Good Thoughts In Marathi – तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार

0
589
Good Thoughts In Marathi - तीन प्रकारची माणसे - सुंदर विचार

मेलेल्या माणसाला खांदा देणें…
लोकं याला पुण्य समजतात.
परंतु नियतीच्या समोर हतबल झालेल्या
जिवंत माणसाला आधार देतांना
खूप वेळा विचार करतात…!

Good Thoughts In Marathi
तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार

टायटॅनिक जहाज बुडत असतांना मदतीसाठी अगदी शेवटचा उपाय म्हणून
आकाशात प्रकाशाचा बार सोडला…

त्यावेळी तो प्रकाशाचा बार १० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका
जहाजाने पाहीले…. परंतु ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्या जहाज वरील लोकांनी विचार केला की… जर आपण मदतीला गेलो तर
आपले काम सगळ्यांन समोर उघडणार… आपला भांडा फुटणार….
तसेच आपला वेळही जाईल…. आणि नुकसानही होणार…
म्हणुन तो जहाज मदतीला गेला नाही.

Good Thoughts In Marathi
तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार

एक कॅलीफोर्नीया नावाचा जहाज २० किलोमीटर अंतरावर होता…
त्या जहाजाने ही मदतीचा प्रकाश बार पाहीला… परंतु वेळ रात्रीची आहे…!
तसेच वाटेत खुप आईस बर्ग आहेत. आपण उजेड झाल्यावर जाऊ असा
विचार केला आणि ते उजेडात सकाळी गेले.. तो पर्यंत जहाज पूर्ण बुडुन
जवळपास चार – पाच तास झाले होते.

७० किलोमीटर अंतरावर एक कैथरीन नावाचे जहाज होते…
त्या जहाजानेही हा मदतीचा प्रकाश बार पाहीला…
मदतीचा प्रकाश पाहताच तो जहाज लगेच
मदतीसाठी निघाला…

७० किलोमीटर प्रवास करून जो पर्यंत तो जहाज पोहचला…
तो पर्यंत खूप उशीर झाला होता…! तरीही त्यांनी जहाजातील
बुडत असलेल्या चारशे पाचशे लोकांना वाचविले होते…
हे सांगायचे म्हणजे…

Good Thoughts In Marathi
तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार

आपल्याला जीवनात तीन प्रकारची माणसे भेटतात…

पहिले असे असतात की ते त्यांच्या स्वार्थानुसार वागतात…
तुमचा अजिबात विचार ना करणारे….!
दुसऱ्या प्रकारचे लोकं त्यांच्या वेळे नुसार.. तसेच त्यांच्या मनात
आले तर मदत करणारे…!
आणि तिसऱ्या प्रकारचे लोकं ते असतात जे कोणताही विचार न करता…
सरळ तुमच्या मदतीसाठी बेधडक धावत येऊन मदतीचा हात देणारे…!

तुम्हालाही जीवनात नेहमीच तिसऱ्या प्रकारची लोकं
जीवनाचा प्रकाश होऊन भेटो
हीच या प्रकाशाच्या सणाला प्रार्थना.

Suvichar | जीवनावर आधारित प्रेरणादायी सुंदर विचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here