Sunder Vichar | तुझा साबून स्लो आहे काय ? | छान काही वाचलेले 

0
510
Sunder Vichar | तुझा साबून स्लो आहे काय ? | छान काही वाचलेले 
तुझा साबून स्लो आहे काय - छान काही वाचलेले -Sunder Vichar

Sunder Vichar | तुझा साबून स्लो आहे काय…?
छान काही वाचलेले 

whatsapp वर मला हि पोस्ट आली आणि वाचल्यावर सगळ्या जाहिराती
डोळ्यासमोरून जायला लागल्या… तसेच हि पोस्ट वाचून कान उघड हि झाली….
म्हणूनच तुमच्यासोबत शेयर करीत आहे…. कुणी लिहिले आहे हे कळले नाही…
त्या अनामिक लेखकाला नमस्कार…

आपण आपले हळूहळू किती खर्च वाढवून घेतलेले आहेत…
याची काही कल्पना आहे का…?

सकाळी आपण उठल्यापासून…. टूथपेस्ट मध्ये नमक असायला पाहिजे…
चारकोल असायला पाहिजे… लौंग… दालचिनी…. विलायची…. माहित नाही…
अजून टूथपेस्ट मध्ये काय काय टाकतील..!

दात घासायचे आहेत की… दातांना फोडणी द्यायची आहे…
काय आता माहिती…? आणि बघा… सर्वच टूथपेस्ट हे डेंटिस्ट ने
सुचविलेले नंबर वन ब्रँड असतात…
ते सतत रात्रभर ढिशूंम ढिशूंम करीत असतात….!

जितके संशोधन टूथब्रशच्या ब्रिसल्स वर होतात….
तितके संशोधन तर नासा मध्ये ही होत असतील का….?
कुणास ठाऊक…! दातों के कोनें कोनें तक पहुँचना चाहिए म्हणून…
मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत….

असोत बाप रे… पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथोस्कोप का असतो….!
हे मला आजही समजलेले नाही…!

Sunder Vichar | तुझा साबून स्लो आहे काय…?
छान काही वाचलेले 

आंघोळ करण्याचा साबण वेगळा…. चेहरा धुन्याचा साबण वेगळा….
जेल वेगळे… फेसवॉश वेगळे… बादाम… एलोविरा… दूध…. हल्दी….
आणि चंदन ने आंघोळ तर महारानी क्लियोपेट्राने पण केली नसेल…
पण आता गरीबातली गरीब मुलगी पण सहजच करत आहे…

पूर्वी शिकेकाईने पण काम भागायचे…. नंतर शॅम्पू आला…
त्याही नंतर समजले की… अरे… शॅम्पू के बाद तो कंडिशनर
लगाना भी जरुरी हैं…!

आज असे समजा…. एक वेळ भिंतीला प्लास्टर करणे स्वस्त आहे….
परंतु चेहऱ्याचा मेकअप करणे फार महागात पडते…!
तरीही… तो तर केलाच पाहिजे… नाहीतर तुमचा कॉन्फिडन्स
हा कमजोर होतो म्हणे…
दाग अच्छे हैं… हे इथे का लागू होत नाही…. काय माहित…!

मी गॅस… नो गॅस… करत सगळेच डिओ वापरून बघितले..
तरीही… टेढ़ा हैं… पर मेरा हैं…
म्हणत एकही मुलगी…. कधीच जवळ आली नाही…

खरंच… सीधी बात… नो बकवास…

Sunder Vichar | तुझा साबून स्लो आहे काय…?
छान काही वाचलेले 

केस ही सिल्की असावेत…… चेहरा तजेलदार असावा….
त्वचा मुलायम असावी… रंग हा गोरा असावा…
आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ असावा बस्स….
बाकी शिक्षण… संस्कार… हुशारी…. बाकी सर्व गेले चुलीत…!

मला तर असे वाटते कि…. काही दिवसांतच सगळीकडे
संतूर मुलगी…. कॉम्प्लॅन मुलगा… रॉकस्टार आई.. आणि
फेअर अँड हॅन्डसम बाबा दिसतील….

साबुन ने पण किटाणू ट्रान्सफर होतात… असे म्हणतात…!
( हे म्हणजे…. किडे मारण्याच्या औषधीलाच कीड़े लागण्यासारखे आहे…! )

आता… तुमचा ही साबण हा स्लो असतो…
मग काय… तर धुवत रहा… आणि धुवत रहा….

टॉयलेट धुवायचा हार्पिक हा वेगळाच… बाथरूमसाठीचा वेगळा…!
आणि मग त्यात सुगंधीत वाटावे म्हणून ओडोनिल बसवणे हे ही आलेच हं…
जसे काही मुक्कामच करायचाय बाथरूम मध्ये….

जर हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी…!
जर मशीनने धुणार असाल तर वॉशिंग पावडर ही वेगळी…!
नाहीतर तुमची महाग वॉशिंगमशीन ही बकेट से ज्यादा
कुछ नहीं… वगैरे… आणि हो… कॉलर स्वच्छ करण्यासाठी
वॅनिश तर पाहिजेच हं… आणि कपडे चमकविण्यासाठी
आया नया उजाला… चार बुंदोवाला…. याला विसरून कसे चालेणार…?

अगं पण दुधातील कॅल्शियम त्याला मिळते का…? हा प्रश्न तर
एकदम चक्रावूनच टाकणारा आहे… म्हणजे आदिमानवापासून
जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे महामूर्ख… आणि त्यात
हॉर्लीक्स मिसळवनारे तेवढे फक्त हुशार…!
ह्यांनाच फक्त दुधातले कॅल्शियम मिळते…! आणि त्यावर
मुलाचा हॉर्लिक्स वेगळा… मुलाच्या आई चा वेगळा…
आणि मुलाच्या बाबा चा वेगळा…!

इसको लगा डाला…. तो लाईफ़ झिंगालाला…
म्हणून मी टाटा स्काय लावले तर खरे.. परंतु तो HD नाही आहे..
म्हणून मग मी घरात टिव्ही पाहत असलो की…. लगेच दार
बंद करून घेतो… का माहित कुठूनतरी पाच सात मुले
नाचत नाचत येतील आणि जर अंकल का टिव्ही डब्बा..
अंकल का टिव्ही डब्बा…. तर माझ्या ३०००० च्या टिव्हीला
चक्क डब्बाच करतील… याचीच भीती वाटून जाते…

पहले इस्तेमाल करो…. फिर विश्वास करो… च्या जमान्यात
आपण खरेच इस्तेमाल होत आहोत…. काल घेतलेल्या वस्तू…
एक्सपायर व्हायच्या अगोदरच त्या आऊटडेटेड होत आहेत…!
माणसांचेही तसेच आहे म्हणा…
असो…

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here