ओलीत ) :- शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस,
लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते.
रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते
म्हणून दुसऱ्या दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते
त्याला चिंबवणी म्हणतात.
वाफा, सारा :- कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे तयार करतात. वाफा किंवा सारा
म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.
जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहान आकाराचा असतो त्याला वाफा
म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.
मोट :- पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर
करत असत. मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण पन्नास लीटर पाणी बसेल असे भांडे तयार
करायचे, त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा. त्यावर आत मोटे मध्ये उघडझाप होईल
असे झाकण असायचे.
विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवे लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला
जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत. जे आडवे लाकूड असायचे त्याला
एक चाक बसवलेले असायचे. मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा.
(नाडा म्हणजे चांगलाच जाड पन्नास ते ६० फूट लांबीचा कसारा (रस्सा ).
मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची.
त्याला दोन बैल जोडलेले असायचे. बैल धावे वरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची.
मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे. मोट पाण्याने
भरली की नाडा, सोल यांना ताण यायचा. मोट भरली की बैल धावेवरून पुढे हाणायचे.
मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे.
( थारोळं – दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद ) ते पाणी पाटात, शेतात जायचे. पुन्हा मोट मागे बैल
सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिले जायचे.

Some Unique Words Used In Villages language 

पांद ( पांदन ) :- शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता.
व्हाण :- पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत
रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो. खोलगट असून ते बारीक करण्यासाठी
लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.
मांदान :- स्वयंपाक करताना खरकटे पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा.
त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केले जायचे, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हते.
त्या मांदानात खरकटे पाणी टाकले जायचे त्याला मांदान म्हणत.
दुपाकी घर :- मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात. त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा
कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

पडचीटी :- दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो.
वळचण :- घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला
असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.
गुंडगी :- गाडग्याचा सर्वात छोटा अवतार
उतरंड :- घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या.
उतरंडीची रचना सर्वात मोठे गाडगे तळात, नंतर लहान, लहान असे ठेवत दहा,अकरा गाडगी
एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा.
पाभरी :- पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.
कणींग :- कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला
आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे.
कणगूले :- कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त टोपले, पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी
कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

चुलवाण :- उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो
त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो.
काहिल :- काहिल चुलवाणावर ठेवली जाते. ऊसाचा रस तयार झाला की, तो काहिली मध्ये टाकला जातो.
नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो. पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते. वाफा – गूळ तयार
होत आला की, काहिलीला दोन लांब लाकडे अडकवली जातात आणि सात – आठ लोकांनी ती काहिल
ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो.
ढेपाळ :- गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. एक किलो, पाच किलो, दहा किलो अशा वेगवेगळ्या
आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात.
ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.
बलुतं :- पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या.
सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी
आपल्या शेतात जे पिकेल ते थोडे  थोडे प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.
तरवा :- कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा, वांगी, फ्लॉवर, गोबी जे
पाहिजे त्याचे बी पेरले जाते. पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागते. त्याला तरवा म्हणतात.
लोंबी :- गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.
सुगी :- ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला
सूगी म्हणत.
खळं :- कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध
एक लाकूड रोवले जायचे. त्याला तिवडा म्हणत.
माती काढल्यावर तिवड्या भोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची. नंतर त्यावर कणसे
टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभे राहून वाढवायची.
माचवा ( मचान ) :- पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसे आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी
बांधलेला माळा.
वगळ :- ओढ्याचा छोटा आकार.
शिंकाळं :- मांजर, उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही, दूध, तूप हे तुळईला अडकवून
ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेले असते.
गोफण :- शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड – माती
मारण्यासाठी रश्शीपासून तयार केलेली असायची.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

सपार / छप्पर :- जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडे आणि पालापाचोळ्यापासून तयार केलेले घर.
बाटूक :- ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात.
पिशी :- ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात.
झापा :- शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेले असते, त्याला लावायचे दार
म्हणजे झापा.
माळवं :- शेतात केलेला भाजीपाला

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

पावशा :- जरपूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी झाले असेल तर खेडेगावात सर्व मुले एकत्र जमत.
गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे. त्याच्या कमरे भोवती लिंबाचा पाला बांधायचा. डोक्यावर
पाट ठेवायचा. पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे ‘पावशा ये रे तू नारायणा’ हे
गाणे म्हणायचे, मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार
आणि भाकरी चटणी देणार. सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या.
कोठी घर :- वाड्यातले धान्याचे कोठार.
परस :– वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची,
त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची.
पडवी :- वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत.
भंडारी :- घराच्या भिंतीत, खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा
त्याला छोटी दार – कडीकोयंडा असायचा. यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.
आगवळ :- लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा.
वज्री :- आंघोळ करताना अंग घासायची घासणी.
कथळी, केटली  :- चहाची किटली.
चौपाळे :- सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.
बारनी :- खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला बारनी म्हणत.
शेजर :- पूर्वी ज्वारी, बाजरी, आरगड, गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची.
ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला
जायचा त्याला शेजर म्हणायचे.
बुचाड :- पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा,
तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसे, आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली
रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे
याला बुचाड म्हणतात.
ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 
तलंग :- कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.
कालवड ( वासरू ) :- गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड ( घोरी ) म्हणतात.
आणि जर पुल्लिंगी असेल तर खोंड ( गोरा ) म्हणतात.
रेडकू :- म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.
दुरडी ( टोपली ) :- दुरडी कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते. धान्यात माती, 
कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची 
त्यामुळे माती केर – कचरा निघून जातो.
हारा :- कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपले म्हणतात, 
मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.
बाचकं :- धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटे पोते असते त्याला बाचकं म्हणतात.
झोळणा :- पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या, 
फुटाणे, शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडे थोडे खायला द्यायचे. 
झोळणा म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.

 

मोतीचूर :- हा एका ज्वारीचाच प्रकार आहे. परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढऱ्या
लाह्या तयार होतात. लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो. त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत 
म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.

 

वटकावण, सोबणी :- भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या 
बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा 
असायचा. त्यालाच वटकावण किंवा सोबणी म्हणत.

 

खंडी :- 20 मणाची खंडी.

 

मण :- ४० शेराचा मण.

 

पायली :- दोन आडबसीर्या म्हणजे पायली.

 

मापटे :- एक शेर म्हणजे मापटे

 

चिपटे :- दोन चीपटे म्हणजे एक मापटे.

 

कोळव (कुळो ) :- दोन कोळवी म्हणजे एक चीपट.

www.vijaybhagat.com

 

संग्रहित ठेवून संस्कृती जपूया.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here