Good Thoughts In Marathi
सुखी संसाराचे रहस्य –
ज्याचे बायकोशी नीट त्याचे घरी सोन्याची वीट
नवरा – बायको सुविचार – सुखी संसाराचे रहस्य |
एकदा एका व्यक्तीने संत कबीरांना सुखी संसाराचे रहस्य विचारले. कबीरांनी त्याला हसत हसत
दुसऱ्या दिवशी दुपारी घरी यायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती संत कबीरांच्या घरी आला. कबीरांनी त्याला बसायला सांगितले. आणि त्याच्या
समोर भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. विना तक्रार तिने तो आणून ही दिला.
थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. कबिरांनी दुध पिऊन म्हणाले. वा…!
मस्त, गोड आहे दूध.
त्या व्यक्ती ला खूप आश्चर्य वाटले…! तो कबीरांना म्हणाला, कबीरजी तुम्ही भर दिवसा कंदिल मागितला.
आणि आत्ता तर दुधात मिठ टाकले असतांनाही दूध गोड आहे म्हणता हे कसे काय आहे.
उत्तर देतांना संत कबीर म्हणाले सुखी संसाराचे रहस्य हेच आहे. मी दिवसा कंदिल मागितला
तरीही तिने त्यात कसलाही दोष न पाहता आणून दिला.
नंतर तिच्या कडून चुकून दुधात साखरे च्या ठिकाणी मीठ पडले तरीही मी तिच्यात दोष न पाहता
गोड म्हणालो. याचा अर्थ असा की मी तिला समजून घेतले व तिने मला समजून घेतले.
हेच सुखी संसाराचे रहस्य आहे.
Good Thoughts In Marathi | सुखी संसाराचे रहस्य | Bayko
नवरा बायको सुविचार |