Sunder Vichar | जिवंत आईचे श्राध्द
एकदा नक्की वाचा | वाचुन धक्काच बसेल
आई – वडिलांच्या जिवंतपणीच
त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे…
म्हणजेच खरे श्राध्द…!
आज एका मिठाईच्या दुकानात माझा एक मित्र भेटला.
मला म्हणाला आज आईचा श्राध्द आहे…
म्हणून लाडू घेत आहे. आईला लाडू खूप आवडत होते.
मला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला… कारण जेमतेम
१० मिनिटा पुर्वीच माझी आणि त्याच्या आईची भेट झालेली होती.
माझे आई सोबत जवळपास पाच मिनिटे बोलने झाले होते.
आई पण मार्केटला आलेली होती. आता मी काही बोलणार तेवढ्यात…
माझ्या मित्राची आई सामानाचा थैला हातात घेवून मिठाईच्या
दुकानात स्वतःच येवून पोहचली.
आपल्या मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारले….
अरे हि कसली मुर्खा सारखी गंमत करतोस…
मुर्खा आई तर तुझ्या बाजूलाच उभी आहे…
माझा मित्र आपल्या आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत
जोर जोरात हसत म्हणाला… अरे गळया… आईच्या मृत्यू
झाल्यानंतर कावळ्यांना… गायी वासरांना लाडू खाऊ घालण्यापेक्षा
मी आपल्या आईला तिच्या जिवंतपणीच संतुष्ट करी इच्छितो.
माझे असे मत आहे कि… जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा
पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द होय…!
Sunder Vichar, जिवंत आईचे श्राध्द
एकदा नक्की वाचा | Suvichar
मित्रा…
आईला मधुमेह आहे… पण तिला गोड खायला खूप आवडते
म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही ना काही ठेवून जातो…!
जे जे आईला आवडते ते ते मी सर्व आणून ठेवतो.
श्रद्धेनी लोकं मंदिरात जातात… अगरबत्ती लावतात. अरे… मी पण लावतो रे…
कासव छाप अगरबत्ती… आई झोपायला जायच्या आधी… मच्छर पळवायला….
आई दररोज सकाळी धार्मिक पुस्तक वाचायला बसते…
मी दररोज तिचा चष्मा साफ करून देतो…
कारण माझा असा समज आहे कि, देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा…
आईचा चष्मा साफ करण्याने पुण्य अधिकच मिळेल.
मी विचारात पडलो… आणि माझा मित्र आपल्या आई सोबत निघून गेला.
मी तसाच विचार करत घरी आलो… पण मनात मी पुन्हा पुन्हा त्याच
गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच
तथ्य वाटले…
रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो… पूर्वजांच्या नावानी पोटभर
गोड धोड खातो…. पण खरोखरच ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही…
एवढे मात्र निश्चित आहे. त्या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी म्हणून
हि प्रथा असावी… म्हणून त्यांच्या जिवंतपणीच त्यांच्यावर दुर्लक्ष करणे…
म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते.
तसे पहिले तर आई – वडील आपल्या त्यांच्या उतार वयात पैश्यापेक्षा…
फक्त आपल्या कुटुंबात प्रेम आणि एक खरा आधार शोधतात.
या आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे
तणाव असतात…! याची त्यांनाही पुरे पूर जाणीव असते. पण तरीही जी मुले
आपल्या आई- वडिलांची काळजी घेवू शकत नाही त्यांना देवही माफ करणार
नाही.
आज कितीतरी वृद्धः आई – वडील कुटुंबियांकडून अनादर झेलतांना आपण
पाहत असतोच. यावर कवी धर्मेश ची ओळ आहे… आधी माता मग पिता..
मग घेईन प्रभू नाम … मला नकोय दुसरे तीर्थ् धाम…!
संत कबीर असे म्हणतात…
जीते बाप को रोटी नां दे
मरे बाद क्यो पछतांये ||
मुठभर चावल धाबेपर झोककर
कव्वे को बाप बनाये ||
संत तुकोबाराय असे म्हणतात…
भुके नाही अन्न |
मेल्यावरी पिंडदान ||
हे तो चाळवा चाळवि |
केले आपणची ठेवी ||
प्रिय मित्र-मैत्रिणीनो….
मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा
आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी
काहीच कमी पडू देऊ नका…
60+ Quotes On Mother In Marathi |आईचे महत्व सांगणारे सुविचार
आई | छान विचार मराठी | Good Thoughts Marathi | Suvichar